Saturday, 1 May 2021

BA III/Special English/Novel/Old Man and the Sea

                                             (e-content developed by Dr N. A. Jarandikar)

The Old Man and the Sea

·         The Old Man and The Sea is a novel written by Ernest Hemingway.

·         Hemingway is an American novelist.

·         The novel is written in 1952.

·         The novel received Pulitzer Prize in 1953.

·         Hemingway received Nobel Prize for literature in 1954.

·         Hemingway dedicated his Nobel Prize to the Cuban people.

·         Santiago (सांतीयागो) is a main character in the novel.

·         Santiago is a fisherman.

·         Santiago loves American baseball. His favourite player is Joe Dimaggio.

·         Manolin (मॅनोलीन) is a boy and assistant of Santiago.

·         The family of Manolin has asked him not to go with Santiago. But Manolin continues to visit Santiago.

·         The sea described in the novel is the Gulf Stream, north of Cuba.

·         Santiago is unable to catch a fish for 84 days.

·         On 85th day, Santiago sees one giant marlin (मार्लिन: एक मोठा मासा). It was 18 feet long.

·          Santiago fights against the giant fish for three days.

·         Santiago kills the marlin.

·         While taking marlin to the shore, the sharks attack the dead marlin.

·         Santiago fights against the sharks with a harpoon (हार्पून:भाला) as his weapon. But then the harpoon is lost in the sea.

·         The sharks eat the flesh (फ्लेश: मांस) of the marlin, and only skeleton (स्केलेटन: सांगाडा) is left.

·         The novel is set in a Cuban village. (क्युबा देशातील एक खेडेगाव)

·         At the end of the novel, Santiago dreams of lions of an African beach.

·         Famous quotation: “A man can be destroyed, but cannot be defeated”. (“माणूस उध्वस्त होऊ शकतो, पराभूत नाही”)

 

BA III/English Compulsory/"The Interview"

                                  (e-content developed by Dr N. A. Jarandikar)

बी.ए भाग ३ / अभ्यासक्रमपञिका १२/ सञ ६ / विषय साहित्यविचार

 बी.ए  भाग   ३

अभ्यासक्रमपञिका  १२

सञ   ६

विषय   साहित्यविचार

 विषय प्राध्यापक -प्रा.बी. के. पाटील.

 विभाग  १

       घटक   शब्दशक्ती

३)   व्यजना :-

                  व्यगना शद्बशक्ती शब्दाच्या तसेच अर्थाच्या ठिकाणीही दिसून येते. अनेक वेळा वाक्यात असे होते की ,लक्षणेसाठी आवश्यक असणारा 'मुख्यार्थबाध' होत नाही. त्या वाक्याचा अर्थ जसाच्या तसा सरळ लागतो, पण त्या शब्दाची शक्ती तेथेच न थांबता पुढे आणखी काही अर्थाची प्रतीती करुन देते, मुख्यार्थापेक्षा अधिक अर्थ प्रतीत करुन देणार्‍या शक्तीला व्यंजना म्हणतात.

    व्यंजना म्हणजे सूचना किंवा सुचविणे. या ठिकानी मुख्यार्थाबरोबर अधिक काही सुचविले गेलेले असते. हे सुचविणे सौंदर्यपूर्ण असते.

उदा.   'सूर्य अस्तास गेला' असे म्हटल्याबरोबर सुर्य बुडाल्याची किंवा मावळ्याची जाणीव लगेच होते. पण आपणाला याचा एवढाच अर्थ लागतो असे होत नाही. हे वाक्य आपण कोणाला उद्देशून उच्यारत आहोत,त्यावर त्याची अनेक अर्थवलये उमटत असतात 

उदा.   जर एक चोर दुसर्‍या चोराला म्हटला असेल तर त्याचा अर्थ चोरी करण्याच्या तयारीला लागावे असा होतो . हेच वाक्य शेतकर्‍याने ऐकले असल तर शेतातले काम थांबवावे असा होतो एखाद्या ब्रम्हकर्म करणार्‍याला म्हटले असेल तर संध्यावंदनाची वेळ झाली असा होईल सूर्य अस्तास गेला हे वाक्य कोणत्या व्यक्तिसाठी उच्यारले त्यावरुन त्या अर्थाच्या वाच्यार्थासह अधिकचे अर्थ प्रतीत होत जातील

