Monday, 10 May 2021

आधुनिक सामाजिक मानसशास्त्र टॉपिक 3 समाजाभिमुख वर्तन

 

राधानगरी महाविद्यालय कामगिरी

बी..भाग 2.   सेमीस्टर 4

पेपर 5

आधुनिक सामाजिक मानसशास्त्र

टॉपिक 3 समाजाभिमुख वर्तन

योग्य तो पर्याय निवडून विधाने पूर्ण करा

 

1) तदनुभूतीच्या अनुषंगाने इतरांना मदत केल्यामुळे आपणास …………….. मिळते

        A) समाधान

         B) स्वार्थभाव

          C) काहीच वाटत नाही

          D) उगीच मदत केली

2) विविध संशोधनाच्या सहाय्याने तदनुभूतीमध्ये महत्त्वाचे ………….  घटक सापडतात

           A) 3

           B) 

            C)

            D

3) तदानुभूतीतील बोधात्मक घटकालाच तदानुभूती घटक ……….. असे संबोधतात

            A) अचूकता

            B) परहित

            C) स्वार्थ

             D) नकार

4) स्वमग्नता या मानसिक विकृतीमध्ये  …………. ची कमतरता असते

            A) संप्रेषण

            B) सहकार्य

            C) सहभाग

             D) अनुभव

5) समाजाभिमुख वर्तनातील बघ्याची भूमिका किंवा बघ्यांचा परिणाम या संदर्भात ……………. या सामाजिक मानसशास्त्रज्ञानी महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे

            A) डार्ली व लाटाने

             B) ब्रायन व टेस्ट

              C) ग्रुडर व रोमन

              D) क्रीचलो व लिवो

6) तातडीच्या प्रसंगी समाजाभिमुख वर्तन घडेल की नाही किंवा मदत केली जाईल की नाही हे ठरविणाऱ्या ……………… मुख्य पायऱ्या  डार्ली व लाटाने यांनी स्पष्ट केल्या आहेत

             A)

             B)

             C)

              D)

7) ज्या व्यक्ती रूप सौंदर्याने आकर्षक आहेत अशा व्यक्तींना अनाकर्षक व कुरूप व्यक्तीपेक्षा …………… मदत केली जाते

             A) जास्त

             B) कमी

            C) अजिबात नाही

            D) कधी कधी

8) समाजाभिमुख वर्तन करणाऱ्या …………… व्यक्तींच्या अनुभवामुळेच किंवा प्रत्यक्ष उदाहरणांमुळे समाजाभिमुख वर्तन वाढीस लागते

         A) आदर्श

         B) समाजविरोधी

         C) अल्पसंख्या

         D) राजकीय

9) सामाजिक आर्थिक दर्जा आणि समाजाभिमुख वर्तन …………….. संबंध दिसून येतो

             A) नकारार्थी

             B) होकारार्थी

              C) परस्परविरोधी

              D) एकमार्गी

10) ………… व्यक्तीमध्ये इतरांना मदत करण्याची प्रवृत्ती कमी दिसून येते

               A) समाज बहिष्कृत

               B) समाजप्रिय

               C) समाजशील

                D) अपसामान्य

11)  माणूस हा …………….. प्राणी आहे

             A) हिंस्र

             B) बुद्धिमान

             C) समाजप्रिय

             D) एकलकोंडा

12) ……………. च्या मते मानवाच्या इच्छा- आकांक्षा त्यांच्या आंतरिक व बाह्य घटकावर अवलंबून असतात

             A) फ्रॉइड

              B) स्टँन्ले

               C) फोर्गस

             D) ईगली

13) …………. या संशोधकाला आनंदी समाधानी व्यक्तीने इतरांना मदत केल्याचे आढळते

             A) वँटसन

             B) स्टँन्ले

             C) विल्सन

             D) आयसेन

14) ……………..  यांच्या मते, पुरुषांच्या तुलनेत क्रिया तत्परतेने मदतीसाठी पुढे धावतात

              A) फ्रॉइड

               B) आँडलर

                C) ईगली

                D) विल्सन

15) लोकसहभागातून ………………… ही संकल्पना मूळ धरू लागली आहे

                A) स्व- कल्यान

                B) राष्ट्रकल्याण

                C) लोककल्याण

                 D) आंतरक्रिया

16) इतरांना मदत करण्याची वृत्ती म्हणजे …………. वर्तन होय.

