Showing posts with label V. S. Patil. Show all posts
Showing posts with label V. S. Patil. Show all posts

Sunday, 27 June 2021

वर्ण वर्णाचे प्रकार व वर्गीकरण

 *बी.ए.भाग 3 मराठी *घटक-७(भाषाविज्ञान आणि मराठी भाषा)

प्रा.डॉ.विश्वास पाटील 

वर्ण वर्णाचे प्रकार व वर्गीकरण

        आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूळ ध्वनी ना आपण वर्णन असे म्हणतो

 *मराठीची वर्णमाला* 

मराठीने आपल्या भाषिक व्यवहारासाठी संस्कृत भाषेतील वर्णमाला स्वीकारली आहे. मराठीतील ध्वनि संस्कृत प्राकृत अपभ्रंश या परंपरेने बदलत आले. परंतु लेखनासाठी मात्र लिपी स्वीकारताना मराठी ने संस्कृत वर्णमाला स्वीकारली. त्यामुळे संस्कृत वर्णमाला व आजच्या मराठीची वर्णमाला यात बराच फरक दिसून येतो.

  वर्णांचे प्रकार

 *स्वर* व *व्यंजन* असे दोन प्रकार आहेत

 *स्वर* 

मराठी सोळा स्वर मानण्यात आले आहेत

अ आ इ ई उ ऊ ऋ ॠ लृ  ॡ ए ऐ ओ औ अं अः

      जो वर्ण स्वतंत्र आहे म्हणजे ज्या वर्णांच्या उच्चाराला दुसऱ्या कोणत्याही वर्णांचे सहाय्य घ्यावे लागत नाही त्या वर्णनास स्वर असे म्हणतात. स्वरांचा उच्चार होत असताना ओटांच्या किंवा जिभेच्या विविध हालचाली होत असतात. पण त्यांचा एकमेकाशी किंवा जिभेचा कोणत्याही भागाचा मुखातील कोणत्याही अवयवाशी स्पर्श न होता मुखावाटे जे ध्वनि बाहेर पडतात त्यांना स्वर असे म्हणतात. स्वरांचा उच्चार आपल्या तोंडावाटे सहज व स्वतंत्रपणे म्हणजे दुसर्‍या कोणत्याही वर्णाच्या साह्या वाचून होतो. स्वरांचा उच्चार करताना आपले तोंड उघडले व पसरलेले असते म्हणजे स्वरांच्या उच्चारात यावेळी हवेचा मार्ग अडवलेला नसतो स्वर म्हणजे नुसते सुर.

 *स्वरांचे प्रकार* 

अ) उच्चारानुसार प्रकार 

 १]  र्‍हस्व स्वर-अ इ उच्चार ऋ ऌ या स्वरांचा उच्चार आखूड होतो. म्हणजे यांचा उच्चार करायला थोडा वेळ लागतो.म्हणून त्यांना र्‍हस्व स्वर म्हणतात. 

२] दीर्घ स्वर- आ ई ऊ ए ऐ ओ औ या स्वरांचा उच्चार करायला अधिक वेळ लागतो.म्हणजेच त्याचा उच्चार लांबट होतो. म्हणून त्यांना दीर्घ स्वर म्हणतात. 

    र्‍हस्व व दीर्घ हे स्वरांचे प्रकार त्याचा उच्चार करावयास लागणाऱ्या कालावधी वरून  ठरवितात. त्यानाच मात्रा असे म्हणतात. र्‍हस्व स्वर उच्चारायला जो वेळ लागतो त्याची एक मात्रा मानतात.  दीर्घ स्वरांच्या दोन मात्रा मानतात.

मराठीची वर्णव्यवस्था

 बी.ए.भाग-3 मराठी पेपर क्रमांक 13(भाषाविज्ञान आणि मराठी भाषा)

प्रा.डॉ.विश्वास पाटील 

घटक-७

    मराठीची वर्णव्यवस्था

भाषा हा शब्द भाषण म्हणजे बोलणे अशा अर्थाच्या संस्कृत धातूपासून बनलेला आहे भाषा या शब्दासाठी इंग्रजी पर्याय लैंग्वेज असा असला तरी स्पीच या शब्दावरून भाषा ठीक आहे हे लक्षात येते भाषा मुखावाटे निघालेल्या दोन्हीतून सिद्ध होते बोलणारा व ऐकणारा यांच्यामध्ये दोन्ही हे माध्यम भाषेचे कार्य करीत असते ्रत्येक भाषेत अक्षरे मुळाक्षरे ध्वनी शब्द वाक्‍य असे घटक असतात या घटकांची रचना म्हणजे भाषा असते भाषा म्हणजे बोलण्याचा व्यवहार करण्याचे प्रभावी साधन आहे

१) लिपी- लेखन करण्यासाठी आपल्या निरनिराळ्या आवाजांच्या किंवा ध्वनींच्या सांकेतिक खुणा ठरवलेले आहेत त्या खुणा ना लिपी असे म्हणतात. लिपी हा शब्द लीप म्हणजे लिफ्टने सारवणे मागणे असा आहे आपण कागदावर शाईने लिहितो म्हणून त्याला लिपी असे म्हणतात ही लिपी उभ्या-आडव्या तिरप्या व गोलाकार रेषांची बनलेली असते शाईचा शोध लागण्यापूर्वी ताडपत्र दगड किंवा ताम्रपट यावर करून ठेवत होते म्हणून अशा प्रकारच्या वरून पुन्हा करण्याला लेखन म्हणू लागले.

२) अक्षर - आपल्या भाषेचा उपयोग बोलण्याच्या वेळी पुरताच व ऐकू येईल एवढ्या अंतरा पुरता होतो लिपीचा शोध लागल्यानंतर बोलण्यापेक्षा लिहिण्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले बोलणे हे बोलून झाल्यावर नाहीशी होते म्हणून ते क्षर (नष्ट होणारे) आहे पण आपले बोलणे हे लिपीत लिहून ठेवले म्हणजे पुष्कळ काळपर्यंत टिकते ते नष्ट न होणारे म्हणून त्याला अक्षर असे म्हणतात अक्षर म्हणजे लेखनाचे चिन्ह असते.

३) देवनागरी लिपी- मराठीत जी लिपी वापरली जाते तिला बाळबोध लिपी असे म्हटले जाते तिलाच देवनागरी लिपी असेही म्हणतात देवनागरी ही आर्य लोकांची लिपी ते इतर लोकांपेक्षा गोरे व तेजस्वी होते म्हणून त्याला देव म्हणत हे आर्य शहरात म्हणजे घरात राहत म्हणून ते नागरी व त्यांच्या लिपीला देवनागरी लिपी असे नाव पडले मराठीत लिपी जलदगतीने लिहिता यावी म्हणून यातील अक्षरे मोडून किंवा त्यांना थोडी मुरड घालून लिहिण्याची पद्धत काही काळ प्रचारात होती तिला मोडी लिपी असे म्हणतात.

