Saturday, 1 May 2021

बी. ए. भाग २ / मराठी पेपर क्रं ६/ सञ ४/ जुगाड (कादंबरी)

 बी. ए. भाग २

मराठी पेपर क्रं  ६

सञ  ४

जुगाड (कादंबरी)

       - किरण गुरव

विषय शिक्षक -प्रा. बी के पाटील.

 योग्य पर्याय निवडा  

१)  किलन अनलोड केले म्हणून चेअरमनसाहेब का चिडले ?

अ)  कारण पूजा करायच्या आधी ते उतरले म्हणून

ब) कारण त्यांच्या अनुपस्थित उतरले म्हणून

क) कारण त्याना न कळवितावू उतरले म्हणून

ड) कारण त्यांच्या शुभहस्ते उतरायचे होते म्हणून.

२)  राधामाईच्या सिव्हिल इंजिनिअर पदावर कोण  होते ?

अ) शशा

ब) सीमा देसाई

क)  डुणूंगसाहेब

ड)  जय

३)  साईटवर शशा कुठे जेवत असे  ?

अ)  भोपे मेसमध्ये

ब)  जयच्या घरी

क)  विठ्ठल टी हाउसमध्ये

ड)  सीमाच्या घरी.

४)  साईटवर कोणती वेळ शशाची विशेष आवडती होता ?

अ)  पहाटेची

ब)  सकाळची

क)  दुपारची

ड)  मावळतीची

५)  कारखान्याच्या बाॅयलरला साईटवर काय म्हणतात ?

अ)  चिमणी

ब)  बाॅयलर

क)  बाय

ड)  धुरका

६)  राधामाईने कोणता प्रकल्प सुरु केला होता ?

अ)  बाॅक्साईटचा

ब)  रेझीनचा

क)  आॅईल पेंटचा

ड)  स्टोन क्रशरचा

७)  राधामाईच्या साईटवरची' मेमसाब' कोण होती ?

अ)  सीमा चव्हाण

ब)  सीमा देसाई

क)  सीमा पाटील

ड)  सीमा शेळणोलीकर

८)  राधामाईच्या साईटवरची शशाची पोस्ट कोणती होती ?

अ)  साईट डिप्लोमा होल्डर

ब)  साईट इंजिनिअर

क)  असिस्टंट साईट इंजिनिअर

ड)  हेल्पर साईट इंजिनिअर

९)  शशाचे शिक्षण काय झाले होते ?

अ)  सिव्हिल पदविका

ब)  केमिकल पदविका

क)  मेकॅनिकल पदविका

ड)  ईलेट्रिक पदविका

१०)  सीमा देसाई मेमसाबचा शशावर राग का होता ?

अ)  कारण त्याला जास्त पगार दिला म्हणून

ब)  कारण तो नंतर येऊन तिचा बाॅस झाला म्हणून

क)  कारण तो तिच्याकडे वाईट नजरेने पाहायचा म्हणून

ड)  कारण तो तिला ञास द्यायचा म्हणून

उत्तरे ...............

 योग्य पर्याय÷ ÷ ÷ ÷ ÷ 

१)  अ)  कारण त्यांना पूजा करायच्या आधी ते उतरले म्हणून

२)  ब)  सीमा देसाई

३) क)   विठ्ठल टी हाउसमध्ये

४)  ड)  मावळतीची

५)  अ)  चिमणी

६)  अ)  बाॅक्साईटचा

७)   ब) सीमा देसाई

८)   ब)  साईट इंजिनिअर

९)   क)  मेकॅनिकल पदविका

१०)  अ) कारण त्याला जास्त पगार दिला म्हणून

बी. ए. भाग -१ / सञ - २ / अभ्यासक्रमपञिका २ /पाठ्यपुस्तक : अक्षरबंध/ बाकी सर्व ठीक आहे(निवडक कविता) -कवी लोकनाथ यशवंत

 बी. ए.  भाग -१

सञ  - २

अभ्यासक्रमपञिका  २

पाठ्यपुस्तक :     अक्षरबंध                    बाकी सर्व ठीक आहे(निवडक कविता)

   -कवी लोकनाथ यशवंत

विषय प्राध्यापक - प्रा. बी. के. पाटील.

