Skip to main content

Posts

Showing posts with the label HSRM

Practice Test/Sociology

  बी.ए.भाग दोन मधील एच.एस.आर.एम. विषय असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी सेमिस्टर चार पेपर क्रमांक 2 मधील प्रकरण तिसरे - सामाजिक सुधारक या प्रकरणातील अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन व कार्यावर काही वस्तुनिष्ठ प्रश्न देत आहे.ते प्रत्येकानी सोडवावेत ,व सराव करावा. प्रा.मोकाशी पी.ए. समाजशास्त्र विभाग सूचना: सराव प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी खाली दिलेली लिंक कॉपी करून गुगलमध्ये पेस्ट करा. https://forms.gle/QV1jzBPRHPmZK5aE9

अण्णाभाऊ साठे / साहित्यातील आशय

  (Mokashi P A) B.A.II SEMESTER - 4 PAPER NO - 2 (H.S.R.M) प्रकरण - 3 सामाजिक सुधारक ड - अण्णाभाऊ साठे साहित्यातील आशय विद्वत्ता , गुणवत्ता नि प्रतिभा यावर असलेल्या अभिजन वर्गाच्या एकाधिकारशाहीला छेद देत अण्णाभाऊ साठे यांनी साहित्याच्या क्षेत्रात पदार्पण केले . औपचारिक शिक्षणाची कास न धरता अण्णाभाऊंनी आयुष्यभर समाजरूपी शाळेत आलेल्या विविध अनुभवांचे पाठ गिरविले . बालपणापासून त्यांना जे जगणं वाट्याला आलं , तशाच प्रकारचे जीवन जगणाऱ्या बहुसंख्याक बहुजन वर्गातील लोकांच्या मनाती ल प्रातिनिधिक विचार त्यांनी साहित्यातून शब्दबद्ध केले . मनोहारी चित्रण , कल्पनारंजन , भोगवाद व विकृती याला फाटा देऊन त्यांनी आपल्या साहित्याची नाळ सर्वसामान्य रंजल्या - गांजलेल्या जनतेशी जोडली . या संदर्भात ' जो कलावंत जनतेची कदर करतो , जनता त्याचीच कदर करते ' यावर त्यांचा मनोमन विश्वास होता . अण्णाभाऊ साठे यांनी आपल्याच जातिकोषात न गुरफटता जो जो वर्ग अन्याय अत्याचारग्रस्त होता त्यांचे मूर्तिमंत चित्रण आपल्या साहित्यकृतीतून समाजासमोर मांडले . त्यामुळेच त्यांचे साहित्य सर्व भारतीय भाषांत प्रक...