Wednesday, 2 June 2021

मराठीचा उगम काळ

 *मराठी विभाग* 

 बी.ए.भाग- 3 सत्र-6 पेपर क्रमांक- 13 ( *भाषाविज्ञान आणि मराठी भाषा)* 

प्रा.डॉ.विश्वास पाटील 


*मराठीचा उगम काळ* 

६) विवेक सिंधू मुकुंदराज यांनी लिहिलेला विवेक सिंधू हा मराठीतील आद्य ग्रंथ इस अकराशे 88 मधील आहे उपनिषदातील विचार सर्वसामान्य मराठी जनतेला सांगण्यासाठी मुकुंदराजांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे जया नाही शास्त्रीप्रतीती Iनेणती तर्क मुद्रेची स्थितीI तेया लागी मराठ्या युक्तीI केली ग्रंथरचना अस आपल्या ग्रंथरचनाचा हेतू मुकुंदराज सांगतात. विवेक्सिंधू ची ओवी साडेतीन चरणांची आहे इथे दिलेल्या ओवीत शास्त्र, प्रतीती, तर्क, मुद्रा, स्थिती, मराठी, युक्ती, ग्रंथरचना असे शब्द येतात.

७) लीळाचरित्र  -मराठीतील पहिला गद्य ग्रंथ म्हणून या ग्रंथाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. महानुभाव संप्रदायाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांच्या लीळा म्हणजे आठवणी त्यांच्या शिष्याने म्हणजेच माहीम भटाने संकलित करून चरित्र रूपाने या ग्रंथात मांडलेल्या आहेत. या ग्रंथाचे एकाक,पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे तीन विभाग असून एकूण १५०९ लीळा आहेत चरित्राची रचना १२८३ मध्ये झालेली असावी. यादव काळात संस्कृत भाषेबरोबरच मराठी भाषा बोलली जात होती याचा उत्तम पुरावा म्हणजे हा चरित्रग्रंथ होय.

      या ग्रंथातील काही शब्दरूपे पुढीलप्रमाणे- सौंदर (सुंदर),पुरूषू (पुरूष),पुसणे(विचारणे),सांघणे( सांगणे),एथ(येथे),सरण(शरण),परिसाळ(पाठशाळा),हाट(बाजार)इत्यादी.

८) ज्ञानेश्वरी - ज्ञानेश्वरी हा ग्रंथ ज्ञानेश्वरांनी इ.स. १२९० मध्ये लिहिला आहे. ज्ञानेश्वरी हे नाव ज्ञानेश्वराने आपला ग्रंथास दिलेले नाही. केले ज्ञानदेवे गीतेI देशीकार लेणेI एवढेच त्यांनी लिहिलेले आहे. नामदेवानी ज्ञानेश्वरी असा उल्लेख केला. गीतेच्या अठराव्या अध्यायातील सातशे लोकांवर मूळ अध्याय व क्रम न बदलता सुमारे ९५०० ओव्यांचे हे भाष्य त्यांनी लिहिलेले आहे.

     ज्ञानेश्वरीतही ऊ काराचे प्राबल्य आढळते. गणेशु, प्रकाशु, निवृत्तीदासू, तर्कु, अंकुशु वेदांतू ,मोदक, सिद्धू, केवळ, घेतू अशी शब्दरूपे आढळतात.

मराठीचा उगम काळ

 *मराठी विभाग* 

 बी.ए.भाग- 3 सत्र-6 पेपर क्रमांक- 13 ( *भाषाविज्ञान आणि मराठी भाषा)* 

प्रा.डॉ.विश्वास पाटील 


*मराठीचा उगम काळ* 

मराठी भाषेचा उगम काळ आपणास निश्चित करावयाचा आहे मराठी भाषेची सुरुवात आपण यादव काळापासून म्हणजे तेराव्या शतकापासून मानतो समाजामध्ये मराठी भाषा व व्यापार स्थिर होत असताना म्हणजेच मराठी ही बोली भाषा किंवा लोक भाषा होताना या भाषेमध्ये या शतकात लिहिले बोलले जात होते त्यामुळे मराठीचा उगम का शोधताना आपणास यादव काळापासून मागे जाऊन विविध ग्रंथ शिलालेख आणि ताम्रपट यांचा मागोवा घ्यावा लागतो.

 सन 1960 मध्ये भाषावार प्रांतरचनेच्या तत्त्वानुसार महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली महाराष्ट्र हे राज्य प्रामुख्याने मराठी भाषा बोलणाऱ्यांची आहे महाराष्ट्राच्या सीमा गुजरात मध्य प्रदेश आंध्र प्रदेश कर्नाटक आणि गोवा या राज्यांनी मर्यादित झाले आहेत महाराष्ट्राचे कोकण पश्चिम महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाडा असे स्थूलमानाने विभाग पडतात. मराठी भाषेचा उगम काढणे शेतीच्या साधनांमध्ये ग्रंथांना खूप महत्त्व आहे ग्रंथात असणारी भाषा त्यातील शब्द रुपये नाम क्रियापद विशेषण ए याचे स्वरूप पडताळून पाहिल्यास तत्कालीन मराठी भाषेची एक निश्चित रूपरेषा आपणास उभी करता येते आपण इथे काही ग्रंथांची माहिती घेऊ.

१) वररुचि- (इसवी सनाचे पाचवे शतक) या प्राकृत व्याकरणकारणे प्राकृत प्रकाश या आपल्या ग्रंथात महाराष्ट्री या प्राकृत भाषेला जणू प्रमुख प्राकृत भाषा म्हणून तिचे वर्णन पहिल्या आठ प्रकरणांमध्ये केले आहे. त्यानंतर शौरसेनी, मागधी व पैशाची या प्राकृत भाषांवर एकेक प्रकरण दिले आहे. ज्यावर ती महाराष्ट्री या प्राक्रुत भाषेवरच आठ प्रकरणे आहेत. तसेच तिचे व्याकरण लिहिले जाते त्यावर ती महाराष्ट्री प्राकृत भाषा लोकांच्या बोलण्यात होती तसेच तिचा प्रसार वाढून ही जिवंत स्वरूपात विकसित होत होती हे लक्षात येते वररुची प्रमाणेच हेमचंद्रा नेही प्राकृत चंद्रिका या ग्रंथ नामाने प्रकृतीचे व्याकरण लिहिले.

२) कुवलयमIला - इ.स.७७८ ज्या कुवलयमला या ग्रंथाचा कर्ता कवी उद्योतनसूरी याने अठरा देशी भाषांचा उल्लेख केला आहे. त्यात मरहट्टे भाषेचा उल्लेख करून त्या देशातील माणसांचे वर्णन पुढीलप्रमाणे केले आहे. दडमडह सामलंगे सहीरे आहीमाने कल हसिले ये गहिले डुलवी रे तत्व मरहट्टे आठव्या शतकाच्या सुमारास दिसणारी गहिले अशी शब्द रूपे मराठी भाषेचे विशिष्ट तत्त्व व्यक्त करतात. सर्वसामान्यांच्या व्यवहाराची ती लोकं भाषा बनली होती याचे ते निदर्शक आहेत.

