Skip to main content

बी.ए. भाग-१ मराठी • आवश्यक अनुषंगिक निवड( CGE- 1) ¤ वाटेवरच्या सावल्या ¤ कुसुमाग्रज तथा विष्णु वामन शिरवाडकर

 बी.ए. भाग-१ मराठी

• आवश्यक अनुषंगिक निवड( CGE- 1)

 ¤ वाटेवरच्या सावल्या ¤

       कुसुमाग्रज तथा विष्णु वामन शिरवाडकर (1912-1999)

         ▪️वाटेवरच्या सावल्या▪️

                 आधुनिक कवी,नाटककार व कादंबरीकार. 'जीवनलहरी','विशाखा','किनारा,'मराठी माती,'स्वगत',' हिमवर्षाव,'वादळवेल', महावृक्ष इ.काव्यसंग्रह प्रकाशित. 'दुसरा पेशवा',कौंतेय','आमचं नाव बाबूराव ','ययाती आणि देवयाणी','वीज म्हणाली धरतीला','नटसम्राट 'ही नाटके प्रकाशित. कालिदासाच्या 'मेघदूता'चे तसेच अन्य पाश्चात्य नाटकांचे मराठीत रूपांतर 'वैष्णव ','जान्हवी,'कल्पनेच्या तीरावर 'या कादंबऱ्याही लिहिल्या आहेत. शिवाय कथा,निबंध आणि काव्यसमीक्षात्मक लिखाणही त्यानी केलेले आहे.साहित्य अकादमी आणि ज्ञानपीठ या पुरस्कारानी ते सन्मानित आहेत.

             'वाटेवरच्या सावल्या' या पाठात कुसुमाग्रज यांनी त्याच्या बालपणातील सुंदर आठवणी ओघवत्या भाषेत कथन केल्या आहेत.कौटुंबिक वातावरण,माध्यमिक शाळेत असताना साहित्य,कला,क्रिडा,नाटक यांची लागलेली गोडी,वाचनाचे संस्कार, एका फकिराची अरेरावी वृत्ती व त्याच्याशी झालेली झटापट,शिक्षकांच्या अध्यापनातून झालेले काव्याचे संस्कार, क्रिकेट या खेळाची मनस्वी आवड आणि त्यासाठी केलेल्या खटपटी यांचे मनोरम वर्णन कुसुमाग्रजांनी केले आहे.शिवाय 'वणी' नावाचे लहानसे गाव, या गावातील ग्रंथालय,चिपळूणकरांची ग्रथमाला,गडकर्याची नाटके,कवितासंग्रह,कादंबर्‍या इ.वाचन,नाटके आणि काव्याच्या छंदापायी गणित विषयात आलेले अपयश;हे सारे काही या पाठात कुसुमाग्रजांनी आत्मियतेने कथन केलेले आहे.

                      नाशिकच्या एच.पी.टी.महाविद्यालयात शिकत असताना कुसुमाग्रज गणित विषयात नापास झाले.एक वर्ष वाया गेले.वडिलांना झालेल्या दु:खाने त्याना खुप वाईट वाटले.पुढे त्यांनी झटून अभ्यास केला.मराठी आणि इंग्रजी विषयात बी.ए. झाले या पाश्र्वभूमीवर त्यानी पुढे केलेली प्रगती थक्क करून सोडते.

Comments

Popular posts from this blog

Internal Evaluation_English_BA I (Sem. I)

सूचना ·        DSC इंग्रजी या विषयाच्या अंतर्गत मूल्यमापनासाठी एकूण ४० गुण असतील . ·        AEC/SEC इंग्रजी या विषयाच्या अंतर्गत मूल्यमापनासाठी एकूण २० गुण असतील . ·        १०/२० गुणांच्या एकूण चार टेस्ट तुम्हाला महाविद्यालयाकडे जमा करायच्या आहेत. ·        पैकी ०३ टेस्टसाठीचे प्रश्न सोबत दिले आहेत. त्याची उत्तरे तुम्ही टायटल पेज सोबत दिलेल्या कागदाची प्रिंट काढून त्यावरतीच लिहायची आहेत. ·        टेस्ट लिहिण्यासाठी प्रोजेक्ट पेपर/आखीव ताव अथवा अन्य कागद वापरू नका. फॉरमॅटमध्ये दिलेल्या कागदाचा वापर करा. ·        टेस्ट क्र. ०३ ही क्विझ असेल. त्यासाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका दिलेली आहे. टायटल पेजसहित त्याची प्रिंट काढावी. आपली उत्तरे सोबतच्या चौकोनात लिहावीत. ·        आपल्या चार टेस्टचे चार निरनिराळे संच आपल्या विषय शिक्षकांकडे जमा करावेत. ·     ...

Model Millionaire

  (e-content developed by Prof (Dr) N A Jarandikar) ‘ The Model Millionaire’ ‘द मॉडेल मिलियनेअर’ (‘ The Model Millionaire’ /आदर्श लखपती) ही कथा ऑस्कर वाइल्ड (Oscar Wilde) या लेखकाने लिहिलेली आहे. कोणताही हेतू न बाळगता चांगल्या मनाने केलेली मदत ही अनमोल कशी असते, याविषयीची ही गोष्ट आहे. या गोष्टीमध्ये पुढील पात्रे आहेत : १.        ह्युई अर्सकाईन ( Hughie Erskine): हा या कथेचा नायक आहे. २.        अॅलन ट्रेव्हर ( Alan Trevor ) : हा एक चित्रकार आणि ह्युईचा मित्र आहे. ३.        बॅरन हाऊजबर्ग ( Baron Hausberg ) : हा अॅलन ट्रेव्हरसाठी मॉडेल म्हणून काम करतो आहे. ४.        लॉरा मेर्टन ( Laura Merton ): ही ह्युईची प्रेयसी आहे. ही कथा लंडन शहरामध्ये घडते. ह्युई अर्सकाईन हा एक तरुण आणि रुबाबदार युवक आहे. त्याचे वर्णन पुढीलप्रमाणे केलेले आहे : 1. wonderfully good looking; 2. crisp brown hair; 3. clear-cut profile; 4. grey eyes. त्याच्या वडलांनी त्यांच्या पश्चात आ...

Serpent Lover

  (e-content developed by Prof. (Dr) N A Jarandikar) The Serpent Lover                                               -     A. K. Ramanujan ए. के. रामानुजन हे इंग्रजीतून लेखन करणारे एक महत्त्वाचे भारतीय लेखक आहेत. त्यांची ओळख ही मुख्यत्वे एक कवी म्हणून आहे. भारतीय लोककथांमध्ये त्यांना विशेष रुची होती. आयुष्यातील कित्येक वर्षे त्यांनी भारतीय , विशेषतः कन्नड लोककथा गोळा करण्यामध्ये व्यतीत केली आहेत. प्रस्तुतची कथा ‘ The Serpent Lover ’ ही अशीच एक कन्नड लोककथा आहे. ही कथा त्यांच्या ‘ A Flowering Tree’ या पुस्तकातून घेण्यात आलेली आहे. कामाक्षी नावाची एक तरुण स्त्री या कथेची नायिका आहे. कामाक्षीचे एका तरूणाबरोबर लग्न झाले आहे. पण हा तरुण बाहेरख्याली असून त्याचे अन्य एका स्त्रीसोबत (concubine— विवाहबाह्य संबंध असणारी स्त्री) ) संबंध आहेत. कामाक्षीला याची कल्पना आहे. एक दिवस आपला नवरा आपल्याकडे परत येईल , या आशेवर ती जगत आहे. अशीच २-३ वर्षे गेल्यानंतर , ...