कविता -राग - योग्य पर्याय निवडा.

१)   सरकारला  कोणत्या बाबींकडे लक्ष द्यायला वेळ नाही असे कवी'राग' या कवितेत म्हणतात

अ)  दुष्काळाकडे

ब)   कुपोषणाने मरणार्‍या मुलांकडे

क)   सुशिक्षित बेकारांकडे

ड)   वाढत्या लोकसंख्येकडे

२)  ' राग ' या कवितेत कुपोषणाने बालकांचे मृत्यू होत असूनही कोण आनंदात आहेत असे कवी म्हणतात ?

अ)  बालकांचे पालक

ब)  सरकार

क)  एनजीओवाले

ड)  सरकारी अधिकारी

३)  कुपोषित बालकांच्या प्रश्नाबाबत डाॅक्टरसाहेबांशी बोलत असतांना ते काय म्हणाले ?

अ)  त्यांनी शहरात मुख्य धारेत यावे

ब)  त्यांनी कुटुंबनियोजन करावे.

क)  कुपोषित ही सरकारची जबाबदारी नाही.

ड)  कुपोषितांनी आपले उत्पन्न वाढवावे.

४)  ' कुपोषितांनी शहरात मुख्य धारेत यावे ' या डाॅक्टरसाहेबांच्या बोलण्यावर कवी काय म्हणाले ?

अ)  त्यांना नोकर्‍या द्या.

ब)  त्यांना शिक्षण द्या.

क)  त्यांना तुमच्या वातानुकूलित 

घरात आणून ठेवतो

ड)  त्यांना नजरपालिकेसमोर उपोषणाला बसवितो.

५)  ' कुपोषितांना तुमच्या वातानुकूलित घरात आणून ठेवतो ' या कवीच्या उत्तरावर डाॅक्टरसाहेबांची काय प्रतिक्रिया होती ?

अ)  ते चकितच झाले.

ब)  ते कवीशी भांडले.

क)  ते कवीला शिव्या देऊ लागले.

ड)  ते आत कवीकडे बघतच नाही.

उत्तरे :- 

 योग्य पर्याय.............,,

१)  ब)  कुपोषणाने मरणार्‍या मुलांकडे

२)  क)  एनजीओवाले

३)   अ)  त्यांनी शहरात मुख्य धारेत यावे.

४)   क)  त्यांना तुमच्या वातानुकूलीत घरात आणून ठेवतो.

५)    ड)  ते आता कवीकडे बघतच नाहीत.

राधानगरी महाविद्यालय, राधानगरी/ बी. ए. भाग ३ /सञ ६/ पेपर क्रमांक : १६ / पाठ्यपुस्तक : वाड:मय प्रकाराचे अध्ययन :ललित गद्य : व्यक्तिचिञे व्यक्तिचिञ : निळू मांग

राधानगरी महाविद्यालय, राधानगरी

बी. ए. भाग ३

सञ  ६ पेपर क्रमांक :  १६

पाठ्यपुस्तक : वाड:मय प्रकाराचे अध्ययन :ललित गद्य : व्यक्तिचिञे

व्यक्तिचिञ :  निळू मांग.

विषय प्राध्यापक प्रा. बी. के. पाटील

 निळू मांग :        

                प्रस्तावना:-

                               अण्णाभाऊ साठे यांच्या" निळू मांग " या व्यक्तिचिञाचा विचार करण्यापूर्वी या लेखकांची जीवनधारणा आणि लेखनप्रेरणा या विषयी .....

