Sunday, 30 May 2021

सामान्य मानसशास्त्र / टॉपिक 2: प्रेरणा

 

राधानगरी महाविद्यालय राधानगरी

 बी.. भाग 1

सेमीस्टर 2

पेपर 2 सामान्य मानसशास्त्र

टॉपिक 2 प्रेरणा

दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा पूर्ण करा

1.       ही एक …..,…….…… शक्ती आहे

क)    आंतरिक

ख)   बाह्य

ग)     दर्शन

घ)     मागील

 

2.       सहजप्रवृत्ती सिद्धांत ………………….. यांनी विकसित केला

क)    विल्यम मँकडुगल

ख)   विल्यम वुंट

ग)     विल्यम विंटर

घ)     विल्यम जोन्स

3.       जागरण सिद्धांताचा संबंध विविध ………………….. यंत्रणांशी आहे

क)    शरीरशास्त्रीय

ख)   मानसशास्त्रीय

ग)     सामाजिक शास्त्रीय

घ)     पर्यावरणीय शास्त्रीय

4.       बोधनिक दृष्टीकोनाचा संबंध…,………………,………………,………………यांच्याशी संबंधित आहे

क)    विचार ,अपेक्षा ध्येय

ख)    ध्येय शरीर समाज

ग)     शरीर व्यक्तिमत्व समाज

घ)     व्यक्तिमत्व समाज अपेक्षा

5.       भूक ही …………….,.,….. प्रेरणा आहे

क)    प्राथमिक

ख)   दुय्यम

ग)     सामाजिक

घ)     बोधनिक

6.        भुकेचे नियंत्रण मेंदूतील ………………………. द्वारा होते

क)    हायपोथँलँमस

ख)   थँलँमस

ग)     मध्य मेंदू

घ)     पार्श्व मेंदू

7.       अँनोरिक्संस्किया नव्होसा ही…………………. विकृती आहे

क)    खाण्याची

ख)   पिण्याची

ग)     झोपण्याचे

घ)     चालण्याची

8.       चित्र अवबोधन चाचणीचा जनक……………………. मानसशास्त्रज्ञ आहे

क)    हेन्री मरे

ख)   हेन्री फॉर्ड

ग)     हेन्री विल्यम

घ)     हेन्री माल्कम

9.       संपादन प्रेरणेचा जनक……………………….. हा आहे

क)    डेव्हिड मँक्लेलँड

ख)   डेव्हिड मार्क

ग)     डेव्हिड डोनाल्ड

घ)     डेव्हिड जार्ज

 

10.   संलग्नतेच्या प्रेरणे संबंधी संशोधन ………………………यांनी केले

क)    शाक्टर

ख)   विंटर

ग)     अँडलेड

घ)     मँक्लेलँड

 

11.   व्यक्तीच्या वर्तनाच्या मुळाशी. ………………….. शक्ती असते

क)    बाह्य

ख)   तिव्र

ग)     अंतर्गत

घ)     सामान्य

12.   वर्तनाला चालना देणारा घटक म्हणजे…………………. होय

क)    प्रेरणा

ख)   भावना

ग)     संघर्ष

घ)     ऊद्दपक

13.    वर्तनाला आणि ऊर्जा देणारा घटक म्हणजे…………….,. होय

क)    भावना

ख)    विचार

ग)     वर्तन

घ)     प्रेरणा

14.    ………………. या संशोधकाने सर्वप्रथम सहज प्रवृत्ती ही संकल्पना स्पष्ट केली

क)    कार्ल युंग

ख)   फ्राँईड

ग)     विल्यम जेम्स

घ)     मँकडुगलन

15.   स्वतः चे अस्तित्व टिकवून ठेवणे हे ………………… मुळे शक्य होते

क)    आक्रमण

ख)   सहज प्रवृत्ती

ग)     भावना

घ)     झोप व निद्रा

16.   मँकडुगलने मानवामध्ये……………….. सहजप्रवृत्ती असल्याचे स्पष्ट केले

क)    १८

ख)   २२

ग)     ०९

घ)     १२

 

17.   मानवामध्ये जवळजवळ 5759 एवढ्या सहज प्रवृत्ती असल्याचे ………….. ने स्पष्ट केले

क)    बर्नाड

ख)   जेम्स

ग)     मँकडुगलन

घ)     फ्राँईड

18.   लैंगिक वर्तन व आक्रमकता याचा मानवी वर्तनावर परिणाम होतो असे असे ……………..  स्पष्ट केले

क)    मँकडुगलन

ख)   फ्राँईड

ग)     वँटसन

घ)     युंग

 

 

19.   1918 मध्ये सर्वप्रथम वुडवर्थने…………………..सिद्धांत स्पष्ट केला

क)    प्रचोदना

ख)   भावना

ग)     उद्दीपक

घ)     समतोल

20.   सर्व सजीव प्राण्यांमध्ये ……………….. उद्दीपन व्हावे अशी एक प्रेरणा असते

क)    जाणिवांचे

ख)   भावनांचे

ग)     ज्ञानेंद्रियांचे

घ)     विचारांचे

21.   …………….. आपण कार्यप्रवृत्त होतो व वर्तनात सातत्य राखले जाते

क)    प्रलोभनामुळे

ख)   शिक्षेमुळे

ग)     विचारामुळे

घ)     विश्रांतीमुळे

22.   स्वतः मधील सुप्त गुण ओळखून क्षमता ओळखून विकास साधणे म्हणजे ………………होय

क)    चिंतन

ख)   आत्मपरीक्षण

ग)     आत्माविष्कार

घ)     भावना

23.   अमेरिकेतील एकूण लोकसंख्येपैकी ……………,. वजनदार व्यक्ती होत

क)    /

ख)   /

ग)     /

घ)     /

24.   बॉडी मास इंडेक्स या परिमाणाने ……………….. चे मोजमाप करता येते

क)    लठ्ठपणा

ख)   वजन

ग)     बुद्धिगुणांक

घ)     भावनांक

25.   ……………… या हार्मोनकडून भुकेच्या संवेदना मेंदूकडे पाठवल्या जातात

क)    प्रोलिन

ख)   अँड्रोजन

ग)     घ्रेलिन

घ)     इन्सुलिन

26.   ……………. प्रेरणा प्रबळ असणाऱ्या व्यक्ती आपले कार्य शीघ्रगतीने पार पाडतात

क)    प्रभुत्व

ख)   कर्तुत्व

ग)     आक्रमण

घ)     सहवास

27.   …………….. या संशोधकाने सर्वप्रथम कर्तुत्व या सामाजिक प्रयत्न विषयी सखोल संशोधन केले

