Monday, 21 June 2021

आधुनिकीकरणाची विविध क्षेत्रे

 

B.A.I SEMESTER II

SOCIOLOGY PAPER - II

उपयोजित समाजशास्त्र

प्रकरण - 3

आधुनिक भारतातील सामाजिक परिवर्तन

*आधुनिकीकरणाची विविध क्षेत्रे*

  आधुनिकीकरण ही मानवी जीवनाच्या विविध क्षेत्रात परिवर्तन घडवून आणणारी प्रक्रिया आहे. समाजाचे आधुनिकीकरण होणे म्हणजे काय, आधुनिकीकरणाची लक्षणे कोणती किंवा आधुनिकीकरणामुळे कोणत्या क्षेत्रात कोणते बदल घडून येतात या प्रश्नांची उत्तरे स्थलकालसापेक्षच असतात. अमेरिका, रशिया, जपान, तुर्कस्थान, चीन इ. देशातील आधुनिकीकरणाचे स्वरूप बऱ्याच प्रमाणात परस्परांहून भिन्न असल्याचे दिसते. असे असले तरी आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेत कोणत्या क्षेत्रात कोणते बदल अपेक्षित आहेत हे पुढीलप्रमाणे सांगता येते. यालाच आधुनिकीकरणाचे पैलू किंवा अंगे असेही म्हणता येते.

) आर्थिक क्षेत्रातील आधुनिकीकरण :

आर्थिक क्षेत्राचे आधुनिकीकरण होण्यासाठी पुढील गोष्टी घडून येणे आवश्यक आहे. ) औद्योगिकीकरण : अवजड उद्योग धंद्यांचा विकास होणे, यंत्रांच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर उत्पादन होणे, घरगुती उत्पादन पध्दतीच्या जागी कारखाना उत्पादन पध्दती येणे.

) बाजारपेठीय अर्थव्यवस्था निर्वाहप्रधान व कृषीप्रधान अर्थव्यवस्थेचे बाजारपेठीय व औद्योगिक अर्थव्यवस्थेत रुपांतर होणे, नफ्यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठांसाठी उत्पादन करणे, वस्तुविनिमयाच्या जागी मुद्राविनिमय पध्दती येणे.

) प्राथमिक क्षेत्रातल्यापेक्षा (कृषी क्षेत्र) द्वितीय (उद्योगाचे क्षेत्र) व तृतीय (विविध सेवांचे क्षेत्र) क्षेत्रांत काम करणाऱ्यांची संख्या वाढत जाणे.

) कृषिविकासही घडून येणे : त्यासाठी शास्त्रीय शेती अवजारे, रासायनिक खते, सुधारित वा संकरीत बी बियाणे, जंतुनाशके व किटकनाशके, कृत्रिम पाणीपुरवठा इ. चा वापर होणे, नगदी वा व्यापारी पिके घेण्यास प्राधान्य मिळणे.

) नव्या आर्थिक संस्था बँका, पतपेढ्या, बाजारपेठा इ. उदयास येणे.

) श्रमविभाजन: जन्म (जात), लिंग या घटकांऐवजी गुणकौशल्ये, शिक्षण प्रशिक्षण या घटकांवर आधारलेले श्रमविभाजन अस्तित्वात येणे. विशेषीकरण वाढत जाणे.

) अजैविक शक्तीचा वापर उत्पादनात जैविक शक्तीच्या जागी अजैविक शक्तीचा वापर वाढत जाणे. उदा. बैलांनी नांगर ओढण्याऐवजी ट्रॅक्टरने शेती नांगरणे, हाताने कापड विणण्याऐवजी वीजेवर चालणाऱ्या यंत्राने कापड विणणे.

) आर्थिक विकास होणे : म्हणजे राष्ट्राचे वास्तविक उत्पन्न तसेच दरडोई उत्पन्न वाढणे, राहणीमानाचा दर्जा उंचावणे, लोकांच्या आर्थिक कल्याणात भर पडत जाणे, आर्थिक विषमता कमी होणे इत्यादी

) राजकीय क्षेत्रातील आधुनिकीकरण :

राजकीय क्षेत्राचे आधुनिकीकरण होण्यासाठी पुढील गोष्टींचा स्वीकार होणे आवश्यक ठरते.

