Skip to main content

Posts

Showing posts with the label Economics

आर्थिक उदारीकरण. (Economic Liberalization)

 (J D Ingawale) बीए भाग १            सेमि २         भारतीय अर्थव्यवस्था आर्थिक उदारीकरण . (Economic Liberalization) उदारीकरणाची संकल्पना (Concept of Liberalization) १९८० नंतर अर्थव्यवस्थेचे शिथिलीकरण व जागतिकीकरण हे परवलीचे शब्द बनले . ' उदारीकरण म्हणजे आपल्या देशाचा जगातील इतर देशांशी खुला व्यापार असणे व देशांतर्गत खाजगी क्षेत्रावर कोणतेही निर्बंध नसणे .' सीमाशुल्क व वाटप पद्धती नाहीशी करणे हा शिथिलीकरणामागील हेतू आहे . उत्पादन , किमती व विक्री वाटप सरकारने न ठरविता खुल्या बाजाराने ठरावेत , स्पर्धेने ठरावेत अशी शिथिलीकरणाची भूमिका आहे . सध्या उदारीकरणाची संकल्पना ही बाजारयंत्रणा वा खुला व मुक्त बाजार व मुक्त स्पर्धा यांवर आधारित आहे . जेव्हा उदारीकरणाच्या धोरणाचा स्वीकार केला जातो तेव्हा पर्यायाने सरकार निष्क्रिय असावे असे म्हटले जात असले तरी खाजगी मालमत्ता बाळगणे व ती वाढविणे हा हक्क अबाधित ठेवण्य...