Monday, 19 April 2021

Sociology Syllabus/Semester II and IV

 

Shivaji University,Kolhapur

Radhanagari Mahavidyalaya,Radhanagari

Syllabus

Year : 2020 -2021

Semester  : 2

Subject : Sociology    Paper No: 2. Applied Sociology  (उपयोजित समाजशास्त्र)

.क्र.

वर्ग

पेपर क्र.

घटक

.

 बी.. 1

 2 .

1.समाजशास्त्रातील सैधातिक दृष्टीकोन:

 प्रास्ताविक, सैधातिक दृष्टीकोन,समाजशास्त्रज्ञाची भूमिका

ऑगस्ट कोम्प्त; जीवन व परिचय

M.N.श्रीनिवास यांचे योगदान

धर्म आणि समाज

कार्ल मार्क्सचे योगदान

.

 बी.. 1.

 2.

2.समाज आणि जनसंपर्क माध्यमे

प्रास्ताविक ,व्याख्या,वैशिष्टे,प्रकार ,

जनसंपर्क माध्यमाचा समाजावर परिणाम

.

 बी..1.

2.

3. आधुनिक समाजातील सामाजिक परिवर्तन

 प्रास्ताविक,अर्थ,

 आधुनिकीकरण व जागतिकीकरण

 आधुनिकीकरण : व्याख्या,वैशिष्टे,महत्व

 जागतिकीकरण : व्याख्या,वैशिष्टे,महत्व

 सामाजिक चळवळी

.

बी..1.

2.

4. समाजशास्त्राची उपयोगिता

   प्रास्ताविक,अर्थ, समाजशास्त्राची उपयोगिता

   सामाजिक धोरण ,वैशिष्टे

   सामाजिक नियोजन ,उद्दीष्टे

                                             

 

 

 

 

 

Shivaji University,Kolhapur

Radhanagari Mahavidyalaya,Radhanagari

Syllabus

                                                                       Year : 2020 -2021

                                                                              Semester : 4

Subject :Sociology  Paper No: 6. Sociology of Health (आरोग्याचे समाजशास्त्र )

.क्र.

वर्ग

पेपर क्र.

घटक

.

 बी..

 6.

Introduction to Sociology of Health

A) Meaning of Nature of Sociology of

Health

B) Subject matter of sociology of Health

C) Importance of Sociology of Health

.

 बी.. .

 6.

 Major Diseases in India

A) Cancer - Causes and Remedies

B) Heart diseases - Causes and Remedies

C) Diabetes - Causes and Remedies

.

 बी...

6.

 Social Dimensions of Health

A) Traditional Dimensions of Health

B) Modern Lifestyle and problems of

Health

C) Remedies on Health Problems

.

बी...

6.

Health Policy in India

A) Health Policy for children and women

B) Health policy for old age

C) Health policy for BPL

 

                                               

 

 

 

 

 

Shivaji University,Kolhapur

Radhanagari Mahavidyalaya,Radhanagari

Syllabus

                                                                       Year : 2020 -2021

                                                                              Semester : 4

Subject :Sociology  Paper No:5. Gender and Violence  (लिंगभाव आणि हिंसाचार  )

 

.क्र.

वर्ग

पेपर क्र.

घटक

.

 बी..

 5.

. लिंगभाव आणि हिंसाचार

  प्रास्ताविक,लिंगभाव अर्थ,लिंगभावविषयक हिंसाचाराचे स्वरूप ,प्रमुख मुद्दे

.

 बी.. .

 5.

. कौटुंबिक हिंसाचार

प्रास्ताविक,अर्थ , हुंडा प्रथा , कारणे,उपाय,,घटस्फोट कारणे आणि उपाय

  

.

 बी...

5.

 . स्त्रियांविरोधातील अत्याचार

आदिवासी महिला ,ग्रामीण महिला,नागरी महिलांवरील अत्याचार व उपाययोजना

.

बी...

5.