) निधर्मी राज्य (Secular state) : समाजाने निधर्मी राज्याची संकल्पना स्वीकारणे म्हणजे राज्य धर्म यांची फारकत होणे, राज्याचा स्वतःचा असा कोणताही धर्म नसणे. नागरिकांत धर्माच्या आधारे भेदभाव करणे.

) कल्याणकारी राज्य (Welfare State) म्हणजे राज्याच्या कार्यक्षेत्रांचा विस्तार होणे. संरक्षण कायदा सुव्यवस्था अशा कार्याबरोबरच नागरिकांचे कल्याण साधण्याचे कार्यही राज्याने करणे, त्यासाठी शिक्षण, आरोग्य, निवास, मनोरंजन या बाबतच्या सोयीसुविधा राज्याने प्रजेला पुरविणे.

) कायद्याचे राज्य : कायद्यापुढे सर्वांना समान लेखणे.

) लोकशाही राज्य (Democratic State) जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी राज्यकारभार चालविणे, जनता सार्वभौम असणे, धोरण ठरविणे या निर्णय घेणे या प्रक्रियांत लोकमतास योग्य ते महत्व मिळणे, लोकांचा राजकीय सहभाग वाढत जाणे, नागरिकांच्या मूलभूत हक्कांना राज्यसंस्थेकडून मान्यता मिळणे. लोकशाही नेतृत्वाचा विकास होणे.

) प्रशासन प्रशासनात अधिकारतंत्र किंवा नोकरशाहीच्या हातात निर्णयाच्या अंमलबजावणीचे अधिकार असणे प्रशासकांनी स्वेच्छेऐवजी औपचारिक नियमानुसार ते अधिकार वापरणे.

) राष्ट्रराज्य (Nation State) : हा राजकीय आधुनिकीकरणातील आवश्यक घटक आहे. राष्ट्राची उभारणी हा शब्दप्रयोग राजकीय आधुनिकीकरणाचा प्रतिशब्द मानला जातो. प्रत्येक राज्य राष्ट्र बनण्याचा प्रयत्न करते.

) सामाजिक क्षेत्रातील आधुनिकीकरण :

 

) मुक्त स्तरीकरण: समाजात बंदिस्त स्तरीकरणाच्या जागी मुक्त स्तरीकरण येते. व्यक्तीला स्वकर्तृत्वाने आपले सामाजिक स्थान दर्जा उंचावण्याची संधी उपलब्ध असणे. म्हणजेच अर्पित दर्जा ऐवजी अर्जित दर्जाला महत्व येणे. सामाजिक गतिशीलतेस वाव असणे. बृहत्समाज (Mass) Society) अस्तित्वात येणे.

) नागरीकरण : नागरीकरणाची गती वाढणे. शहरांची संख्या आकार वाढत जाणे. नागरी जीवनपध्दतीचा प्रभाव वाढत जाणे.

) औपचारिक संस्था : संघटना, ऐच्छिक मंडळे, दुय्यम समूह . ची संख्या प्रभाव वाढत जाणे. सामाजिक संबंधात औपचारिकता करारात्मकता येणे.

) सामाजिक संस्थात बदल : आधुनिकीकरणात कुटुंब, विवाह, शिक्षण, राज्य, धर्म . सामाजिक संस्था मूलभूत परिवर्तन घडून येणे. कुटुंबाचा आकार लहान होणे. कुटुंबाची काही पारंपरिक कार्ये इतर संस्था संघटनांकडे हस्तांतरीत होणे. कौटुंबिक वैवाहिक जीवनात व्यक्तीला बरेच स्वातंत्र्य उपभोगता येणे, रूढी, परंपरा, धर्मश्रध्दा, कर्मकांड यांचा प्रभाव कमी होणे. शिक्षणाचा प्रसार होणे. धार्मिक शिक्षणाऐवजी वैज्ञानिक तांत्रिक शिक्षणास महत्व येणे.

) नवीन मूल्ये : समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, धर्मनिरपेक्षता, मानवता . मूल्यांचा समाजाने स्वीकार करणे, वंश, धर्म, जात, लिंग, आर्थिक स्तर, . च्या आधारे सामाजिक भेदभाव होणे म्हणजेच सामाजिक समता प्रस्थापित होणे.

