Monday, 21 June 2021

१९ व्या शतकाच्या प्रारंभीची भारतातील सामाजिक परिस्थिती

(Mokashi P. A.)

B.A.II SEMESTER - 4

(I.D.S.) PAPER NO.-II

महाराष्ट्रातील समाजसुधारणेचा इतिहास

(HISTORY OF SOCIAL REFORMS IN MAHARASHTRA)

 

() १९ व्या शतकाच्या प्रारंभीची भारतातील सामाजिक परिस्थिती:

 () धर्म, अंधश्रद्धा, व्रतवैकल्ये लोकभ्रम :

 १९ व्या शतकाच्या प्रारंभी भारतीय समाजात वर्णव्यवस्था, या वर्णव्यवस्थेतील प्रत्येक वर्णात जाती, उपजाती, पोटजाती होत्या. भारतात हजारोंच्या संख्येने जाती-पोटजाती होत्या. या जातिव्यवस्थेतील कडक निर्बंधांना विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. या काळात समाजजीवनातील अनिष्ट चालीरीती, रूढी, परंपरा व पोथीनिष्ठता यांना विशेष महत्व प्राप्त झाले होते. धार्मिक आचार व पोथीनिष्ठ धार्मिक विचारांचा प्रचंड प्रभाव येथील समाजजीवनावर पडला होता. पुरोहित असणाऱ्या ब्राह्मण वर्गाचे येथील समाजात सर्वच क्षेत्रांत प्राबल्य होते. मूळ वैदिक धर्माची तत्त्वे व नीतिमत्ता बाजूला पडली होती. समाजात अज्ञान, निरक्षरता व धर्मभोळेपणा होता. त्यामुळे धर्ममार्तंड सांगतील तोच खरा धर्म मानला जात होता. कर्मकांड व व्रतवैकल्ये यांना महत्त्व प्राप्त झाले होते. यज्ञ-याग, सोवळे-ओवळे, ब्राह्मण भोजने, दानधर्म, ज्योतिष, मुहूर्त, जप, तप, पायगुण, शकुन अपशकुन, मांजर आडवे जाणे, भांडणे, भालू भुंकणे, घुबड घुमणे, विधवा स्त्री आडवी येणे इत्यादींविषयीचे शकुन-अपशकुन मानण्याचे लोकभ्रम समाजात अस्तित्वात होते. उदा. शिंकणे चांगले-वाईट, पाल चुकचुकणे, अंगावर पडणे, कुत्रे रडणे यावर लोकांचा विश्वास होता. तंत्र-मंत्र, जादूटोणा, भूत, चेटूक, पिशाच्च यांना महत्त्व प्राप्त झाले होते. तंत्र व मंत्राने संकटे दूर होतात, अरिष्ट टळते अशी समजूत होती. त्यामुळे अंधश्रद्धा व बुवाबाजी यांची बजबजपुरी समाजात माजली होती. असे तांत्रिक, मांत्रिक बुवा भोळ्याभाबड्या अडाणी लोकांची पिळवणूक करत होते.

() जातिव्यवस्था :

या काळात जातिव्यवस्थेचा, जातिसंस्थेचा समाजावर मोठा प्रभाव होता. जातिव्यवस्था ही भारतीय समाजाला लागलेली भयंकर मोठी कीड होती. या देशात हजारो जाती होत्या आहेत. याशिवाय शूद्र अति शूद्र, अस्पृश्य, आदिवासी, भटके-विमुक्त, बारा बलुतेदार, अठरा अलुतेदार या जातिव्यवस्थेला धर्मशास्त्रे पुराणे यांचा आधार होता. या जातिसंस्थेची समाजावर पोलादी पकड होती. मनुष्य ज्या जातीत जन्मला ती त्याची जात ठरत असे. जातीला परंपरेने ठरवून दिलेला धंदा त्यास करावा लागे. जातीवरून व्यक्तीची उच्च-नीचता, श्रेष्ठत्व कनिष्ठत्व ठरत असे. अति शूद्र जातीच्या लोकांना मूलभूत मानवी हक्कांपासून वंचित ठेवले होते. जातीबाहेर रोटी-बेटी व्यवहार होत नसत. जातीबाहेर विवाह केल्यास तो गंभीर स्वरूपाचा सामाजिक गुन्हा मानला जात असे.

() अस्पृश्यता :

भारतीय समाजातील जातिव्यवस्थेच्या विषवृक्षास लागलेले महाविषारी फळ म्हणजे 'अस्पृश्यता' होय. या देशातील हिंदू धर्मशास्त्रे पुराणे यांनी शूद्र, अति शूद्र, अस्पृश्य, चांडाळ समाजातील सर्व हीन मानलेल्या जातींना जन्म दिला. या अति कनिष्ठ जातींना अस्पृश्य मानले. अस्पृश्य म्हणून त्यांना गावकुसाबाहेर ठेवले. त्यांना अत्यंत हीन घाणेरडी कामे दिली. महार, मांग, ढोर, चांभार यांना अस्पृश्य म्हणून वागवत. अस्पृश्यता काटेकोरपणे पाळली जात असे. त्यांना मंदिरात प्रवेश दिला जात नसे. अस्पृश्यांचे पाणवठे वेगळे, मसनवटे वेगळे होते. यावरून मनुष्य मेल्यानंतरसुद्धा त्याची जात जात नसे हे स्पष्ट होते.

() वेठबिगार, दास दासी :

 अति शूद्र जातीतील लोकांना वेठबिगार म्हणून विविध स्वरूपाची कामे करावी लागत असत. गावातील परगण्यातील वतनदार म्हणजे पाटील, देशमुख, जहागीरदार इत्यादी लोकांकडे वेठबिगारी करावी लागे. वेठबिगारांना सरकारी बांधकाम करणे, रस्ते दुरुस्ती करणे, सरकारी कुरणातील गवत कापणे इत्यादी कामे करावी लागत. भारतीय समाजव्यवस्थेत दास दासींची पद्धत अस्तित्वात होती. जहागीरदार, सरदार, राजे-रजवाडे यांच्याकडे दास दासी ठेवल्या जात असत. महाराष्ट्रातः दासांना 'पोरगे' म्हणत तर दासींना कुणबीण म्हणत, विशेषतः श्रीमंत लोक घरगुती कामासाठी दास-दासी ठेवत असत. या दास दासींना मोबदला देऊन किंवा पर्यायी व्यक्ती देऊन मुक्तता करून घेता येत असे. दास दासी वृद्ध झाल्यावर त्यांची मुक्तता मालकाकडून केली जात असे.

() स्त्रीजीवन : १९ व्या शतकातील समाजव्यवस्था ही पुरुषप्रधान होती. मालमत्तेचे अधिकार फक्त पुरुष वर्गासच होते. कुटुंबप्रमुख पुरुष असे. त्याची सत्ता कुटुंबावर चालत असे. येथील समाजात स्त्रीची स्थिती मात्र अत्यंत वाईट होती. स्त्रीला धर्मशास्त्रे, रूढी व परंपरा, चालीरीती यांच्या बंधनात सर्व बाजूंनी जखडले गेले होते. तिच्याकडे फक्त भोगवस्तू म्हणूनच पाहिले जाई. चूल व मूल एवढेच तिचे काम होते. या काळात स्त्रीला गुलामाप्रमाणे वागविले जाई. या काळातील स्त्रियांविषयीच्या चालीरीती, रिवाज व परंपरा पुढीलप्रमाणे होत्या.

. सती पद्धती : भारतीय समाजातील सती पद्धती स्त्री जातीला मिळालेला मोठा शाप होता. सतीची चाल म्हणजे माणुसकीला काळिमा फासणारी पद्धत होती. बहुतेक वेळा पतीच्या निधनानंतर स्त्रीला जबरदस्तीने सती जाण्यास भाग पाडले जात असे. बालविवाह पद्धत रूढ असल्यामुळे १०-१२ वर्षांच्या मुलीला सती जाणे भाग पाडले जात असे.

. बालविवाह व विधवा विवाहास बंदी : भारतीय समाजात मुलीचे ते वर्षाच्या वयातच लग्न करीत असत. मुलीचे वय १२ वर्षांच्या पुढे गेल्यास तो अधर्म मानत असत. मुलाच्या लग्नाचे वय १२ ते १४ वर्षाचे असे. एखाद्या साथीच्या रोगात पतीचे निधन झाल्यास त्या मुलीस सती जावे लागत असे. सती न गेल्यास आयुष्यभर विधवा म्हणून राहावे लागे. ब्राह्मण समाज व ९६ कुळी क्षत्रिय मराठा समाजात विधवांच्या विवाहास बंदी होती. शूद्र व अति शूद्र समाजात विधवांच्या विवाहास परवानगी होती.

. केशवपन : ब्राह्मण समाजातील स्त्री विधवा झाल्यास त्या विधवा स्त्रीचे केशवपन व मुंडन करण्याची प्रथा रूढ होती. केशवपनामुळे ती विद्रूप व कुरूप दिसावी हा हेतू होता. अशा विधवांना आयुष्यभर अपमानित व परावलंबी जीणे जगावे लागत असे.

. बहुपत्नीकत्व : १९ व्या शतकात भारतीय समाजात बहुपत्नीकत्वाची चाल मोठ्या प्रमाणात अस्तित्वात होती. समाजातील श्रीमंत वर्ग व वतनदार वर्ग यांच्यात ही प्रथा सर्रास सुरू होती. पुरुष कोणत्याही वयात कितीही लग्ने करीत असत. याशिवाय अंगवस्त्र ठेवण्यास पुरुषाला समाजाची मान्यता होती.