 . कामाच्याठिकाणी स्त्रियांचा होणारा छळ

स्त्रियांचा छळ,प्रकार , विशाखा मार्गदर्शक कायदा २०१३

 

 

 

 

 

 

 

Shivaji University,Kolhapur

Radhanagari Mahavidyalaya,Radhanagari

Syllabus

Year : 2020 -2021

Semester : 4

Subject :H.S.R.M.  Paper No:2. HISTORY OF SOCIAL REFORMS IN MAHARASHTRA  (महाराष्ट्रातील समाजसुधारणेचा इतिहास )

.क्र.

वर्ग

पेपर क्र.

घटक

.

 बी..

2.  

.प्रारंभीची सामाजिक सुधारणा

  सामाजिक सुधारणा चळवळीच्या अगोदरच्या समाजजीवन ,१९ व्या शतकाच्या सुरुवातीची सामाजिक परिस्थिती , परमहंस सभा,प्रार्थना समाज ,महर्षी वि.रा.शिंदे.

.

 बी.. .

 2.

. महिला सुधारक

सावित्रीबाई फुले ,ताराबाई शिंदे ,पंडिता रमाबाई

  

.

 बी...

2.

 . सामाजिक सुधारक

लहूजी साळवे यांचे कार्य ,महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे कार्य.संत गाडगे महाराज यांचे कार्य ,अण्णाभाऊ साठे यांचे कार्य

.

बी...

2.

 . शेक्षणिक सुधारक

कर्मवीर भाऊराव पाटील,शिक्षणमहर्षी बापुजी साळोखे ,स्वामी विवेकानंद ,पंजाबराव देशमुख

 

 

 

 

बी ए भाग ३ / मराठी पेपर क्रमांक ११ /सञ -पाचवे / वाड:मय प्रवाहाचे अध्ययन: मध्ययुगीन

वाड:मय प्रवाहाचे अध्ययन: मध्ययुगीन

१ महानुभाव पंथाचे संस्थापक पुढीलपैकी कोण आहेत?

अ)श्रीचक्रधर स्वामी ब) केसोबास क)म्हाइंभट ड)श्री नागदेवाचार्य

२ दृष्टांतपाठ या ग्रंथाची निर्मिती पुढुलपैकी कोणत्या ग्रंथावर आधारित आहे?

अ)सुञपाठ ब)लीळाचरिञ

क)स्मृतिस्थळ

ड)सातीग्रंथ

३पुढीलपैकी कोणता ग्रंथ संस्कृत भाषेत आहे?

अ)सूञपाठ 

ब)रत्नमालास्तोञ

क)स्मतिस्थळ 

ड)मूर्तिप्रकाश

४केसोबास यांचा पुढीलपैकी कोणता ग्रंथ संस्कृत भाषेत आहे?

अ)सुञपाठ 

ब)रत्नमाला स्तोञ

क)स्मृतिस्थळ

ड)मूर्तिप्रकाश

५दृष्टांतपाठ हा ग्रंथ ......

अ)चरिञग्रंथ आहे

ब)ञिस्तरीय आहे

क)द्बिस्तरीय आहे

ड)संस्कृत भाषेत आहे

६ दृष्टांतपाठ या ग्रंथाचा रचनाकाळ पुढीलपैकी कोणता आहे?

अ)इ स १३६०

ब)इ स१३६४

क)इ स १३६८

ड) इ स १३७२

७दृष्टांतपाठ:निवडक दृष्टांत या संपादित ग्रंथात पुढीलपैकी कोणत्या व्यवसायाचा उल्लेख आढळत नाही ?

अ)शेती 

ब)लोहारकाम

क)नाभिक

ड)गूळ करणे

८दृष्टांतपाठ या ग्रंथाची रचना पुढीलपैकी कोणत्या राजाच्या राजवटीत झाली?