३) नव्या शतकाच्या सुमारास विठ्ठल कविता वैद्यकचकोरचंद्रिका हा वैद्यक  शास्त्रीय संस्कृत ग्रंथ अधून-मधून मराठी भाषेचा आधार घेताना दिसतो श्रीपती कवीचा ज्योतिष रत्नमाला हा ग्रंथ 1039 मधील आहे. या ग्रंथात श्रीपती कवी तिथी, वार, नक्षत्र, मुहूर्त या विषयाची खगोलशास्त्रीय माहिती मराठी भाषेत देतो.

४) राजमतीप्रबोध - इसवी सनाच्या अकराव्या शतकाच्या उत्तरार्धात यशचंद्र जैन यांनी राजमती प्रबोध  नावाच्या संस्कृत नाटकात राजीमती या नायिकीचे वर्णन मराठी भाषेत केले आहे. या नाटकात केला. त्यांनी महाराष्ट्र म्हणजेच मराठी स्त्री म्हटले आहे.

५) मानसोललास - चालुक्य वंशीय दुसऱ्या विक्रमादित्याचा मुलगा सोमेश्वर याने इस 1129 मध्ये मानसोल्लास अथवा  अभिलासीतार्थचिंतामणनी नावाचा संस्कृत ग्रंथ लिहिला. या ग्रंथात मराठी स्त्रिया जात्यावर दळण दळताना म्हणत असलेल्या ओव्यांचा उल्लेख आहे. यावरून मराठी लोकगीतांची जुनी परंपरा व तत्कालीन मराठी बोलीचे अस्सल रूप येथे पाहायला मिळते.

माती,पंख आणि आकाश / ज्ञानेश्वर मुळे

 बी.ए. भाग-2 पेपर क्र.-V 

प्रा.डॉ.विश्वास पाटील 

माती,पंख आणि आकाश 


ज्ञानेश्वर मुळे


ज्ञानेश्वर मुळे हे भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी व मराठी भाषेतील लेखक आहेत. यांचे माती, पंख आणि आकाश हे आत्मकथन प्रकाशित आहे. शिवाजी विद्यापीठाच्या एसवायबीएच्या अभ्यासक्रमात याचा समावेश करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील मराठी माध्यमामध्ये शिकलेला मुलगा स्वत.च्या बुद्धीच्या जोरावर भारतीय परराष्ट्र सेवेत मोठी झेप घेतो, ही प्रेरणा विद्यार्थ्यांमध्ये जागवण्यासाठीच या आत्मकथनाचा विचार केला गेला आहे.


दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे २७ वे साहित्य संमेलनाचे ते संमेलनाध्यक्ष होते.


वारकरी परंपरा असलेल्या कुटुंबात अब्दुल लाट (ता. शिरोळ) येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे शिक्षण अब्दुल लाट, कोल्हापूरचे विद्यानिकेतन, शहाजी छत्रपती महाविद्यालय आणि शिवाजी विद्यापीठात झाले. मूळचे कवी असलेल्या मुळे यांचे जोनाकी (१९८४), दूर राहिला गाव (२०००), रस्ताच वेगळा धरला (२००५), स्वतःतील अवकाश (२००६) हे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. ओरिया साहित्यिक रमाकांत रथ यांच्या 'श्री राधा' या खंडकाव्याचा त्यांनी अनुवाद केला आहे.


माणूस आणि मुक्काम, रशिया - नव्या दिशांचे आमंत्रण (२००६) , ग्यानबाची मेख, नोकरशाईचे रंग (२००९) ही त्यांची पुस्तकेही प्रसिद्ध आहेत. मुळे यांनी हिंदीमध्येही काव्यलेखन केले असून ऋतु उग रही है (१९९९), अंदर एक आसमान(२००२), मन के खलिहानो में (२००५), सुबह है की होती नही (२००८) हे हिंदी कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. हिंदी, उर्दू, कन्नड, अरेबिक भाषांमध्ये त्यांच्या साहित्याचा अनुवाद झाला आहे.


ज्ञानेश्‍वर मुळे हे कडोली मराठी साहित्य संघाच्या वतीने १४ जानेवारी २०१८ रोजी झालेल्या ३३व्या कडोली मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.

महात्मा फुले

 राधानगरी महाविद्यालय राधानगरी

 बी ए भाग एक

 मराठी आवश्यक 

 विषय शिक्षक: प्रा. डॉ. विश्वास पाटील

 महात्मा फुले (इ.स. 18 27- 18 90) महात्मा ज्योतिराव फुले हे आधुनिक भारतातील एक अत्यंत महत्त्वाचे समाजसुधारक, शिक्षण तज्ञ, तत्त्वचिंतक व साहित्यिक होते. त्यांनी शोषित जनसमूहांच्या दुःख दैन्याचा वस्तुनिष्ठ अन्वयार्थ. त्यांच्या शोषण मुक्तीची एक मूलगामी विचारसरणी मांडली. सत्यशोधक समाजाची स्थापना करून समाजपरिवर्तनासाठी कार्यकर्त्यांचे संघटन उभे केले. शोषितांचे मुक्ती, स्वातंत्र्य, मानवी प्रतिष्ठा, समता, सामाजिक न्याय, श्रमप्रतिष्ठा हा क्रांतिकारी मूल्य विचार त्यांनी दिला. मुला - मुलींच्या शिक्षणासाठी शाळांची स्थापना, विधवा-पुनर्विवाह साहाय्य, बालहत्या प्रतिबंधक गृह, अस्पृश्यांसाठी पाण्याचा हौद खुला करणे, सावकारशाही विरुद्ध शेतकऱ्यांचे संघटन व उठावाचे नेतृत्व करणे. यासारख्या त्यांच्या प्रत्येक कृतीमधून शोषितांच्या मुक्तीचा ध्यास प्रकटतो. तृतीय रत्न, छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पोवाडा, ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी, हंटर आयोग पुढील शैक्षणिक निवेदन, शेतकर्याचा असुड, मराठी ग्रंथकार सभेस पत्र, सत्सार, इशारा, सार्वजनिक  सत्यधर्म पुस्तक, अखंड वगैरे साहित्यामधून कृषी जनसमूहाच्या पर्यायी वांग्मयीन संस्कृतीचे बीजारोपण त्यांनी केले. महात्मा फुले यांचे दोन अखंड अभ्यासक्रमांमध्ये समाविष्ट केलेले आहेत मानवांचा धर्म एक या खंडामध्ये मानवाने स्वतःला सोयीसाठी अनेक धर्म देव निर्माण केले आहेत. त्यातून त्याचे हित होण्याऐवजी शोषणच होत असते. सर्वांचा निर्मिक एकच आहे. त्याला स्मरून न्यायाने सर्व वस्तूंचा उपभोग घ्यावा. धर्माच्या नावाने आपापसात न भांडता सर्वांनी सत्य हा एकच धर्म मानवा असे मानवतावादी विचार महात्मा फुले यांनी मांडले. निर्मिकाने पृथ्वी निर्माण करताना कोणताही भेदभाव केला नाही. त्याने सर्वांसाठी समान तृण, वृक्ष, गोमटी फळे आपणास देऊ केले आहे. त्याप्रमाणे आपण मानवता हा एकच धर्म मानवा असे आव्हान महात्मा फुले यांनी या अखंड मध्ये केले आहे. 