अशा प्रकारे १९ व्या शतकाच्या प्रारंभी भारतीय समाजाची सामाजिक स्थिती होती. या शतकातच इंग्रजांचे राज्य भारतात स्थिर झाले होते. अशा या मागासलेल्या भारताने इंग्रजांच्या राजवटीत आधुनिक युगात प्रवेश करण्यास प्रारंभ केला. इंग्रजांनी शिक्षण पद्धती सुरू केली. इंग्रजांनी सर्व क्षेत्रांत प्रगत झालेले पाश्चिमात्य ज्ञानाचे भांडार भारतीयांसाठी खुले केले. इंग्रजी शिक्षणामुळे पाश्चात्त्य आधुनिक विचार व ज्ञान भारतात आले. नवशिक्षित भारतीय तरुण बुद्धिप्रामाण्यवादी बनला. प्रगल्भ विचार, विज्ञान, तंत्रज्ञान, व्यक्तिस्वातंत्र्य, समता, उदारमतवादी विचार यांसारख्या मूलभूत तत्त्वांचे ज्ञान येथील समाजाला होऊ लागले. इंग्रज राज्यकर्ते व प्रशासकीय अधिकारी यांनी भारतातील सर्व क्षेत्रांत परिवर्तनास सुरुवात केली. येथील समाजाला त्यांनी सर्वांत प्रथम शांतता व सुव्यवस्था प्रदान केली. येथील समाजाने इंग्रजी राजवटीचे स्वागत केले. कारण इंग्रजपूर्व राजवटीतील अन्याय, जुलूम, जबरदस्तीमुळे जनता त्रासून गेली होती. गावगुंड, ठग व पेंढारी लोकांच्या लूटमार, उपद्रव व दहशतीने ते त्रासले होते. त्यामुळे इंग्रज व इंग्रजांचे प्रशासन चांगले असे त्यांना वाटू लागले. नवशिक्षित तरुण वर्ग आत्मपरीक्षण करू लागला. अंधश्रद्धेऐवजी त्यांची दृष्टी डोळस बनली. आपल्या चालीरीती, रूढी व परंपरा तसेच धर्मशास्त्रे यांचा विचार बुद्धी प्रमाण मानून करू लागले. यातून आपल्या समाजातील दोष त्यांच्या लक्षात आले. हे दोष दूर केल्याशिवाय आपली प्रगती होणार नाही याची जाणीव त्यांना झाली. आपण अभ्यासलेल्या विविध सामाजिक दोषांवर त्यांनी बारकाईने विचार केला व यातून मुक्त होण्यासाठी या विचारवंतांनी अनेक समाजसुधारणा करण्यास सुरुवात केली. यातूनच समाजसुधारणा चळवळी व धर्मसुधारणा चळवळी सुरू झाल्या. ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज, आर्य समाज, रामकृष्ण मिशन, सत्यशोधक समाज, परमहंस सभा इत्यादी चळवळी सुरू झाल्या. या परिवर्तनवाद्यांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या शासनास सामाजिक सुधारणांसाठी सर्वतोपरी साहाय्य केले. कंपनी सरकारनेसुद्धा अनेक हेतूंनी येथे काही सुधारणा घडवून आणल्या


स्वाध्याय: सरावासाठी सोबत दिलेली प्रश्नपत्रिका सोडवा. त्यासाठी खाली दिलेली लिंक कॉपी करून गुगलमध्ये पेस्ट करा.

https://forms.gle/yS3G9e8sVJCzC8aL9


 

आलोचक के गुण

 Eknath Patil, [20.06.21 12:00]

T. Y. B. A.  ,  HINDI  , paper no - 13  ,  semester - 06  . साहित्यशास्त्र   ,                 आलोचक के गुण


आलोचक का उत्तरदायित्व तिहरा होता है। एक कवि या लेखक के प्रति, दूसरे कृति के प्रति और तीसरे समाज के प्रति । इन तीनों ही प्रकार के उत्तरदायित्वों को निभाने के लिए आलोचक में कुछ गुणों का होना अत्यंत आवश्यक है । आलोचक के गुणों पर विचार करने से जो गुण ज्ञात होते हैं, उनमें भारतीय और पाश्चात्य विद्वानों दद्वारा समन्वित प्रमुख गुण इस प्रकार हैं


*


सहृदयता


सहृदयता आलोचक का आवश्यक गुण है। क्योंकि भारतीय काव्यशास्त्र के अनुसार कोई भी व्यक्ति बिना सहृदय हुए काव्य का रसास्वादन नहीं कर सकता। सहृदय होने से ही वह कृति का सही विवेचन कर सकता है। मुक्त हृदय से काव्य-कृति में तन्मय होकर, गुणों पर रीझता हुआ जो आलोचक अपनी आलोचना प्रस्तुत कर सके, वह सहृदय आलोचक है। आलोचक के मन में रचनाकार तथा रचना के प्रति श्रद्धा, सहानुभूति तथा आदर की भावना होनी चाहिए।


विस्तृत ज्ञान -


यदि आलोचक को आलोच्य विषय तथा लोक और शास्त्र का व्यापक एवं सूक्ष्म ज्ञान न होगा, तो वह वर्ण्य विषय की बारीकियों को समझ ही न पाएगा; उसमें गुण-दोष निकालना तो दूर की बात है। आलोचक का इतिहास, दर्शन, काव्यशास्त्र, समाजशास्त्र आदि का विस्तृत ज्ञान ही उसे आलोचना की विविध भूमियाँ प्रदान कर सकता है और कृति की विशेषताओं का विवेचन करने में सहायक हो सकता है। अत: विषय का सांगोपांग विवेचन करने के लिए समालोचक का ज्ञान विस्तृत होना आवश्यक है।


निष्पक्षता


सहृदयता के साथ-साथ निष्पक्षता के मेल के बिना आलोचक किसी कृति की आलोचना में न्याय नहीं कर सकता। परिचितों और आत्मीयों की कृतियों में उसे गुण ही गुण दिखलाई देंगे और अन्यों की कृतियों में दोषअधिक और गुण कम। आलोचक को न्यायाधीश के समान नीर-क्षीर विवेकी होना आवश्यक है। आलोचक का यह गुण उसकी सूक्ष्म बुद्धि और चरित्र दोनों से ही संबंध रखता है। पाश्चात्य समालोचनाशास्त्र में आलोचक के इस गुण को बहुत महत्त्व दिया गया है।


* स्वाभाविक प्रतिभा -


स्वाभाविक प्रतिभा के अभाव में कोई भी आलोचक आलोचना क्षेत्र में कभी भी सफल नहीं हो सकता। स्वाभाविक प्रतिभा के बल पर ही एक आलोचक अपने कथन, निर्णय या मत को सामर्थ्यपूर्ण और प्रभावोत्पादक बना सकता है । इसी कारण हमारे यहाँ काव्योत्पादन और काव्यालोचन दोनों में प्रतिभा को बहुत महत्त्व दिया गया है। हमारे यहाँ प्रतिभा के दो भेद माने गए हैं- कारयत्री और भावयत्री। कारयत्री प्रतिभा का संबंध कवि से होता हैं और भावयत्री प्रतिभा का संबंध भावक या आलोचक से होता है।


*

अन्तर्दृष्टि 

आलोचक में अन्तर्दृष्टि का होना बहुत जरूरी होता है। अन्तर्दृष्टि की विशेषता बहुत कुछ जन्मजात कहीं जा सकती है। किंतु शिक्षा और अभ्यास आदि से आलोचक की यह विशेषता विकसित हो सकती है। आलोचक अपनी इसी विशेषता के कारण सच्ची आलोचना में समर्थ हो सकता है; क्योंकि आलोचक का कर्तव्य है कि कवि के द्वारा की गई जीवनाभिव्यक्ति को पाठक तक पहुँचा देना। आलोचक का यह लक्ष्य तभी पूर्ण हो सकता है, जब उसमें सूक्ष्म अंतर्दृष्टि हो। हडसन तथा फेलेट ने आलोचक के इस गुण को काफी महत्त्व किया है।                        शिक्षा और कवित्व शक्ति


*


आलोचक को भी कवि के समान शिक्षित होना चाहिए। स्कॉट जेम्स के मतानुसार आलोचक को उसी भूमिका तक पहुँचने की चेष्टा करनी चाहिए, जिस भूमिका पर कवि रहता है। यह तभी हो सकता है, जबकि आलोचक भी कवि के समान शिक्षित हो। हडसन ने भी आलोचक के शास्त्र ज्ञान की अपेक्षा पर जोर दिया है।


अनेक विचारकों ने यह भी माना है कि समालोचक में भी कवि की तरह कवित्व शक्ति होनी चाहिए। बेन जॉनसन ने तो यहाँ तक कहा है कि, "कवियों की आलोचना केवल कवि ही कर सकते हैं; केवल वे ही कवि, जो काव्य-रचना में श्रेष्ठ समझे जाते हैं।"


*


वैज्ञानिक और मनोवैज्ञानिक प्रवृत्ति का होना


आज की आलोचना के ये आवश्यक उपादान है। पाश्चात्य आलोचना शास्त्र में इनके ऊपर विशेष जोर दिया गया है। वैज्ञानिकता का अर्थ है, वस्तुओं का निष्पक्ष भाव से विश्लेषण । इस प्रकार का विश्लेषण तभी हो सकता है, जब आलोचक स्वभावत: वैज्ञानिक हो। वैज्ञानिकता के साथ-साथ पात्रों के अन्तर्द्वद्व से परिचित होने के लिए आलोचक में मनोवैज्ञानिक प्रवृत्ति का होना भी नितांत आवश्यक है। साहित्य मानव जीवन की अभिव्यक्ति है और आलोचक का कार्य उस साहित्य का मूल्यांकन करना होता है। अतः उसे मानव-मनोविज्ञान का अच्छाअच्छा ज्ञान हो.                                       कवि और उसके काव्य के विषय में पूर्ण ज्ञान -