) सामाजिक सहिष्णुता : वंश, धर्म, जात, भाषा, प्रांत, आर्थिक स्थिती . बाबतीत समाजात विविधता (सामाजिक विजातीयता) असली तरी देखील समाज घटकांत सामंजस्य, सहिष्णुता निर्माण होणे,

) दळणवळण : वाहतूक, संदेशवहन या क्षेत्रातील प्रगत साधनांचे जाळे उभारले जाणे.

) आरोग्य सुविधांत वाढ होणे, समाजातील सरासरी आयुर्मानात वाढ होणे.

) मानसिक क्षेत्रातील आधुनिकीकरण :

आधनिकीकरणाच्या प्रक्रियेत लोकांची तत्त्वे, मूल्ये, दृष्टिकोन, मनोवृत्ती . मध्ये देखील परिवर्तन घडून येते. यालाच मानसिक आधुनिकीकरण किंवा व्यक्तीचे आधुनिकीकरण असे म्हणतात. यामध्ये पुढील बाबी अभिप्रेत आहेत.

) तर्कशुध्द वैज्ञानिक दृष्टिकोनाचा लोकांनी स्वीकार करणे. कोणत्याही गोष्टींची योग्यायोग्यता अनुभवजन्य ज्ञान, बुध्दिप्रामाण्य चिकित्सक मनोवृत्तीच्या आधारे ठरविणे.

() रूढी, परंपरा, अंधश्रध्दा, कर्मठपणा इत्यादींचा त्याग करून नाविन्याचा, परिवर्तनाचा स्वीकार करणे.

) भुतकाळात रममाण होता वर्तमान काळाचा विचार करुन भविष्याचा वेध घेणे.

) दैववादी वृत्तीचा त्याग करुन प्रयत्नवादाची कास धरणे.

) निसर्गाच्या अधिन राहता त्यावर मात करण्याची जिद्द बाळगणे. ) प्रत्येक क्षेत्रात नियोजन संघटन यांना महत्व देणे.

) इतरांशी सन्मानपूर्वक व्यवहार करणे, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय या मूल्यांचा आदर करणे.

) मी, माझे कुटुंब, माझा गांव, माझा देश यापलिकडे जाऊन अखिल मानवजातीच्या कल्याणाचा विचार करणे. 'विश्वची माझे घर' असा व्यापक दृष्टिकोन लोकांच्या मनात विकसित होणे..

 

 

आधुनिकीकरणाची कारणे

 

बी.. भाग - 1

समाजशास्त्र पेपर 2

उपयोजित समाजशास्त्र

 प्रकरण- 3

*आधुनिक भारतातील सामाजिक परिवर्तन*

                                                  *आधुनिकीकरणाची कारणे*

 

आधुनिकीकरण केवळ कोणत्या एकाच कारणामुळे घडून येत नसून अनेक घटकांच्या प्रभावातून आधुनिकीकरण उदयास येते. मिरॉर विनर यांनी आधुनिकीकरणाच्या अशा पाच प्रमुख घटकांचा अथवा कारणांचा उल्लेख केला आहे. त्यामध्ये शिक्षण, जनसंज्ञापन, राष्ट्रवादी विचारसरणी, वैभूतिक नेतृत्व आणि निग्रहात्मक शासकीय सत्ता यांचा समावेश होतो.

.शिक्षण (Education) :

 विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील उच्च शिक्षणापर्यंत असलेल्या शिक्षणामुळे आधुनिकीकरण घडून येते. शिक्षणातून कौशल्य आणि विशिष्ट दृष्टिकोणाची निर्मिती होते. राष्ट्रीय निष्ठा निर्माण होते. ज्ञान समृद्धीवरच राष्ट्राचा विकास अवलंबून असतो. लोकांचे ज्ञान, कौशल्य, त्यांचा दृष्टिकोण, त्यांच्या आशा-आकांक्षा हे सर्व शिक्षणाशी निगडित असते. त्यामुळेच एडवर्ड शिल्स यांनी आधुनिकीकरणाला शिक्षणाचा महत्त्वाचा घटक मानला आहे.