 धीर या खंडांमध्ये व्यक्ती व समूह जीवनामध्ये धैर्याचे महत्त्व सांगितले आहे. फुल्यांनी  मांडलेले विचार आजही उपयुक्त आहेत.

प्रज्ञा दया पवार

 राधानगरी महाविद्यालय राधानगरी

 *बी ए भाग -एक

मराठी आवश्यक* 

विषय शिक्षक: प्रा डॉ विश्वास पाटील

     प्रज्ञा दया पवार (जन्म 19 66)

         नव्वदोत्तर कालखंडातील महत्त्वाची कवयित्री. अंत:स्थ, उत्कट जीवघेण्या धगीवर, मी भिडवू पाहतेय समग्रासी डोळा, आरपार लयीत प्राणांतिक, दृश्यांचा ढोबळ समुद्र हे त्यांचे कवितासंग्रह प्रकाशित आहेत. अफवा खरी ठरावी म्हणून हा कथासंग्रह. केंद्र आणि परिघ. धांदात खैरलांजी ही त्यांची नाटके. मी भयंकराच्या दरवाजात उभा आहे, विमुक्तांचे स्वातंत्र्य ही संपादने. महाराष्ट्र शासनाचा कवी केशवसुत वांग्मय पुरस्कार तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक व महाराष्ट्र फाऊंडेशन यांचेही पुरस्कार प्राप्त. त्यांच्या कवितांचे अनुवाद मल्याळम, तमिळ, तेलुगु, कन्नड, गुजराती, हिंदी, बंगाली, रशियन आणि इंग्रजी मध्ये झालेले आहेत. पद्मश्री दया पवार प्रतिष्ठान मुंबई या संस्थेच्या कार्याध्यक्ष, सामाजिक चळवळीत विशेषता स्त्री संघटनांमध्ये सहभाग, ज्ञानसाधना महाविद्यालय ठाणे येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत.                                एकविसाव्या शतकात स्त्रियांच्या जगण्याचे अवकाश विस्तृत झाले असले तरी आजही तिच्याकडे माणूस म्हणून पाहिले जात नाही ही शोकांतिका आहे. स्त्री आणि पुरुष मानवी जीवनातील संवादी अनुबंध असले तरी ही पुरुषाची स्त्रीकडे पाहण्याची दृष्टीही एक उपभोगाची वस्तू अशीच आहे. आज ही पुरुष स्त्रीच्या संपूर्ण देहावर आपली मालकी बांधतो. परंतु आधुनिक स्त्रीने पुरुषाच्या भोगाचे साधन बनणे नाकारले. त्यातून स्त्रीला आपले माणूस म्हणून अस्तित्वात असणे गरजेचे असल्याचे अधोरेखित होते. 

   माणसासारखा माणूस असूनही या कवितेत पुरुषांच्या मनातील स्त्री बद्दलचे नकारात्मक विचार व्यक्त झालेले आहेत. स्त्री आपल्या अस्तित्वासाठी झगडत असताना त्याला असे वाटते की तिची नग्न धिंड काढावी, तिला चाबकाने फोडवे, उकळत्या तेलामध्ये हात घालायला लावून तिची कठोर सत्वपरीक्षा घ्यावी, तिच्या स्त्री देहाचे लचके तोडून त्याला आपलं पुरुष पण दाखवून द्यायचं असतं परंतु त्याला आता यातील काहीच करता येत नाही. कारण स्त्री ही आपल्या अस्तित्वासाठी जागृत झालेली आहे. तिला जगण्याचं भान आले आहे. आजपर्यंत इथल्या पारंपरिक समाजव्यवस्थेने पुरुषांची प्रतिमा सुसंस्कृत आणि पुरोगामी अशी चित्रित केली आहे. त्यांच्या घरात महापुरुषाचे फोटो आहेत, मात्र त्यांच्या मनात स्त्रीबद्दल अस्थाच भरलेली दिसते. या कवितेतून कवयित्री समता व न्यायाची अपेक्षा व्यक्त करुन मानवी मूल्य हे सर्वश्रेष्ठ मूल्य असल्याचे सूचित करते.       आग आणि फुफाटा या कवितेमधून पुरुषप्रधान संस्कृतीचे चित्रण केलेले आहे. अनेकदा पुरुषी मानसिकतेने आदर्श बसनवलेला चेहरा प्रत्यक्षात संकुचित असतो. स्त्रीने कितीही प्रगती केली तरी ती बंड करू शकत नसल्याचे दिसते. एखाद्या स्त्रीने आत्मसन्मानासाठी बंड केले तरी काही होऊ शकत नाही. कारण शेवटी ती बाई आहे. अशी गळचेपी करणारी ही व्यवस्था आहे. पारंपारिक समाजव्यवस्थेत आग आणि फुफाटा हे दोनच पर्याय त्यांच्यापुढे आहेत. हे वास्तव कवयित्री सूचित करते. नीतिमत्तेच्या नावाखाली पुरुषांची पाशवी वृत्ती स्त्री रोज अनुभवत असते. अशी स्त्री वेदना अस्वस्थता निर्माण करते.

वाहरू सोनवणे

 राधानगरी महाविद्यालय

 मराठी आवश्यक              बी.ए.भाग-1 

विषय शिक्षक: प्रा.डॉ.विश्वास पाटील 

वाहरू सोनवणे जन्म इ.स. 19 50

    नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील श्री खेड येथे जन्म. आदिवासी साहित्य प्रवाहातील महत्त्वाचे समकालीन कवी व चळवळीतील कार्यकर्ते. आदिवासींच्या मूलभूत  प्रश्नांसाठी अविरत लढा त्यांनी दिलेला आहे. गोधड,रोडाली हे त्यांचे कवितासंग्रह प्रकाशित आहेत. गोधड कविता संग्रहाचा पहाड जीने लगा या नावाने हिंदी अनुवाद झालेला आहे. वाहरू सोनवणे यांच्या निवडक कविता प्रकाशित आहेत कोल्हापूर येथे 2000 साली झालेल्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले आहे. पाचवे आदिवासी साहित्य संमेलन पालघर, परिवर्तन साहित्य संमेलन साकोली, दुसरे नंदुरबार जिल्हा साहित्य संमेलन शहादा या संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले आहे. विविध सामाजिक, सांस्कृतिक घडामोडींवर त्यांनी लेखन केले आहे. गोधड या काव्यसंग्रहाचा अर्थ सांगताना कवी म्हणतो गोधड या काव्यसंग्रहाचा जाणकार चुकीचा अर्थ लावतात. ही गोधड आदिवासींच्या वेदना, व्यथांची नसून सडलेल्या फाटलेल्या समाजव्यवस्थेची ही गोधड आहे. ती बदलण्याची ही वेळ आलेली आहे. आदिवासींची परिस्थितीही फाटक्या मळलेल्या गोदडी प्रमाणे झालेली आहे. त्यामध्ये काही सुधारणा नाही, वर्तमान परिस्थितीत ते गुदमरून गेले आहेत.  पिढ्यान पिढ्या अज्ञान, दारिद्र्यामुळे त्यांचे शोषण होत आहे. गेल्या कित्येक पिढ्यामध्ये ही व्यवस्था तशीच आहे. आता या व्यवस्थेत जीव गुदमरून जातोय. कारण ही व्यवस्था जीर्ण आणि मळकट झाली आहे. तिचा कुबट आंबट वास येत आहे. ती आता बदलायला हवी. फाटकी गोधडी, आंबट वास या प्रतिमा ही खूप बोलक्या आहेत. भारतीय समाजातील शोषित उपेक्षित घटकांची व्यथा-वेदना या कवितेतून व्यक्त होतांना आपल्याला दिसते.

