(e-Content developed by Prof (Dr) N A Jarandkar)
तोरू दत्त ही स्वातंत्र्यपूर्व भारतातील इंग्रजीतून लिहिणारी एक
महत्त्वपूर्ण कवयित्री आहे. केवळ २१ वर्षाचे आयुष्य लाभलेल्या तोरू दत्तने आपल्या
आयुष्यातील चार वर्षे युरोपमध्ये व्यतीत केली होती. इंग्रजीबरोबरच तिचा फ्रेंच, बंगाली आणि संस्कृत भाषांचा अभ्यास होता.
युरोपमधील स्त्रियांना मिळणाऱ्या स्वातंत्र्याने भारावून गेलेल्या तोरूला
आयुष्याच्या एका टप्प्यावर पाश्चात्य संस्कृतीइतकीच भारतीय संस्कृती समृद्ध असल्याची
प्रचिती आली. पाश्चात्य आणि भारतीय संस्कृतीसंदर्भातील भावनांच्या आंदोलनांचे
तिच्या कवितेमध्ये प्रतिबिंब पडलेले पहावयास मिळते.
‘दि लोटस’ ही कविता ‘सॉनेट’ या काव्यप्रकारात
लिहिलेली आहे. ‘सॉनेट’ म्हणजे १४ ओळींची कविता. ही कविता दोन कडव्यांमध्ये
विभागलेली असते. यातील पहिले कडवे हे आठ ओळींचे असते. याला ‘ऑकटेव्ह’ (octave) असे म्हटले जाते. तर दुसरे कडवे हे सहा ओळींचे
असते. याला ‘सेसटेट’ (sestet) असे
म्हटले जाते. इंग्रजीतील हा एक अत्यंत प्रसिद्ध काव्यप्रकार आहे.
‘दि लोटस’ कवितेमध्ये कवयित्रीने ग्रीक-रोमन
पुराणकथांचा संदर्भ घेतलेला आहे. एकदा प्रेमाची देवता ‘लव्ह’ (Love) ही फुलांची देवता ‘फ्लोरा’ (Flora) हिच्याकडे
येते आणि तिच्याकडे अशा एका फुलाची मागणी करते ज्याला निर्विवादपणे ‘फुलांची राणी’
म्हणता येईल. हा सन्मान मिळवण्यासाठी दोन फुलांमध्ये नेहमीच स्पर्धा राहिली होती :
लिली आणि गुलाब. कवीमंडळीनी (bards of power)
आपापल्यापरीने या दोन्ही फुलांची पाठराखण केली होती. काहींचे म्हणणे होते की ज्युनोसारखे
प्रसन्न दर्शन असणाऱ्या लिलीच्या फुलासोबत गुलाबाची तुलना होऊ शकत नाही (Juno: स्वर्गाची देवता). तर अन्य कवींचे म्हणणे
होते की गुलाबाइतकी लिली देखणी आहे का? त्यामुळे प्रेमाच्या देवतेने अशी मागणी
केली की मला असे फुल दे जे गुलाबाइतके देखणे असेल आणि लिलीइतके प्रसन्न असेल (“Give
me a flower delicious as the rose And stately as the lily in her pride”).
यावर फ्लोरा देवतेने विचारले की मग या फुलाचा रंग
कसा असावा? यावर प्रेमाच्या देवतेने प्रथम गुलाबासारखा लाल रंग मागितला, मग लिलीसारखा
पांढरा रंग मागितला आणि शेवटी दोन्ही रंग एकत्र असणाऱ्या फुलाची मागणी केली. आणि
यावर फ्लोरा देवतेने फुलांमधली ‘सर्वोत्तम राणी’ म्हणून (the queenliest
flower) तिला कमळाचे फुल प्रदान केले.
भारतीय परंपरेनुसार ‘कमळ’ हे शांतता आणि पावित्र्य यांचे प्रतिक आहे.
कमळाला भारताचे राष्ट्रीय फुल जाहीर करण्यात आले आहे. कवितेमध्ये ‘लिली’ आणि ‘गुलाब’ ही पश्चिम आणि पूर्व संस्कृतींची प्रतीके आहेत. परंतु कवीला असे
वाटते की या दोन्ही संस्कृतींचा संगम (‘कमळ’) शांतता आणि सलोखा निर्माण करण्यासाठी गरजेचा आहे.
Introduction:
Toru
Dutt is an important Indian English poet writing in the pre-independence period
of India. She was well versed in Bengali, Sanskrit, English and French. Her
poetry combines Indian themes with Western classical influences. She died at a
young age. Her poem ‘The Lotus’ is considered as an expression of the national
pride. The poem symbolizes the dignity and beauty of Indian culture.
The poem:
In
the poem, it is seen that once the Roman goddess Love approaches Flora, the
goddess of flowers and asks to
give her a flower which deserves the honour of a queen. But she is in dilemma
whether she should choose the white lily which stands for majestic quality or
the red rose which symbolizes sweetness. Several poets have sung in favour of
both the flowers. There is fraction among the renowned poets into two groups;
one group adores lily and the other adores rose. Rose can never match the
majestic look of lily as it looks like ‘Juno’s mien’. On the other hand, a lily
cannot match the loveliness of a rose. Finally, Love asks Flora to give her a
flower that is both charming and sweet like a rose and majestic like a lily.
Flora, then, conceives lotus which is both red and white having qualities of
both rose and lily.
Themes of
the poem:
At
one level, the poem celebrates the expression of national pride. A lotus
is a national flower. It has a special significance in the Indian tradition.
Then, the poem talks about harmony and balance. People are divided into rose-lovers
and lily-lovers. But the flower of lotus blends both the qualities of rose and
lily. Thus, a lotus becomes a symbol of harmony and balance.
In
the poem, the poet makes use of the Roman mythology. Love and Flora are the
Roman goddesses of love and flowers. There is a reference to Juno and Psyche,
again the Roman goddesses. So, at one level, it appears that the dispute about beauty
is going on in the western world. And the solution to this dispute is seen in
the Indian context.
Form of the
poem:
The
poem is written in a sonnet form. Sonnet is a poem written in fourteen
lines. It is divided into two stanzas. There are eight lines in the first
stanza (octave), and six lines in the second stanza (sestet). The
first stanza of the poem deals with the conflict between the beauty of rose
versus lily. The second stanza deals with harmony and balance through the lotus
flower.
Conclusion:
The Lotus” is a short but profound
poem that beautifully expresses Toru Dutt’s poetic vision. It is a world where love
and purity, East and West, passion and peace come together.
Through the myth of Flora and the Indian lotus, she creates a universal symbol
of beauty and unity. The poem stands as a fine example of how an Indian poet
could use Western literary forms and classical myths to express Indian themes
and pride.