. जनसंज्ञापन (Mass Communication) : आधुनिकीकरणाची संकल्पना प्रामुख्याने जनसंज्ञापनावर अवलंबून असते. जनसंपर्काची माध्यमे म्हणजे वर्तमानपत्र, नियतकालिक, रेडिओ, दूरदर्शन, चित्रपट, संगणक, इंटरनेट, टेलिफोन इत्यादींमुळे आधुनिक विचारसरणीचा वेगाने प्रसार करणे शक्य झाले आहे. जनसंज्ञापन हे एक असे माध्यम असते की, ज्यामधून आवश्यक ती माहिती किंवा ज्ञान आणि दृष्टिकोण जलद गतीने घेऊन जाता येते. परंतु त्यामध्ये शासनाचे एकतर्फी नियंत्रण असू नये. कारण त्यातून एकतर्फी संदेश जाण्याचाच धोका असतो. त्यासाठी लोकशाही शासन व्यवस्था अधिक चांगली असू शकते.

. राष्ट्रवादी विचारसरणी (Ideology based on Nationalism) :

राष्ट्रवाद आणि लोकशाही यांचा आधुनिकीकरणाशी परस्परसंबंध असतो. राष्ट्रीय जागृतता आणि राजकीय विचारातील सामंजस्य यांच्याशी राष्ट्रवादाचा संबंध असतो, जो समाज किंवा राष्ट्र विविधतेवर आधारित असते अशा ठिकाणी राष्ट्रवादी विचारांची आवश्यकता असते. लोकशाही व्यवस्था राष्ट्रवादाची जाणीव वृद्धिंगत करण्यास उपयोगी ठरते. लोकांच्या दृष्टिकोणात परिवर्तन घडवून आणण्यास, नवीन मूल्ये रुजविण्यात लोकशाही व्यवस्था तसेच राष्ट्रीयत्वाची विचारसरणी अधिक पूरक ठरू शकते व त्यातूनच आधुनिकीकरणाला प्रोत्साहन मिळते.

. वैभूतिक / दैवीगुणाधिष्ठित नेतृत्व (Charismatic Leadership ) :

समाजातील दैवीगुणाधिष्ठित नेतृत्व असणाऱ्या व्यक्तीच्या माध्यमातून लोकांना, आधुनिक मूल्ये, श्रद्धा आणि वर्तन पद्धतीचे ज्ञान देता येते. परंतु अशा नेतृत्वाकडून काही वेळा गैरवापर होण्याचा आणि लोकांची दिशाभूल होण्याची शक्यतादेखील असते. अशा प्रकारच्या एकूण प्रक्रियेत नेतृत्व करणारी व्यक्ती केवळ व्यक्तिगत स्वार्थापोटी आणि मोठेपणासाठी आधुनिक मूल्ये, श्रद्धांचा उपयोग करू लागली तर राष्ट्राचा विकास होऊ शकणार नाही. त्यासाठी असे नेतृत्व व लोकशाही यात परस्परपूरकता असणे गरजेचे आहे.

. निग्रहात्मक शासकीय सत्ता (Coercive Governmental Authority) :

लोकांनी आधुनिक मूल्ये आणि जीवनविषयक दृष्टिकोण आत्मसात करण्यासाठी स्थिर आणि बळकट सरकार असणे आवश्यक आहे. शासन त्या ठिकाणच्या व्यक्तींना अशी मूल्ये स्वीकारणेबाबत आदेश देऊ शकते. केंद्रस्थानी असे सरकार असेल तर घटक सरकारवरही ते नियंत्रण प्रस्थापित करू शकते व त्याद्वारे आधुनिक विचारसरणीचा प्रसार करणे शक्य होते.

      या व्यतिरिक्त नागरीकरण, औद्योगिकीकरण, सार्वत्रिक विधी व्यवस्था (कायदे व्यवस्था) या गोष्टीदेखील आधुनिकीकरणासाठी आवश्यक आहेत. त्याचप्रमाणे तर्कसंगत विचारसरणी, सकारात्मक दृष्टिकोण, गतिशील विचारसरणी (व्यावसायिक, आर्थिक व शैक्षणिक गतिशीलता) विकसित होणारी उत्पादन व्यवस्था, साक्षरता, जीवनाकडे पाहण्याचा बदलता दृष्टिकोण (दैववादीऐवजी शास्त्रीय विचारसरणीशी निगडित) या गोष्टीही आधुनिकीकरणाला तितक्याच जबाबदार आहेत.

काव्यानंदमीमांसा

राधानगरी महाविद्यालय,राधानगरी.