    चळवळ म्हणजे या कवितेतून मानवी समाजाला गतिमान करणाऱ्या कृतिशील प्रवाहाचे चित्रण आलेले आहे. कवीला परिवर्तनाची आस आहे. तो स्वतः चळवळीतील कार्यकर्ता असल्याने आपल्या न्याय हक्कासाठी चळवळ उभी करतो. मात्र ही चळवळ म्हणजे जत्रा किंवा नदीला आलेला पूर नाही. सतत विकसित होत जाणारा हा प्रवाह आहे. चळवळ ही माणुसकीची मूलभूत गाभाभूत घटक आहे. मानवतेच्या प्रस्थापनेसाठी अखंड कार्यरत असणाऱ्या चळवळींना व त्यांच्या कार्यकर्त्यांना विरोध करणारे त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून अडथळे आणणारे अनेक घटक असतात. तरी याविषयी व्यवस्थे मधून चळवळ विशाल महासागरा कडे वाट काढत असते. परिवर्तनवादी चळवळीच्या केंद्रस्थानी माणूस असायला हवा. हे कवी  विशेषत्वाने इथे नोंद करतात.

विंदा करंदीकर

 *राधानगरी महाविद्यालय 

 मराठी (आवश्यक) 

 बी.ए. भाग-1 

विषय शिक्षक: प्रा.डॉ.विश्वास पाटील

 विंदा करंदीकर इ.स. 19 18- इ.स.2010* 

     विंदा करंदीकर हे मराठी वागणमयाची विविध दालने समृद्ध करणारे प्रयोगशील कवी. कविता, गीते, समीक्षा, बाल कविता, लघुनिबंध, अनुवाद असे विविध प्रकारचे लेखन त्यांनी केले आहे. स्वेदगंगा, मृदगंध, धृपद, जातक, विरुपिका इत्यादी काव्यसंग्रह. राणीची बाग, एकदा काय झाले, सशाचे कान, एटू लोकांचा देश, परी ग परी, अजबखाना, सर्कस वाला, पिशी मावशी आणि तिची भुतावळ, आडम तडम हे बालकवितासंग्रह. स्पर्शाची पालवी, आकाशाचा अर्थ हे लघुनिबंध संग्रह. अरिस्टॉटलचे काव्य-शास्त्र, पाऊस भाग 1, राजा लिअर हे अनुवादित ग्रंथ. परंपरा आणि नवता हा समिक्षा लेख संग्रह. सावंतवाडी येथे 1996 मध्ये झालेल्या कोकण मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मान.

     माझ्या मना बन दगड ही एक वेगळी सामाजिक जाणीव व्यक्त करणारी कविता. समाजामधील ज्या लोकांना नीटपणे प्राथमिक गरजाही मिळालेले नाहीत त्यांचा आक्रोश ऐकून आपणाला काहीही करता येत नाही. म्हणून स्वतःच्या मनाला कवी म्हणतो माझ्या मना बन दगड इथल्या शोषित, वंचितांना कोरडी सहानुभूती दाखवून काहीही उपयोग नाही. मात्र हेच लोक एक दिवस क्रांतीचे दूत बनून येतील असा आशावादही व्यक्त केला आहे. कुडकुडणारे हे जीव पाहू नको! डोळे शिव! माणूस मिथ्या, सोने सत्य! यासारख्या अवतरणा मधून त्यांच्या कवितेची सामर्थ्य केंद्रे स्पष्ट होतात.

     झपताल या कवितेमध्ये संसारिक स्त्रीच्या व्यक्तिमत्त्वाच्या बहुविध अशा पैलूंचे चित्रण येते. बाळाला दुध पाजणारी, स्वयंपाक करणारी, कपडे धुणारी, अशी ती अनेक रूपात नाना कामे करीत सबंध घरभर भिरभिरत असते. स्वागत करताना ती सुहासिनी असते, वाढताना यक्षणी असते,  मुलाना भरवताना पक्षिनी असते, तर बचत करुन साठवताना सहिता असते. हा सगळा संसाराचा गाडा ती दहा फूट खोलीमध्ये दिवसाच्या चोवीस मात्रा कशी बसवते याचे कवीला आश्चर्य वाटते. प्रेम जाणिवेच्या विविध छटा या कवितेमधून विंदा करंदीकर प्रकट करताना दिसतात.

बालकवी

 राधानगरी महाविद्यालय मराठी (आवश्यक) बी.ए.भाग-1

सत्र-2

विषय शिक्षक- प्रा.डॉ.विश्वास पाटील 


बालकवी इ. स. (18 90- इ. स. 19 18) 

          त्र्यंबक बापूजी ठोंबरे उर्फ बालकवी यांचा जन्म खानदेशातील धरणगाव येथे झाला. वडिलांची नोकरी फिरतीची असल्यामुळे एरंडोल, यावल, जामनेर बेटावर या ठिकाणी तिसरीपर्यंत शिक्षण. अहमदनगरच्या मिशन स्कूलमध्ये व महाबळेश्वरच्या ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या शाळेत काही काळ शिक्षक 1907 साली जळगाव येथे भरलेल्या मराठी कवी संमेलनात डॉक्टर कीर्तिकर यांच्याकडून बालकवी '' ही उपाधी मिळाली. भादली स्टेशन जवळ रूळ ओलांडताना आगगाडी खाली अपघाती निधन. बालकवींची समग्र कविता पुस्तक रूपाने प्रसिद्ध. कल्पकता वेधकता आणि उत्प्रेक्षा ही त्यांच्या कवितेची वैशिष्ट्ये होत. निसर्ग प्रेम आणि बालसुलभ भाव अशा विविध रंगांनी त्यांची कविता नटलेली आहे. निसर्ग वर्णन पर सौंदर्यवादी कवितांचे लेखन करून त्यांनी मराठी काव्य विश्वात मौलिक भर टाकली आहे.

     फुलराणी ही बालकवींची कविता खूप लोकप्रिय झाली. या कवितेचा विषय अगदी साधा आहे. हिरव्या हिरव्या गवतात उगवलेल्या बारीकशा कळीचे गोजिरवाण्या रविकिरनासी  लग्न ठरते. सगळेजण तिची चेष्टा मस्करी करतात. तिला रात्री प्रीतीची स्वप्ने पडतात आणि सकाळी तिचे रवीकिरण अशी लग्न होते. विषय काय तेवढाच परंतु आपल्या तरुण प्रतिभेने बाल कवीने या कवितेत एक नितांत सुंदर प्रेम कथा गुपली आहे. निसर्गातील विविध घटकांवर मानवी भावभावनांचे आरोपण केल्यामुळे ही कविता मन मोहून टाकते. फुलराणीच्या विवाहाचे वर्णन करताना तेजोमय नव मंडप, दिव्य वराडी, लाल सुवर्णी झगे, गुलाबी फेटा, मंगल पाठ, सनई या शब्दांनी मांगल्य आणि पवित्रता वाढविण्यास मदत केली आहे.