क)    मेक्लेलँड

ख)   मँकडुगलन

ग)     फ्रॉइड

घ)     जेम्स

28.   नवजात अर्भकाला आपली आई सोबत हवी असते या प्रेरणेला……………म्हणतात

क)    झोप

ख)   सहवास

ग)     कुतूहल

घ)     भूक

 

योग्य पर्याय खालीलप्रमाणे

1)      क)    आंतरिक

2)      क)    विल्यम मँकडुगल

3)      क)    शरीरशास्त्रीय

4)      क)    विचार ,अपेक्षा ध्येय

5)      क)    प्राथमिक

6)      क)    हायपोथँलँमस

7)      क)    खाण्याची

8)      क)    हेन्री मरे

9)      क)    डेव्हिड मँक्लेलँड

10)   क)    शाक्टर

11)   ग)    अंतर्गत

12)   क)    प्रेरणा

13)   घ)    प्रेरणा

14)   ग)    विल्यम जेम्स

15)   ख)    सहज प्रवृत्ती

16)   क)    १८

17)   क)    बर्नाड

18)   ख)    फ्राँईड

19)   क)    प्रचोदना

20)   ग)    ज्ञानेंद्रियांचे

21)   क)    प्रलोभनामुळे

22)   ग)    आत्माविष्कार

23)   क)    २/३

24)   क)    लठ्ठपणा

25)   ग)    घ्रेलिन

26)   ख)    कर्तुत्व

27)   क)    मेक्लेलँड

28)   ख)    सहवास

 

प्रश्नावली

 (Dhere V. D.)

B.A.III

Paper XVI

प्रश्नावली

  संशोधन प्रक्रियेमध्ये प्रश्नावली तंत्राला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. एखाद्या समस्येचा अभ्यास करण्यासाठी त्या समस्येबाबत माहिती मिळवण्यासाठी संशोधकांने तयार केलेल्या प्रश्नांच्या मालिकेस प्रश्नावली असे म्हणतात. एखादे समस्या विधान डोळ्यासमोर ठेवून संशोधक त्याची उत्तरे शोधण्यासाठी मोठी प्रश्नावली तयार करतो. या प्रश्नावली मध्ये जे प्रश्न असतात ते संशोधनाच्या कामासाठी उपयुक्त ठरतात. या प्रश्नावली मधून लोकांची मते समजावून घेतली जातात. राज्य शासन चालवताना कोणत्या अडचणी येतात याची माहिती शासनाला येऊ शकते. प्रश्नावली मधून संशोधक तत्कालीन परिस्थितीचे आकलन करून घेतो. प्रश्नावली चा वापर प्रामुख्याने आधुनिक काळातील विशेषतः समकालीन माहिती संकलित करण्यासाठी होतो. सामाजिक, आर्थिक व राजकीय विषयाच्या संशोधनामध्ये प्रश्नावली फार उपयुक्त असते. ज्या अभ्यास विषयातील व्यक्ती शिक्षित आहेत, प्रश्न ओळीतील प्रश्न समजतात, विचार करणाऱ्या व्यक्ती आहेत, प्रश्नावली तील प्रश्नांची लिखित उत्तरे देण्यात त्यांना कोणाची भीती वाटत नाही. अशा प्रकारच्या उत्तरदाते कडून माहिती घेण्यासाठी प्रश्नावली हे चांगले साधन आहे. उत्तरदात्याला लिखित प्रश्न विचारून त्याच्याकडून शाब्दिक व लिखित प्रतिक्रिया मिळवणे ही प्रश्नावली ची उद्दिष्टे आहेत.

      प्रश्नावली चे प्रकार

  सामाजिक संशोधन कोणत्या प्रकारचे आहे व उत्तर दात्याकडून नेमकी कोणत्या प्रकारची माहिती अपेक्षित आहे या आधारावर प्रश्नावलीचे अनेक प्रकार पडतात.



अ). संरचीत प्रश्नावली:-.

         या प्रकारची प्रश्नावली छापून पोस्टाने किंवा मुलाखत काळाबरोबर पाठवतो. संशोधक आपला विषय, हेतू, संशोधनाची व्याप्ती आणि खोली याचा विचार करून विचारावयाचे प्रश्न प्रश्नांचा क्रम निश्चित करतो. व त्यातच महत्त्वाची पर्यायी उत्तरे देतो. उत्तरदाते असे प्रश्न आपल्या पसंतीचे उत्तर  निवडण्यास सांगतो. काही प्रश्नांची उत्तरे संशोधकास स्पष्ट माहित नसतात किंवा त्याबाबत उत्तर दात्याकडून मते हवी असतात. ज्या प्रश्नांची पर्यायी उत्तरे दिलेली नसल्यास उत्तरदात्याकडून त्याच्या शब्दांमध्ये उत्तर देण्याचे स्वातंत्र्य दिलेले असते. अशा प्रश्नांना मुक्त किंवा अनावृत्त प्रश्न म्हणतात. प्रश्नाच्या व्यक्ती वरून प्रश्नाचे स्वरूप कसे असावे हे संशोधक ठरवतो खुल्या प्रश्नामुळे प्रत्येकाने वेगवेगळी उत्तरे दिल्याने प्रश्नाच्या उत्तराची वर्गीकरण करण्यामध्ये संशोधकांची कसोटी लागते. त्यासाठी जास्त वेळ खर्च होतो. तर बंदिस्त प्रश्नामुळे संशोधकांची वर्गीकरणाची काम कमी होऊन त्वरित निष्कर्ष काढता येतात.