बी. ए. भाग ३

अभ्यासक्रमपञिका क्रमांक १२

सञ :६

पाठ्यपुस्तक :साहित्यविचार

विभाग :२

घटक :काव्यानंदमीमांसा

🔹विषय प्राध्यापक प्रा बी के पाटील🔹

🔹रसिकाचा आनंद:    रसिकाला होणारा आनंद अर्थात वरील तीन गोष्टीपेक्षा वेगळ्या कारणांनी होतो. तो निर्माता नसतो म्हणून त्याचा आत्माविष्कारही होत नसतो. वाचकाची वृत्ती लेखनापेक्षा वाचनाची अधिक असते.क्रोचे या अभ्यासकांच्या मतानुसार रसिक वाचकाला दुसर्‍याची कलाकृती वाचन करीत असताना मनातल्या मनात निर्मितीच करीत असतो. त्याचा आत्माविष्कारही होत २असतो.परंतु ही निर्मिती अमुर्त असते व आत्माविष्कारही सूक्ष्म असतो, त्यामुळे त्याला मान्यता दिली तरीही,रसिकाच्या आनंदाची काही कारणे आहेत का? त्याबद्दलची मते

रसिकाला होणार्‍या आनंदामध्ये भावनाजागृतीचा भाग महत्वाचा असतो. ही भावना जागृती सर्व प्रकारचा अर्थ किंवा आशय समजल्याशिवाय होत नसल्याने अर्थग्रहण करण्यासाठी हे बुद्धीचे कार्य व्हावे लागते.अर्थामध्ये किंवा आशयामध्ये काही चमत्कृती असल्यास ते बुध्दीनेच वाचकाला समजते. येथे भावनाजागृती होण्याची गरज नसते. काव्यानंदामध्ये शारीरिक, बौध्दिक आणि भावनिक अशी तीनही अंगे असतात. यापैकी भावनिक अंगास सर्वात अधिक महत्व प्राप्त होते.

🔹१) ज्ञानानंद:  काव्यानंदामध्ये ज्ञानानंदाचा भाग बराच असतो. नवीन काही वाचले, कळले, समजले यामध्ये मनुष्यातील जिज्ञासा या प्रवृत्तीचे दर्शन अधिक होते.  या ठिकाणी प्रथम केवळ ज्ञानानंदाचाच आनंद असतो. जगातील पुष्कळशी वाड:मयाची निर्मिती या जिज्ञासावृत्तीमुळे झालेली आहे. व अशी तृप्ती झाल्याने आनंद होत असल्याचा अनुभव सर्वांचा असतो.

         काव्यात व इतर ललित वाड:मय प्रकारात जिज्ञासावृती करण्याचे जे साधन आहे ते इतर ललित कलामध्ये आहे असे म्हणता येणार नाही. एखादे सत्य कळल्यामुळे होणारे मनाचे समाधान, औचित्य दर्शनाने होणारा आनंद, उच्च नैतिक तत्वे पटल्याने होणारी प्रसन्न वृत्ती, एखाद्या कलावंताच्या कृतीचे अवलोकन केल्याने वाटणारे कौतुक, पूर्ण लेखन वाचल्यामुळे वाटणारी चमत्कृती, या सर्वांमध्ये बौध्दीक आनंदालाच प्राधान्य असते. बहुतांशी वाचक तटस्थच असतो व तटस्थ राहूनच आस्वाद घेण्यात त्याला मौज वाटत असते. याला सेंद्रिय आनंद म्हणण्यापेक्षा ज्ञानानंद म्हणने अधिक संयुक्त होईल.

🔹२)जिज्ञासापूर्ती : जिज्ञासापूर्ती ही उपपत्ती माधव ज्युलियन यांनी मांडली, जिज्ञासापूर्ती म्हणजे कुतूहलपूर्ती होय. नवीन ज्ञान किंवा अनुभव यांचे काव्यानंदातील महत्व लक्षात घेऊन जिज्ञासापूर्तीमूळे होणार्‍या काव्यानंदाला मीमांसेत प्राधान्य दिले आहे. डाॅ. माधवराव पटवर्धन यांनी जिज्ञासापूर्ती हा काव्यानंदाचा गाभा आहे असे म्हटले आहे. मानवविषयक कुतूहलाच्या पूर्तीलाच काव्यानंदमीमांसेमध्ये महत्वाचे स्थान दिले आहे. सामाजिक शास्ञांच्या अभ्यासानेही मानवविषयक कुतूहलाची पूर्ती बर्‍याच अंशी होण्यासारखी आहे. वाचकाला काही भावनिक आस्वाद मिळवून देण्याचे कार्य झाल्याखेरीज केवळ कुतूहलपूर्तीला महत्व नाही. म्हणूनच काव्यानंदामध्ये रसिकाला होणार्‍या भावानानुभवालाच प्राधान्य आहे.