        अण्णाभाऊ साठे यांनी ज्या दलित आणि शोषित समाजाचे दु:ख ,वेदना आणि संघर्श यांचे चिञण केले त्यातून ते स्वत: गेले आहेत. अर्थातच अनुभूतीची धार या लेखनाला लाभली होती. १९४९ मध्ये ' मशाल' या साप्ताहिकात त्यांची 'दिवाळी 'ही कथा प्रसिध्द झाली.  तेथून ते लिहितच राहिले.  संघर्ष हा त्यांच्या जीवनाचा स्थायीभाव होता. अस्पृश्य ही काय चीज असते ही त्यांनी स्वत: अनुभवलेली होती.  प्रतिकूल परिस्थितीत त्यांना औपचारिक शिक्षण घेता आले नाही.प्रखर जीवनानुभूती ही त्यांची शाळा ठरली. तीच त्यांची प्रयोग शाळाही ठरली. अत्यंत प्रतिकुलतेच्या परिस्थितीच्या मुशीतून त्यांची साहित्यसंपदा निर्माण झाली. पस्तीस कादंबर्‍या आणि तेरा कथासंग्रह लिहिले. तमाशा आणि नाटके लिहिली." माझा रशियाचा प्रवास" हे प्रवासवर्णन लिहिले

 आपल्या लेखनप्रेरणाविषयी अण्णाभाऊ साठे म्हणतात, "मी जे जीवन जगतो , पाहतो, अनुभवतो तेच मी लिहितो. मला कल्पनेची भरारी मारुन लिहिता येत नाही...... माझी सारी पाञे या ना त्या नात्याने माझ्या आयुष्यात येऊन गेली आहेत माझी माणसं वास्तवातली आहेत, जिवंत आहेत.  मुंबईत ओझेवाला , हमाल , नाका कामगार, मिल कामगार असे जीवन जगावे लागले. त्याचेच प्रतिबिंब  त्यांच्या  पाञचिञणात पडलेले दिसून येते.

     "निळू मांग "  ही व्यक्तिरेखा  अण्णाभाउ साठे यांनी  सोप्या भाषेत साकार केली आहे. छोट्या वाक्यातुन त्यांचे निवेदन पुढे सरकते त्या व्यक्तिरेखांचे कंगोरे त्यांच्या चिञणातून साकारतात. 

    अनुभवाला भिडणारे निवेदन पहा .......

" तोफ तयार झाली . गोळा भरला होता. बत्तीवाला बत्ती घेऊन पुढे आला आणि तै साजुरचा निळू मांग  काळी टोपी  घेऊन तोफेकडे चालू लागला त्याचा प्रत्येक पाऊल मजबूत पडत होतं. तो निर्भय होता. त्याला कसलीच भीती नव्हती. तो सरळ तोफेशु जाऊन उभा राहिला. "

      वरिष्ठ अधिकारी कनवाळू स्वरात निळूला उद्देशून म्हणतो, " आता तू प्रभूकडे जाणार, जर तुला बोलायचे असेल तर बोलून घे आता तू मरणार. जगातून जाणार. तुझा शब्द आता उमटणार नाही. बोल, काही इच्छा असेल तर सांग. "

      आपल्याला तोफेच्या तोंडाशी देणारी ही माणसे आपल्या आयुष्याच्या  शेवटच्या घडीला अशी सहानुभूतीच्या स्वरात बोलतात याचे निळू  मांगाला आश्चर्य वाटते.

 अण्णाभाऊ साठे यांनी मोजक्या शब्दात निळू मांगाचे शब्दचिञ  उभे केले आहे.