        ब). असंरचित प्रश्नावली:-. 

    या प्रकारात या समस्येविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही, निश्चित प्रश्न किंवा पर्याय देता येत नाहीत, अशा वेळी असंरचित प्रश्नावली चा उपयोग होतो. उत्तर दात्याला अनुभव शब्दांकित करून त्यावरून निष्कर्ष काढून प्रश्न तयार करावे लागतात. अशा प्रश्नावली मध्ये उत्तरदात्यावरच जास्त जबाबदारी असते तर असंरचीत प्रश्नावलीत उत्तरे वेगवेगळी असू शकतात. त्यामुळे अनेक उत्तरदात्यानी दिलेल्या उत्तराची तुलना करणे अवघड जाते. समस्येबाबत प्राथमिक माहिती मिळवण्यासाठी ही प्रश्नावली उपयोगी ठरते.


आदर्श प्रश्नावलीचे स्वरूप:- 

१). प्रश्नावली तील प्रश्नांची लांबी क्रम व पर्यायी उत्तरे याबाबत काळजी घ्यावी.

२). प्रश्नावली चांगली तयार होण्यासाठी कौशल्य व अनुभव हवा.

३). ज प्रश्नावलीचे उत्तरे पोस्टामार्फत मिळवायचे असतील तर संशोधकाने विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

४). प्रश्न अचूक व काटेकोर शब्दात विचारावेत.

५). प्रश्न छोटे सोपे व सुटसुटीत असावेत.

६). पंधरा ते वीस मिनिटांमध्ये उत्तरे देऊ शकतील एवढेच प्रश्न असावेत.

७). प्रश्नांच्या उत्तराचे पर्याय असावेत असं तिच्या उतरल्याबरोबर अशी खूण करण्यास सांगावे.

८). प्रश्न वस्तुनिष्ठ असावेत.

९). प्रश्न सुसंगत असावेत.

१०). प्रश्नावली मध्ये खाजगी प्रश्न विचारताना शब्दांची निवड काळजीपूर्वक करावी.


प्रश्नावली तंत्र प्रभावी होण्यासाठी घ्यावयाची काळजी.

     अ. आवाहन:-. प्रश्नावली तयार केल्यानंतर उत्तरदात्याला आपल्या संशोधनाबद्दल थोडक्यात पण पूर्ण माहिती द्यावी. प्रश्नावली उत्तरदात्याकडे पाठवताना ती भरून परत पाठवणे बाबत विनंती करणारे आवाहन पत्र सोबत जोडावे. त्यात पुढील गोष्टी असाव्यात.

१). प्रश्नावली तयार केल्यानंतर ती भरून पाठवणे बाबत योग्य शब्दात विनंती करावी.

२). प्रश्नावली भरून मिळणारी माहिती गोपनीय ठेवावयाची असेल तर तसा स्पष्ट उल्लेख असावा.

३). प्रत्येक प्रश्नवली वर अनुक्रमांक असावा.


Dhere Sir, [19.05.21 14:42]

४). आवाहन व प्रश्नावली चांगल्या प्रतीच्या व योग्य आकाराच्या कागदावर आकर्षक पद्धतीने छा.

५). संशोधन करणारी व्यक्ती किंवा संस्था संशोधनाचा हेतू व विषय संशोधनात मिळणारी सरकारी मदत यांचा उल्लेख करावा.

६). प्रश्नावली सोबत तिकीट लावलेले पाकीट पाठवावे.

७). प्रश्नावली कशी भरावी किती वेळेत व कोणाकडे पाठवावी याचा स्पष्ट उल्लेख करावा.

      ब.. प्रश्नावली ची चाचणी:- 

      प्रश्नावली तयार केल्यानंतर ती प्रातिनिधिक स्वरुपात काही उत्तरदात्यानकडे पाठवून ती योग्य झाली आहे की नाही याची चाचणी घ्यावी. अशा चाचणीमुळे प्रश्नावली किती अचूक आहे? किती अचूक उत्तरे मिळतात? प्रश्नावलीत कोणत्या उणिवा आहेत? हे समजते.

      क.. प्रश्नावली ला मिळालेला प्रतिसाद:-. 


               जर २०% ते ३०% लोकांनी प्रश्नावली भरून पाठवल्यानंतर चांगला प्रतिसाद मिळाला असेल तर याहीपेक्षा चांगला प्रतिसाद मिळण्यासाठी खालील बाबीकडे अधिक लक्ष द्यावे.

 १).  केलेले आवाहन प्रभावी असावे.

२). ज्यांच्याकडून प्रश्नावली भरून आल्या नसतील त्यांना स्मरण पत्र पाठवून योग्य कालावधीत पाठवण्याची विनंती करावी.

३). प्रश्नावली साठी वापरलेला कागद त्याची छपाई ही उत्तर जात्याला प्रभावी करणारी असावी ज्यामुळे संशोधन कार्य करण्यास हातभार लावण्याची त्याची इच्छा होईल.


      प्रश्नावली चे गुण

  

  १).  प्रश्नावली ही संशोधकाच्या तटस्थ प्रतीचे निदर्शक असते त्यामुळे ती वस्तुनिष्ठ  असू शकते.

२). प्रश्नावली कोणी भरून पाठवली याचे नाव जाहीर न केल्याने वस्तुनिष्ठ माहिती मिळते व गुप्तता राखली जाते.

३). प्रश्नावली चे उत्तर पाठवलण्यावर संशोधकाचे प्रत्यक्ष दडपण नसते त्यामुळे व्यक्ती पूर्ण विचारांती प्रश्नावली भरते.

४). अतिशय कमी वेळेत बऱ्याच जणांना प्रश्नावली देऊन माहिती गोळा करता येते.

५). प्रश्न सुटसुटीत व उत्तरेही सुटसुटीत असल्याने वर्गीकरण करून मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करणे सोपे जाते.