बी. ए. भाग २ / मराठी पेपर क्रं ६/ सञ ४/ जुगाड (कादंबरी)

 बी. ए. भाग २

मराठी पेपर क्रं  ६

सञ  ४

जुगाड (कादंबरी)

       - किरण गुरव

विषय शिक्षक -प्रा. बी के पाटील.

 योग्य पर्याय निवडा  

१)  किलन अनलोड केले म्हणून चेअरमनसाहेब का चिडले ?

अ)  कारण पूजा करायच्या आधी ते उतरले म्हणून

ब) कारण त्यांच्या अनुपस्थित उतरले म्हणून

क) कारण त्याना न कळवितावू उतरले म्हणून

ड) कारण त्यांच्या शुभहस्ते उतरायचे होते म्हणून.

२)  राधामाईच्या सिव्हिल इंजिनिअर पदावर कोण  होते ?

अ) शशा

ब) सीमा देसाई

क)  डुणूंगसाहेब

ड)  जय

३)  साईटवर शशा कुठे जेवत असे  ?

अ)  भोपे मेसमध्ये

ब)  जयच्या घरी

क)  विठ्ठल टी हाउसमध्ये

ड)  सीमाच्या घरी.

४)  साईटवर कोणती वेळ शशाची विशेष आवडती होता ?

अ)  पहाटेची

ब)  सकाळची

क)  दुपारची

ड)  मावळतीची

५)  कारखान्याच्या बाॅयलरला साईटवर काय म्हणतात ?

अ)  चिमणी

ब)  बाॅयलर

क)  बाय

ड)  धुरका

६)  राधामाईने कोणता प्रकल्प सुरु केला होता ?

अ)  बाॅक्साईटचा

ब)  रेझीनचा

क)  आॅईल पेंटचा

ड)  स्टोन क्रशरचा

७)  राधामाईच्या साईटवरची' मेमसाब' कोण होती ?

अ)  सीमा चव्हाण

ब)  सीमा देसाई

क)  सीमा पाटील

ड)  सीमा शेळणोलीकर

८)  राधामाईच्या साईटवरची शशाची पोस्ट कोणती होती ?

अ)  साईट डिप्लोमा होल्डर

ब)  साईट इंजिनिअर

क)  असिस्टंट साईट इंजिनिअर

ड)  हेल्पर साईट इंजिनिअर

९)  शशाचे शिक्षण काय झाले होते ?

अ)  सिव्हिल पदविका

ब)  केमिकल पदविका

क)  मेकॅनिकल पदविका

ड)  ईलेट्रिक पदविका

१०)  सीमा देसाई मेमसाबचा शशावर राग का होता ?

अ)  कारण त्याला जास्त पगार दिला म्हणून

ब)  कारण तो नंतर येऊन तिचा बाॅस झाला म्हणून

क)  कारण तो तिच्याकडे वाईट नजरेने पाहायचा म्हणून

ड)  कारण तो तिला ञास द्यायचा म्हणून

उत्तरे ...............

 योग्य पर्याय÷ ÷ ÷ ÷ ÷ 

१)  अ)  कारण त्यांना पूजा करायच्या आधी ते उतरले म्हणून

२)  ब)  सीमा देसाई

३) क)   विठ्ठल टी हाउसमध्ये

४)  ड)  मावळतीची

५)  अ)  चिमणी

६)  अ)  बाॅक्साईटचा

७)   ब) सीमा देसाई

८)   ब)  साईट इंजिनिअर

९)   क)  मेकॅनिकल पदविका

१०)  अ) कारण त्याला जास्त पगार दिला म्हणून

बी. ए. भाग -१ / सञ - २ / अभ्यासक्रमपञिका २ /पाठ्यपुस्तक : अक्षरबंध/ बाकी सर्व ठीक आहे(निवडक कविता) -कवी लोकनाथ यशवंत

 बी. ए.  भाग -१

सञ  - २

अभ्यासक्रमपञिका  २

पाठ्यपुस्तक :     अक्षरबंध                    बाकी सर्व ठीक आहे(निवडक कविता)

   -कवी लोकनाथ यशवंत

विषय प्राध्यापक - प्रा. बी. के. पाटील.

