Showing posts with label Sawant S. R.. Show all posts
Showing posts with label Sawant S. R.. Show all posts

Thursday, 8 July 2021

गुप्त सत्ता व वाकाटक--- बृहत भारत संकल्पना ( भारताचे परकीय देशांशी संबंध )

(Sawant S R) 

B.A-- 3 --  

पेपर नंबर -- 12-- प्राचीन भारताचा इतिहास प्रकरण--2 ---गुप्त सत्ता  व  वाकाटक--- बृहत भारत संकल्पना ( भारताचे परकीय देशांशी संबंध )--- 

गुप्त काळामध्ये भारतीयांनी आपल्या प्रगतीचा व सांस्कृतिक गोष्टीचा वसा भारताबाहेर अन्य देशांनाही दिलेला आहे.गुप्ताच्यां   कारकिर्दीमध्ये देशांशी जावा  सुमाञा मध्य आशिया  या पृदेशाशी व्यापार व्यवसाय मोठ्या प्रमाणात होत होता. फाइयान या चिनी प्रवाशांने याविषयी आपल्या प्रवासा वणृना मध्ये याचे विस्तृत वर्णन केलेले आहे. गुप्त राजे आपल्या साम्राज्या मध्ये गुंतून राहिले नव्हते. त्यांनी  पश्चिम व पूर्व आशियाशी  मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले होते .यामध्ये बौद्ध धर्माने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती. या भागांमध्ये बौद्ध धर्माचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला . 

चीनने तर बौद्ध धर्माला राजधमृ म्हणून जाहीर केले. परिणामी बौद्ध धर्माचा अभ्यास करण्यासाठी चिनी देशातील अनेक प्रमुख भारतात आले होते. भारतीय संस्कृतीचा ठसा आशियायी देशावर मोठ्या प्रमाणात उमटला होता. आशियाई राजांना गौतम बुद्धा विषयी विलक्षण आकर्षण होते. जावा सुमात्रा व्दी समूहात व्यापार व धर्मप्रसार राजकीय व्यवहारासाठी स्थायिक  झाले होते. चांगल्या संबंधामुळे 

गुप्त काळात अनेक भारतीय मध्य आशियात  झाले होते. कुची या नगरात कायम स्वरूपात स्थायिक झालेला बौद्ध तत्वज्ञान कुमार जीव यापैकी एक प्रमुख होता. यानेच चिनी लोकांना बौद्ध धर्मातील महायान पंथाच्या तत्वाची ओळख करून दिली .जवळजवळ 106 बौद्धधर्मीय संस्कृत ग्रंथाचे त्याने चिनी भाषेत भाषांतर करून दिले, सिलोनचा चा बौद्ध राजा श्री मेघ वर्मन याच्याशी समुद्रगुप्ताचे मैत्रीचे संबंध होते.समुदृ गूप्ताच्या सहाय्याने बौध्द गया येथे सुंदर विहार बांधला. अलाहाबाद येथील एका स्तंभलेखा नुसार द्वीप वासियांनी हिंदू वसाहतींनी समुद्रगुप्ता शी सातत्याने संपर्क ठेवून भारत भूमी ची जवळीक साधली होती. अजिंठ्यातील चित्रामधील पृसगांवरून सातव्या शतकात भारताचा निकटचा संबंध असावा असे दिसुन येते. गुप्तकाळात भारतीय संस्कृतीचा रोम शी संबंध होता असे मानले जाते. रोमन सम्राट च्या भेटीसाठी तीन भारती यांचे पथक गेल्याचे गुप्त नाण्यावर  कोरलेले आहे.चीनी पृवाशी फायियान याच्या प्रवास वणृना तून गुप्त कालीन सामाजिक धार्मिक व राजकीय परिस्थितीवर पडतो .

Sunday, 4 July 2021

गुप्त कालीन साहित्य

(Sawant S R)