६). व्यक्ती कितीही दूर असली तरी पोस्टाने प्रश्नावली पाठवून त्याच्याकडून माहिती मिळवता येते.

७). प्रश्नावली पोस्टाने पाठवावयाचे असल्याने मुलाखत करांना प्रवासासाठी निवेदक यांना भेटण्यासाठी लागणारा वेळ श्रम व पैसा यांची बचत होते.

८). उत्तरदाता स्वतःच्या घरी स्वतःच्या सवडीने विचार करून प्रश्नाचे उत्तर लिहित असल्याने वेळेचे व मुलाखत कराचे उपस्थितीचे दडपण त्याच्यावरून नसते.



       प्रश्नावली चे दोष:-. 

१). प्रश्नावली मध्ये उत्तरदात्याच्या उत्तरावर विश्वास ठेवावा लागतो त्याच्या उत्तरांची पडताळणी करण्याची संधी नसते.

२). उत्तरदातामध्ये पूर्वग्रहदूषित पण असेल तर वस्तुनिष्ठ माहिती मिळणे अशक्य असते.

३). प्रश्नावली मधील प्रश्नाचा अर्थ समजून घेण्याची कुवत उत्तरदात्यामध्ये असावी लागते.

४). प्रश्नावली पाठवल्यावर त्याची उत्तरे वेळेत मिळतील याची खात्री नसते कमी प्रतिसादामुळे अधिक व्यक्तींकडे प्रश्नावली पाठवावे लागतात.

५). पिक्चर प्रश्नावली छोटे व सुटसुटीत प्रश्न असतील तर त्याची योग्य उत्तरे मिळत नाहीत

कौटुंबिक हिंसाचार : घटस्फोट

B.A.II

SEMESTER -4

 SOCIOLOGY PAPER -5

लिंगभाव हिंसाचार

प्रकरण :- 2 कौटुंबिक हिंसाचार

:घटस्फोट:

भारतातील विवाह विच्छेदनासाठी आवश्यक कायदेशीर अटी (कारणे)

विवाह विच्छेदनासाठी पती किंवा पत्नी वरीलप्रमाणे विविध कारणास्तव घटस्फोट मागू शकतात. परंतु त्याचबरोबर कायदेशीर दृष्टिकोणातून विवाह विच्छेदनासाठी असलेल्या अटीनुसारच घटस्फोट दिला किंवा घेतला जाऊ शकतो. भारत हा बहुधर्मीयदेश आहे. परंतु प्रत्येक धर्माची संस्कृती व तत्वे भिन्न स्वरूपाची आहेत. त्यानुसार घटस्फोटविषयक अटीदेखील काही प्रमाणात भिन्न आहेत. असे असले तरी सर्वसाधारणपणे काही प्रमुख अटी सर्व धर्मांमध्ये समान असल्याचे दिसून येते.

भारत सरकारने १९५५ साली विवाहविषयक अधिनियम मंजूर केला. हा अधिनियम दोन भागात विभागला गेला आहे. पहिल्या भागाचा संबंध विवाहाशी तर दुसरा भाग विवाह विच्छेदाशी संबंधित आहे. हा कायदा मंजूर करताना हिंदू समाजाच्या संस्कृतीची जपणूक करण्यात आली असून विवाहासंबंधीचा धार्मिक दृष्टिकोण व त्याचे पावित्र्य यात कायम ठेवले आहे.

पती-पत्नीला एक दुसऱ्यापासून विलग होण्यासंबंधीच्या या अधिनियमाचे तीन भाग आहेत. न्यायिक पृथक्करण, विवाह अवैध घोषित करणे व विवाह विच्छेद हिंदू विवाह कायद्यांतर्गत (१९५५) घटस्फोटविषयक तरतूद करण्यापूर्वी प्रथम कोल्हापूर संस्थानात १९२० साली व नंतर बडोदा संस्थानात १९४२ साली विशिष्ट कारणास्तव स्त्रियांना घटस्फोट घेण्यास मान्यता देणारे कायदे झाले हे लक्षात घेतले पाहिजेत.

भारतात विवाहविषयक कायदे प्रामुख्याने १९५४ साली 'विशेष विवाह अधिनियम (Special Marriage Act') आणि १९५५ साली 'हिंदू विवाह अधिनियम' (Hind Marriage Act') असे दोन कायदे अस्तित्वात आले. अर्थात, हे कायदे हिंदू धर्मीय दृष्टिकोणातून निर्माण केले असले तरी हे कायदे हिंदूंप्रमाणेच जैन, बौद्ध, शीख धर्मांना तसेच लिंगायत, वीरशैव यांनादेखील लागू आहे. मुस्लीम, ख्रिश्चन व पारशी या समुदायासाठी घटस्फोटाचे कायदे वेगळे आहेत. परंतु विवाह विच्छेदनासाठीच्या बहुतांश अटी एकसारख्या स्वरूपाच्या आहेत.

हिंदू विवाह अधिनियम १९५५ (Hindu Marriage Act)

हिंदू विवाह अधिनियम यामध्ये विवाहविषयक अटी, विवाह पद्धती, विवाह नोंदणी, वैवाहिक हक्क, विवाह शून्यता अशा विवाहविषयक तरतुदींबरोबरच विवाह विच्छेद म्हणजेच घटस्फोटा बाबतचे नियमही दिलेले आहेत. त्यामध्ये करू शकतात. घटस्फोटाचा कायदा १९५५ ला जरी झाला असला तरी त्यापूर्वी केव्हाही विवाह झाला असला तरी त्यांना घटस्फोट मिळू शकतो. अर्थात, घटस्फोट घेणे फारसे सोपे नाही. हिंदू कायद्याने त्यासाठी विविध अटी घातल्या असून त्या सिद्ध कराव्या लागतात. १९५५ च्या हिंदू विवाह कायद्यानुसार घटस्फोट घेण्याबाबतच्या तरतुदी म्हणजेच घटस्फोट मिळविण्यासाठी असलेली कायदेशीर कारणे अगर अटी पुढीलप्रमाणे

() घटस्फोट मिळविण्यासाठीची कायदेशीर कारणे (अटी)

१९५५ च्या हिंदू विवाह कायद्यातील कलम १३ नुसार पती किंवा पत्नी पुढील | कारणांवरून जिल्हा न्यायालयात विनंती अर्ज करून घटस्फोटाचा आदेश मिळवू शकतात. . विवाहानंतर पती अगर पत्नीने परस्त्री किंवा परपुरुषाशी शारीरिक संबंध ठेवल्यास,

. विवाहानंतर जोडीदाराने अर्जदारास क्रूरपणाची वागणूक दिली असल्यास . जोडीदाराने अर्जदाराचा किमान दोन वर्षांपासून त्याग केलेला असेल.

