(S D Patil) B.A II Sem IV Co-Operatives in India Paper II Unit – I घटक - नागरी सहकारी बँका ( Urban Co - Operative Banks ) नागरी सहकारी बँका जर्मनी व इटली देशांतील नागरी सहकारी चळवळीपासून प्रभावित होऊन भारतातही नागरी सहकारी पत संस्था स्थापन होण्यास सुरुवात झाली . ९ फब्रुवारी १८८९ ला प्रा . विठ्ठल लक्ष्मण कवठेकर यानी बडोदा शहरात " परस्पर सहाय्यकारी मंडळी " ची स्थापना , काही महाराष्ट्रीयन मध्यमवर्गीयांच्या मदतीने केली . या सस्थेपासून प्रेरणा घेऊन बॉम्बे प्रांतातही नागरी सह . पत सस्था स्थापन झाल्या . १९०४ च्या कायद्याने त्यांना कायदेशीर दर्जा मिळाला . १९४९ चा बकिंग नियमन कायदा ( Banking Regulation Act ) १ मार्च १९६६ रोजी नागरी सहकारी बँकाना लागू करण्यात आला . व्याख्या : बँकिंग नियमन कायदा - १९४९ नुसार नागरी सहकारी बँकांना प्राथमिक सहकारी संस्था समजण्यात येते याचा अर्थ या बँका सहकारी त्रि - स्तरीय रचनेतील सर्वात खालच्या पातळीवर मात्र शहरी भ...
The e-contents are meant for the under-grad college students. The contents are designed and developed by the concerned teachers. The images are downloaded from internet sources and care is taken not to violate the copyright.