Eknath Patil, [20.06.21 12:00]

समालोचक का विद्वान होना ही पर्याप्त नहीं है। उसके लिए यह भी आवश्यक है कि वह कवि और उसके काव्य के विषय में सभी कुछ जानता हो। तभी वह आलोच्य कृति की सही आलोचना कर सकता है। समालोचक को अपने सिद्धांतों के आधार पर कृति की समालोचना करने के स्थान पर, आलोच्य कृति के कृतिकार की रूचि तथा परिस्थितियों के आधार पर करनी चाहिए। अतः उनका ज्ञान समालोचक का विशेष गुण है।


*


कृतिकार के साथ तादात्म्य -


समालोचक का एक गुण यह भी है कि वह समालोचना करते समय स्वयं को भी उन्हीं परिस्थितियों में अनुभव करे, जिनमें आलोच्य कृतिकार रहा हो। इस तादात्म्य से कृति की गहराई से समालोचना हो सकती है।


* प्रेषण की क्षमता -


आलोचक में अपनी सहानुभूति को दूसरों तक प्रेषित करने की क्षमता होनी अपेक्षित है। उसका कार्य केवल यह नहीं है कि वह स्वयं किसी कलाकृति का आनंद ले; अपितु उस आनंद को पाठकों तक प्रेषित करे। इस संबंध में हेलन गार्डनर ने कहा है, "एक अच्छे आलोचक में अच्छी एवं बुरी कविता का भेद करने की क्षमता का होना उतना आवश्यक नहीं, जितना कि उसके अभिप्रेत सौंदर्य को सहज एवं ग्राह्य शब्दावली में प्रस्तुत करना ।”


*


निर्णयात्मक शक्ति -


आलोचक का कर्म निर्णय प्रधान होता है। अतः उसका यह सर्वोपरि गुण है कि वह स्पष्ट और सही निर्णय ले सके। सही विषय-बोध, अपने व्यक्तित्व की सशक्तता एवं अभिव्यक्ति की स्पष्टता से ही समालोचक सही निर्णय ले सकता है।


*


अभिव्यक्ति कौशल


यदि समालोचक में अभिव्यक्ति कौशल नहीं है, तो समालोचना स्वयं में प्रभावहीन हो जाएगी। जब समालोचना ही नीरस और प्रभावहीन होगी, तो वह जो निर्णय देगी, उसका पाठकों पर प्रभाव ही क्या पड़ेगा? अतः समालोचक के किए यह भी आवश्यक है कि उसकी अभिव्यक्ति सक्षम हो।


 सहानुभूती                         सहानुभूति आलोचक का आवश्यक गुण है। लौंगफेलो ने इस बात का समर्थन किया है। हमारे यहाँ भी इस तथ्य का समर्थन दूसरे ढंग से किया गया है। किसी ने ठीक ही कहा है - "शिवजी की भाँति बुधजन गुण और अवगुण दोनों ग्रहण करते हैं; किंतु चंद्रमा की भाँति गुणों को सिर पर रख प्रकाशित करते हैं और दोषों को विष की भाँति गले के भीतर ही रखते हैं।" इस लक्ष्य तक आलोचक तभी पहुंच सकता है, जब उसमें सहानुभूति का विशेष गुण हो ।                       औचित्य ज्ञान


आलोचक को किसी रचना के गुण-दोषों के विवेचन में औचित्य की उपेक्षा नहीं करनी चाहिए। हमारे यहाँ तो औचित्य को बहुत महत्त्व दिया गया है। इस प्रकार का औचित्य-ज्ञान उसी समालोचक में हो सकता है, जो सत्यप्रिय और ईमानदार है, जिसमें धीरता और स्थिरता आदि स्वाभाविक गुण हैं, तथा जो स्वभाव से गंभीर है।


छिद्रान्वेषी प्रकृति का निराकरण


यद्यपि काव्य की समालोचना के लिए जब समालोचक प्रवृत्त होता है, उस समय सम्यक विवेचना के लिए गुणों के साथ-साथ दोषों को भी प्रदर्शित करता है; पर इसमें सुधार भावना होनी चाहिए, न कि छिद्रान्वेषण की प्रवृत्ति । टी. राइमर ने कहा है - "किसी श्रेष्ठ कलाकार के दोषों का प्रदर्शन और गुणों पर परदा डालना अच्छे आलोचक का गुण नहीं है। "


*


व्यक्तित्व -


आलोचक का व्यक्तित्व विशिष्ट होना चाहिए। व्यक्तित्व प्राय: दो प्रकार के होते हैं - दूसरों से प्रभावित होने वाले और दूसरों को प्रभावित करने वाले। आलोचक का व्यक्तित्व वास्तव में इन दोनों की मध्य कोटि का होना चाहिए । उसका दृष्टिकोण विस्तृत हो, स्वभाव गंभीर हो, विचार उदात्त हो, साथ-साथ सहानुभूति भी हो ।


इन महत्त्वपूर्ण गुणों के अतिरिक्त आलोचक में गुण-ग्राहकता, परिमार्जित एवं परिष्कृत रूचि, साहस, गर्वहीनता, भाषा पर अधिकार, विभिन्न शैलियों का ज्ञान, विश्लेषणात्मक बुद्धि, दार्शनिक वृत्ति आदि अनेक गुणों का होना आवश्यक है । कुछ गुण पाठक से सम्बद्ध हैं, कुछ कवि से तथा कुछ समालोचक से और इन सबके होने से ही समालोचना आदर्श बनती है।

आलोचना स्वरूप और परिभाषा

 (Eknath Patil)

T. Y. B. A. ,  HINDI  , paper no - 13 , semester - 06     आलोचना स्वरूप और परिभाषा   - आलोचना के अर्थ को व्यक्त करने के लिए हिंदी में कई शब्द प्रचलित हैं। इनमे आलोचना, समालोचना और समीक्षा विशेष प्रसिद्ध हैं। इनके अतिरिक्त विवेचना शब्द भी इनका पर्यायवाची हैं। आलोचना का सामान्य अर्थ किसी वस्तु या व्यक्ति के दोषों की चर्चा करना है, किंतु साहित्य के क्षेत्र में इसे थोडे भिन्न एवं व्यापक अर्थ में ग्रहण किया जाता है । आलोचना शब्द 'लोच' धातु में 'आ' उपसर्ग लगने से बना है। 'लोच' का अर्थ है 'देखना' । अत: व्युत्पत्तिपरक दृष्टि से आलोचना का अर्थ हुआ - 'किसी वस्तु या कृति को सम्यक रूप से देखना या उसका मूल्यांकन करना ।' साहित्य में किसी भी साहित्यिक रचना के विवचेन-विश्लेषण, गुण-दोष दिग्दर्शन या नियम के प्रतिपादन तथा उसकी ऐतिहासिक, सामाजिक या मनोवैज्ञानिक व्याख्या को आलोचना के अंतर्गत स्थान दिया जाता है। किंतु कुछ लोग इस शब्द का अर्थ केवल दोष दिखाना ही समझते हैं। इसी दोष के निराकरण के लिए 'आलोचना शब्द में 'सम' उपसर्ग जोड़ा जाने लगा, जिससे 'समालोचना' शब्द बना। इसका अर्थ है - संतुलित दृष्टि से किसी रचना के गुण दोषों का विवेचन। 'समीक्षा' शब्द में भी गुण-दोषों के प्रति समान दृष्टि की अपेक्षा हैं। इस प्रकार शब्दगत अर्थ की दृष्टि से आलोचना की अपेक्षा समालोचना अथवा समीक्षा शब्द अधिक उपयुक्त हैं। किंतु अब तीनों शब्द सामान्यतया समान अर्थ में प्रयुक्त किए जाते हैं।साहित्य या काव्य का सूक्ष्म अध्ययन करके निष्पक्ष दृष्टि से उसके गुण-दोषों का कथन करना 'आलोचना' कहलाता है। लेकिन कुछ लोग रचनात्मक साहित्य के अतिरिक्त साहित्य से संबंधित अन्य समस्त बातों को आलोचना का हिस्सा समझते हैं। वे साहित्यानुसंधान, काव्य का इतिहास और काव्यशास्त्र एवं काव्य-सिद्धांतों को भी आलोचना के अंतर्गत सम्मिलित करते हैं। परंतु यह मत गलत और भ्रांतिपूर्ण है। आलोचना का स्वरूप इन तीनों से भिन्न है, जिसे हम निम्न पंक्तियों में स्पष्ट करेंगे ।अनुसंधान और आलोचना .