. जोडीदाराने धर्मांतर केले असलेस

. जोडीदाराला असाध्य रोग, कुष्ठरोग, गुप्तरोग झाला असल्यास . जोडीदार दीर्घकाळ मानसिक आजाराने त्रस्त असल्यास अथवा वेडा असेल ७. जोडीदाराने संन्यास घेतला असल्यास

. जोडीदार सात वर्षांपासून बेपत्ता असेल आणि तो जीवंत असल्याचे ऐकिवात नसल्यास,

. पती-पत्नी दोघे कायदेशीररित्या विभक्तपणाचा न्यायालयाचा आदेश प्राप्त झाल्यानंतर दोन वर्षे एकत्र आले नसल्यास.

() पत्नी पुढील अटीनुसार घटस्फोट घेऊ शकते.

 १. विवाहाच्या वेळी पतीची प्रथम पत्नी हयात असलेले आढळल्यास

. विवाहानंतर पती हा बलात्कारी, समलिंगी संभोगी या आरोपात दोषी आढळल्यास,

. कायदेशीर विभक्त होण्याचा जाहीरनामा मिळाल्यानंतर किमान एक वर्षे दोघे पती-पत्नी म्हणून एकत्र राहात नसतील,

. एखाद्या मुलीचा विवाह तिच्या १५ वर्षे वयाच्या आत झाला आणि ती १८ | वर्षांची झाल्यानंतर तिने तो विवाह नाकारला असेल (परंतु त्या दरम्यान दोघांचे शारीरिक संबंध प्रस्थापित झालेले नसावेत)

() पती-पत्नी दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेणे.

. विवाह झाल्यानंतर एक वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त काळ पती-पत्नी वेगळे राहात असतील आणि घटस्फोट मिळविण्यासाठी दोघांचे एकमत असेल तर ते तसा न्यायालयात अर्ज करू शकतात.

. न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केल्यानंतर दीड वर्षाच्या आत अर्ज मागे घेतला नसलेस व योग्य त्या चौकशीनंतर, खात्री पटल्यावर न्यायालय घटस्फोट देऊ शकते.

. विवाहानंतर एक वर्ष पूर्ण होईपर्यंत घटस्फोटासाठी न्यायालयात कोणीही अर्ज करू शकत नाही.

. परंतु एक वर्षाच्या आत जोडीदार अनैतिक वागत असेल, खूपच त्रास देत असेल तर अपवादात्मक परिस्थितीत न्यायालय अशा वेळी घटस्फोटाचा अर्ज स्वीकारू शकते.

() पुनर्विवाहाची तरतूद:-

न्यायालयाने घटस्फोटाचा हुकूमनामा दिल्यानंतर अशिलाने त्या विरोधात दिलेल्या मुदतीत अर्ज केला नसेल तर पुनर्विवाह करता येतो.

() पोटगी:-

कायद्यानुसार पती किंवा पत्नीने पोटगी किंवा निर्वाह खर्च मिळावा अशी विनंती न्यायालयात केल्यास न्यायालय प्रतिपक्षाची मालमत्ता, उत्पन्न, वर्तन लक्षात घेऊन रोख रक्कम किंवा मासिक अगर वार्षिक रक्कम हयात असेपर्यंत देण्याबाबत आदेश काढू शकते. अर्थात, अर्जदार नोकरी करीत असेल तर मात्र पोटगी मिळण्याची शक्यता कमी असते.

() अपत्याचा ताबा

अपत्याचा ताबा कोणाकडे असावा याबाबत स्पष्ट निर्देश या कायद्यात नाहीत; परंतु १९५६ च्या हिंदू अज्ञानत्व व पालकत्व कायद्याप्रमाणे अपत्याचा ताबा मिळण्याचा प्रथम हक्क पित्यास आहे. पण अपत्य पाच वर्षांचे होईपर्यंत ते मातेकडे राहते.

वरीलप्रमाणे हिंदू विवाह कायद्यानुसार पती किंवा पत्नीला वरील अटींनुसार घटस्फोट दिला जातो. वरील अटींची पूर्तता केली असेल तरच घटस्फोट घेता वा देता येतो. 

जुगाड -किरण गुरव

 बी. ए. भाग:२

अभ्यासक्रमपञिका क्रं. ६

सञ : ४

जुगाड  -किरण गुरव

विषय प्राध्यापक प्रा बी के पाटील

प्रश्न : योग्य पर्याय निवडा.

१)   "बहोत........... होते हो यार मरहट्टी लोग,......." असं थाॅमस म्हणाला

अ)   कामचोर

ब)    फिल्मी

क)    गुस्साखोर

ड)    दुबले

२)   बी सी थ्रीच्या काॅलमवर अगदी टोकाला शशा ताठ उभा राहिला आणि..........

अ)   अचानक त्याला पांडूने खाली ढकलला.

ब)    अचानक त्याचा तोल गेला.

क)    अचानक त्याने वरनं उडी ठोकली.

ड)    अचानक त्याला चक्कर आली.

३)   'या नोकरीचं काही खरं नाही' अशी नोटीस......

अ)    शशाला चेअरमनने पूर्वीच दिली होती.

