Monday, 10 May 2021

आधुनिक सामाजिक मानसशास्त्र प्रकरण 1 आवड / आकर्षण

 

राधानगरी महाविद्यालय राधानगरी

बी. ए.भाग 2

सेमीस्टर 4 पेपर क्रमांक 5

आधुनिक सामाजिक मानसशास्त्र

प्रकरण 1  आवड / आकर्षण

 

1) .......... म्हणजे व्यक्ती- व्यक्तीमधील आकर्षण होय

     A) आंतरवैयक्तिक आकर्षण

     B) स्त्री-पुरुष नातेसंबंध

     C) लैंगिक आकर्षण

     D) बाह्य नातेसंबंध

2) आंतर व्यक्ती आकर्षण ही अत्यंत मूलभूत ............... प्रक्रिया आहे

      A) मानसिक

     B) सामाजिक

     C) भावनिक

     D) व्यक्तिगत

3).......... यांच्यामते सहवास प्रेरणाही सहज प्रवृत्ती आहे

      A) मॅक डुगल

      B) एरिकसन

      C) किबॉल यूंग

      D) चार्ल्स कुली

4) उत्क्रांतिवादनुसार ......... प्रेरणा ही आदिम काळापासून आढळते

      A) सहवास

      B) प्रशंसा

      C) मान्यता

      D) अनुकरण

5) सहवास प्रेरणेच्या बाबतीत .......... यांनी सखोल अभ्यास केला आहे

      A) शँक्टंर

      B) म‌ँकडुगल

      C) लेअर्स

      D) एरिक्‍सन

6).........  म्हणजे आंतरवैयक्तिक आकर्षणाच्या आधार होय

       A) भाव भावना

       B) इच्छा आकांक्षा

       C) प्रेरणा

       D) अध्ययन

7) भाव भावना आणि आकर्षण यामध्ये अत्यंत महत्वपूर्ण.........दिसून येते

       A) संबंध

        B) संघर्ष

        C) वेगळेपणा

        D) विरोध

8) दोन व्यक्ती मध्ये सकारात्मक भावनिक संबंध असतील तर त्यांच्यात परस्परांविषयी .......... असते

        A) अकर्षण (आवड)

         B) अनाकर्षक

         C) संघर्ष

         D) सहकार्य

9) भाव-भावना आणि आकर्षण यांच्या संबंधाचा आपल्या...........वर्तनावर व जीवनावर प्रभाव दिसून येतो

          A) सामाजिक

         B) राजकीय

          C) आर्थिक

          D) खाजगी

10) पुन्हा पुन्हा किंवा वारंवार दिसण्यामुळे ......... आकर्षण निर्माण होते

           A) धनात्मक

           B) नकारात्मक

          C) उपाय योजनात्मक

           D) प्रासंगिक

 

11)........ ही आकर्षणाची गुरुकिल्ली आहे

   A) जवळीकता

   B) सारखेपणा

   C) भिन्नता

   D) विरोधाभास

12) झँजोन्क यांच्या संशोधनाला काही वेळा.......... परिणाम असे म्हटले जाते

   A) वारंवार दिसण्याचा

   B) वारंवार पाहण्याचा

   C) रविवार अवलोकनाचा

   D) वारंवार ऐकण्याचा

13) तुलना सिद्धांत .......... यांनी मांडला

   A) बँरन

   B) न्यूकोंब

   C) फेस्टिंजर

   D) फ्रॉईड

14) इतरांशी परिणामकारकपणे अंतर क्रिया करण्यासाठी लोकांना मदत करणाऱ्या एकत्रित अभिक्षमता म्हणजे ......... होय