कविता -राग - योग्य पर्याय निवडा.

१)   सरकारला  कोणत्या बाबींकडे लक्ष द्यायला वेळ नाही असे कवी'राग' या कवितेत म्हणतात

अ)  दुष्काळाकडे

ब)   कुपोषणाने मरणार्‍या मुलांकडे

क)   सुशिक्षित बेकारांकडे

ड)   वाढत्या लोकसंख्येकडे

२)  ' राग ' या कवितेत कुपोषणाने बालकांचे मृत्यू होत असूनही कोण आनंदात आहेत असे कवी म्हणतात ?

अ)  बालकांचे पालक

ब)  सरकार

क)  एनजीओवाले

ड)  सरकारी अधिकारी

३)  कुपोषित बालकांच्या प्रश्नाबाबत डाॅक्टरसाहेबांशी बोलत असतांना ते काय म्हणाले ?

अ)  त्यांनी शहरात मुख्य धारेत यावे

ब)  त्यांनी कुटुंबनियोजन करावे.

क)  कुपोषित ही सरकारची जबाबदारी नाही.

ड)  कुपोषितांनी आपले उत्पन्न वाढवावे.

४)  ' कुपोषितांनी शहरात मुख्य धारेत यावे ' या डाॅक्टरसाहेबांच्या बोलण्यावर कवी काय म्हणाले ?

अ)  त्यांना नोकर्‍या द्या.

ब)  त्यांना शिक्षण द्या.

क)  त्यांना तुमच्या वातानुकूलित 

घरात आणून ठेवतो

ड)  त्यांना नजरपालिकेसमोर उपोषणाला बसवितो.

५)  ' कुपोषितांना तुमच्या वातानुकूलित घरात आणून ठेवतो ' या कवीच्या उत्तरावर डाॅक्टरसाहेबांची काय प्रतिक्रिया होती ?

अ)  ते चकितच झाले.

ब)  ते कवीशी भांडले.

क)  ते कवीला शिव्या देऊ लागले.

ड)  ते आत कवीकडे बघतच नाही.

उत्तरे :- 

 योग्य पर्याय.............,,

१)  ब)  कुपोषणाने मरणार्‍या मुलांकडे

२)  क)  एनजीओवाले

३)   अ)  त्यांनी शहरात मुख्य धारेत यावे.

४)   क)  त्यांना तुमच्या वातानुकूलीत घरात आणून ठेवतो.

५)    ड)  ते आता कवीकडे बघतच नाहीत.

राधानगरी महाविद्यालय, राधानगरी/ बी. ए. भाग ३ /सञ ६/ पेपर क्रमांक : १६ / पाठ्यपुस्तक : वाड:मय प्रकाराचे अध्ययन :ललित गद्य : व्यक्तिचिञे व्यक्तिचिञ : निळू मांग

राधानगरी महाविद्यालय, राधानगरी

बी. ए. भाग ३

सञ  ६ पेपर क्रमांक :  १६

पाठ्यपुस्तक : वाड:मय प्रकाराचे अध्ययन :ललित गद्य : व्यक्तिचिञे

व्यक्तिचिञ :  निळू मांग.

विषय प्राध्यापक प्रा. बी. के. पाटील

 निळू मांग :        

                प्रस्तावना:-

                               अण्णाभाऊ साठे यांच्या" निळू मांग " या व्यक्तिचिञाचा विचार करण्यापूर्वी या लेखकांची जीवनधारणा आणि लेखनप्रेरणा या विषयी .....