 B,A-- 3-- इतिहास -- पेपर  नं -- 12--  2021/07/04 13:51:05 

प्राचीन भारताचा इतिहास गुप्त कालीन साहित्य ---गुप्त कालखंडामध्ये वांग्मय व साहित्याला मोठे प्रोत्साहन मिळाले. कारण साम्राज्यविस्तार अंतर्गत शांतता सुव्यवस्था आणि स्वतः गुप्त राज्यकर्ते.हे विद्वान  होते समुद्र गुप्त हा स्वतः  एक कवी व विद्वान असल्याने साहित्य कला संस्कृती या क्षेत्रात त्यांनी  सर्व  विद्वानाना मदत केल्याने त्याच्या दरबारामध्ये व वसुबंधु सारखे विद्वान दरबारात होते. स्वतः समुद्रगुप्त उच्च वाग्मयीन ञान असणारा कवि होता. त्याच्या नाण्यावरील कवीराज या शब्दातून हेव्यक्त होते. शांतता  सुव्यस्था भरभराट यामुळे गुप्त राज्यकर्त्यांनी अनेक विद्वानांना आश्रय दिला होता.त्याचबरोबर साहीत्य निर्मितीच्या क्षेत्रात गद्य व पद्य लेखनास स्वातंत्र्य दिले. होते.त्यामुळे विपुल साहित्याची निर्मिती झाल्याचे दिसून येते .समुद्रगुप्ता संस्कृत भाषेला राज्य भाषेचा दर्जा दिला होता. कृष् चरित्रम हा संस्कृत ग्रंथ समुद्र गुप्ताने लिहला आहे.कलिदासाचे मेघदूत रघुवंश.ही काव्य 'अभिज्ञान शाकुन्तलम्'मालविकाग्निमित्रम्' या नाट्यकृती ने जागतिक वांग्मयात  मानाचे स्थान मिळवले आहे.ही साहित्य निर्मिती गुप्त  कालखंडात झाली. 'नारद स्मृती'  'ब्रस्पहस्पमूर्ती'ही स्मृति वांग्मय याच काळात पूर्णत्वास गेली .पंचतंत्र याच काळात रचले गेले.वसुबंधू व धर्मापिल या   विद्वानांनी बौद्ध धर्म ग्रंथ लिहिले. याच काळात साहित्य क्षेत्रामध्ये पाली तामीळ व प्राकृत भाषेतील वांग्मय यांची निर्मिती झाली. धार्मिक विषयावरील वांग्मय यामध्ये विशाखा दत्ताचे मुद्राराक्षस सु बंधूंचे स्वप्न-वासवदत्ता भट्टिनचे रावण वध शुद्काचे रावन व मृच्छ कठीक दंडीनचै काव्य दर्शन. दशकुमारचरितम्. इत्यादी संस्कृत गृथांची निर्मिती या काळात झाली.गुप्तकाळात  तात्विक विषयावरील साहित्यामध्ये किशोर कुमार ते भाष्य दशक पदार्थ शास्त्र विज्ञान विषयावरील ग्रंथ याच काळात होते असंग या बौद्ध तत्त्वचिंतकाने माहायान समपरीगृह . संगीतशास्त्र. छेदिका. लिहिले उज्जैन लेखक सिद्ध सेन यांचे न्याय दर्शन. ईश्वर कृष्णाची सांख्यकारिका.वात्सा यानाचे कामसूत्र. व पृशास्त्र पदाचे पदार्थ शास्त्र. धर्म संग्रह नीतिशतक. यांचे लिखाण झाले एकंदरीत साहित्य निर्मितीला हा सुवर्ण कालखंड म्हणावा लागतो त्यानंतर शास्त्रीय साहीत्याचा विचार करता वैद्यक. खगोल. गणित .क्षेत्रात देखील बरेच लिखाण झाले. सुप्रसिद्ध गणिती आर्यभट्ट याचे .वराहमिहिर. याचे पंचशील सिद्धांत गुप्तकाळातील शास्त्रज्ञ ब्रह्मगुप्त याने .गुरुत्वआकर्षणाचा सिद्धांत सांगितला. आहे नागार्जुन या शास्त्रज्ञाने रसायन व धातू या शास्त्रावर लेखन केले.धन्वतरी.चरक याचे यांचे वैदक शास्त्रावरील लेखन.  हस्ता आयुर्वेद व शास्त्र या दोन वैद्यकीय ग्रंथात प्राण्याच्या रोगावरील उपचार संबंधी माहिती दिले आहे. एकंदरीत गुप्त कालखंड हा साहित्याच्या निर्मितीच्या दृष्टीने सुवर्ण कालखंड होता असे  दिसते .