अनुसंधान का प्रमुख कार्य अज्ञात तथ्यों की खोज अथवा ज्ञात तथ्यों की नवीन व्याख्या है। जब तक तथ्यों या दृष्टिकोण संबंधी नवीनता न हो, तब तक उसे अनुसंधान की कोटि में नहीं रखा जा सकता। परंतु आलोचना का कार्य किन्हीं मानदंडों के आधार पर विशेषताएं बताना, व्याख्या करना अथवा मूल्यांकन करना है । अत: अनुसंधान की समस्य कृतियाँ आलोचना नहीं हो सकती और न ही आलोचना की समस्त कृतियाँ अनुसंधान हो सकती हैं।


इतिहास और आलोचना


साहित्येतिहास और आलोचना भी एक नहीं है। इन दोनों की प्रक्रियाओं में भिन्नता है । इतिहास का प्रमुख ध्येय कालक्रम में लेखक और कृति की व्यवस्था और उसका स्थूल परिचय है। इसके विपरीत आलोचना ऐतिहासिक पृष्ठभूमि का ध्यान रखती हुई लेखक के महत्त्व का प्रकाशन, कृति की मूल्यांकन संबंधी विवेचना, कृति की व्याख्या और उसकी विशेषताओं का स्पष्टीकरण करती हैं। ऐतिहासिक आलोचना इतिहास की पृष्ठभूमि ग्रहण करती है, पर वह इतिहास नहीं है। इतिहास तथ्यों के अनुसंधान के अनुसार अपनी व्यवस्था और मान्यताओं में परिवर्तन और संशोधन करता रहता है; अत: आलोचना से अधिक उसका संबंध अनुसंधान से है।


काव्यशास्त्र और आलोचना


काव्यशास्त्र और काव्य-सिद्धांत को भी कुछ लोगों ने आलोचना का एक रूप माना है। परंतु दोनों में अंतर है। काव्यशास्त्र या काव्य-सिद्धांत समस्त काव्य में व्याप्त उसके स्वभाव, सौंदर्य, प्रक्रिया, प्रभाव आदि से संबंधित नियमों और सिद्धांतों का विश्लेषण और विवेचन करता है, तो आलोचना उन सिद्धांतों और नियमों को मानदंड या कसौटी के रूप में स्वीकार करती है। आलोचना निराकार नियमों और सिद्धांतों की खोज नहीं करती, बल्कि कवि की कृति की व्याख्या या मूल्यांकन करती है।


आलोचना की परिभाषा


आलोचना के स्वरूप को स्पष्ट करने की कोशिश अनेक भारतीय एवं पाश्चात्य विद्वानों ने की है। उनमें


से कुछ प्रमुख मत इसप्रकार हैं। -


* एनसाइक्लोपीडिया ब्रिटानिका


"Criticism is the art of judging the qualities and values of an aesthetic object whether in literature or the fine arts. It involves the formation and expression of judgement.'' अर्थात् आलोचना का अर्थ वस्तुओं के गुण-दोषों की परख करना है, चाहे वह परख साहित्य क्षेत्र में की गई हो या ललित कला क्षेत्र में इसका स्वरूप निर्णय में सन्निहित रहता है।आई. ए. रिचर्ड्स.


रिचर्ड्स ने भी आलोचना का स्वरूप स्पष्ट करते हुए मूल्य निर्धारण को ही उसकी प्रमुख विशेषता स्वीकार किया है। उन्होंने लिखा है- "To set up as a critic is to set up as a judge of values." अर्थात् आलोचक की नियुक्ति करना निर्णायक की नियुक्ति करना है।


*


-


Eknath Patil, [17.06.21 12:14]

कार्लाइल प्रभावशाली समीक्षा के समर्थक थे। उन्होंने आलोचना की परिभाषा देते हुए लिखा है "Literary criticism is nothing and should be nothing but the recital of one's personal adventures with a book." अर्थात् आलोचना पुस्तक के प्रति उद्भूत आलोचक की मानसिक प्रतिक्रिया का परिणाम है।


* •एडिसन - -


इन्होंने आलोचना का अर्थ छिद्रान्वेषण न लेकर सौंदर्योद्घाटन ही लिया है। उनका कथन है - "समालोचक का धर्म कलाकारों के दोष निकालना नहीं है, बल्कि उसका कर्तव्य है, उनकी कृतियों का सौंदर्योद्घाटन करना।"


*


कॉलरिज -


एडिसन से मिलता-जुलता ही दृष्टिकोण कॉलरिज साहब का है। उन्होंने लिखा है - "समीक्षा का उद्देश्य साहित्य-निर्माण के नियमों का निश्चितीकरण है, न कि निर्णयात्मक नियमों का संकलन तैयार करना।'


* ब्रयेन्तर


ब्रयेन्तर ने भी आलोचना में निर्णय की प्रधानता स्वीकार कर उसके उद्देश्य के बारे में लिखा है- "इसका प्रमुख उद्देश्य जनता तथा लेखकों की अभिरूचि का संशोधन एवं कला और साहित्य का श्रेष्ठ निर्देशन है।"


*


वर्सफिल्ड


“आलोचना कला और साहित्य के क्षेत्र में निर्णय की स्थापना है।"


डॉ. गुलाबराय


*


“आलोचना का मूल उद्देश्य कवि की कृति का सभी दृष्टिकोणों से आस्वाद कर पाठकों को उस प्रकार के आस्वाद में सहायता देना तथा उसकी रूचि को परिमार्जित करना एवं साहित्य की गतिविधि निर्धारित करने में योग देना है।"डॉ. श्यामसुंदरदास


"किसी ग्रंथ को पढ़कर उसके गुण-दोषों का विवेचन करना और उस पर अपना मत स्थिर करना आलोचना कहलाता है। यदि हम साहित्य को जीवन की व्याख्या माने तो आलोचना को उस व्याख्या की व्याख्या मानना पड़ेगा।"


*


डॉ. सीताराम चतुर्वेदी -


"समीक्षा वह तात्त्विक प्रक्रिया है, जिसमें मनुष्य कुछ दर्शनीय पदार्थ देखने की इच्छा करे और देख चुकने पर उसमें जो द्रष्टव्य है, उसे दूसरों को भी दिखा दे।"


*


डॉ. गोविंद त्रिगुणायत


“सच्ची समालोचना वह है, जिसमें आलोचक इतिहास एवं तुलना का आधार लेकर वस्तु के बाह्य और अंतर दोनों पक्षों की व्याख्या वैज्ञानिक शैली में करता हुआ सिद्धांतों का निर्माण और आलोच्य वस्तु का मूल्यांकन करने का प्रयास करता है।"


आलोचना संबंधी उपर्युक्त परिभाषाओं का यदि ध्यान से अध्ययन करें, तो हमें स्पष्ट अनुभव होगा कि विद्वानों ने आलोचना संबंधी अपने-अपने दृष्टिकोणों के अनुरूप ही उसके स्वरूप की व्याख्या की है। कोई निर्णय को, कोई व्याख्या को, कोई वैज्ञानिक विवेचन को, कोई मनोवैज्ञानिक अध्ययन को तथा कोई सिद्धांत निर्माण को आलोचना का आवश्यक अंग मानता है। वास्तव में ये सभी मत एकांगी हैं। हमारे दृष्टिकोण से आलोचना में तीन बातें मुख्य हैं- (1) अर्थ का स्पष्टीकरण, (2) विषय का वर्गीकरण तथा (3) निर्णय की प्रधानता। आलोचना का उद्देश्य लेखक और पाठक की रूचि का परिष्कार करना है।


आलोचना के संबंध में भारतीय और पाश्चात्य विद्वानों के मानदंड अलग-अलग हैं। भारतीय विद्वानों ने अलंकार, रीति, वक्रोक्ति, ध्वनि, रस आदि काव्यालोचन के मानदंड प्रस्तुत किए हैं; तो पाश्चात्य विद्वानों ने बिंबवाद, प्रतीकवाद, अभिव्यंजनावाद आदि । भारतीय आलोचना दृष्टि और पाश्चात्य आलोचना दृष्टि में अंतर होते हुए भी तात्त्विक अंतर नगण्य हैं। फिर भी हम यह अस्वीकार नहीं कर सकते कि पाश्चात्य दृष्टिकोण भारतीय दृष्टिकोण से अधिक व्यापक है। जहाँ भारतीय आलोचना हमें एकांगी दिखाई देती है, वहां पाश्चात्य आलोचना सर्वांगपूर्ण है। संभवतः यही कारण है कि आधुनिक भारतीय समीक्षक किसी एक शैली का स्वीकार न कर, दोनों के समन्वित रूप को अपनी आलोचना का आधार बनाते हैं।

साहित्याचे माध्यम

 राधानगरी महाविद्यालय, राधानगरी.

बी.ए. भाग ३

अभ्यासक्रमपञिका १२

सञ: ६ विभाग :३

साहित्याचे माध्यम

🔹परस्तावना:  साहित्याचे स्वरुप समजून घेण्यासाठी साहित्याचे माध्यम म्हणजे भाषा आणि साहित्यकृतीचा घाट(Form)याविषयी समजून घेणे आवश्यक आहे.एका घटकाचा दुसर्‍या घटकाशी संबंध जोडताना  ज्या एका तिसर्‍या घटकाचा उपयोग होतो-त्याला माध्यम म्हणता येईल.

अॅरिस्टाॅटलने साहित्याचे माध्यम म्हणून(Speech) विचार केला. त्याने साहित्याला शब्दकला(Verbal Art)मानले.

   चिञाचे माध्यम रंगरेषा शिल्पकलेचे माध्यम घनपदार्थ(संगमरवर, दगड, प्लास्टर आॅफ पॅरिस इ.) तर संगीताचे माध्यम नाद व ध्वनी हे आहे. सर्वसामान्यपणे आज हे मानले जाते की साहित्याचे माध्यम शब्द-म्हणजे पर्यायाने भाषा हे आहे.