     अप्सरांचे गाणे या कवितेमधून सौंदर्यासाठी तळमळणार्‍या बालकवींच्या संवेदनशील मनाचे प्रगटीकरण होते. परी किंवा अप्सरा या रात्रीच्या वेळी आनंदाची उधळण करत मौज मजा करत पृथ्वीवर भ्रमंती करतात. अशी एक कल्पना आहे. या स्वर्गीय अप्सरा स्नानासाठी पृथ्वीवर सुंदर जागेचा शोध घेत फिरतात. त्यांचे मोहक वर्णन बालकवींनी केले आहे. या अप्सरा फुलांच्या गर्भात लपलेल्या गंगेत स्नान करू इच्छितात तिथे उतरत असताना शुभ पुकेसरणा धक्का लागू नये म्हणून खबरदारी घेतात. तेथील वातावरणाचे निसर्गातील विविध घटकांचे वर्णन करताना बालकवींच्या प्रतिभेला बहर आला आहे.

Monday, 19 April 2021

बी.ए.भाग-१ (मराठी आवश्यक) / अनंत फंदी

                                                      अनंत फंदी   (इ. स. १७४४-१८१९)

      'फंदी आनंदाची कविता सवाई सोटा सोटा रे'असा आत्मविश्वास घेऊन मराठी शाहिरी काव्यात आपले नाव अजरामर करणारा कवी म्हणजे आनंत  फंदी होय. त्यांच्या जन्म मृत्यु संदर्भात नेमकी माहिती उपलब्ध नाही. पेशवे काळातील हा एक महत्त्वाचा कवी. आनंत फंदी यांचे गाव संगमनेर.पूर्वजांचा व्यवसाय गोंधळी पणाचा व सराफीचा होता. आपल्या कवित्वाच्या बळावर तो प्रसिद्ध शाहीर झाला. व पुढे अहिल्याबाई होळकर यांच्या सल्ल्याने तो कीर्तन करण्यास प्रवृत्त झाला. व पुढे तो प्रसिद्ध कीर्तनकार झाला. आनंद फंदी चे पोवाडे, लावण्या, कटाव व फटके उपलब्ध आहेत. आनंत फंदी यांचा 'खर्ड्याच्या लढाईवर' पोवाडा प्रसिद्ध आहे. 'माधव ग्रंथ' हा त्यांच्या नावावर आहे.

 ' जमाना आला आला उफराटा ' या लावणीत अनंत फंदी यांनी पेशवे काळातील अनागोंदीचे चित्र रेखाटले आहे. सुन, लेक, शिष्य अनुक्रमे सासू, वडील आणि आणि गुरूला किंमत देत नाहीत. त्यांची निंदा करतात जावई सासूला किंमत देतो व आईला लावंडून देतो. बहिणीला अपशब्द वापरून मेहुणीचे लाड पुरविणारा भाऊ, आईवडिलांची निर्भत्सना करुन बायकोचे लाड पुरवणारा लबाड मुलगा, मालकावर उलटनारे चाकर, बेईमान सावकार, दरबाराची बिघडलेली शिस्त, व्यापारी लोकांनी केलेली लूट, फालतू लोकांना आलेली किंमत, चमचेगिरीचा सुळसुळाट या सारख्या अनेक घटकांचे  स्पष्ट शब्दात फंदी यांनी वर्णन केले आहे.

       'हे मूर्खा खून तर्का' जीवनातील काही कटू अनुभवातून आणि भोवतालच्या परिस्थितीच्या निरीक्षणातून आनंत फंदीच्या लेखणीला धार चढत गेली. त्यातूनच काही उपरोधिक लावण्याची रचना झाली त्यातील एक लावणी म्हणजे 'हे मूर्खा खून तर्का' होय. यामधून दिसते तसे नसते हे सत्य त्यांनी उपरोधक पद्धतीने मांडले आहे. बाहेरून जे चांगले वाटते तसे आतूनच असेलच असे नाही. याची अनेक उदाहरणे कवीने या लावणीतून दिली आहेत. आणि सावधपणे जगाकडे पाहण्याचा सल्ला दिला आहे. उपदेशपर रचना, मौलिक व्यावहारिक संदेश, रांगडी भाषा, व्यवहार ज्ञान सडेतोडपणा ही फदीच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत.

बी. ए. भाग-१/(मराठी आवश्यक)/ संत नामदेव

                                                          संत नामदेव ( इ.स. 1270 - इ.स.1350)

         मराठीतील पहिले भाव कवी ,पद्य चरित्रकार, आत्मचरित्रकार, आख्यान कवी, भागवत धर्माचे पहिले संघटक आणि प्रचारक, कीर्तन परंपरेचे प्रवर्तक अशा अनेक दृष्टीने नामदेवांचे व्यक्तिमत्व संपन्न आहे. त्यांची अभंगवाणी म्हणजे त्यांच्या भाव वेड्या उदात्त, प्रसन्न, सोज्वळ आणि निष्पाप अशा व्यक्तिमत्त्वाचा आविष्कार आहे. नामदेवांनी मराठी, हिंदी आणि इतर भाषांमधून रचना केल्या आहेत. त्यांच्या नावावर आज सुमारे अडीच हजार अभंग आहेत. भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत फडकवणारे हे पहिले मराठी संत होत. त्यांनी पंजाबमधील 'घुमान'येथे वास्तव्य केले. शिखांच्या 'गुरू ग्रंथ साहिब' मध्ये त्यांच्या रचनांचा समावेश आहे. आत्मचरित्र, संतचरित्र, तीर्थावळी, समाधी, बाळक्रीडा चे अभंग अशी बहुविध रचना त्यांनी केली आहे. सुंदर शब्दचित्रे, उत्तम भावकाव्य आणि उत्कट भक्ती ही त्यांच्या अभंगाची वैशिष्ट्य आहेत.

 'पतितपावन आहेस म्हणून' या अभंगांमध्ये नामदेवांच्या उत्कट विठ्ठलभक्तीचा आविष्कार झाला आहे. नामदेवांची विठ्ठलावर अपार श्रद्धा आहे. त्यांची मनोभावे सेवा करावी, त्याला सगुण रूपात पाहावे ही त्यांची इच्छा आहे. मात्र कठोर, आर्त भक्ती करूनही विठ्ठल त्यांना भेटत नाही त्यावेळी नामदेव विठ्ठलाला स्पष्ट शब्दात सुनावतात हे विठ्ठला तू पतीत लोकांना पावन करून घेणारा आहेस म्हणून मी तुझ्या दारात आलो आहे, पण तू  भेट देत नाहीस म्हणून मी रागावून माघारी जात आहे. तू कृतघ्न आहेस, अभिमानी आहेस त्यामुळे पतित-पावन म्हणून घेण्याचा तुला अधिकार नाही. हातात झेंगट घेऊन मी तुझा कृतघ्नपणा दवंडीच्या द्वारे साऱ्यांना सांगणार आहे. हे देवा तुझ्या कडून मला काही नको तुझ्यावर माझे प्रेम आहे म्हणून हा सारा खटाटोप सुरू आहे. या अभंगांमधून नामदेवांचे विठ्ठलावरील निस्सीम प्रेम व भक्ती व्यक्त होते.