                   A) समाजाभिमुख

                   B) मानवाभिमुख

                   C) वर्तना भिमुख

                   D) यापैकी नाही

17) …….. ….  .. इतरांना मदत करणे चांगले वाटते

                  A) तद्नूभुतीमुळे

                 B) संघर्षामुळे

                 C) आनंदामुळे

                 D) दुःखामुळे

18) तद्नूभुती …………… घटकानी मिळून बनलेली असते

                 A) तीन

                  B) दोन

                  C) चार

                   D) पाच

19) तद्नूभुतीचे प्रशिक्षण दिले तर …………. प्रतिबिंब क्षेत्रावर परिणाम होवुन ती क्षमता वाढते

                   A)  मज्जापेशी

                    B) अग्रखंड

                    C) कुंभखंड

                    D) पार्श्वखंड

20) सामाजिक वर्ग ज्यांच्याकडे कमी आहेत ते ………….. देतात

                    A) जास्त

                    B) आनंद

                    C) दुःख

                    D) कमी

21) आपण वेळेचे मूल्य पैशात मोजल्याने समाजाभिमुख वर्तन ……………. होते

                    A) कमी

                    B) जास्त

                    C) साधारण

                    D) या पैकी नाही

22) ………….. निधी समाजशील वर्तनाचा नवा प्रकार आहे

                  A) जनहित / जनसहयोग

                   B)  कल्याण

                   C)  सार्वजनिक

                    D) यापैकी नाही

23) ……………. भावना मदतीची इच्छा कमी करतात

                   A) नकारात्मक

                   B) सकारात्मक

                   C) दुःखद

                    D) यापैकी नाही

 

 

 

 

योग्य उत्तरे खालील प्रमाणे

1)       A) समाधान

2)         A )   3

3)      A) अचूकता

4)            A) संप्रेषण

5)           A) डार्ली व लाटाने

6)           C)

7)              A) जास्त

8)      A) आदर्श

9)          A) नकारार्थी

10)       A) समाज बहिष्कृत

11)        C) समाजप्रिय

12)         C) फोर्गस

13)          D) आयसेन

14)        C) ईगली

 

15)     C) लोककल्याण

16)     A) समाजाभिमुख

17)     A) तद्नूभुतीमुळे

18)      A) तीन

19)    A)  मज्जापेशी

20)    A) जास्त

21)    A) कमी

22)   A) जनहित / जनसहयोग

23)      A) नकारात्मक

 

पर्शियन साधने

 बी. ए. ३ पेपर क्रमांक १५

पर्शियन साधने.   मुघल इतिहासकारांनी लिहिलेली मुघल साम्राज्याच्या इतिहासाची साधने बादशहाची चरित्रे, सरदारांची पत्रे, विजापूरच्या आदिलशाही, गोवळकोंड्याची कुत्बशाही, अहमदनगरची निजामशाही या बादशाहीत होत्या त्यांचे बहुतांश लिखाण हे पारशी भाषेत होते या साधनांमधून मराठ्यांच्या बाबतची माहिती आपणास उपलब्ध होते.

१).. मासिरे आलमगिरी.  औरंगजेब बादशहाचा हा चरित्रग्रंथ साकी मुस्तैदखान यांनी इसवी सन १७०९ मध्ये लिहिला. लेखक औरंगजेबाच्या दरबारात एक अधिकारी होता. या ग्रंथाचे इंग्रजी भाषांतर सर जदुनाथ सरकार यांनी केले तर मराठी भाषांतर सेतू माधवराव पगडी यांनी केले. औरंगजेब बादशहाच्या राज्यारोहण यापासून च्या अनेक घटना त्याने दिलेले आहेत छत्रपती शिवाजी राजे संभाजी महाराज राजाराम व ताराबाई यांच्या कारकीर्दीतील अनेक घटनांचा उल्लेख यामध्ये आहे.

२)... तारीखे खाफीखान.    या ग्रंथाचे नाव लांबलचक आहे मात्र म्हणताना त्याला तारीखे काफीखान असेच म्हणतात. इसवीसन १७३४ साली खाफीखानाने हा ग्रंथ लिहिला. रॉयल एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगाल यांनी तो प्रसिद्ध केला. सेतुमाधवराव पगडी यांनी मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध या नावाने तो प्रसिद्ध केला.

  औरंगजेबाच्या सैन्यातील अधिकारी म्हणून या पिकांनी काम केले आहे त्याने स्वतः मराठा मुघल संघर्ष पाहिला होता मराठ्यांनी औरंगजेबाचे केलेली दुर्दशा या ग्रंथामधून आपणास दिसते धनाजी संताजी चा पराक्रम राजाराम ताराबाई ची कामगिरी यातून आपणास समजते.