 " साजूर गावात निळू मांग एक सज्जन , गरीब माणूस म्हणून ओळखला जात होता. प्रत्येक माणूस निळूला मान देत होता. निळु कोणाची थुंकी ओलांडत नव्हता. भरपूर उंची, अंगात भरपूर बळ रंगानं सावळा नि चेहर्‍यानं तो गावात उजवा होता. त्याच्या वयाला नुकतच बाविसावं लागलं होतं पण तो शांत होता. त्याला फक्त आई होती. आईनच त्याला जगवून वाढवलं होतं लहानापासून वृद्धापर्यत सर्वच लोक  निळूला चांगला माणूस म्हणत होते.  अब्रुदार म्हणून त्याची गावात  ख्याती  होती. "

    व्यकटेश माडगुळकरांच्या 'रामा मैलकुली' या व्यक्तिचिञातील वर्णनशैलीशी येथे कांहीसे साधर्म्य दिसते. निवेदन आणि पाञसंवाद यांच्या संयोगातून वातावरण निर्मिती करणे लेखकाला चांगल्या प्रकारे साधलेले आहे. ग्रामीण परिसरातील दलित वस्तीचे हे चिञ आहे

      भिमा पाटलाच्या मक्याचे राखण करण्याचे काम निळू मांगाकडे येते. तो ते इमानइतबारे करतो. त्याचे अनेक तपशील या व्यक्तिचिञणात येतात.

    याव्यक्तिचिञणाला कथात्मक वळण मिळते. संघर्षाची धार कथानक प्रवाहाला प्राप्त झाली आहे.

 सरकारी खजिना लूटुन राजद्रोह करणारा निळु मांग  हा भयंकर गुन्हेगार मानला जात होता. त्याला क्षमा  नव्हती.

     या पुढे या व्यक्तिचिञणाला  वेगळी कलाटणी मिळते तो न्यायमूर्तीना सांगतो, "सरकार, मायबाप मी निळ्या मांग. मी साजूरात तंबाखु मागून खाणारा तुम्ही माझी  किंमत तोफेच्या  गोळ्याच्या किंमतीची ठरवल्याबद्दल मी तुमच्या पायावर डोकं ठवतो. "

        तोफेपुढे उभे राहून निळू मांग गतायुष्याचे अवलोकन करत उद्दगारतो, "सायब मी काय बोलू ? आता मी मरणार . बोलण्यासारख माझ्याकडं  काईच न्हाय. तुमी मला लवकर वाटेला लावा. संपू द्या. एकदाची ही कटकट. "

      निळू मांगाची शिक्षा रद्द होते. त्याच्या ध्येयामुळे आणि मृत्युला कवटाळण्याच्या बेगुमान वृत्तीमुळे न्यायमूर्ती चक्रावतात.

सारांश :- 

           सामान्य माणसाला असामान्यत्व प्राप्त करुन देण्याची किमया लेखकाच्या लेखणीत असते. "निळू मांग " या व्यक्तिचिञातून ते अधोरखित झाले आहे.वास्तव जीवनदर्शनाचा उत्कृष्ट नमुना म्हणून या व्यक्तिचिञाकडे पाहता येईल.

बी. ए. भाग 2 /सेमीस्टर 4 / पेपर 6/ उपयोजित मानसशास्त्र / टॉपिक 1 ताबा घेणे / पदभार स्वीकारणे

बी. ए. भाग 2 सेमीस्टर 4

पेपर 6 उपयोजित मानसशास्त्र

टॉपिक 1 ताबा घेणे / पदभार स्वीकारणे

 

1)  ……….. …नियंत्रण केंद्र म्हणजे ज्यामध्ये व्यक्तीचा असा विश्वास आहे की जीवनातील घटनावर