           'वैष्णवांचा धर्म' या अभंगात पंढरपूर विठ्ठलाचे महत्त्व येते. वैष्णवाणी  एकदा तरी पंढरपुरात जावे व तिथल्या भक्तिमय वातावरणात स्वतःचे जीवन मुक्त करून घ्यावे. विठ्ठल हा जिवलग असून त्याला उराउरी भेटावे. त्या भेटी मधील प्रेम, सुखाचा अनुभव घ्यावा. त्याचे मुख दर्शन झाल्यानंतर स्वतःच्या जीवावरून लिंबलोन उतरू टाकावे, विठ्ठल दर्शनाने अंतर्बाह्य कैवल्याचा अनुभव येतो व ब्रम्हानंदी ची अनुभूती येते आणि यासाठीच नामदेव रात्रंदिवस विठ्ठल भक्तीत रममाण होतात.

Friday, 4 December 2020

बी.ए. भाग-१ मराठी • आवश्यक अनुषंगिक निवड( CGE- 1) ¤ शब्दाचे मोल ¤ चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी (1927)

(E-content created by Dr V. S. Patil)

  बी.ए. भाग-१ मराठी

• आवश्यक अनुषंगिक निवड( CGE- 1)

 ¤ शब्दाचे मोल ¤

              चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी (1927)                 

▪️शब्दाचे मोल▪️

                  मध्य प्रदेशातील रायपूर येथे जन्म. दादा धर्माधिकारी हे त्यांचे वडील . राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ ,नागपूर येथे उच्च शिक्षण . नामवंत वकील ,गांधीवादी विचारांचा प्रभाव. अंतयात्रा , काळाची पावले, भारतीय संविधानाचे अधिष्ठान, मंजिल दूरच राहिली, माणूस नामा, मानवनिष्ठ अध्यात्म, शोध गांधींचा, समाजमन , सहप्रवास,सूर्योदयाची वाट पाहूया अशा मराठी पुस्तकांचे लेखन न्यायमूर्ती का हलफनामा , लोकतंत्र एंव राहों के अन्वेषण ही हिंदी पुस्तके प्रसिद्ध इ.स.2004 साली पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित.

                त्यांच्या काळाची पावले या पुस्तकातून 'शब्दाचे मोल' हा उतारा घेतलेला आहे वडील दादा धर्माधिकारी यांच्या सहवासात झालेली घडण, वक्तृत्वाची तयारी वगैरे अनुभव लेखकाने कथन केले आहेत जो प्रयोग करतो,आव्हानांच्या परिक्षेला सामोरे जातो, तो यशस्वी होतो हा संदेश येथे मिळतो

बी.ए. भाग-१ मराठी • आवश्यक अनुषंगिक निवड( CGE- 1) ¤ पन्नासपैकी शून्य मार्क्स ¤ शांता शेळके

  बी.ए. भाग-१ मराठी

• आवश्यक अनुषंगिक निवड( CGE- 1)

 ¤ पन्नासपैकी शून्य मार्क्स ¤

              शांता शेळके (1922-2002)

                        

                   

▪️पन्नासपैकी शून्य मार्क्स ▪️

                      प्रसिद्ध मराठी लेखिका, कवयित्री,अनुवादक व गीतकार. 'नवयुग ' या साप्ताहिकात नोकरी.नागपूर,मुंबई येथे मराठीचे अध्यापन. कविता,कथा,कादंबरी,व्यक्तिचित्रे,बालसाहित्य,चित्रपटगीते,समीक्षा,आत्मकथन,अनुवाद अशा विविध साहित्य प्रकारावर लेखन.वर्षा,रूपशी,तोच चंद्रमा....,गोंदण,ओळख,जन्मजान्हवी,पूर्वसंध्या,इत्यर्थ इ.काव्यसंग्रह व गीतसंग्रह प्रकाशित. मुक्ता आणि इतर गोष्टी हा कथासंग्रह व स्वप्नतरंग ही कादंबरी प्रकाशित. शब्दांच्या दुनियेत हा ललितलेखसंग्रह. कालिदासाच्या मेघदूताचा अनुवाद. धुळपाटी हे आत्मकथन. हायकू या जपानी काव्यप्रकारात लेखन. पश्चिमरंग,वडीलधारी माणसे ही व्यक्तिचित्रणात्मक पुस्तके.आळंदी येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा. अनेक ग्रंथांना महाराष्ट्र शासनाचे वाड़मयीन पुरस्कार. 

            'पन्नासपैकी शून्य मार्क्स ' या पाठात शांता शेळके यांनी शालेय जीवनातील लहानसा पण महत्त्वपूर्ण अनुभव सांगितला आहे.मुलांच्या शाळेत एकटीच मुलगी,मराठी विषयात अतिशय हुशार असल्यामुळे जागृत झालेला सुक्ष्म अहंकार,शाळा तपासणीत झालेले कौतुक,पण गणितात पडलेले पन्नासपैकी शून्य मार्क्स मिळाल्यामुळे झालेले गर्वहरण,या अनुभवाच्या माध्यमातून शांता शेळके यांनी माणसाला कितीही मोठे यश मिळाले तरी माणसाने अहंकारी न होता सदैव नम्रता अंगी बाणवावी अशी शिकवण देण्याचा प्रयत्न केला आहे.नेमक्या आणि प्रासादिक शब्दकळेमुळे हा अनुभव विलक्षण प्रत्ययकारी झाला आहे.

बी.ए. भाग-१ मराठी • आवश्यक अनुषंगिक निवड( CGE- 1) ¤ वाटेवरच्या सावल्या ¤ कुसुमाग्रज तथा विष्णु वामन शिरवाडकर

 बी.ए. भाग-१ मराठी

• आवश्यक अनुषंगिक निवड( CGE- 1)

 ¤ वाटेवरच्या सावल्या ¤

       कुसुमाग्रज तथा विष्णु वामन शिरवाडकर (1912-1999)

         ▪️वाटेवरच्या सावल्या▪️

                 आधुनिक कवी,नाटककार व कादंबरीकार. 'जीवनलहरी','विशाखा','किनारा,'मराठी माती,'स्वगत',' हिमवर्षाव,'वादळवेल', महावृक्ष इ.काव्यसंग्रह प्रकाशित. 'दुसरा पेशवा',कौंतेय','आमचं नाव बाबूराव ','ययाती आणि देवयाणी','वीज म्हणाली धरतीला','नटसम्राट 'ही नाटके प्रकाशित. कालिदासाच्या 'मेघदूता'चे तसेच अन्य पाश्चात्य नाटकांचे मराठीत रूपांतर 'वैष्णव ','जान्हवी,'कल्पनेच्या तीरावर 'या कादंबऱ्याही लिहिल्या आहेत. शिवाय कथा,निबंध आणि काव्यसमीक्षात्मक लिखाणही त्यानी केलेले आहे.साहित्य अकादमी आणि ज्ञानपीठ या पुरस्कारानी ते सन्मानित आहेत.