    इतर  कलांच्या माध्यमात आणि साहित्यकलेच्या माध्यमात फरक आहे.आपण भाषाविज्ञानात  हे शिकलो की भाषा ही काही साहित्यासाठी निर्माण झालेली नाही. भाषेचे मुख्य कार्य आहे विचार विकांराचे दळणवळण(Communication) वा अभिव्यक्ती(expression) भाषेचा  शब्दांचा वापर खुणेसारखा होत नसून प्रतिकासारखा होतो. भाषिक प्रतीक (चिन्हन) व त्याने निर्देशित केलेली वस्तू(चिन्हित)यात कोणतेही साम्य नसते. उदा.' झाड' या भाषिक चिन्हाने जी वस्तू निर्देशित केली जाते त्या वस्तूत (म्हणजे प्रत्यक्ष झाडात)व 'झाड' या चिन्हात काही साम्य नसते. या दोन्हीतील संबंध सांकेतिक आहे. तो त्या त्या समाजाने निर्माण केला आहे.

     भाषा या माध्यमाचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे ते स्वत:च अर्थयुक्त असते.  अन्य कला अशा स्वत:च अर्थयुक्त नसतात. शब्दांच्या अर्थाकडे दुर्लक्ष करुन किंवा कधी कधी 'शब्दांच्या पलीकडे' जाऊन- केवळ एखादी कविता लिहिने शक्य आहे.अर्थयुक्त असणे,अशय सापेक्ष असणेहा जो साहित्याचा विशेष मानला जातो, तो मुळात साहित्याच्या माध्यमाशी- म्हणजे भाषेशी संबंधित आहे.

     व्यवहारात वापरली जाणारी भाषा-हीच आपण साहित्यातही वापरतो पण तरीही साहित्याच्या भाषेची काही वैशिष्ट्ये आहेत .आता पाहू.

 🔹साहित्याची भाषा : उत्तम काव्याची भाषा कशी असते या संदर्भात  व पाश्यात्य ते संस्कृत विशारदांनी चर्चा केली आहे या अनुषंगाने भारतीय व पाश्यात्य  समीक्षकांच्या विचारातून काही ठळक वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे

 १)भाषेच्या साह्याने लेखक आपला जीवनानुभव व्यक्त करत असतो. त्यामुळे त्यामुळे  लेखकाची स्वत:ची अशी भाषा असते.

२)सुचकता: साहित्याची भाषा विविध संवेदनांची सूचक असते ललित साहित्यातील सौंदर्य  हे सौंदर्याच्या या सुचकतेवर अवलंबून असते.

३)चिञदर्शित्व :   ललित साहित्य विविध रुपात अवतरते. कधी कवित्व तर कधी कथारुप धारण करुन त्यामधून  लेखकाचे विविध अनुभव गोचर होतात  खरं तर शब्दांच्या मधून  अनुभवांचे चिञण करत असतात. चिञातील रंगछटांचे कार्य गोचर करणे हे त्याचे कार्य असते.

४) लय आणि ताल:   साहित्यातून साकार झालेल्या अनुभवाला स्वत:ची एक लय असते. लयीनुसार  शब्दांचा  एक क्रम असतो. जो अनुभव प्रकटला आहे त्याची लय व ताल सांभाळला जातो की नाही याची काळजी भाषा घेते.

५) सौदर्यनिर्मितीची क्षमता :  साहित्याची भाषा ही सौंदर्य सर्जक असते  व्यवहाराच्या भाषेची निर्मिती अशी होईलच असे नाही. त्यामुळेच साहित्यभाषेत कलात्मक अनुभव देण्याचे सामर्थ असते.


स्वाध्याय: सरावासाठी सोबत दिलेली प्रश्नपत्रिका सोडवा. त्यासाठी खाली दिलेली लिंक कॉपी करून गुगलमध्ये पेस्ट करा.

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdneMgip_-QKqpE9h6-2eXrsxFGB8-p2QN2no2l2ZX3xRs8qw/viewform?vc=0&c=0&w=1&flr=0&usp=mail_form_link

सामाजिक चळवळी

 (Dhere V. D.)

B A.II History Paper IV सामाजिक चळवळी

(भाग १)

इ.स.१९६० ते २००० हे चाळीस वर्षाच्या कालखंडात महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेत कोणकोणते बदल आपला सुधारणा झाल्या त्यासाठी संघटनात्मक व संस्थात्मक काय प्रयत्न झाले? याचा अभ्यास या प्रकरणांमध्ये करणार आहोत.

          अ. मुस्लिम सत्यशोधक समाज...

भारत हा विविध जात, धर्म, भाषेच्या एकत्रित रहिवाशांचा देश आहे, विविधतेतून एकता हीच आपल्या राष्ट्रीयत्वाची खास ओळख आहे. बहुसंख्येने असलेल्या या देशात हिंदू धर्मात सुधारणा व्हाव्यात, अनिष्ट रूढी नष्ट व्हाव्यात यासाठी जाणकार, सुधारक व विचारवंतांनी अनेक प्रयत्न केले. त्याचप्रमाणे इतर धर्मातील पुरोगामी विचारवंतही पुढे सरसावले त्यापैकी इस्लाम धर्माच्या सुधारणेसाठी हमीद दलवाई यांनी केलेल्या प्रयत्नांचा आपण अभ्यास करणार आहोत.

         हमिद दलवाई (१९३२ ते१९७७)

29 सप्टेंबर 1932 रोजी हमीद दलवाई यांचा जन्म कोकणात चिपळूण जवळ मिरजोळी या गावी झाला. लहानपणीच त्यांच्या आईचे निधन झाले. प्राथमिक शिक्षण चिपळूणला घेतल्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते मुंबईला आले. पण आर्थिक अडचणीचा सामना त्यांना करावा लागला. त्यांच्या शिक्षणाची फी त्यांच्या शिक्षकांनी भरली व सांगितले की तू ही इतरांना मदत कर. याचा परिणाम म्हणून ते 1946 साली साने गुरुजींच्या राष्ट्र सेवा दलात सामील झाले व दै. मराठा मध्ये पत्रकारिता करू लागले. आपल्या समाज बांधवांचे प्रबोधन केले पाहिजे त्याशिवाय समाजातील स्त्रियांचे तलक, बहुपत्नित्व, पोटगी, दत्तक-विधान इत्यादी प्रश्न सुटणार नाहीत. ही त्यांची खात्री होती. त्यांचा संविधानावर विश्वास होता. उर्दू ऐवजी स्थानिक भाषेतून समाजबांधवांनी शिक्षण घ्यावे यासाठी त्यांनी प्रयत्न चालू केले. त्यामुळे त्यांना प्रखर विरोधाला सामोरे जावे लागले. "दारिद्र्यामुळे शिक्षण नाही आणि शिक्षण नसल्याने दारिद्र्य संपत नाही."या दृष्टचक्रातील मुस्लिमांनी शिक्षण घ्यावे. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, राष्ट्रीयत्व, विज्ञाननिष्ठा यांचा पुरस्कार करावा असे त्यांचे मत होते.       

         वयाच्या 38 व्या वर्षी त्यांनी "मुस्लिम सत्यशोधक मंडळा"ची स्थापना केली. कन्या नंतर केव्हा सातच वर्षात त्यांचे निधन झाले. त्यामुळे धर्ममार्तंडांना आनंदही झाला, पण त्यांचे सर्व कार्यकर्ते एकत्र आले आणि त्यांच्या विचारांची ही ज्योत त्यांनी पुढे नेली.

         "मुस्लिम सत्यशोधक समाज/ मंडळ"(२२ मार्च १९७०)

 हमिद दलवाई यांनी हिंदू मुस्लिम ऐक्य सदभावना सहकार्य व इस्लाम धर्मातील चुकीच्या प्रथांना विरोध करण्यासाठी प्रचार सुरू मध्ये धनी साथ तलाकपीडित मुस्लीम महिलांना घेऊन मोर्चा काढला व समान नागरी कायदा झाला पाहिजे असे निवेदन त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना दिले व कार्याची सुरुवात केली. सुरुवातीला अत्यंत खडतर अवस्था होती प्रारंभी दलवाई एकटेच होते. नंतर भाई वैद्य, डॉ.आढाव यदुनाथ थत्ते यांची त्यांना मदत झाली. 

     मुस्लिम सत्यशोधक समाज/ मंडळाची उद्दिष्टे..

शासनाकडे मुस्लिम सत्यशोधक मंडळाची रितसर रजिस्टर स्थापना करण्यात आली. त्यामध्ये त्यांची स्वरूप, रचना, उद्दिष्टे, सदस्यत्व, कार्यपद्धती, संचालक मंडळ, पदाधिकारी यांची नोंद आहे.  

      

    उद्दिष्टे...१) भारतीय समाजामध्ये प्रबोधनाच्या मार्गाने इहवादी (सेक्युलर) मुल्ये रुजविणे.

    २) भारतीय समाजातील विभक्ततावादी प्रवृत्तीविरुद्ध झगडा करून राष्ट्रीय एकात्मता साध्य होण्यास पोषक वातावरण निर्माण करणे.

     ३) भारतीय समाजातील कालविसंगत अशा श्रद्धा घालविणे.  

     ४) भारतीय स्त्रियांना समाजात समान हक्क मिळावेत यासाठी कार्य करणे.

     ५) इहवादी मूल्ये रुजविण्यासाठी शाळा, महाविद्यालये चालवणे संशोधन केंद्र स्थापन करणे.  

     ६) वाचनालये चालवून त्यात मुख्यत्वे लोकशाही, राष्ट्रवाद, धर्मनिरपेक्षता असे साहित्य ठेवणे.