   कुतूहलपूर्ती हवीच त्यातून भावनाभूतीचा जन्म व्हावयास हवा अशी आवश्यकता वाटत नसती तर शाकुंतल ते नटसम्राट  या सारख्या सर्वमान्य कलाकृती वाचण्याची प्रवृत्ती एकाच वाचकाला पुन:पुन्हा झाली नसती. इतिहासासारख्या विषयात कुतूहलपूर्ती लगेच संपते. कारण त्यामध्ये भावानुभव नसतो. अक्षरग्रंथांचे दुसरे, तिसरे, चौथे वाचन केल्यानंतरही भावानुभव संपत नाही. म्हणून केवळ जिज्ञासापूर्ती म्हणजे काव्यानंद नव्हे, तर जिज्ञासापूर्तीबरोबरच भावनानुभवही काव्यानंदामध्ये महत्वाचा घटक मानला जातो. 

🔹  करुणरसानंद

 करुनरसानंद:  करुणरसाचा विचार काव्यानंदाच्या विचाराशिवाय अपूर्णच राहतो. करुणरसपूर्ण  लेखनात काव्यगत प्रधान व्यक्तीस दु:खच झालेले वर्णन येत असल्याने रसिकाससुध्दा दु:खानुभव यावा असे म्हणने क्रमप्राप्त होते. मग काव्यानंद हा आनंद तरी कसा मानावयाचा?  अशी अडचण उभी राहते. आपल्यापेक्षा पाश्यात्य देशात या मीमांसेचा विचार अधिक झाला आहे. कारण तिकडे शोकांतिकेचा संप्रदाय रुढ होता. त्या विचारात अॅरीस्टाॅटलच्या कॅथार्सिस या उपपत्तीला अधिक महत्व मिळाले काहीनी उपपत्या सुचविल्या. शोक हा करुणरसाचा स्थायीभाव आहे, करुणरसाची आस्वाद्यता मान्य केल्याबरोबरच शोकात नाटकाच्या दर्शनाने आनंदाची प्राप्ती होते, असे म्हणावे लागेल. ही आस्वाद्यता मान्य केली नाही तरी करुण नाटकांच्या प्रयोग दर्शनासाठी प्रेक्षक हे उत्सुक असतात. याचे उत्तर द्यावे लागेल. मग असामान्य लोकप्रियता लाभलेल्या शोकाला नाटकाच्या लोकप्रियतेचा खुलासा करणे भाग पडेल

🔹१) केवलानंदवाद:

                 संस्कृत अभ्यासक विश्वनाथ यांनी केवलानंदवादाचा पुरस्कार केला. करुणरसातसुध्दा अत्यंत सुख होते असे विश्वनाथालाळू वाटते अर्थात असा अनुभव ज्यांना येत नाही तो अरसिकच म्हणावा लागेल कोणीही साहित्यिक किंवा रसिक स्वत:स दु:ख व्हावे म्हणून करुनरसपूर्ण नाटक वाचण्यास किंवा पाहण्यास प्रवृत्त होतात, त्याअर्थी त्यांना या कलाकृतीपासून सुखच होत असले पाहिजे. रामायणासारखी महाकाव्ये दु:खकारक असली तरी या दु:खापासून सुख कसे प्राप्त होते याचे विवेचन करताना विश्वनाथ म्हणतो." व्यवहारात ज्या गोष्टी दु:खदायक होतात त्या काव्यात वर्णन केल्यानंतर त्यांना काव्यातील कल्पनेमुळे अलौकिक स्वरुप प्राप्त होते. त्यामुळे त्या गोष्टी काव्यात सुखकारक ठरतात". करुणरसाचा भाग पाहून किंवा वाचून कित्येक रसिक अश्रु ढाळतात तेव्हा त्यांना दु:ख होत असले पाहिजे, असे अनुमान करणार्‍यास विश्वनाथाचे उत्तर असे आहे की, अश्रुपात हा सुखामुळेच होऊ शकतो.