 त्यांचे किंवा तिचे पूर्ण नियंत्रण आहे

A.  बाह्य

B.      अंतर्गत

C.      सामजिक

D.      सांस्कृतिक

2)       सवेदित नियंत्रण उच्च असणाऱ्या व्यक्ती…………चिंताग्रस्त असतात

A.  A.कमी

B.      जास्त

C.      मध्यम

D.  अति जास्त

3)  साभोवतालच्या उद्दिपकाना अनुसरून प्रत्येक व्यक्ती …………….. देते

A.  क्रिया

B.  समायोजन

C.  प्रतिक्रिया

D.  पारितोषिक

4)  …………… या साशंशोधकाने 1974 मध्ये स्वनियंत्रण संकल्पनेचा विकास केला

   À . फेस्तिजर

   B. स्मिथ

   C.स्नायडर

   D. युंग

     5) ……….. यांनी'संपादीत असहायता'या समस्येचा विस्तृतपणे अभ्यास केला

        A. सेलीगमन

         B. बंडूरा

       C. पीटरसन

       D. स्टँन

 6) व्यक्तिगत नियंत्रण म्हणजे …………. परिणामाची जबाबदारी स्वतःकडे घेणे

    A. वर्तमानकालीन

    B. संभाव्य

    C. असंभाव्य

    D. शक्य

7). …………….. हा विविध सकारात्मक परिणामशी आज की जोडलेला आहे

    A. निराशावाद

    B अशावाद

    C निर्णयन

    D प्रतिरोध

8) ………….. यांच्या मते संवेदित नियंत्रण उच्च असणाऱ्या व्यक्ती कमी करतात

   A. फँरेस

   B. फेस्टीनजर

   C. फ्रॉइड

   D स्किनर

9) ………....  यांच्या मते उच्च संवेदित नियंत्रण असणाऱ्या व्यक्तीचे समायोजन अधिक चांगले असते

   A.अँने ओलेरी

   B.फेस्टीनजर

   C.मँस्लो

   C वँटसन

10) संपादित आशावाद ही संकल्पना ………………… यांनी स्पष्ट केले

    A सेलिगंमन

    B स्नायडर

    C स्किन्नर

    D.मँकडुगल

11) बचावात्मक निराशेचा वारंवार वापर करणाऱ्या व्यक्तीचा …………… कमी होतो

    A. बुद्धिगुणांक

    B. स्व आदर

    C. चिंता

    D. ताण

12) वैयक्तिक वाढीसाठी …………... महत्वाचे असतात

    A. चिंता

    B. ताण

    C.निराशा

    D निर्णाय

13) मूल्याविषयाच्या गोंधळामुळे बरेच  …………….….उद्भवतात

    A. अजार

    B. संघर्ष

    C निर्णय

    D आनंद

14) आपल्याकडून निर्णय घेतला जात नाही यालाच ……………..म्हणतात

   A. प्रतीगमित्वा

   B. पुरोगामित्व

   C. सुधारणावादी

    D उदारमतवादी

15) खेदजनक निर्णयामध्ये कमीत कमी .......... घटक असतात

    .A.3

     B.4

     Ç.6

     D.2

16)………………यांनी प्रत्यक्ष निर्णयोपचार पद्धती विकसित केली

     A  हॅरोल्ड ग्रीनवाँर्ल्ड

     B. स्टँन्ले हाँल

     C. मार्टिन सेलिगमन

     D. जेरी फँरेस

17) प्रतिकूल वर्तनावर मात करण्यासाठी …………… निर्णय घेण्याची प्रेरणा महत्त्वाची असते

           A. अनुकूल

            B. विरोधी

            C. झटपट

            D. सावध

18 )ग्रीनवाँर्ल्ड यांच्या मते बदलण्याची किंवा बदलाची इच्याही बदलाकडे घेऊन जाते व त्यामुळे व्यक्तीचा ………..  होतो

A.  विकास

B.      फायदा

C.      विनास

D.      अपेक्षाभाग

 

 

 

वरील प्रस्नाची उत्तरे

1)  B.  अंतर्गत

2)  A.  .कमी

3)  C.  प्रतिक्रिया

4)  C स्नायडर

5)  A ससेलीगमन

6)  B संभाव्य

7)  B अशावाद

8)  A फँरेस

9)  A अँने ओलेरी

10) A सेलिगंमन

11) B स्व आदर

12) D निर्णाय

13)  B. संघर्ष

14)  A. प्रतीगमित्वा

15)  .A.3

16)  A  हॅरोल्ड ग्रीनवाँर्ल्ड

17)   A. अनुकूल

18) A.  विकास

           

 

 

Friday, 30 April 2021

बी.ए. भाग -तीन मराठी अभ्यासक्रमपञिका १६ सञ सहा. पाठ्यपुस्तक :वाड:मय प्रकाराचे अध्ययन ललितगद्य(व्यक्तिचिञे) / मृत्यूचे चुंबन घेणारा महाकवी:

 बी.ए. भाग -तीन

मराठी अभ्यासक्रमपञिका  १६

सञ   सहा.