गुप्तकाळातील आर्थिक परिस्थिती

(Sawant S R) 

BA-- 3 -- इतिहास  -- पेपर  नं -- १२-- 

प्राचीन भारताचा इतिहास--- गुप्तकाळातील आर्थिक परिस्थिती --- 

प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये गुप्त काळाच्या आर्थिक परिस्थितीला महत्त्वाचे  स्थान आहे. कारण गुप्त राजे  हे कर्तबगार होते. त्यांच्या साम्राज्यात शांतता नांदत होती साम्राज्य विस्तार आणि साम्राज्य संरक्षणासाठी त्यांनी केलेल्या व्यवस्थेमुळे गुप्त राजवटीमध्ये शांतता प्रस्थापित झाली. आणि ही शांतता  सुव्यवस्था समाजाच्या आर्थिक विकासाला कारणीभूत ठरली. शेती व्यापार उद्योग धंदे याने या सत्तेला आर्थिक सुसंपन्न आता मिळवून दिली.  गुप्त काळामध्ये आथीक दृष्ट्या शेती हा उत्पन्नाचा महत्वपूर्ण घटक होता शास्त्रशुद्ध पद्धतीने शेती केली जात होती. शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात पीक घेण्यासाठी तलाव व कालव्याच्या पाण्याचा उपयोग केला जात होता.पाणीपुरवठ्याच्या सुविधा होत्या. स्कंद गुप्ता च्या काळात सुदर्शन नावाच्या तलावाची दुरुस्ती त्याने केलेली होती. शेतामधून तांदूळ गहू कापूस फळे पालेभाज्या यांचे उत्पादन घेतले जात होते. शेतीच्या जोडीला पशुपालन व्यवसाय होता. बहुसंख्य वर्ग हा शेती व्यवसाय करीत होता गुलामगिरीची पद्धत होती.गुलामांची विक्री केली जात  होती. त्यानंतर व्यापार हा गुप्तकाळातील दुसरा व्यवसाय होता. चांगले रस्ते सुरक्षित व्यवस्था धर्मशाळा यामुळे तक्क्षशीला उज्जैन या शहरांना प्रसिद्ध व्यापारी पेटा म्हणूनषृ सिध्द झालेल्या  होत्या . राष्ट्रीय व्यापार देखील वाढला होता. समुद्रमार्गे व्यापार चालत होता.चंदन केशर मसाल्याचे पदार्थ अत्तरे इत्यादी वस्तू भारतामधून निर्यात होत होत्या इराण इराक चिन मलाया  इत्यादी देशाबरोबर व्यापार चालत होता. भारतात मध्ये आशियातिल घोडे रेशीम हस्तिदंत निलमनी आयात होत होते. भारतीय व्यापारी काही वस्तूंचे दलाल म्हणून देखील काम करत होते.व्यापाऱ्यानी आपल्या वेगवेगळ्या व्यावसायिक संस्था  स्थापन केल्या होत्या .त्याच्या श्रेण्या मार्फत व्यापार करण्यासाठी व्यापाऱ्याना   आर्थिक मदत दिली जात होती. सुवर्णाची नाणी चांदीची  नाणि  इत्यादी चा वापर वस्तू  विनिमयासाठी केला जात होता. कवड्यांचा ही वस्तू  विनिमयासाठी  वापर केला जात होता .गुप्त राजांची नाणी शुद्ध सोन्याची व अतिशय प्रगत होती. 122 ग्रॅम वजनाची सोन्याची  नाणी होती. एकंदरीत गुप्तकाळातील  शांतता सुव्यवस्था   व्यापार व्यवहार समाजाच्या आर्थिक विकासाला मोठ्या प्रमाणात साहाय्यभूत ठरली

वाकाटक सत्ता

(Sawant S R)