अ)सिंदेराजा

ब)यादवराजा

क)राजा चंद्रगुप्त

ड)गोविंदराजा

९ दृष्टांत हत्तीचा मध्ये हत्ती पाहायला पुढीलपैकी कोण गेले असा उल्लेख आहे?

अ)बालके

ब)थोटे

क)लंगडे 

ड)जन्मांध

१० दृष्टांत साकरेचा मध्ये श्री चक्रधर स्वामींनी कोणता दृष्टांत दिला आहे

अ)साखर होणे  चांगले की साखर खाणे चांगले

ब)साखर होणे चांगले की साखर असणे चांगले

क)साखर बनविणे चांगले की साखर खाणे चांगले

ड)साखर कमी खाणे चांगले की जास्त खाणे चांगले

   उत्तरे

१-श्रीचक्रधर स्वामी

२-लीळाचरिञ

३-स्मृतिस्थळ

४-रत्नमाला स्तोञ

५-ञिस्तरीयआहे

६-इ,स.१३६८

७-नाभिक

८-यादवराजा

९-जन्मांध

१०-साखर होणे चांगले की साखर खाणे चांगले

Friday, 11 December 2020

बी. ए. भाग :२ /मराठी अभ्यासकक्रमपञिका क्रं४/ सञ:३/ पाठ्यपुस्तक:काव्यगंध / कविता:जातीय दंगल :१२भानगडींची१३वळणे-अजीम राही

बी. ए. भाग :२

मराठी अभ्यासकक्रमपञिका क्रं४

सञ:३

पाठ्यपुस्तक:काव्यगंध

विषय प्राध्यापक:प्रा. बी. के. पाटील

कविता:जातीय दंगल :१२भानगडींची१३वळणे-अजीम राही

        'जातीय दंगल:१२भानगडींची१३ वळणे :दंगलीची भीषणता.

     या कवितेत दंगलीची भीषणता कवी व्यक्त करतात. माणसं एकमेकावर गुरगुरु लागली की दंगल जवळ आली असं समजाव असं ते म्हणतात. जातीयदंगलीच्या राञीचे भयाण वर्णन करताना ते म्हणतात, समष्टीच्या झाडाचा मोहर गळतो आणि मेंदूत कळकट विचार थैमान घालतात. दंगलीत लोकांची भाषाही बदलते.सगळे गावच दहशतीने पोखरुन गेले आहे. पशुपक्षी यांच्याही जीवनावर दंगल परिनाम करते.

        गावात एरवी एकोपा असतो.सामंजस्य, समन्वय असतो. पण दंगलीच्या राञी हे सगळे संपते.या राञी विसंवादाचे रक्त भळाभळा वाहू लागते. जखमांचा मोसम येतो. या दंगलीच्या राञी कवीने काय करावं असा प्रन्न अजीम राही यांना पडतो. कविता जाळून कवीने दगडफेकीत सामील व्हावं की काय? सगळं सौजन्य गळून पडतं गावाचं आरोग्य बिघडतं अन कुटिल कारवाया कळस गाठतात.

   माञ शेवटी कवी म्हणतात:

"मंदिरावरचा कबुतरांचा थवा

मशिदीच्या घुमटावर येऊन विसावतो".

     या ठिकानी कवी आशावाद सूचित करतो. दंगलीत सामान्य माणसे कशी होरपळतात याचे वास्तव वर्णन कवी करतो. दंगलकाळातील गावाची वेगवेगळी रुपे कवी शब्दबध्द करतो.

        या कवितेतील शब्द फार वेगळे व अर्थपूर्ण आहेत उदा.शब्दांचे थवे पसार होणे,समष्टीच्या झाडांचा मोहर झडणे, विवेकाची मळवाट ओस पडणे,मणुसकीचे व्याकरण विसरणे इ. हे नवे वाकप्रचार दंगलीची भयानकता वाढवतात

बी. ए. भाग :२/ मराठी अभ्यासक्रमपञिका क्रं: ४/ पाठ्यपुस्तक :काव्यगंध./सञ:३/ घटक:३ /अजीम नवाज राही(वंचितांची कविता) / कवी अजीम राही यांचा परिचय.