        अण्णाभाऊ साठे यांनी ज्या दलित आणि शोषित समाजाचे दु:ख ,वेदना आणि संघर्श यांचे चिञण केले त्यातून ते स्वत: गेले आहेत. अर्थातच अनुभूतीची धार या लेखनाला लाभली होती. १९४९ मध्ये ' मशाल' या साप्ताहिकात त्यांची 'दिवाळी 'ही कथा प्रसिध्द झाली.  तेथून ते लिहितच राहिले.  संघर्ष हा त्यांच्या जीवनाचा स्थायीभाव होता. अस्पृश्य ही काय चीज असते ही त्यांनी स्वत: अनुभवलेली होती.  प्रतिकूल परिस्थितीत त्यांना औपचारिक शिक्षण घेता आले नाही.प्रखर जीवनानुभूती ही त्यांची शाळा ठरली. तीच त्यांची प्रयोग शाळाही ठरली. अत्यंत प्रतिकुलतेच्या परिस्थितीच्या मुशीतून त्यांची साहित्यसंपदा निर्माण झाली. पस्तीस कादंबर्‍या आणि तेरा कथासंग्रह लिहिले. तमाशा आणि नाटके लिहिली." माझा रशियाचा प्रवास" हे प्रवासवर्णन लिहिले

 आपल्या लेखनप्रेरणाविषयी अण्णाभाऊ साठे म्हणतात, "मी जे जीवन जगतो , पाहतो, अनुभवतो तेच मी लिहितो. मला कल्पनेची भरारी मारुन लिहिता येत नाही...... माझी सारी पाञे या ना त्या नात्याने माझ्या आयुष्यात येऊन गेली आहेत माझी माणसं वास्तवातली आहेत, जिवंत आहेत.  मुंबईत ओझेवाला , हमाल , नाका कामगार, मिल कामगार असे जीवन जगावे लागले. त्याचेच प्रतिबिंब  त्यांच्या  पाञचिञणात पडलेले दिसून येते.

     "निळू मांग "  ही व्यक्तिरेखा  अण्णाभाउ साठे यांनी  सोप्या भाषेत साकार केली आहे. छोट्या वाक्यातुन त्यांचे निवेदन पुढे सरकते त्या व्यक्तिरेखांचे कंगोरे त्यांच्या चिञणातून साकारतात. 

    अनुभवाला भिडणारे निवेदन पहा .......

" तोफ तयार झाली . गोळा भरला होता. बत्तीवाला बत्ती घेऊन पुढे आला आणि तै साजुरचा निळू मांग  काळी टोपी  घेऊन तोफेकडे चालू लागला त्याचा प्रत्येक पाऊल मजबूत पडत होतं. तो निर्भय होता. त्याला कसलीच भीती नव्हती. तो सरळ तोफेशु जाऊन उभा राहिला. "

      वरिष्ठ अधिकारी कनवाळू स्वरात निळूला उद्देशून म्हणतो, " आता तू प्रभूकडे जाणार, जर तुला बोलायचे असेल तर बोलून घे आता तू मरणार. जगातून जाणार. तुझा शब्द आता उमटणार नाही. बोल, काही इच्छा असेल तर सांग. "

      आपल्याला तोफेच्या तोंडाशी देणारी ही माणसे आपल्या आयुष्याच्या  शेवटच्या घडीला अशी सहानुभूतीच्या स्वरात बोलतात याचे निळू  मांगाला आश्चर्य वाटते.

 अण्णाभाऊ साठे यांनी मोजक्या शब्दात निळू मांगाचे शब्दचिञ  उभे केले आहे.