 BA  -- 3---   

इतिहास---पेपर नंबर - 12 --प्राचीन भारताचा इतिहास -- वाकाटक सत्ता --- 

प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये दक्षिण भारतामध्ये सातवाहन सत्ता नष्ट झाल्यानंतर वाकाटक आणि दक्षिणेमध्ये प्रभावशाली सत्ता निर्माण केली. भारतामध्ये जे काही ताम्रपट लेणी मराठी यावेळेच्या सापडले ल्या साधना वरून यांची माहिती मिळते इतिहास सशोंधक डॉक्टर मिराशी यांनी विदर्भातील रामटेक जवळील नंदिवर्धन हे दक्षिण भारतातील वाकाटकांचे स्वतंत्र सत्तेचे मूळ स्थान आहे असे स्पष्ट केले आहे. विध्य शक्ती  हा वाकाटक सत्तेचा संस्थापक  हा मानला जातो.त्याने स्वतंत्र वाकाटक सत्तेची स्थापना केली. तो ब्राह्मण विष्णू वृद्ध  गोतराचा होता विदर्भातील परदेशी जिंकल्या नंतर त्याने पुरीया आणि जनका या त्याच्या दोन राजधान्या होत्या त्याच्यानंतर हा वाकाटक सत्तेचा प्रमुख बनला त्याने जवळजवळ साठ वर्षे राज्य केले.त्या नंतर पृवरसेन सत्तेवर आल्यानंतर वाकाटक साम्राज्यविस्तारास सुरुवात केली. बलाढ्य सैन्याची निर्मिती करुन अनेक  पृदेश जिंकले. प्रवरसेन हा वैदिक धर्माचा अनुयायी होता.  पहील्या पृवरसेना नंतर  वाकाटक सत्तेच्या  विघटनास सुरूवात  झाली त्या  नंतर  काही दिवसातच त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मुलगा पहिला पृथ्वीसेन हा सत्तेवर  आला याला हा गुप्त घराण्यातील दुसऱ्या चंद्रगुप्ताने आपली मुलगी प्रभावती हिचा विवाह पृथ्वी से ना बरोबर करून दिला. होता पृथ्वी सेना च्या मृत्यूनंतर त्याचा पुत्र दुसरा रुद्रसेन सत्तेवर आला.   थोड्याच कालावधीत मृत्यू झाला त्यानंतर दुसरा रुद्रसेन नंतर त्याचा मुलगा दिवाकर सेन सत्तेवर आला.त्यावेळी तो अल्पवयीन होता. त्यामुळे त्याची कर्तबगार माता प्रभावती हिने  राज्यकारभाराची सर्व सूत्रे साभांळलीत . यावेळी तिला दुसऱ्या चंद्रगुप्ताने आपल्या  प्रशासनातील काही वरीष्ट अधिकारी  कामकाजासाठी वाकाटक सत्तेमध्ये पाठवले. गुप्तांचा राज्य कवी कालिदास याच काळात दक्षिण भारतात आला होता.मेघदूत या महाकाव्याची कालिदासाने याचभागात रचना केली. याच्यानंतर वाकाटक सत्तेमध्ये दामोदर सेन नरेंद्र सेन दुसरा पृथ्वी सेन  हे सवृ राज्यकर्ते वाकाटक सत्तेला लाभले आपापल्यापरीने त्याने आपली सत्ता स्थिर करण्याचा प्रयत्न केला माञ उत्तरेमध्ये यांना सत्ता  स्थापन करता आली नाही शेवटचा राजा हरीसेना जो होता .तो महत्त्वकांक्षी आणि कार्यक्षम होता .त्याने खसलेल्या फौजेची निर्मिती केली त्याच्या  जोरावर त्याने अनेक पराक्रम केले. मध्य भारतातील आणि पूर्वेतील बराचसा प्रदेश आपल्या ताब्यामध्ये आणला होता. तो विद्वान व कलाकारांचा आश्रयदाता होता. अजिंठा येथील 16 क्रमांकाचे लेण्याचे खोदकाम याचकाळात झाले. हरीसेना ची कारकीर्द वाकाटक घराण्याला प्रतिष्ठेच्या शिखरावर घेऊन गेली. तोच वाकाटक सत्तेचा शेवट चा राजा होय. त्याच्यानंतर दुसऱ्या  कोणत्याही  राजाचा उल्लेख इतिहासात सापडत नाही.

Practice Test / भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास

(Sawant S R) 

भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास

BA-2 history paper-6.प्रकरण -2 गांधीयुग

सूचना: सोबतची सराव प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी खाली दिलेली लिंक कॉपी करून गुगलमध्ये पेस्ट करा.
https://forms.gle/RfMmmxvaC2PqsfdJ7

गुप्त राज्यकर्ते चंद्रगुप्त

(Sawant S. R.) 