     ७) इहवाद, लोकशाही,धर्म-सहिष्णुता इ.मूल्ये रुजवणारी नियतकालिके,पुस्तके,ग्रंथ इ. प्रसिद्ध करणे.

    ८) जाहीरसभा,व्याख्यानमाला,चर्चासत्रे,अभ्यासवर्ग, परिषदा व संमेलने याद्वारे इहवाद, लोकशाही, धर्म- निरपेक्षता इत्यादी मूल्यांचा प्रसार करणे.

    ९) या उद्दिष्टांना पूरक अशा भारत किंवा भारताबाहेर संस्थांशी/ व्यक्तींशी संबंध जोडणे. पण यासाठी जमा झालेला निधी भारताबाहेर वापरता येणार नाही.

    १०) वर निर्देश केलेले उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी करणे.

         हमीद दलवाई यांचे विचार...

  इस्लाम संस्कृतीतील काही अंगाबद्दल त्यांना प्रेम व अभिमान होता. पण तिची अनिष्ट बाजूही त्याला माहीत होती. ज्याप्रमाणे हिंदू आणि ख्रिश्चन धर्माची  चिकित्सा त्या-त्या धर्मातील विचारवंतांनी केली, तशी इस्लाम धर्माची कठोर व बुद्धिनिष्ठ चिकित्सा अजून कोणीही मुस्लिम विद्वानाने केली नाही. याची त्यांना खंत होती. अशी चिकित्सा झाल्याशिवाय मुस्लिम समाजाचे प्रबोधन होऊन तो


Dhere Sir, [12.06.21 11:25]

समाज समानतेच्या नात्याने इतरांच्या बरोबर राष्ट्रउभारणीच्या कार्यात सहभागी होऊ शकणार नाही. त्याची कायम अधोगती होत राहील. या अर्थाने दलवाई मूलगामी विचारवंत होते.  पारंपरिक धर्मकल्पनांच्या शृंखलातून जोपर्यंत हा समाज मुक्त होत नाही, तोपर्यंत त्याचे प्रश्न सुटणार नाहीत. पिक्चर इस्लामपूर ते सांगावयाचे झाल्यास मुस्लिम समाजाचे प्रबोधन मुस्लिमांनी सुरू केले पाहिजे. अन्य धर्मीयांनी केल्यास त्यांना इस्लाम विरोधक ठरवले जाईल. यासाठी "इस्लामिक रिसर्च इन्स्टिट्यूट" निर्माण करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. दलवाई स्वतः नास्तिक व अश्रद्ध होते, पण मुस्लिम समाजाने वा मंडळाने तसे झालेच पाहिजे असा त्यांचा आग्रह नव्हता.  इस्लाम धर्मात ही कुटुंब नियोजन करून लोकसंख्यावाढीला नियंत्रण घालण्याची गरज आहे असे त्यांचे मत होते. हिंदु अथवा मुस्लिम सनातनी जातीयतावादी न बनवता सुधारक बनवले पाहिजेत असे त्यांचे मत होते. याबाबत प्रा. समशुद्दिन तांबोळी म्हणतात "हमिद दलवाई यांना आपल्या नावे कोणतेही स्मारक होऊ नये असे वाटत होते. त्यांना अपेक्षित असलेली समाज प्रबोधनाची चळवळ मुस्लीम सत्यशोधक समाजामार्फत रुजविणे आणि विशुद्ध विज्ञानवादी दृष्टिकोन असणारे, परिवर्तनशील, सेक्युलर, लोकशाही, अशी संविधानिक मुल्ये अंगीकृत करणारे तरुण-तरुणी निर्माण करणे हेच त्यांचे खरे स्मारक ठरेल". 

    मुस्लिम सत्यशोधक मंडळाची कार्य...

मंडळाच्या स्थापनेनंतर सात वर्षातच दलवाई यांचे निधन झाले. त्यातही शेवटची दोन वर्षे ते आजारी होते. 

१). मुस्लीम सत्यशोधक पत्रिका... प्रबोधन प्रशिक्षण व प्रकाशन या त्रिसूत्री नुसार त्रेमासिक पद्धतीने ही पत्रिका प्रकाशित होत आहे. 

२). हमीद दलवाई स्टडी सर्कल.. मुस्लिमच नव्हे तर सर्व धर्मियांसाठी कार्यकर्त्यांची अभ्यास शिबिरे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन गरजू विद्यार्थ्यांना विशेष मदत या केंद्राद्वारे केली जाते.

३). मुस्लिम सत्यशोधक महिला मंच... महिलांच्या सुमारे 50 संघटना यामध्ये कार्यरत आहेत जागतिक पातळीवरील "वूमेन अंडर मुस्लिम लॉ"ही संघटना या अंतर्गत कार्यकर्ते तिहेरी तलाक विरुद्ध सध्या भारत सरकारने केलेला कायदा हा याचेच फलित आहे.

४). मुस्लीम सत्यशोधक युवा मंच.... मुस्लिम तरुणांना भडकवले जाते व ते जमातवादकडे वळतात  या विचारा विरुद्ध तरुणांना उदारमतवादी पुरोगामी विचार पटवून देणे त्यांची प्रश्न समजून घेणे योग्य मार्गदर्शन करणे योग्य व्यक्तिमत्व घडविणे हा या मागचा उद्देश आहे.

५). बकरी ईद निमित्त रक्तदान अभियान... नरेंद्र दाभोळकर यांनी अनिष्ट धार्मिक रूढी विरुद्ध कार्य केले त्यांचा मुलगा हमीद हेच कार्य पुढे नेत आहे डॉक्टर दाभोळकरांना पासून प्रेरणा घेऊन आम्ही दलवाईंनी देखील "रक्ताचं नातं जास्त धर्मापलीकडे मानवतेकडे" हा उपक्रम सुरू केला. बकरी ईद हा महत्त्वाचा सण आहे. या दिवशी कुर्बानी या शब्दाचा अर्थ कळावा यासाठी या मंडळामार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते.

६). वर्धापन दिन कार्यक्रम (२३ मार्च) या दिवशी चर्चासत्र, प्रकाशन, पुरस्कार इ. कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. हमीद दलवाई पुरस्कार, समाज प्रबोधन पुरस्कार, ही रोख रक्कम, मानपत्र,स्मृतीपत्र,सन्मानपत्र इ. मार्फत दिले जाते. याशिवाय मौलाना आझाद जयंती हमीद दलवाई व दिनकरराव जवळकर यांचा ३मे हा स्मृतिदिन साजरा केला जातो. या वेळी विविध संस्थांमार्फत गरीब मुस्लिम विद्यार्थ्यांना आर्थिक मदत मिळवून दिली जाते.

७). समविचारी संघटना बरोबर चे उपक्रम.. राष्ट्रीय एकात्मता समिती, विषमता निर्मूलन समिती, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, लोकशाही, उत्सव इत्यादी समविचारी संघटनांबरोबर हे मंडळ संविधान सन्मान, सामाजिक समता, हिंसाचार निषेध, धर्मनिरपेक्ष लोकशाही इ. विषयांवर उपक्रम राबवते.


  हमीद दलवाई यांची ग्रंथसंपदा....

  १). राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान

  २). इस्लामचे भारतीय चित्र

  ३). मुस्लिम जमात वाद कारणे व उपाय

  ४). भारतातील मुस्लिम राजकारण

  ५). मुस्लिम पॉलिटिक्स इन इंडिया

  ६). इंधन

  ७). लाट

  ८). जमिला जावेद

  इतरांची ग्रंथसंपदा:

  मेहरुसिन्ना दलवाई : मी भरून पावले ( हमीद यांचे चरित्र)

 सय्यद : दगडावरची पेरणी

 हुसेन जमादार : जिहाद

 अ.का. मुकादम : दास्तान, चंद्रकोरीच्या छायेखाली    

 प्रा. शमशुद्दीन तांबोळी :

 १) हमिद दलवाई-क्रांतिकारी विचारवंत-शहाबानो ते शबानाबानो.

 २). मुस्लिम समाज-व्यक्ती-विचार-साहित्य,आझाद कलाम.

 ३).  मुस्लिम समाज-प्रबोधन आणि विकास

 ४). समान नागरी कायदा-अपेक्षा आणि वास्तव

 ५). महाराष्ट्राचा शैक्षणिक विकास-नवे दालन,नव्या संधी.

 डॉ.बेनझीर तांबोळी:

 १). प्रभावशाली शिक्षणतज्ञ.

 २). शिक्षण शब्दकोश.

 तमन्ना इनामदार:

 १).  एक नजर.... तलाक नंतर

 २). मुस्लिम महिलांच्या समस्या-शोध आणि बोध.

 मुस्लिम सत्यशोधक पत्रिका (त्रीमासिक)

 मुस्लिम सत्यशोधक मंडळ-उद्देश व भूमिका.

महाराष्ट्रातील दूध उद्योग- आरे दूध डेअरी

 (Dhere V. D.)