      करुण घटनेच्या दर्शनाने प्रेक्षकांना आनंदच होतो असे विश्वनाथाने मांडलेले मत बरोबर नाही. कारण रसपूर्ण घटनेच्या दर्शनाने दु:खच होते व असे दु:ख होते हे माहित असूनही प्रेक्षक पुन:पुन्हा' एकच प्याला' 'नटसम्राट' या सारखी नाटके पहावयास जातात याची चिकित्सा केली पाहिजे

२)विरेचन(कॅथार्सिस) :   अनिष्ट विकारांच्या भावनांना वाट देवून मन थोडेसे हलके झाल्याने जे समाधान होते त्या स्वरुपाची मनाची अवस्था करुणरसाची असते. असे पाश्यात्य टीकाकारांचा गुरु असलेले अॅरिस्टाॅटल यांचे मत आहे. आपल्याकडे रससंबंधी भरतमुनींचे सूञ जसे प्रमाण मानले जाते व त्याच्या भोवतीच भाष्य व चर्चा घोटाळतात,त्या स्वरुपातच🔹१) केवलानंदवाद:

                 संस्कृत अभ्यासक विश्वनाथ यांनी केवलानंदवादाचा पुरस्कार केला. करुणरसातसुध्दा अत्यंत सुख होते असे विश्वनाथाला वाटते अर्थात असा अनुभव ज्यांना येत नाही तो अरसिकच म्हणावा लागेल कोणीही साहित्यिक किंवा रसिक स्वत:स दु:ख व्हावे म्हणून करुनरसपूर्ण नाटक वाचण्यास किंवा पाहण्यास प्रवृत्त होतात, त्याअर्थी त्यांना या कलाकृतीपासून सुखच होत असले पाहिजे. रामायणासारखी महाकाव्ये दु:खकारक असली तरी या दु:खापासून सुख कसे प्राप्त होते याचे विवेचन करताना विश्वनाथ म्हणतो." व्यवहारात ज्या गोष्टी दु:खदायक होतात त्या काव्यात वर्णन केल्यानंतर त्यांना काव्यातील कल्पनेमुळे अलौकिक स्वरुप प्राप्त होते. त्यामुळे त्या गोष्टी काव्यात सुखकारक ठरतात". करुणरसाचा भाग पाहून किंवा वाचून कित्येक रसिक अश्रु ढाळतात तेव्हा त्यांना दु:ख होत असले पाहिजे, असे अनुमान करणार्‍यास विश्वनाथाचे उत्तर असे आहे की, अश्रुपात हा सुखामुळेच होऊ शकतो.

      करुण घटनेच्या दर्शनाने प्रेक्षकांना आनंदच होतो असे विश्वनाथाचे मांडलेले मत बरोबर नाही. कारण रसपूर्ण घटनेच्या दर्शनाने दु:खच होते व असे दु:ख होते हे माहित असूनही प्रेक्षक पुन:पुन्हा' एकच प्याला' 'नटसम्राट' या सारखी नाटके पहावयास जातात याची चिकित्सा केली पाहिजे

२)विरेचन(कॅथार्सिस) :   अनिष्ट विकारांच्या भावनांना वाट देवून मन थोडेसे हलके झाल्याने जे समाधान होते त्या स्वरुपाची मनाची अवस्था करुणरसाची असते. असे पाश्यात्य टीकाकारांचा गुरु असलेले अॅरिस्टाॅटल यांचे मत आहे. आपल्याकडे रससंबंधी भरतमुनींचे सूञ जसे प्रमाण मानले जाते व त्याच्या भोवतीच भाष्य व चर्चा घोटाळतात,त्या स्वरुपातच. यालाच     अरिस्टाॅटल कॅथार्सिस म्हणतो.


स्वाध्याय: सोबत सरावासाठी प्रश्नपत्रिका दिलेली आहे. त्यासाठी खाली दिलेली लिंक कॉपी करून गुगलमध्ये पेस्ट करावी.

https://docs.google.com/forms/d/1VwqPyr1DIdh7YnS5KxAURNokkmVFhpMxWOlgzatOz3s/edit

BCOM_AEC

https://drive.google.com/file/d/1F1IRMakowHOCmho9iSvSdqoPKh2SWmVe/view?usp=sharing