३).   तारीखे दिलकुशा.     भीमसेन सक्सेना यांचे हे आत्मचरित्र आहे. औरंगजेबाच्या पदरी काम करणारा भीमसेन सक्सेना बादशहाबरोबर दक्षिणेच्या मोहिमेवर आला त्याने अनेक लढाया पाहिल्या.१७०१ चा पन्हाळा वेड्या वेळी तो स्वतः हजर होता इसवीसन १७०९ मध्ये त्यांनी हे लिखाण पूर्ण केले. बुंदेल्यांचे बखर या नावाने पटवर्धन यांनी या ग्रंथाचा अनुवाद केला आहे. 

४). फुतूहाते अलगिरी ( अलम गिरा चे विजय).  ईश्वरदास नागर यांनी हा ग्रंथ लिहिला तो औरंगजेब बादशहाच्या न्यायाधीशपदी कारकून होता.१७१० ते १७२० दरम्यान त्यांनी हा ग्रंथ लिहिला सेतुमाधवराव पगडी यांनी  मुघल मराठा संघर्ष या नावाने त्याचा अनुवाद केला आहे. शाहिस्तेखानाच्या आक्रमणापासून ते सातारच्या किल्ल्याच्या वेड्या पर्यंत सविस्तर माहिती तसेच संभाजी अकबर कवी कलश दुर्गादास राठोड राजाराम संताजी घोरपडे यांच्या बद्दलची माहिती यातून मिळते छत्रपती संभाजी ने बादशाह पुढे मान झुकवली नाही डोळे काढल्यावर अन्नत्याग केला इत्यादी माहिती ईश्वरदास यांनी दिली आहे.

५). खुतुते शिवाजी. ( शिवाजी महाराजांची पत्रे). 

या ग्रंथामध्ये शिवाजी महाराजांच्या बरोबरच औरंगजेब शहजादा अकबर झुल्फिकारखान मिर्झा राजे जयसिंग शाहू महाराज यांची सुद्धा पत्रे आहेत सर जदुनाथ सरकार यांनी या पत्रांचा इंग्रजी अनुवाद प्रसिद्ध केला आहे सेतुमाधवराव पगडी यांनी मुघल मराठा संघर्ष या नावाने तो पुन्हा  प्रकाशित केला.

६). हफ्त अंजुमन.   मिर्झाराजा जयसिंग यांच्या पत्रांचा संग्रह आहे औरंगजेबास त्यांनी दक्षिण मोहिमेवर असताना लिहिलेली पत्रे यात आहेत सेतुमाधवराव पगडी यांनी मोबाईल मराठा संघर्ष यात त्यांचा अनुवाद केला आहे.

७).  लुतफुल्ला खानाची पत्रे   लुतफुल्ला खान शहाजहान बादशहाचा वजीर असा मुलगा होता औरंगजेब बादशहाच्या दरबारात काम करत होता त्याच्या धनाजी संताजी बरोबर लढाई झाल्या यातून आपणास विजापूर औरंगाबाद पराड इत्यादी ठिकाणच्या माहिती मिळते त्याच्या 40 पत्रांचा अनुवाद सेतू माधवराव पगडी यांनी मोगल मराठा संघर्ष यात दिला आहे.

८) मातरब खानाची पत्रे    मातरब खान गर्ल सरदार होता नाशिकचा ठाणेदार होता बागलाण नाशिक उत्तर कोकण येथे त्यांनी पराक्रम केला होता ही पत्रे मराठ्यांच्या अभ्यासास उपयुक्त आहेत.

९). भुसातीन उस सलातीन.  हा विजापूरच्या आदिलशहाचा इतिहास ग्रंथ आहे विजापूरच्या आदिलशाही घराण्याचा इतिहास या नावाने मूड वझे यांनी तो प्रसिद्ध केला खरे आणि बेंद्रे यांनी ही त्याचा अनुवाद केलेला आहे.

१०).  अखबरात. बादशहाच्या दरबारात दररोज घटना घडलेल्या घटनांचा वृत्तांत सरकारी अधिकारी लिहून ठेवत असत काळाच्या ओघात यातील बरीच पत्रे नष्ट झाली आहेत मात्र लंडन जयपूर आणि कलकत्ता येथील दप्तर खाण्यात काही अखबार आज उपलब्ध History of Aurangzeb या ग्रंथात सर जदुनाथ सरकार यांनी त्यांचा वापर केला आहे डॉ. खरे आणि सेतुमाधवराव पगडी यांनीअखबरात  त्यांचे मराठी भाषांतरही केलेले आहे.