B.A.II History Paper IV( भाग २)

महाराष्ट्रातील दूध उद्योग- आरे दूध डेअरी


महाराष्ट्राच्या अर्थकारणात आमूलाग्र बदल घडवून आणणारा उद्योग म्हणजे दूध उद्योग होय. शेतीला जोड व्यवसाय म्हणून हा उद्योग केला जातो. महाराष्ट्र शासनाने राज्यात दुधाचे संकलन वाहतूक प्रक्रिया पॅकेजिंग या करता सुविधा निर्माण करुन दिलेले आहेत. दुधाची स्थानिक गरज पुरवल्या वर ग्रामीण भागातून दुधाचे संकलन करुन शहरी भागात ते आणण्यासाठी सहकारी संस्थांच्या माध्यमातून गावपातळीपासून शासकीय दुध योजनेपर्यंत एक साखळी निर्माण करण्यात आलेली आहे. 1960 पर्यंत फक्त मुंबई साठी असलेले शासकीय दूध वितरण हळूहळू महाराष्ट्रातील इतर शहरांमध्ये सुद्धा सुरू करण्यात आले यामध्ये पुणे नागपूर नाशिक इ. शहरांचा समावेश होतो. शासकीय दूध योजना 36 जिल्ह्याच्या ठिकाणी राबवली जाते. विकी आठ ठिकाणी सहकारी दूध योजना आहेत. राज्यात 122 शीतकरण केंद्र आहेत. दूध, दुधापासून भुकटी, लोणी, चीज, तूप, आईस्क्रीम, पेढे, इत्यादी उपपदार्थ तयार करून त्यांची विक्री केली जाते.  मिरज, उदगीर, अकोला येथे दूध भुकटी तयार करणारे कारखाने आहेत.

महाराष्ट्राचे दुग्ध प्रशासन...

दुग्ध उत्पादन व्यवसाय विकसित करण्यासाठी आवश्यक संरचना शासनाने 1958 पासून सुरू केलेली आहे शासकीय यंत्रणा पुढील प्रमाणे आहे.

१). दुग्ध आयुक्त.. हे दूध प्रशासनाचे प्रमुख आहेत त्यांच्या मदतीसाठी पाच उपायुक्त निर्माण केलेले आहेत. त्यातील उपायुक्त १. हे प्रशासनाचे काम पाहतील ;उपायुक्त २. दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन व दुधाच्या उत्पन्न वाढीकडे मदत करण्याची काम करतील ; उपायुक्त ३. दुध व दुग्धजन्य पदार्थांचे वितरण प्रक्रियेची जबाबदारी असेल. ; उपायुक्त ४. अभियांत्रिकी व तांत्रिक जबाबदारी पार पडतील ; उपायुक्त ५. आर्थिक जबाबदारी पार पडतील.

२). सहाय्यक आयुक्त... 

               दूध प्रशासनात सहाय्यक आयुक्त हा दुग्ध आयुक्ताला मदत करत असतो सहाय्यक आयुक्त च्या मदतीसाठी (१) कार्यासन अधिकारी प्रशासन; (२) लेखाधिकारी सर्वसाधारण (३) परिवहन अधिकारी सामग्री (४) भू सर्वेक्षण अधिकारी गुणनियंत्रण (५) दक्षता अधिकारी लेखा हे पाच अधिकारी असतात.

३). सहनिबंधक...

     तालुका व जिल्हा दूध संघ व सहकारी दूध संस्था यांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्याचे काम सहनिबंधक करतात आणि शेवटी उपनिबंधक सहनिबंधकाला मदत करतात.

  ४). उपनिबंधक...

         खेडेगावातील सहकारी दूध संस्था व इतर अधिकाऱ्यांना मार्गदर्शनाचे काम उपनिबंधक करतात त्याशिवाय ती थेट दूध उत्पादक व नागरिकांशी संपर्क ठेवून कामे करतात.

         बृहन्मुंबईमध्ये आरे, वरळी व कुर्ला या तीन दुग्धशाळा आहेत त्यांचे नियंत्रण महाव्यवस्थापक बृहन्मुंबई दूध योजना यांचे मार्फत करण्यात येते. या विभागाकडे आरे, पालघर व दापचरी ही तीन प्रक्षेत्रे असून मुंबईतील जनावरे व तबेलेधारक  यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नियंत्रक गुरे नियंत्रण यांचे मार्फत करण्यात येते. आरे दूध वसाहत येथील कामकाज मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत करण्यात येते.

         १९५८ मध्ये महाराष्ट्र शासनाने स्वतंत्र दुग्धव्यवसाय विभाग सुरू केला त्याच्या प्रमुखाला दुग्ध आयुक्त (Milk Commissioner) असे संबोधण्यात येते.१९६० चाली राज्याचे प्रतिदिन दूध संकलन १ लाख लिटर होते. २०१५-१६ साली प्रतिदिन शासकीय दूध संकलन 114 लाख लिटर इतके झाले. ग्रामीण भागातून दूध संकलन करण्यासाठी गाव स्तरावर प्राथमिक सहकारी संस्था. तालुका आणि जिल्हा स्तरावर जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी या पदांची निर्मिती 1978 चाली करण्यात आली.

         दूध महापूर योजना.

उद्देश १. दुधाचे उत्पादन वाढविणे २. भाकड जनावरांची संख्या कमी करून दूध देणाऱ्या जनावरांची पैदास करणे.३. जनावरांना सकस आहार मिळवून देण्यासाठी प्रयत्न दूध व्यवसायात गरीब शेतकऱ्यांचा सहभाग वाढविणे.

पहिली दूध महापूर योजना (१९७५-१९८१)....(ऑपरेशन फ्लड) या योजनेअंतर्गत कुर्ला दुग्धशाळा कोल्हापूर आणि जळगाव येथे सहकारी संस्थांमार्फत चालविण्यात येणार्‍या दुःख शाळांची उभारणी करण्यात आली.

दुसरी दूध महापूर योजना (२९८१-१९८७)... या योजनेत जळगाव, कोल्हापूर, पुणे, सोलापूर, अकलूज येथे शीतकरण केंद्रांची उभारणी करण्यात आली तसेच इतर दुग्ध शाळांचे विस्तारीकरण करण्यात आले. 


तिसरी दूध महापूर योजना (१९८७-१९९२)...       महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये ही राबवण्यात आली २३ करोड रुपयांची गुंतवणूक करून दूध वाढीसाठी प्रोत्साहन देण्यात आले. 

एकूण 81 कोटी रुपयांची गुंतवणूक करून  दूध उत्पादन वाढविण्यात आले. यामुळे अतिरिक्त दुधाचा प्रश्‍न निर्माण झाला. तो सोडवण्यासाठी शालेय पोषण आहारात दूध वितरण सुरू करण्यात आले.१९८५-८६ मध्ये शालेय पोषण आहार सुरू केला यात ४७७२९६ विद्यार्थ्यांना ७१५९४ लिटर प्रतिदिन दुधाचा पुरवठा करण्यात आला. पूर्वी 1983 पर्यंत बाहेरील राज्यातून महाराष्ट्रात वितरणासाठी दूध आणले


Dhere Sir, [10.06.21 10:07]

जाई. आता आपल्या राज्यातून आंध्र, बंगाल, मध्य प्रदेश, बिहार, दिल्ली इत्यादी राज्यांमध्ये दररोज दूध पाठवले जाते. महाराष्ट्रातील 14 लाख शेतकऱ्यांना यामुळे जोड धंदा मिळाला यापैकी 70 टक्के शेतकरी आर्थिक दृष्ट्या दुर्बल व गरीब आहेत.

                          'आरे' डेअरी मुंबई

  स्थापना..१९४९ सालीमुंबई शहरातील गोरेगाव येथे असलेल्या उपनगरात आरे दुग्ध वसाहतीची स्थापना झाली.

   उद्देश ...१. मुंबई शहरातील दूध उत्पादनाच्या बाबतीत क्रांतिकारी सुधारणा दुग्ध वसाहतीतील दुधावर प्रक्रिया दूध दुग्धजन्य पदार्थांचे मार्केटिंग दुध वसाहतीतील दुधावर प्रक्रिया करून निर्जंतुक बाटल्यांत भरून मुंबईतील ग्राहकांना पुरवणे.

   मुंबईतील आद्य दुग्ध व्यावसायिक दादा खुरोडी यांच्या संकल्पनेतून आरे दुग्ध उत्पादने विकसित केली गेली. त्यांनी 1963 मध्ये रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळवणारे डॉ. वर्गीस कुरीयन यांच्या सहकार्याने दुधाचे उत्पादन व मार्केटिंग करण्याचे काम केले. सुरूवातीला 1970 पर्यंत आरे येथे उत्पादित होणारे दूध वितरित केले जात होते. 1970 नंतर ग्रामीण भागातून दूध संकलित करून ते वितरित करण्यास सुरुवात झाली.

     अरे दूध कॉलनी चे एकूण 3166 एकर जमिनीचे क्षेत्र आहे. त्यातील चारशे एकर क्षेत्र सारा आणि गवत लागवडीखालील आहे. प्रचंड विस्तार असल्यामुळे यातील काही जमीन राज्य केंद्र व विविध संस्थांना भाडेतत्त्वावर दिली आहे.

     १) केंद्र सरकारच्या (सेंट्रल पोल्ट्री फार्म, मॉडर्न बेकरी, एन. डी.डी.बी., आर. बी.आय.) या संस्थांना २२९.९२ इतके क्षेत्र दिलेली आहे.

    २) महाराष्ट्र शासनाच्या (मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, एस. आर. पी.; म्हाडा, एम. सी. जी. बी. फिल्म सिटी व फिशरी) यांना ७२९.१२इतके क्षेत्र दिलेली आहे.

    ३) रस्ते व इमारती खालील क्षेत्र ४६०.०० एकर.

    ४) नाले तलाव शेत बंधारे शेत रस्ते नदी केलेले क्षेत्र नापीक जमीन १,०२०.२० एकर.

    ५) लोन बगीच्या फळबागा ५३७.००एकर.