बी. ए. भाग :२

मराठी अभ्यासक्रमपञिका क्रं: ४

पाठ्यपुस्तक :काव्यगंध.सञ:३

विषय प्राध्यापक :प्रा. बी. के. पाटील घटक:३ अजीम नवाज राही(वंचितांची कविता)

        कवी अजीम राही यांचा परिचय.

           कवी अजीम राही यांचा जन्म१मे१९६५ रोजी झाला.बुलडाणा जिल्हा सिंदखेड राजा तालुक्यातील सावरखेर्डा हे त्यांचे मूळ गाव आहे. ते आठवी पासून मराठी माध्यामात  शिकले.याचा परिणाम दहावीत ते मराठी भाषेच्या पेपरमध्ये नापास झाले व त्यांचे शिक्षण तेथेच थांबले.

  पण मराठीत नापास झालेल्या या कवीच्या कविता कालांतराने दहावी मराठी भाषेच्या पाठ्यपुस्तकासाठी निवडल्या गेल्या दुष्काळ व पडझड या त्या कविता होत.

      गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली डाॅ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद, संत विद्यापीठ अमरावती,त्याच्या कविता अभ्यासाला आहेत.

     अजीम नवाज राही यांच्या कवितांचे इंग्रजी व हिंदी अनुवाद झाले आहेत.

   राही यांना मिळालेले पुरस्कार :

            *महाराट्र फाऊंडेशन

             *महाराट्र शासनाचा कवी  केशवसुत पुरस्कार

* इंदिरा संत काव्य पुरस्कार

*नारायण सुर्वे काव्य पुरस्कार

*लोकमत साहित्य पुरस्कार

*शरच्चंद्र मूक्तिबोध पुरस्कार

*कवी कुसुमाग्रज पुरस्कार

    *प्रकाशित कवितासंग्रह*

*व्यवहाराचा काळा घोडा

*कल्लोळातला एकांत:२०१२

*वर्तमानाचा वतनदार:२०१७

    कवी सावरखेडा येथे पैनगंगा सह. सूत गिरणीॅत काही काळ जनसंपर्क अधिकारी होते.

     सध्या ते सावरखेडा येथेच वास्तव्याला आहेत.

        दुष्काळ: काही दाहक संदर्भ:कवी अजीम राही यांच्या जीवनावर-भोवतालावर झालेला परीणाम

        " दुष्काळ:काही दाहक संदर्भ" या कवितेत दुष्काळाचे ह्रदय पिळवटून टाकणारे वर्णन येते. कवी जेथे राहतात त्या बुलडाणा जिल्यातील परीसरात सततच दुष्काळच दिसतो, या दुष्काळाचा कवीच्या जीवनावर परिणाम झाला आहे. तिथला निसर्ग शेतीभाती, पशुपक्षी यावरही दुष्काळाच्या झळा दिसतात.

      करपलेले गवत, आटलेल्या विहिरी,तळ शोधणारी धरणे  या मुळे कवीचे मन अस्वस्थ होते,रानातून उपाशीपोटीच गायीगुरे आली आहेत. व्याकूळ वासरे हंबरत आहेत. घरे दुष्काळाच्या झळांनी उदासवाणी दिसत आहेत. वसती समस्यानी घेरलेल्या आणि काळोखात बुडाल्या आहेत. सगळ्या भवतालला वेढून असलेली उदासी कवीच्या मनालाही वेढून घेते. 

     कवी म्हणतात:

" पारावरच्या म्हातार्‍या कुतार्‍यांच्या चर्चा गप्पा

क्षीण डोळ्यात भाकरीची आकृती"

       कवी तपशिलात जाऊन दुष्काळाचे वर्णन करतो, कूवळ पशुपक्षी नव्हेत तर म्हातारे व मुलेही दुष्काळाने कसनुसे झाले आहेत. म्हातार्‍या माणसांच्या क्षीण डोळ्यात भाकरीचे स्वप्न करपले आहे तर लहान मुलांच्या चेहर्‍यावर भीती आहे ती बालपनच विसरुम गेली आहेत. 