पाठ्यपुस्तक :वाड:मय प्रकाराचे अध्ययन ललितगद्य(व्यक्तिचिञे)

विषय प्राध्यापक प्रा. बी. के. पाटील.

मृत्यूचे चुंबन घेणारा महाकवी:

        हा एक वेगळ्या प्रकारचा लेख आहे. त्याला रुढार्थाने मृत्युलेख म्हणावे लागेल.साने गुरुजींचे जीवन हे राट्रजीवनासाठी वाहिलेले समर्पित जीवन होते. सुरुवातीलाच आचार्य अञे  यांच्यासारखा समर्थ साहित्यिक साध्या सोप्या भाषेत साने गुरुजींचे व्यक्तिचिञ समग्रतेने उभे करीत आहेत.

    "हे सात दिवस मी विचार करतो आहे.त्यांच्या भाषणाचा विचार करतो आहे.त्यांच्या मरणाचा विचार करतो आहे. त्यांच्या उपोषणाचा विचार करतो आहे. त्यांच्या बसण्याचा विचार करतो आहे त्यांच्या उभे राहण्याचा विचार करतो आहे. संकोचाच्या भावनेने सदैव अवघडलेली त्यांची आकृती माझ्या डोळ्यासमोर उभी आहे. ओठांच्या दोन्ही कोपर्‍यातुन त्यांचे ते  ओशाळू हसू अजून माझ्या दृष्टिपुढे उभे आहे.स्नेहभावाने डबडबलेल्या त्यांच्या डोळ्याच्या ओल्या कडा अजुन मला दिसता आहेत.

     याठिकानी त्यांच्या आयुष्याचे प्रयोजन न सांगता अधोरेखित झाले आहे .ही सारी किमया आहे आचार्य अञे यांच्या शब्दप्रभु साहित्याची.

   साने गुरुजी आणि आचार्य अञे यांची डोळाभेट झालेली आहे. त्यांचे वाड:मय अञे यांनी आवडीने वाचलेले आहे. त्यांच्या जीवनाचा अन्वयार्थ अनेकांनी अनेक तर्‍हांनी लावला अञे यांनी आपल्या आकलनानुसार लावण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या कवित्वशक्तिवर  प्रकाश टाकतांना ते मातृह्यदयाचे कवी होते असे आञेना वाटते. मातृप्रेमात  ममता असते,तशीच समता असते. साने गुरुजी यांचे व्यक्तिमत्वही असेच आहे.

    गुरुजींचे सारे सामर्थ त्यांच्या अश्रुत होते. आपला दुबळेपणा रडकेपणा या वाशेषणांनी उपहास केला. याचे त्यांना वैषम्य वाटते. पण अश्रुंच्या सामर्थामुळे कश्मल कसे घालविता येते याचा आदर्श साने गुरुजींनी निर्माण कूला आहे . हे उदाहरणासह  आचार्य अञे यांनी दाखवून दिले आहे.

    गरीब आणि श्रमजीवी जनतेची सर्व दु:खे आणि दुखणी दूर व्हावीत ही साने गुरुजींच्या जीवनातील तळमळ होती."माझ्या वाड:मयाला हात लावाल तर माझ्या ह्रदयाला हात लावाल" असे ते म्हणत होते. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे आणि वाड:मयाचे अभिन्न असे नाते होते.

शुद्ध, निर्हेतुक आणि आत्यंतिक प्रेम  ही साने गुरुजींच्या जीवनाची  प्रेरणा होती.