    ६) सामाजिक वनीकरण व जमीन १८३.००एकर.

    ७) एकूण आरे कॉलनी क्षेत्र ३१६०.००एकर

           अरे वसाहत उभारण्याचे मुख्य उद्दिष्ट.

 अ. शहराच्या हद्दीतून जनावरे/  म्हशीचे स्थानांतर करणे.   

 ब. मुंबई शहर वासियांना तुलनेने स्वस्त दरात उच्च प्रतीच्या दुधाचा पुरवठा करणे.

 क. आधुनिक वैज्ञानिक पद्धतीने पशुपालन व प्राण्यांची देखभाल करणे.

             जनावरांच्या तबेल्याची व्यवस्था 

आरे कॉलनीत प्रत्येकी 500 ते 550 गुरेढोरे राहण्याची क्षमता असलेले 30 गोठे तबेले आहेत. त्या लगेच साहेब ठरणारा इमारती शेड आहेत त्यामध्ये गवत गोडाऊन चारा कापणी यंत्र वासरांची सोय कर्मचाऱ्यांची राहण्याची सोय करण्यात आलेली आहे. १६०७९ इतक्या जनावरांची येथे सोय आहे. परवानाधारकांना परवाना शुल्क, पाणी, वीज शुल्क, व्यवसाय शुल्क व इतर सुविधांचे शुल्क भरावे लागते.                   

  यशवंत जनावरांची देखभाल कॉलनीतील रहिवाशांच्या मुलांच्या हितासाठी प्राथमिक शाळा आणि 24 बीडचे रुग्णालय हे उपक्रम अरे प्रशासनाने चालवलेले आहेत.

          पशुसंवर्धन योजना व गाय विभाग  

जवळपास 700 देशी व संकरित गाईंचे पालन केले जाते देशी वाना बरोबरच परदेशी संकरित कालवडी यांची पैदास करण्यासाठी क्रॉस ब्रीड वापरले जाते. या अभ्यासाचा उपयोग महाराष्ट्रातील दूध उत्पादकांना दूध उत्पादनासाठी व उच्च प्रतीच्या जनावर पैदाशीसाठी केला जातो.

     २००१-०२ सालापासून  महसूल तूट भरून काढण्यासाठी पुढील उपाय योजना करण्यात आलेले आहेत.

     १) पवई,मालाड बोरवली दिंडोशी गोरेगाव अंधेरी मरोल मरोशी ते अरे दूध कॉलनी मुख्य रस्ता वापरणाऱ्या वाहनांना टोल सार्वजनिक निविदेतून संकलित केला जातो.

     २) आरे कॉलनीतील तळाचा वापर नौकाविहारा साठी भाडेतत्त्वावर दिला जातो. 

     ३) रिकामी असणारी गोडाऊन आधुनिक निविदा मागवून विविध पक्षांच्या सभा मीटिंग व इतर उपक्रमासाठी भाड्याने दिले जातात. 

     ४) विविध वस्तू व पदार्थ विक्री केंद्रासाठी विक्रेत्यांना स्टॉल्स रेस्टॉरंट जनरल स्टोअर्स सुरू करण्यासाठी भाडेतत्त्वावर जागा दिली जाते.

     ५) नारळ आंबे काजू इत्यादी कृषी उत्पादनासाठी कंत्राटी पद्धतीने दिली जातात.

     ६) विविध संसाधने आणि उत्पादने उदाहरणार्थ पाणी, चारा प्लांट, गुरेढोरे भाडेतत्त्वावर कराराने दिली जातात.

     हे सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी आरे कॉलनी यांच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली विविध उपक्रम राबवले जातात.    

     असे असले तरी तिथल्या रिकाम्या जागेवर शासनाचा सतत डोळा असतोच, सध्या मेट्रो कार शेड साठी आरे ची रिकामी जागा वापरण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, यासाठी तेथील वृक्षांची कत्तल करण्यात आली.

अक्षरबंध/अग्रलेख

 राधानगरी महाविद्यालय, राधानगरी

बी ए भाग १

अभ्यासक्रमपञिका क्रमांक:२

सञ :२

पाठ्यपुस्तक :अक्षरबंध

विभाग :३ अग्रलेख

विषय प्राध्यापक प्रा बी के पाटील

प्रस्तावना : वृत्तपञात बातमीबरोबर वृत्तपञिय लेख लिहिले जातात. वृत्तपञिय लेखास इंग्रजीत Feature Writing असे म्हणतात.A non-news aarticle in newspaper म्हणजे वृत्तपञिय  लेख. ज्याला बातमी म्हणता येत नाही. असा लेख असे या लेखाचे स्वरुप असते. वृत्तपञ, व्यक्तिविशेष लेख, मुलाखतीतून लेख, ऐतिहासिक लेख, स्फूटलेख, स्तंभलेख या सर्वामध्ये प्रथम क्रमांकाचा मान आग्रलेखाला दिला जातो. अग्रलेखाला संपादकीय लेख असे म्हटले जाते. संपूर्ण वृत्तपञाची जबाबदारी संपादकावर असते. वृत्तपञाच्या पृष्टावर अग्रलेखाला जागा  दिली जाते.

🔹अग्रलेख :संकल्पना, स्वरुप आणि महत्व

       'अग्रलेख' या शब्दात अग्र आणि लेख हे दोन शब्द आहेत. अग्र म्हणजे,अगोदरचा आणि महत्वाच्या स्थानी असलेला. लेख म्हणजे विशिष्ट विचार प्रतिपादन  करणारी भाषिक रचना. 'वृत्तपञातील अत्यंत महत्वाचा लेख म्हणजे अग्रलेख' या विधानात अग्रलेख हे समजून येत नाही , माञ त्याचे स्थान कळते.

   अग्रलेख म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी ,अग्रलेख कशाला म्हणता येत नाही, याचा विचार करावा लागतो. एखादी बातमी किंवा वृत्त वाचकापुढे विस्तृत स्वरुपात मांडणे म्हणजे अग्रलेख नव्हे. एखाद्या समस्येवर दिलेली लेखी रुपातली प्रतिक्रिया म्हणजे अग्रलेख नव्हे. अग्रलेखासाठी वृत्तपञातील विशिष्ट पृष्ट आणि विशिष्ट जागा जी अढळ स्वरुपात संपादकाने निश्चित केलेली असते, त्यावरुनही तो लेख हा अग्रलेख आहे की नाही हे समजून घेता येते.

उदा. आतील दूसरे, चौथे, सहावे किंवा आठवे पृष्ठ आणि अगदी डावीकडची बाजू. अशा प्रकारे त्या त्या वृत्तपञात अग्रलेखाची जागा ठरलेली असते.

अग्रलेखात संपादक किंवा अग्रलेख लेखक हा सभोवतालच्या घडामोडीचे विश्लेषण करीत असतो, त्यामागच्या कार्यकारणाचा शोध घेत असतो, घटनेत दडलेल्या सत्याचा शोध घेऊन त्यावर भाष्य करीत असतो. वाचकांना एखादी घटना वा विषय आवडेल की नाही याचा विचार लेखक करीत नाही. ती घटना प्रभाव टाकणारी, जीवनमान बदलवून टाकणारी असेल तर तिची निवड करुन अग्रलेख लिहिला जातो. 'सभोवतालच्या घडामोडी, राज्यकर्त्याचे बदलते धोरण, त्यासाठी राबविल्या जाणार्‍या योजना आणि लोकांचे विचार वर्तन याचे सम्यक विश्लेषण करणारा, वाचकांच्या शक्तीला चालना देणारा लेखन प्रकार म्हणजे अग्रलेख होय.'

   तसेच वैचारिक निबंधाशी अत्यंत जवळचे नाते सांगणारा लेख म्हणजे अग्रलेख होय. प्रत्येक वृत्तपञातील अग्रलेख हा त्या वृत्तपञाची भूमिका दर्शविणारा लेख असतो. अग्रलेख वाचल्यानंतर त्या त्या वृत्तपञाची किंवा संपादकाची भविष्यकालीन वाटचाल लक्षात येते. अग्रलेख वाचणे म्हणजे सभोवतालच्या घडामोडीकडे पाहण्याचा दृष्टिकोण विकसित करणे. वैचारिक समृद्ध होण्याचा अनुभव अग्रलेखामुळे येतो.

  अग्रलेख हा कोण लिहितो,हे महत्वाचे नसते. लिहिणारी व्यक्ती माञ जबाबदारीची जाणीव असलेली, पणकारितेची पुरेपूर जाण असलेली, बहुश्रुत असलेली आणि काळाची पुढील पावले ओळखणारी असावी लागते. अग्रलेखाच्या खाली वा शीर्षकाजवळ लेखकाचे नाव वा ओळख नसते. इतर कोणत्याही लेखाचा कर्ता वाचकांना कळतो माञ अग्रलेख/संपादकीय लेख कोणी लिहिला हे समजत नाही. नाव समजले नाही तरी अग्रलेखातील विचार समजून घेता येतात.


स्वाध्याय: सरावासाठी सोबत दिलेली प्रश्नपत्रिका सोडवा. त्यासाठी खाली दिलेली लिंक कॉपी करून गुगलमध्ये पेस्ट करा.

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSddwhPiXLOnODtWP_kUWPSaeMFeLIAR-sx4x_XgdsvyNQGXuw/viewform?vc=0&c=0&w=1&flr=0&usp=mail_form_link

BCOM_AEC

https://drive.google.com/file/d/1F1IRMakowHOCmho9iSvSdqoPKh2SWmVe/view?usp=sharing