 " साजूर गावात निळू मांग एक सज्जन , गरीब माणूस म्हणून ओळखला जात होता. प्रत्येक माणूस निळूला मान देत होता. निळु कोणाची थुंकी ओलांडत नव्हता. भरपूर उंची, अंगात भरपूर बळ रंगानं सावळा नि चेहर्‍यानं तो गावात उजवा होता. त्याच्या वयाला नुकतच बाविसावं लागलं होतं पण तो शांत होता. त्याला फक्त आई होती. आईनच त्याला जगवून वाढवलं होतं लहानापासून वृद्धापर्यत सर्वच लोक  निळूला चांगला माणूस म्हणत होते.  अब्रुदार म्हणून त्याची गावात  ख्याती  होती. "

    व्यकटेश माडगुळकरांच्या 'रामा मैलकुली' या व्यक्तिचिञातील वर्णनशैलीशी येथे कांहीसे साधर्म्य दिसते. निवेदन आणि पाञसंवाद यांच्या संयोगातून वातावरण निर्मिती करणे लेखकाला चांगल्या प्रकारे साधलेले आहे. ग्रामीण परिसरातील दलित वस्तीचे हे चिञ आहे

      भिमा पाटलाच्या मक्याचे राखण करण्याचे काम निळू मांगाकडे येते. तो ते इमानइतबारे करतो. त्याचे अनेक तपशील या व्यक्तिचिञणात येतात.

    याव्यक्तिचिञणाला कथात्मक वळण मिळते. संघर्षाची धार कथानक प्रवाहाला प्राप्त झाली आहे.

 सरकारी खजिना लूटुन राजद्रोह करणारा निळु मांग  हा भयंकर गुन्हेगार मानला जात होता. त्याला क्षमा  नव्हती.

     या पुढे या व्यक्तिचिञणाला  वेगळी कलाटणी मिळते तो न्यायमूर्तीना सांगतो, "सरकार, मायबाप मी निळ्या मांग. मी साजूरात तंबाखु मागून खाणारा तुम्ही माझी  किंमत तोफेच्या  गोळ्याच्या किंमतीची ठरवल्याबद्दल मी तुमच्या पायावर डोकं ठवतो. "

        तोफेपुढे उभे राहून निळू मांग गतायुष्याचे अवलोकन करत उद्दगारतो, "सायब मी काय बोलू ? आता मी मरणार . बोलण्यासारख माझ्याकडं  काईच न्हाय. तुमी मला लवकर वाटेला लावा. संपू द्या. एकदाची ही कटकट. "

      निळू मांगाची शिक्षा रद्द होते. त्याच्या ध्येयामुळे आणि मृत्युला कवटाळण्याच्या बेगुमान वृत्तीमुळे न्यायमूर्ती चक्रावतात.

सारांश :- 

           सामान्य माणसाला असामान्यत्व प्राप्त करुन देण्याची किमया लेखकाच्या लेखणीत असते. "निळू मांग " या व्यक्तिचिञातून ते अधोरखित झाले आहे.वास्तव जीवनदर्शनाचा उत्कृष्ट नमुना म्हणून या व्यक्तिचिञाकडे पाहता येईल.

बी. ए. भाग 2 /सेमीस्टर 4 / पेपर 6/ उपयोजित मानसशास्त्र / टॉपिक 1 ताबा घेणे / पदभार स्वीकारणे

बी. ए. भाग 2 सेमीस्टर 4

पेपर 6 उपयोजित मानसशास्त्र

टॉपिक 1 ताबा घेणे / पदभार स्वीकारणे

 

1)  ……….. …नियंत्रण केंद्र म्हणजे ज्यामध्ये व्यक्तीचा असा विश्वास आहे की जीवनातील घटनावर