        बारीकसारीक तपशिलामुळे दुष्काळाची दाहकता वाचकांच्या अंगावर येते जे भोगले ते तसे थेटपणे मांडणे ही या कवीची भूमिका आहे.

       थोडक्यात कवी स्व:च्या जीवनावर आणि भवतालावर दुष्काळाचा कोणता परिणाम झाला ते व्यक्त करतात.

बी. ए भाग २/ सञ : ३ / मराठी अभ्यासक्रमपञिका क्रं ४ / पाठ्यपुस्तक : काव्यगंध / वास्तववाद : भयभीत वर्तमानाला आणि अस्वस्थ भोवतालला दिलेली प्रतिक्रिया

 बी. ए भाग २ 

 सञ  : ३ 

  मराठी अभ्यासक्रमपञिका क्रं ४

  पाठ्यपुस्तक  : काव्यगंध

  विषय प्राध्यापक : प्रा. बी. के. पाटील

      वास्तववाद : भयभीत वर्तमानाला आणि अस्वस्थ भोवतालला दिलेली प्रतिक्रिया.

         वास्तववाद ही कविता भयभीत आणि अस्वस्थ भोवतालला दिलेली प्रतिक्रिया आहे. 

    "जी बीजे पेराल, तशी पिकं निघतात.

       तिरस्कार, घृणा, हिंसा यांची बीजे पेराल तर

        रक्तानं रंगलेल्या पिकांची कापणी करावी लागेल

          आणि खळ्यात तुडवल्या जातील उदध्वस्त वस्ता" 

   असे कवी म्हणतात.

         आज जगभरात द्बेष, हिंसा यांचेच राजकारण दिसते.काही व्यक्ती मुद्दामच वंश, धर्म यांचा आधार घेतात आणि माणसामाणसात भेद निर्माण करतात. प्रेम दिल्याने प्रेम वाढते ही शिकवण जणू विसरुनच गेली आहे. सुंकुचित अस्मितांचे मुद्दे पुढे करुन माणसामाणसातील दरी वाढविण्याचे काम सुरु आहे.हेच वास्तव आज कवीला अस्वस्थ करत आहे. कवी डहाके याकडे मोठ्या गंभीर नजरेने बघतात.

   शेतात आपण जे पेरतो तेच उगवते त्याच प्रकारे हिंसा आणि द्बेष यांची पेरणी करुन त्याचेच पीक काढणारे काही जण आहेत. त्यांचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे असे कवीला वाटते. 

   समाजात  एकोपा असावा. एकमेकात प्रेम - जिव्हाळा असावा असे कवीचे स्वप्न आहे समताधिष्ठित समाज निर्माण करावा असे कवीला वाटते  पण असे वाटणार्‍यांची संख्या फारच कमी आहे.

      समाजात समता असावी असे वाटणार्‍या लोंकांच्या विचाराचे कोंब खुडले जात आहेत. माणूसपण धोक्यात आणले जात आहे 

    असे एक दाहक वास्तव ही कविता वाचकांच्या समोर आणते वाईट गोष्टी टाळून वास्तवाचा हा विस्तव हातात घेऊन काटेरी रानातून जायचे आहे आणि तो पुढच्या पिढीकडे सोपवायचा आहे.

      पण हा विस्तव सकारात्मक कामासाठी वापरायला हवा अशी कवी सुचना  करतात.

    

अशी ही कविता वास्तववाद एक भीषन वास्तव वाचकासमोर उभे करणारी, धोक्याची सुचन करणारी कविता आहे.

BCOM_AEC

https://drive.google.com/file/d/1F1IRMakowHOCmho9iSvSdqoPKh2SWmVe/view?usp=sharing