ब)    गोप्याने शशाला पूर्वीच दिली होती

क)    शशाने स्वत:ला पूर्वीच दिली होती

 ड)    सीमाने शशाला पूर्वीच दिली होती

४)   कंडक्टर तिकीट द्यायला आल्यावर शशा काय म्हणाला?

अ)   एक कोल्हापूर द्या

ब)    एक पाठगाव द्या

क)    एक भ्रम द्या

ड)    एक चक्कर द्या

५)   बाकी सगळं ठीक करण्याचा एकमेव जुगाड कोणता आहे असं शशाला वाटलं ?

अ)  आपलं शरीर

ब)    आपलं सीमावरचं प्रेम

क)    आपलं गावाकडे परत जाणं

ड)    आपलं लग्न होणं

६)   'टिकूनच पुढे विकास होईल आणि त्यासाठी शरीर हाच एकमेव अंतिम ............ आहे' असं शशाला वाटलं.

अ)    जुगाड

ब)    आत्मा

क)    परमेश्वर

ड)    पर्याय

उत्तरे...........................

१)    ब) फिल्मी

२)    क) अचानक त्याने वरनं उडी ठोकली

३)    क)  शशाने स्वत:ला पूर्वीच दिली होती

४)    क)  एक भ्रम द्या

५)    अ)  आपलं शरीर

६)    अ)  जुगाड

Friday, 28 May 2021

स्पर्श/ कवी लोकनाथ यशवंत

 बी. ए. भाग १

अभ्यासक्रमपञिका क्रं २

सञ : २

अक्षरबंध:कविता -स्पर्श

             कवी लोकनाथ यशवंत

विषय प्राध्यापक :प्रा बी के पाटील

१)   अनेक हलिउतार लोक काय करतात, असे कवी 'स्पर्श ' या कवितेत म्हणतात ?

अ)    कुञे पोसतात

ब)    म्हशी पाळतात

क)    अनाथालयात जातात

ड)    अनाथांना पोसतात

२)   अनेक हलिउतार लोक कुञ्याला काय खाऊ घालतात, असे कवी ' स्पर्श ' या कवितेत म्हणतात?

अ)   चपाती व दूध

ब)    बकर्‍याची मूंडी

क)    चीज व पनीर

ड)     मांस व मासे

३)   अनेक हलिउतार लोक कुञ्याचे लाड कसे करतात, असे कवी 'स्पर्श ' या कवितेत म्हणतात ?

अ)   ते कुञ्यांना चीज व पनीर खाऊ घालतात.

ब)    ते कुञ्यांना बांधून ठेवत नाहीत.

क)    ते कुञ्यांचे अगणित मुके घेतात. 

ड)    ते कुञ्यांना  चांदीची साखळी लावतात,

४)   काही माजलेले लोक कुञ्यांना..........., असे कवी 'स्पर्श ' या कवितेत म्हणतात ?

अ)   चीज व पनील खाऊ घालतात.

ब)    चांदीची साखळी लावतात.

क)    बांधून ठेवत नाहीत.

ड)    रंगीबेरंगी कपडे घालतात.

५)   किही माजलेले लोक कुञ्यांना............., असे ' स्पर्श ' या कवितेत म्हनतात.

अ)   स्वतंञ खोली बांधतात.

ब)    स्वतंञ वेळ देतात.

क)    शाम्पू वापरतात,

ड)    चौकीदार ठेवतात.

६)   अनाथ मुले कवीची वाट कशी बघतात असे कवी ' स्पर्श ' या कवितेत म्हणतात ?

अ)   प्रेयसीने प्रियकराला बघावी तशी.

ब)    बाळाने आईची बघावी तशी.

क)    चातकाने पावसाची बघावी तशी.

ड)    चकोराने चंद्राची बघावी तशी.

७)   कवी अनाथ मुलांना भेटायला जातो तेव्हा काय होते, असे कवी ' स्पर्श ' या कवितेत म्हणतात ?

अ)   त्यांचे डोळे  शुष्क होतात.

ब)    त्यांच्या चोहीकडे गुलाब डोलतात,

क)    ते स्वागतगीत गाऊ लागतात,

ड)    त्यांच्या डोळ्यांतून अश्रु वाहू लागतात.

उत्तरे ,...................

१)  अ)  कुञे पोसतात.

२)   ब)  बकर्‍याची मुंडी.

३)   क)  ते कुञ्यांचे अगणित मुके घेतात.

४)    ड)  रंगीबेरंगी कपडे घालतात.

५)   ड)  चौकीदार ठेवतात.

६)    अ)  प्रेयसीने प्रियकराची बघावी तशी.

७)   ब)  त्यांच्या चोहीकडे गुलाब डोलतात.

मुलाखत

 (Dhere V. D.)

B.A . III History paper XVI

  मुलाखत:- 

   इतिहासातील अभ्यासक संशोधकाला मुलाखत हा पर्याय सगळ्यात चांगला पर्याय आहे. अभ्यास विषयाची व्याप्ती पाहिल्यानंतर आपण कोणा कोणाची मुलाखत घेतली पाहिजे याचा विचार संशोधकाने करणे क्रमप्राप्त आहे? मुलाखत किती लोकांची घेणे आवश्यक आहे? मुलाखतीचे स्वरूप कसे कोणती असावी? याचा अगोदर विचार करावा मुलाखत म्हणजे तोंडी पद्धती होय. संशोधक आपले विचार मुलाखतीतून मांडतो लोकांना त्याबद्दल काय वाटते?  त्यांना कोणता प्रमाणबद्ध प्रतिसादाची अपेक्षा नसते.