साने गुरुजींनी आत्मसमर्पण का केले  याची मीमांसा  आचार्य अञे यांनी आपल्या परीने केली आहे. समाजातील जातीयता, प्रातीयता आणि ध्येयशुन्यता नष्ट करण्यासाठी साने गुरुजींनी जन्मभर प्रयत्न  केले. पण ते फलद्रूप झाले नाहीत म्हणून त्यांना कमालीचे नैराश्य  प्राप्त झाले असे त्यांना वाटते . या लेखाचा शेवट त्यांनी हळूवारपणे केला आहे. साने गुरुजी जरी देहरुपाने गेले असले तरी त्यांचे वाड:मय मातेच्या वात्सल्याने अनंत काळापर्यत महाराष्टातील तरुण पिढीचे संगोपन करीत राहील अशी श्रद्धा बाळगून आहेत

    "मत्युचे चुंबन  घेणारा महाकवी" हे आचार्य अञे यांनी या व्यक्तिचिञाला दिलेले शीर्षकही अर्थपूर्ण आहे. साने गुरुजींच्या समर्पित जीवनाला ते कवेत घेणारे आहे

बी. ए. भाग -तीन / (अभ्यासक्रमपञिका क्र:१६ DSE-E130) / वाड्:मय प्रकाराचे अध्ययन:ललितगद्य(व्यक्तिचिञे) / मुलुखावेगळी माणसं

 बी. ए. भाग -तीन

(अभ्यासक्रमपञिका क्र:१६ DSE-E130)

वाड्:मय प्रकाराचे अध्ययन:ललितगद्य(व्यक्तिचिञे)

मुलुखावेगळी माणसं

विषय प्राध्यापक प्रा बी के पाटील

रामा मैलकुली:-                                                  

   प्रस्तावना:

          'माणदेशी माणसं हा  व्यकटेश  माडगुळकर यांचा सोळा व्यक्तिचिञांचा संग्रह आहे व्यक्तिदर्शन हाच निवेदनात्मकतेचा गाभा आहे. कथनशैलीत तटस्थपणे लेखकाचे निवेदन येते. माणदेशाच्या या अभावग्रस्त  कृषीसंस्कृतीत  वावरणार्‍या माणसाभोवती ही कथानके गुंफली आहेत

 व्यकटेश माडगुळकर यांचे लेखन अल्पाक्षरी वाटते. मनुष्य स्वभावाच्या गाभ्याला सहजपणे भिडण्याची शक्ती त्यांच्या लेखणीत आहे.

यापाश्वभूमीवर रामा मैलकुली या व्यक्तिचिञातील  अनुभूतीचा पोत तपासून पाहिला तर काय जाणवते ? ही सामान्य व्यक्ती असुन सामान्य वाटत नाही. चिञमय शैलीत लेखकाने रंगविलेले हे व्यक्तिचिञ अनुभवताना  सर्व रंगछटासह  रंगविलेले हे चिञच वाटते फक्त माध्यम निराळे

       निवेदकाच्या निवेदनातून या परिसराचे चिञ उभा राहते. परिसरातील दारिद्राचे विदारक चिञही  लेखकाने रेखाटले आहे. रामा मैलकूल्याच्या बाह्यांगाचे तसेच  तसेच अंतरंगाचे प्रत्ययकारी चिञण लेखकांने रेखाटले आहे. यात त्यांच्या शैलीचे कौशल्य दिसून येते.

अल्पाक्षराने लिहिणारे माडगुळकर येथे तपशिलाचे रंग भरतात. कारण त्यांच्या आशयाची ती मागणी असते. हा लवचिकपणा त्यांच्या भाषाशैलीत आहे.