जुगाड (कादंबरी) -किरण गुरव

 बी. ए. भाग :२

अभ्यासक्रमपञिका :६ 

सञ:  ४

जुगाड (कादंबरी) -किरण गुरव 

विषय प्राध्यापक :प्रा बी के पाटील

 प्रश्न :  योग्य पर्याय निवडा.   

१)  आय.डी.बी.आय. बॅंकेचे   

  टेक्निकल एक्सपर्ट भूमीनंदन साहेब यांना प्लॅन्टमधील किती माहिती होती ?

अ)    काहीही कळत नव्हतं

ब)    थोडी फार माहिती होती

क)    शंभर टक्के माहिती होती

ड)    अर्धवट माहिती होती.

२)  भूमीनंदन साहेबांचा सत्कार करुन त्यांना शाल श्रीफळासह काय भेट देण्यात आले ?

अ)    गणपतीची चांदीची मूर्ती

ब)    अय्यपाची चांदीची मूर्ती

क)    अंबाबाईची चांदीची 

ड)    छ.शिवाजी महाराजांची चांदीची मूर्ती.

३)  चेअरमनसाहेबांनी सत्कार समारंभात कशाचे भरभरुन वर्णन केले?

अ)    राधामाई प्रकल्पाचे

ब)    बाॅक्साईट कॅल्सिनेशन प्रकल्पाचे

क)    प्रभा कन्स्टक्शनचे

ड)    खाणविषयक प्रकल्पाचे

४)  प्रोजेक्टचे काम ठप्प झाले तसे जय, युसूफ, साजी कोणता खेळ सतत खेळू लागले?

अ)    रमी

ब)    बुद्धिबळ

क)    क्रिकेट

ड)    कॅरम

५)  सीमा मेमसाबने कोणत्या कार्यक्रमासाठी शशाला घरी यायचे निमंञण दिले ?

अ)  संक्रांत -तीळगूळ

ब)    दिवाळी

क)    बहिणीचा साखरपुडा

ड)    बहिणीच्या मुलाचे बारसे

६)  सीमा मॅडमच्या वडिलांनी शशाकडे कोणत्या  गोष्टीची विशेष चौकशी केली ?

अ)    त्याला पगार किती आहे

ब)    जन्मतारीख किती आहे

क)    पाव्हणेरावळे कोण आहेत

ड)    शेती किती एकर आहे

७)  शशाचे व आपले पाव्हणेरावळे एक आहेत हे कळल्यावर सीमाच्या वडिलांच्या कोणत्या वाक्याने शशा फुशारुन गेला ?

अ)    जमलं तर मग

ब)    आमच्यातलंच हाईसा घ्या

क)    तारीख कंदीची धरु

ड)    तुमच्या पिताजींना घ्या बोलवून

८)  वुईमन कंपनीचा मालक कोण होता ?

अ)    कोया सेठ

ब)    भूमीनंदन सेठ

क)    जय सेठ

ड)    एस. सुब्रह्यण्यम

९)  वुईमन कंपनीच्या मालकाला म्हणजे कोया सेठला आपल्याबरोबर घेऊन  कोण आले होते?

अ)    जय

ब)    साजी

क)    सुब्रह्यण्यम

ड)    थाॅमस

१०)  कोया सेठला सोडायला कोल्हापूरपर्यत कोण गेले होते ?

अ)    जय

ब)    साजी

क)    सुब्रह्यण्यम

ड)    थाॅमस

उत्तरे ................

१)  अ)  काहीही कळत नव्हतं

२)  क)  अंबाबाईची चांदीची मूर्ती

३)  ड)  खाणविषयक प्रकल्पाचे

४)  ब)  बुध्दिबळ

५)  ड)  बहीणीच्या मुलाचे बारसे

६)  क)  पाव्हणेरावळे कोण आहेत

७)  ब)  आमच्यातलंच हाईसा घ्या

८)  अ)  कोया सेठ

९)  ड)  थाॅमस

१०) ड)  थाॅमस

टिप: वरील योग्य पर्यायांची उत्तरे आहेत.

BCOM_AEC

https://drive.google.com/file/d/1F1IRMakowHOCmho9iSvSdqoPKh2SWmVe/view?usp=sharing