 त्यांचे किंवा तिचे पूर्ण नियंत्रण आहे

A.  बाह्य

B.      अंतर्गत

C.      सामजिक

D.      सांस्कृतिक

2)       सवेदित नियंत्रण उच्च असणाऱ्या व्यक्ती…………चिंताग्रस्त असतात

A.  A.कमी

B.      जास्त

C.      मध्यम

D.  अति जास्त

3)  साभोवतालच्या उद्दिपकाना अनुसरून प्रत्येक व्यक्ती …………….. देते

A.  क्रिया

B.  समायोजन

C.  प्रतिक्रिया

D.  पारितोषिक

4)  …………… या साशंशोधकाने 1974 मध्ये स्वनियंत्रण संकल्पनेचा विकास केला

   À . फेस्तिजर

   B. स्मिथ

   C.स्नायडर

   D. युंग

     5) ……….. यांनी'संपादीत असहायता'या समस्येचा विस्तृतपणे अभ्यास केला

        A. सेलीगमन

         B. बंडूरा

       C. पीटरसन

       D. स्टँन

 6) व्यक्तिगत नियंत्रण म्हणजे …………. परिणामाची जबाबदारी स्वतःकडे घेणे

    A. वर्तमानकालीन

    B. संभाव्य

    C. असंभाव्य

    D. शक्य

7). …………….. हा विविध सकारात्मक परिणामशी आज की जोडलेला आहे

    A. निराशावाद

    B अशावाद

    C निर्णयन

    D प्रतिरोध

8) ………….. यांच्या मते संवेदित नियंत्रण उच्च असणाऱ्या व्यक्ती कमी करतात

   A. फँरेस

   B. फेस्टीनजर

   C. फ्रॉइड

   D स्किनर

9) ………....  यांच्या मते उच्च संवेदित नियंत्रण असणाऱ्या व्यक्तीचे समायोजन अधिक चांगले असते

   A.अँने ओलेरी

   B.फेस्टीनजर

   C.मँस्लो

   C वँटसन

10) संपादित आशावाद ही संकल्पना ………………… यांनी स्पष्ट केले

    A सेलिगंमन

    B स्नायडर

    C स्किन्नर

    D.मँकडुगल

11) बचावात्मक निराशेचा वारंवार वापर करणाऱ्या व्यक्तीचा …………… कमी होतो

    A. बुद्धिगुणांक

    B. स्व आदर

    C. चिंता

    D. ताण

12) वैयक्तिक वाढीसाठी …………... महत्वाचे असतात

    A. चिंता

    B. ताण

    C.निराशा

    D निर्णाय

13) मूल्याविषयाच्या गोंधळामुळे बरेच  …………….….उद्भवतात

    A. अजार

    B. संघर्ष

    C निर्णय

    D आनंद

14) आपल्याकडून निर्णय घेतला जात नाही यालाच ……………..म्हणतात

   A. प्रतीगमित्वा

   B. पुरोगामित्व

   C. सुधारणावादी

    D उदारमतवादी

15) खेदजनक निर्णयामध्ये कमीत कमी .......... घटक असतात

    .A.3

     B.4

     Ç.6

     D.2

16)………………यांनी प्रत्यक्ष निर्णयोपचार पद्धती विकसित केली

     A  हॅरोल्ड ग्रीनवाँर्ल्ड

     B. स्टँन्ले हाँल

     C. मार्टिन सेलिगमन

     D. जेरी फँरेस

17) प्रतिकूल वर्तनावर मात करण्यासाठी …………… निर्णय घेण्याची प्रेरणा महत्त्वाची असते

           A. अनुकूल

            B. विरोधी

            C. झटपट

            D. सावध

18 )ग्रीनवाँर्ल्ड यांच्या मते बदलण्याची किंवा बदलाची इच्याही बदलाकडे घेऊन जाते व त्यामुळे व्यक्तीचा ………..  होतो

A.  विकास

B.      फायदा

C.      विनास

D.      अपेक्षाभाग

 

 

 

वरील प्रस्नाची उत्तरे

1)  B.  अंतर्गत

2)  A.  .कमी

3)  C.  प्रतिक्रिया

4)  C स्नायडर

5)  A ससेलीगमन

6)  B संभाव्य

7)  B अशावाद

8)  A फँरेस

9)  A अँने ओलेरी

10) A सेलिगंमन

11) B स्व आदर

12) D निर्णाय

13)  B. संघर्ष

14)  A. प्रतीगमित्वा

15)  .A.3

16)  A  हॅरोल्ड ग्रीनवाँर्ल्ड

17)   A. अनुकूल

18) A.  विकास

           

 

 

BCOM_AEC

https://drive.google.com/file/d/1F1IRMakowHOCmho9iSvSdqoPKh2SWmVe/view?usp=sharing