    रामा मैलकूल्याच्या संवादामधून त्याच्या करुणमय जीवनाची निवेदकाला कल्पना येते

"कशाला देव परपंच ? काय तरी करुन हातातोंडाची गाठ घालायची ! ढोरावानी जीव !  काय अंगभर धडुता मिळतूया, का गोडधोड खायाला मिळतया ? आमा गरीबाचं हे असच ! तरी बरं, आपला सोताचा काय खटाला न्हाई. एकलाच हाय" 

रामा मैलकूल्याची  दर्दभरी कहाणी लेखकांने कलात्मक संयमाने सांगितली आहे. त्यात भावविवशतेचा सूर नाही. सहानूभूतीचा कंप माञ  ओतप्रोत भरला आहे.

बी. ए. भाग ३ / पेपर क्रमांक १२ / सञ- ६ / पाठ्यपुस्तक साहित्यविचार

 बी. ए. भाग  ३

पेपर क्रमांक   १२

सञा-  ६

पाठ्यपुस्तक   साहित्यविचार

विषय प्राध्यापक - प्रा. बी. के. पाटील.

विभाग- १

प्रकरण  शब्दशक्ती

 २)  लक्षणा 

             ही शब्दाची दुसरी शक्ती आहे. वाक्याचा बोध होण्यासाठी कित्येकवेळा मुख्यार्थाचा उपयोग होत नाही, अशा वेळी मुख्यार्थास बाजुस सारुन दुसरा अर्थ स्वीकारावा लागतो ,यालाच लक्ष्यार्थ असे म्हणतात. लक्षणा ही महत्वाची शक्ती आहे.

उदा. तो साक्षात बृहस्पती आहे. या उदाहरणात एखादा विद्यार्थी फार बुध्दीमान आहे तेव्हा तु फार बुद्धीमान आहेस असे न म्हणता तो साक्षात बृहस्पती आहे असे म्हटले जाते.

लक्षणेस आवश्यक गोष्टी

        अ) मुख्यार्थबाध:-

             घरावरुन हत्ती गेला यावाक्यात घरावरुन हत्ती जात नाही हे लक्षात घ्यावे लागते  किंवा आणखी एक पेला द्या  म्हणजे रिकामा पेला नव्हे तर' आणखी एक पेला सरबत असा' त्याचा अर्थ असतो.

ब) लक्ष्यार्थाचा मुख्यार्थाशी संबंध :- 

         लक्षणा होण्यासाठी दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे लक्ष्यार्थाशी काही संबंध हवा. हा संबंध म्हणजे 'तद्योग'

 वरील उदाहणे घेतली त्यामध्ये' घरावरुन हत्ती गेला'  किंवा ' आणखी  एक पेला द्या या उदाहरणावरुन मुख्यार्थाचा लक्ष्यार्थाशी कोणता संबंध आहे हे समजते.

क) रुढी अथवा प्रयोजन :-**

    लक्षणा होण्यासाठी मुख्यार्थबाध व   मुख्यार्थाचा लक्ष्यार्थाशी संबंध या दोन अटी आहेत. तिसरी अट अशी की, असा शब्दप्रयोग करण्यासाठी काही कारण पाहिजे. म्हणजे काहीएक प्रयोजन पाहिजे किंवा असा शब्दप्रयोग करण्याची रुढी असली पाहिजे उदा: 'घरावरुन हत्ती  गेला' असे म्हणण्यास काहीतरी कारण पाहिजे. हत्ती घरावरुन कधीच जात नाही, तरीही असे म्हटले जाते. कारण हत्ती घराजवळून  गेला, ही घटना परिणामकारकतेने सांगायची आहे म्हणून थोडी अतिशयोक्ती करुन सांगितले . इथे असे बोलण्याचे प्रयोजन आहे. हत्ती घरावरुन गेला असा शब्दप्रयोग करण्याची एक परंपरा निर्माण झाली, एक रुढी निर्माण झाली आणि रुढीनेच'घराजवळून' असा लक्ष्यार्थ  घेतला गेला

BCOM_AEC

https://drive.google.com/file/d/1F1IRMakowHOCmho9iSvSdqoPKh2SWmVe/view?usp=sharing