     मुलाखत घेणारा मुलाखतकारा समोर मुलाखती चा विषय मांडतो. मुलाखतीमधील त्याचा हेतू स्पष्ट करून निवेदक मोकळेपणाने बोलण्याची मुभा देतो. प्रश्न व उत्तरे दोन्ही पूर्वनियोजित नसल्यामुळे मुलाखतीचे स्वरूप निश्चित राहते. व मुलाखतकराच्या गरजेप्रमाणे- सोयी प्रमाणे त्यास मूळ विषयाला अनुसरून इतर संबंधित प्रश्न विचारता येतात. या प्रकारच्या तंत्रामुळे निवेदकाला व मुलाखत काराला स्वातंत्र्य मिळते. या प्रकारांमध्ये मुलाखतकाराकडे प्रश्न विचारण्याचे अधिक कौशल्य लागते. मुलाखतकार कोणताही प्रश्न विचारू शकतो. निवेदक विषय सोडून दुसरी माहिती सांगत असेल तर त्याला विषयाची आठवण करून देतो त्यामुळे संपूर्ण चर्चा संबंधित विषयावर होते.

मुलाखत कशी घ्यावी? व त्यातील प्रश्नांचे स्वरूप कसे असावे?

१). संशोधकांनी मुलाखत घेत असताना कोणाची मुलाखत घेतली असता आपल्या कार्याला अधिक मदत होईल याचा अंदाज घ्यावा.

२). मुलाखत केव्हा घ्यावी याचा पूर्ण विचार करून मुलाखत घ्यावी.

३). ज्यांच्या मुलाखती घ्यावयाचे आहेत त्यांची प्रथम यादी तयार करावी.

४). प्रश्न सरळ, निसंदिग्ध, मुद्देसूद व सुटसुटीत असावेत म्हणजे मुलाखत कराचा गोंधळ होत नाही.

५). प्रश्न मुद्देसूद असतील तरच उत्तरे मुद्देसूद मिळतात.

६). मुलाखत घाईगडबडीत घेऊ नये ज्या व्यक्तीकडून मुलाखत घ्यायची आहे ती व्यक्ती बौद्धिक दृष्ट्या सक्षम असावी.

७). मुलाखत त्या व्यक्तीच्या सोयीच्या ठिकाणी घ्यावी म्हणजे तो उत्तरेही उत्साहाने देतो.

८). प्रश्न वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असावेत व्यक्तिनिष्ठ असतील तर मुलाखतकार मोकळेपणाने माहिती देणार नाही.


      मुलाखतीचे फायदे (गुण)

      १). उत्तम प्रतिसाद:- संशोधक स्वतः संशोधन क्षेत्रात जाऊन निवेदकाशी प्रथम संबंध प्रस्थापित करतो त्याच्याकडून माहिती संकलन करतो त्यामुळे निवेदकाचा प्रतिसाद उत्तम असतो.

      २). प्रश्नाची योग्य उत्तरे मिळतात:- निवेदकाच्या मनात प्रश्नाविषयी गोंधळ निर्माण झाला तर ते एकमेकांच्या प्रत्यक्ष संपर्कात असल्याने शंकाचे निरसन होते व सर्व प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित रित्या मिळतात.

      ३). सखोल अभ्यास होतो:- मुलाखत कार व मुलाखत देणारा या दोघांमध्ये एखाद्या घटनेविषयी व्यापक चर्चा होऊन अत्यंत बारीक सारीक माहिती संकलित होते त्यामुळे अभ्यास  सखोल होतो.

      ४).  पात्र लोकांकडून माहिती मिळण्यास उपयुक्त:-  निरक्षर लोकांकडून लहान मुलांकडून एखाद्या विषयाची माहिती संशोधकाला मिळवायचे असेल तर मुलाखत तंत्र हेच प्रभावी तंत्र आहे.

      ५). नाखूष लोकांकडून विश्‍वसनीय माहिती संकलित करण्यासाठी उपयुक्त तंत्र:- समाजात असे काही लोक असतात की कोणत्याही बाबी संबंधी विचारलेल्या प्रश्नांना काही कारणाने उत्तर देण्याची त्यांची इच्छा नसते असे नाखूष लोक सुद्धा मुलाखतीच्या माध्यमातून जेव्हा इतिहास काळापर्यंत पोहोचतात तेव्हा त्यांच्याकडून ही विश्वसनीय माहिती मिळू शकते.

      ६). मुलाखतीच्या सहाय्याने भावना  जाणता येतात:-. निवेदका कडून एखाद्या प्रश्नाविषयी माहिती घेत असताना तो भावनिक होऊ शकतो. काही वेळेला त्याच्या मनात असलेल्या अनामिक भीती मुळे तो उत्तर देण्याची टाळाटाळ करतो अशा वेळेला मुलाखतकार व निवेदक समोरासमोर असल्याने निवेदकाच्या मनातील भीती दूर करून त्यांच्या भावनांना आवर घालून आपणास योग्य माहिती संशोधक मिळवू शकतो.

      ७). माहितीची विश्वसनीयता:-. मुलाखतकार स्वतः निवेदकाची मुलाखत घेत असल्यामुळे व मिळालेल्या माहितीची नोंद करत असल्याने माहिती विश्वसनीय असते.

      ८). खरे-खोटे ची तपासणी करणे शक्य:-. मुलाखत घेणारी व्यक्ती प्रशिक्षित असेल तर निवेदकाला बोलते करून त्यांनी सांगितलेली माहिती खरी की खोटी याची शहानिशा करताना निवेदकाचे हावभाव बोलण्यातील चढ-उतार स्वतः पाहिल्यामुळे सत्यासत्यता पडताळून शकतो.

        त्याची मुलाखत घ्यायची आहे त्याची  स्मरण शक्ती समजते मौखिक इतिहास समजण्यास मुलाखत महत्त्वाचे साधन आहे मुलाखत घेताना संशोधकाने पुढील बाबींचा विचार करावा.

मुलाखतीचे स्वरूप

  १). प्रत्यक्षात संपर्क:-. मुलाखत देणारा व घेणारा यांच्यात प्रत्यक्ष सरळ संबंध प्रस्थापित होत असल्यामुळे कोणताही निवेदक खुल्या मनाने संशोधकाने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतो त्यामुळे मुलाखत यशस्वी होते.