   A) सामाजिक कौशल्य

   B) शारीरिक कौशल्या

   C) व्यक्तिगत कौशल्य

   D) यांत्रिक कौशल्य

15) व्यक्तिमत्व गुन्हा विषयी पंचघटक सिद्धांत ........  यांनी मांडला आहे

   A) गोल्डबर्ग

   B) कार्ल युंग

   C) अँल पोर्ट

   D) फ्रॉइड

16) ………….. यांनी वारंवारितादर्शक परिणाम स्पष्ट केला

       A) झँझोक

        B न्यूकाँब

        C) मोर्फ

        D) सेंटर्स

17) वाढत्या संपर्कातून …………….. वाढते

    A) ओळख

    B) बुद्धिमत्ता

         C) आकर्षण

        D) वजन

18)  विरुद्ध आकर्षणाला …………… आकर्षण ही संज्ञा आहे

          A) समान

          B) बरोबरीची

          C) पूरक

          D) जास्त

19) सकारात्मक आणि नकारात्मक भावना या ………………. आहेत

          A) संकीर्ण

          B) समान

           C) अनुवंशिक

            D) तटस्थ

20) ………….. यांनी सामाजिक तुलना सिद्धांत मांडला

          A)  सेबर्ट

            B) फेस्टीगर

           Ç)  गल्टन

            D)      झँझोक

   21)  ………………. यांनी सारखेपणा सिद्धांत कल्पना मांडली

                A) फ्रान्सिस गाल्टन

                B)   झँझोक

                 C)  फेस्टीगर

                 D).  न्यूकाँब

22) अकर्षणामध्ये ……………हा महत्त्वाचा घटक आहे

                  A) देहबोली

               B) जवळीकता

               C)  वातावरण

                D) अनुवंश

23) जे सुंदर आहे ते चांगलं आहे हा परिणाम ………….. आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अभ्यास केला

                 A) सेबर्ट

                  B) न्यूकाँब

                  C) लेमे

                   D) मोफंं

24) …………. व्यक्तीचा स्व या - आदर उच्च आणि बिनबुडाचा असतो

                  A) आत्मरत

                   B) अंतर्मुख

                  C) बहिर्मुख

                  D) सदसद्विवेकी

 

 

योग्य पर्याय खालील प्रमाणे

1)       A) आंतरवैयक्तिक आकर्षण

2)          B) सामाजिक

3)           A) मॅक डुगल

4)          A) सहवास

5)        A) शँक्टंर

6)        A) भाव भावना

7)          A) संबंध

8)          A) अकर्षण (आवड)

9)            A) सामाजिक

10)      A) धनात्मक

11)     A) जवळीकता

12)     A) वारंवार दिसण्याचा

13)      C) फेस्टिंजर

14)     A) सामाजिक कौशल्य

15)     A) गोल्डबर्ग

16)        A) झँझोक

17)          C) आकर्षण

18)        C) पूरक

19)        A) संकीर्ण

20)         B) फेस्टीगर

21)      A) फ्रान्सिस गाल्टन

22)         B) जवळीकता

23)           C) लेमे

24)        A) आत्मरत

 

 

मराठ्यांच्या इतिहासाची साधने

 B.A.3 paper 15 

बी.ए.३ पेपर १५ Topic 1

मराठ्यांच्या इतिहासाची साधने

कोणताही इतिहास अभ्यासण्यासाठी अथवा लिहिण्यासाठी आवश्यकता असते ती साधनांची. साधनांचे मुख्यतः दोन प्रकार पडतात १. अस्सल साधने( प्राथमिक साधने) २. दुय्यम साधने

मराठ्यांचा इतिहास अभ्यासण्या साठी प्राथमिक साधने आपण पाहत असताना छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज राजाराम महाराज ताराबाई शाहू महाराज पेशवे इत्यादी ने दिलेली आज्ञापत्रे, वतन पत्रे, इनाम पत्रे, निवाडे इत्यादी कागदपत्रांचा आपणास अभ्यास करावा लागतो यामध्ये शासकीय अधिकाऱ्यांची पत्रे होत गोतसभा, ज्ञाती, ग्रामसभा यांची निवड इत्यादी कागदपत्रांचा आपणास विचार करावा लागतो इतिहासाचार्य राजवाड्यांनी मराठ्यांच्या इतिहासाच्या अभ्यासाची साधने प्रकाशित केली. एकूण २२ खंडांमध्ये त्यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधने प्रकाशित केली.  शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ताराबाई कालीन कागदपत्रे प्रकाशित करण्यात आले.