             'वाटेवरच्या सावल्या' या पाठात कुसुमाग्रज यांनी त्याच्या बालपणातील सुंदर आठवणी ओघवत्या भाषेत कथन केल्या आहेत.कौटुंबिक वातावरण,माध्यमिक शाळेत असताना साहित्य,कला,क्रिडा,नाटक यांची लागलेली गोडी,वाचनाचे संस्कार, एका फकिराची अरेरावी वृत्ती व त्याच्याशी झालेली झटापट,शिक्षकांच्या अध्यापनातून झालेले काव्याचे संस्कार, क्रिकेट या खेळाची मनस्वी आवड आणि त्यासाठी केलेल्या खटपटी यांचे मनोरम वर्णन कुसुमाग्रजांनी केले आहे.शिवाय 'वणी' नावाचे लहानसे गाव, या गावातील ग्रंथालय,चिपळूणकरांची ग्रथमाला,गडकर्याची नाटके,कवितासंग्रह,कादंबर्‍या इ.वाचन,नाटके आणि काव्याच्या छंदापायी गणित विषयात आलेले अपयश;हे सारे काही या पाठात कुसुमाग्रजांनी आत्मियतेने कथन केलेले आहे.

                      नाशिकच्या एच.पी.टी.महाविद्यालयात शिकत असताना कुसुमाग्रज गणित विषयात नापास झाले.एक वर्ष वाया गेले.वडिलांना झालेल्या दु:खाने त्याना खुप वाईट वाटले.पुढे त्यांनी झटून अभ्यास केला.मराठी आणि इंग्रजी विषयात बी.ए. झाले या पाश्र्वभूमीवर त्यानी पुढे केलेली प्रगती थक्क करून सोडते.

बी.ए. भाग-१ मराठी /आवश्यक अनुषंगिक निवड( CGE- 1) ¤ निवड- यशवंतराव चव्हाण ¤

  बी.ए. भाग-१ मराठी

• आवश्यक अनुषंगिक निवड( CGE- 1)

 ¤ निवड- यशवंतराव चव्हाण ¤

        

      यशवंतराव बळवंतराव चव्हाण  (1913-1984)

              महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय नेते.सविनय कायदेभंग चळवळीत सहभाग, 1942  च्या छोडो भारत आंदोलनात सहभाग,स्वतंत्र भारताचे संरक्षणमंत्री,गृहमंत्री,अर्थमंत्री,परराष्ट्रमंत्री. कार्यक्षम मंत्री,उत्तम संसदपटू,उदारमतवादी नेते,वक्ते आणि लेखक म्हणून परिचित. 'कृष्णाकाठ' हे आत्मचरित्र. 'सह्याद्रीचे वारे',युंगातर या दोन संग्रहातून विचारप्रवर्तक भाषणे प्रकाशित. 

▪️निवड▪️

           या पाठातून यशवंतराव चव्हाण यांच्या महाविद्यालयीन जडणघडणीचा प्रत्यय येतो.कोल्हापूरशी जिव्हाळ्याचे नाते, कायद्याच्या शिक्षणासाठी पुण्यातील महाविद्यालयात प्रवेश, वाचनाशी जडलेले नाते,शिक्षणाबरोबर समाजकारण, राजकारणातील सक्रियता,अभ्यासमंडळे,सभा-संमेलनातील सहभाग या सर्वांमुळे कायद्याच्या प्रथम वर्षांत आलेले अपयश,त्यावर केलेली मात,दुसरे महायुद्ध,या महायुद्धाचा भारतावर झालेला परिणाम,वेगवेगळ्या विचारसरणीशीं करावा लागलेला संघर्ष यांचे इ.बाबींचे चित्रण या लेखात केले आहे.शिक्षण घेत असताना आपल्या वर्तमान जगण्याशी असलेले नाते,त्यात सक्रिय सहभाग असूनही आपले व्यक्तीमत्व कसे संपन्न,विविधांगी आणि सुसंस्कृत करता येते याचा प्रत्यय या पाठातून येतो.

मराठी अभ्यासपत्रिका -3 / सेमिस्टर -III / बी.ए. भाग- 2/ नाटक- काय डेंजर वारा सुटलाय! लेखक-जयंत पवार

(E-content created by Dr V. S. Patil)

मराठी अभ्यासपत्रिका -3 , सेमिस्टर -III       बी.ए. भाग- 2

नाटक- काय  डेंजर वारा सुटलाय!लेखक-जयंत पवार 

नाटक:

         नाटक हा एक वाड़मय प्रकार आहे.नाटक दृकश्राव्य वाड़मय प्रकार आहे. या घटकाचा अभ्यास केल्यावर आपल्याला- 

* नाटक या वाड़मय प्रकाराची वैशिष्ट्ये स्पष्ट करता येतील. 

* नाटकाच्या दृकश्राव्य स्वरूपाचे वेगळेपण नोंदवता येतील. 

* नाटक या वाड़मय प्रकाराच्या जन्माचा इतिहास सांगता येईल. 

* नाटक या वाड़मय प्रकाराची व्याखा करता येईल. 

● नाटक व्याख्या●

1) शब्दांनी तयार झालेले संवाद साभिनय सादर करावयाची कला म्हणजे नाटक. 

2) एका मानवी समूहाने दुसर्‍या मानवी समूहासमोर सादर करावयाची कला म्हणजे नाटक.

3) नाटक म्हणजे शब्दांपासून तयार होणारी संहिता आणि या संहितेचे सादरीकरण म्हणजे नाटक. नेपथ्य, संगीत, प्रकाशयोजना, अभिनय,इ.घटकांच्या मदतीने करता येते.पण या सर्व घटकांची सुप्त शक्ती शब्दानी तयार झालेल्या संहितेत असावी लागते.

● नाटकाचे घटक ●

 ( अ) विषयसूत्र 

 ( ब)  संविधानक 

 ( क) पात्रचित्रण

 (ड)   संवाद

● नाटकाचे प्रकार ●

                  1) शोकात्मिका(Tragedy)

                   2) सुखात्मिका (Comedy)

                   3)क्षोभप्रदान नाट्य            (Melodrama)

                   4) प्रहसन ( Farce)

■ नाटकांचे उपप्रकार ■

                 1) एकांकिका

                 2) दिर्घांक 

                 3) पथनाट्य 

                 4) एकपात्री प्रयोग 

                 5) नाट्यछटा

                 6) संगीतिका 

                 7) नभोनाट्य 

   ▪️ नाटकांचे आशयानुरूप वर्गीकरण ▪️

   1) पौराणिक 

   2) ऐतिहासिक 

   3) समस्याप्रधान

    अ) सामाजिक 

    ब) राजकीय 

    क) दलित 

    ड) स्त्रीवादी 

    इ) चर्चाप्रधान

Sunday, 19 April 2020

BCOM_AEC

https://drive.google.com/file/d/1F1IRMakowHOCmho9iSvSdqoPKh2SWmVe/view?usp=sharing