  २). मुलाखत ही पूर्वनियोजित असते:- मुलाखत तंत्र कौशल्याने हाताळल


Dhere Sir, [18.05.21 12:22]

े लागते मुलाखतीतून योग्य व आवश्यक माहिती मिळवण्यासाठी मुलाखतीची पूर्वतयारी करणे आवश्यक असते. संशोधकाला सर्वप्रथम संशोधनासाठी निवडलेल्या विषयाचा सर्वांगीण अभ्यास करावा लागतो. मुलाखतकाराने योग्य प्रश्न विचारण्याचे कौशल्य वापरावे मुलाखतकार कोणताही प्रश्न केव्हाही विचारू विचारू शकतो. निवेदक विषय सोडून दुसरेच माहिती सांगत असेल तर त्याला विषयाची आठवण करून द्यावी लागते.

  ३). मुलाखत म्हणजे  हेतूपूर्वक संवाद:-. संशोधक व निवेदक यांच्यामध्ये मुलाखतीदरम्यान होणारा संवाद आहे. उपयोग होत असतो निवेदिका कडून मिळालेली माहिती सत्य आहे की नाही हे तपासता येते विविध मुलाखतीमधून येणारे निष्कर्ष आपण काढू शकतो.

  ४). विश्वसनीय माहिती संकलित करण्याचा हेतू:-. संशोधक निवेदक आखडून संशोधन विषयासंबंधी विश्वसनीय माहिती मिळवण्यासाठी मुलाखत तंत्र वापरतो मुलाखती संरचीत असो की  संरचीत, औपचारिक /अनौपचारिक व्यक्तिगत असो की समूह त्या  मागील हेतू हा विश्वसनीय माहिती मिळवणे हाच असतो.

  ५). मुलाखत एक परिणामकारक संवाद:-. मुलाखतीमध्ये फक्त संशोधक निवेदकाला प्रश्न विचारतो व निवेदक त्याची उत्तरे देतो, असे नसून निवेदक ही त्याच्या मनात निर्माण होणारे शंका संशोधका समोर मांडतो व त्यांचे निराकरण करून घेतो. त्यामुळे मुलाखत ही दुहेरी पातळीवर चालणारे विचार व भावना यांची देवाणघेवाण असते.

मुलाखतीचे प्रकार

१). संरचित किंवा आकारिक मुलाखत:- मुलाखत तंत्रात पूर्वनियोजित साचेबंद प्रश्न विचारले जातात त्यामध्ये मिळणारी उत्तरे ही साचेबंद असतात काही वेळा उत्तर सुद्धा होय नाही अशा पर्यायी स्वरूपाची असतात िवेदकाला त्याच्या प्रश्‍नांच्या बाहेर जाता येत नाही म्हणून या मुलाखतीला आकारिक किंवा संरचीत मुलाखत म्हणतात.

२). खुली किंवा मुक्त मुलाखत:-. या मुलाखत प्रकारात पूर्वनियोजनाशिवाय प्रश्न विचारले जातात. या प्रकारात मुलाखत करायला आपल्याला कोणते उत्तर मिळेल हे सांगता येत नाही.

A. मुलाखतीत लवचिकता साधंता येते:- मुलाखतीत एखादा प्रश्न निवेदकाला समजला नसेल तर वेगळ्या पद्धतीने त्याची रचना करून निवेदका कडून योग्य माहिती संकलित करता येते. निवेदकाची नेमकी मानसीकता कशी आहे याचा अंदाज घेऊन योग्य वेळी योग्य प्रश्न विचारून माहिती मिळवता येते.

B. अज्ञात घटनांचा अभ्यास शक्य होतो:-. मुलाखत हे असे तंत्र आहे की ज्या द्वारे निवेदकाशी स्वतः संपर्क साधून त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारून बोलते करून त्यांच्याकडून अद्याप अज्ञात असलेल्या घटनांचा ही अभ्यास करता येतो.

C. मुलाखतीत कल्पनांचे आदान-प्रदान होते:- मुलाखत तंत्रात संशोधक व निवेदक हे परस्परांच्या विचार कल्पनांचे आदान-प्रदान करतात अशी सुविधा इतर माहिती संकलन तंत्रात उपलब्ध होत नाही त्यामुळे मुलाखतीचा हा मोठा फायदा आहे.


     मुलाखतीचे दोष

१). खर्चिक व वेळ खाणारी पद्धत:- मुलाखत साठी श्रम वेळ व पैसा खर्च होतो प्राथमिक स्वरूपातील संशोधक जेव्हा अभ्यास क्षेत्रात गेल्यानंतर मुलाखत येणाऱ्यांची भेट होतेच असे नाही. अशावेळी संशोधकाला प्रवासासाठी अधिक खर्च करावा लागतो. पुन्हा पुन्हा संवाद साधावा लागतो त्यामुळे ही पद्धत खर्चिक आहे.

२). मुलाखतीमुळे बऱ्याच वेळेला अनावश्यक माहिती गोळा होते.

३). मुलाखतीत वापरल्या जाणाऱ्या शब्दांच्या अर्थात बदल होण्याची शक्यता असते.

४).  मुलाखत करायला काही वेळेला अपमान सहन करावा लागतो.

५). मुलाखत घेणारा व देणारा यांच्यातील ही अंतर क्रिया पूर्णपणे परस्पर विश्वासावर आधारित असते.

६). मुलाखत करामती प्रचंड सहनशील तसेच आवश्यक असते.

७). मुलाखत घेण्याची वैयक्तिक कौशल्य सर्वांनी आत्मसात करणे आवश्यक असते.

८). मुलाखत जर एखाद्या धंदेवाईक राजकारणी व्यक्तीची असेल तर तो मुद्दाम मुलाखत करायची दिशाभूल करण्याची शक्यता असते.

९). मुलाखत जर वयस्कर व्यक्तीची असेल तर तो बऱ्याच वेळेला विचारलेल्या प्रश्नापासून दूर जातो. व स्वप्नरंजनात गुंतून पडतो. त्यामुळे मुलाखतीचा हेतूच नष्ट होण्याची शक्यता असते.

BCOM_AEC

https://drive.google.com/file/d/1F1IRMakowHOCmho9iSvSdqoPKh2SWmVe/view?usp=sharing