जेधे शकावली: ऐतिहासिक घटना लिहून ठेवण्याच्या प्रथा काही मराठी घराण्यांमध्ये होती त्यातील नोंदी अस्सल नोंदी आहेत जेधे करीना जेधे शकावली यामध्ये अनेक घटना नोंदी तारखा या अचूक आहेत. शिवाजी महाराजांची जन्म तिथी शके 1951 फाल्गुन वद्य तीन म्हणजेच १९ फेब्रुवारी १६३० ही नोंद याच शकावली वरून इतिहासकारांनी मांडणी केली आहे

आज्ञापत्र:.  रामचंद्रपंत अमात्य यांनी हा ग्रंथ १७१५ मध्ये लिहिला. शिवाजी महाराजांची राजनीती पुढील वारसांना उपयुक्त ठरावी म्हणून हा ग्रंथ रामचंद्र पंत अमात्य लिहिलेला यामध्ये नऊ प्रकरणे आहेत. राजा प्रधानमंडळ व्यापार सावकार वतने इनामदार वृत्ती किल्ले जंजिरे व आरमार यावर त्यांनी आपले विचार मांडले आहेत. 

बखरी :  सेक्स खबर या शब्दावरून बखर हा शब्द आला असावा दरबारातील वृत्त वार्तांकन व इतर सर्व प्रकारच्या खबरी म्हणजे माहिती यामध्ये लिहिलेले असत.

१). सभासद बखर.  कृष्णाजी अनंत सभासद यांनी राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत जिंजी या ठिकाणी इसवी सन १६९७ मध्ये याचे चे लिखाण केले. शिवाजी महाराजांच्या बद्दल सर्वात लवकर लिहिलेली ही बखर आहे.

२). ९१ कलमी बखर या बखरी मध्ये एकूण 91 कलमे आहेत मालोजीराजे यांच्या पासून शिवाजी महाराज यांच्या पर्यंतचा इतिहास यामध्ये कथन केलेला आहे दत्ताजी त्रिंबक वाकेनवीस यांनी ही बखर लिहिली असे इतिहासकारांचे मत आहे.

३).  चिटणीस बखर (सप्त प्रकरनात्मक  चरित्र).  मल्हार रामराव चिटणीस यांनी लिहिलेली सातारचे छत्रपती शाहू दुसरे यांच्या पदरी तो काम करत होता प्रथमतः विविध ज्ञानविस्तार या मासिकात प्रसिद्ध झाली माहितीच्या आधारावर लिहिलेली ही बखर आहे.

४) चित्रगुप्ताची बखर.   रघुनाथ यादव चित्रगुप्त यांनी ही बखर सभासद बखरी वर आधारित यांचे लिखाण झालेले आहे.

५). दलपत रायाची बखर . शिवाजी महाराजांच्या विरोधी पक्षांनी ही बखर लिहिलेली आहे विरोधकांचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल काय मत होते हे यातून आपणास अजमावता येते.

६).  शिवदिग्विजय बखर.   या बकरीचा कर्ता अज्ञात आहे इसवीसन १८१८ मध्ये ती लिहिली गेली नंदुरबारकर आणि दांडेकर यांनी या भाकरीचे संपादन केले आहे.

७).  मराठी साम्राज्याची छोटी बखर.  याही बकरीचा लेखक अज्ञात आहे इसवीसन अठराशे 17 मध्ये ही लिहिली असावी काव्येतीहास संग्रह या मासिकातून प्रसिद्ध झाली.

८). चिटणीस कृत संभाजी महाराज व राजाराम महाराज यांची बखर.    मल्हार रामराव चिटणीस यांनी या दोन बकरी लिहिल्या.

      वरील सर्व बखरी शिवचरित्रावर प्रकाश टाकतात व कलाकारांच्या लिखाणात स्थळ प्रसंग यात अनेक ठिकाणी गलती झालेले आहेत सर जदुनाथ सरकार यांनी बखरीला इतिहास निर्मितीसाठी दुय्यम मांडलेले आहे.

शिलालेख नाणी शिक्के इत्यादी

     नाणी, हत्यारे, शीलालेख इत्यादी ऐतिहासिक वस्तू मराठ्यांच्या इतिहासातील महत्त्वाची साधने आहेत. महाराष्ट्राच्या विविध भागात व विविध पुराणवस्तू संग्रहालयात या सर्व बाबी आपणास आढळून येतात.

Resume writing_Short answer type questions

Short answer type questions: 1.    What is the primary purpose of a resume, and how can a well-designed resume benefit a job applicant? ...