BA-- 3-- इतिहास -- पेपर नं -- १२--  

प्राचीन भारताचा इतिहास-- प्रकरण -2 --  

गुप्त राज्यकर्ते चंद्रगुप्त -- समुद्रगुप्ता नंतर गुप्तांच्या राजवटीवर पराक्रमी आणि महत्वकांशी सत्ताधीश म्हणजे दुसरा चंद्रगुप्त होय. दुसऱ्या चंद्रगुप्ताला लहानपणापासूनचा योग्य प्रकारे संस्कार झाल्यामुळे त्याने साम्राज्य विस्तार प्रशासन व्यवस्था याच्यामध्ये जीवनामध्ये महत्व पूर्ण कामगिरी केली.त्याच्या कारकीर्दीमध्ये यांचा त्याने शकांचा पराभव केला. गणराज्याचां यांचा पराभव केला राजांचा पराभव केला पराभव केला .पूर्व कडील राज्यावर पुन्हा नियंत्रण मिळवले. त्याचबरोबर त्याने काही राजघरान्या बरोबर वैवाहिक  सबंध  प्रस्थापित केले .चंद्रगुप्ताने बलवान आणि विस्तारित अशा  सामृज्याची निर्मिती केली.सास्कृतिक क्षेत्रात  त्यांनी मोठी प्रगती केली होती .इतर धर्माच्या लोकांना  त्याने सन्मानाची वागणूक दिली होती. विविध कला विद्वान याचा तो आश्रयदाता होता. क्षपणक शकूं कालिदास इत्यादी मंडळी रो त्याच्या दरबारामध्ये होती.म्हणून  त्याच्या  दरबारातस नवरत्नांचा दरबार देखील म्हटले जात होते.दुसऱ्या चंद्रगुप्ताने धनुरधर छाप नाणी काढली त्या नाण्यावर श्री विक्रम असा उलेख आहे.सिंहरुप छाप .अश्वारुढ छाप .छञ छाप त्याने नानी   काढली.  मंचावरील राजा राणीच्या पण आणि राजदंड छाप नानी अशी वेगळ्या प्रकारची त्याने नाण्याची निर्मिती केली होती. त्याच्यानंतर कुमारगुप्त हा  गुप्तशासक बनला आपल्या साम्राज्याचे त्याने सरक्षंन केले कुमार गुप्ता वैष्णव पंथिय होता महिंद्रा गीत.असे त्याने नाव धारण केलेले आहे. कुमार गुप्ता ने आपल्या प्रशासनाचे वेगळे भाग करून वेगवेगळ्या प्रदेशावर त्याने जबाबदार व्यक्तीची प्रशासन व्यवस्था सांभाळण्यासाठी नियुक्ती केली होती. त्याच्यानंतर स्कंदगुप्त हा राज्य सत्तेवर आला स्कदंगुप्ताने  शकाचा  पराभव केला. स्कंदगुप्ता चे सांस्कृतिक कार्य महत्त्वपूर्ण आहे.मात्र स्कंदगुप्ताच्या काळातच हुणाच्या लहान-लहान टोळ्यांनी भारतीय प्रदेशावर आक्रमण करत काही प्रदेश आपल्या ताब्यात मध्ये घेतले.हुणाच्या बरोबर  सातत्याने संघर्ष करण्यामुळे स्कंदगुप्ता आथिक स्थीति कमकुवत  झाली.सततचा सघषृ अतगृत मंडळीचा विरोध या  मुळे स्कदंगुपताच्या तब्बेतिवर परिणाम झाला. आणि गुप्त राजवटीत हा शेवटचा सम्राट मरण पावला .गुप्त राजसत्तेने जवळ जवळ भारतात 450 वर्षे  बलवान सत्ता स्थापन केली .मात्र स्कदगुप्ता नंतरच्या अकार्यक्षम राज्यकत्यान मुळे व सत्तेसाठीच्या स्पर्धा मांडलिक राजे यांचे प्रयत्न वंशपरंपरागत सत्तास्पधा.हुणांची आक्रमणे आर्थिक दैन्यावस्था मुत्सद्देगिरीचा अभाव यामुळे गुप्त राजसत्तेचा शेवट झाला असे म्हणावे लागेल

Saturday, 3 July 2021

गुप्त आणि वाकाटक कालखंड

(Sawant S. R.) 

BA---- 3 --  इतिहास -- पेपर -- नं --  12--  

प्राचीन भारत-- प्रकरण -2 --  गुप्त आणि वाकाटक कालखंड --- गुप्त सत्तेची स्थापना हा प्राचीन भारताच्या इतिहासात महत्त्वाचा भाग मानला जातो.भारतीय  संस्कृतीच्या क्षेत्रातील नव्या युगाचा प्रारंभ असे देखील म्हटले जाते. या गुप्त राजवटीमध्ये स्थिर राजकीय सत्ता सामाजिक व सांस्कृतिक जीवनात स्थैर्य सामृज्याचा विकास घडवून आणणारा धोरणात्मक निर्णय.वांग्मय कला  पृशासन शिक्षण इत्यादी क्षेत्रात विकासात्मक कामगिरी.त्याच बरोबर मोयृ काळानंतर प्राचीन भारतात मोठ्या प्रमाणावरील एक संग सत्ता स्थापन करण्याचे श्रेय गुप्त राज्यकर्त्यांना दिले जाते. भारतात तसेच भारताबाहेर आपले वर्चस्व त्यांनी प्रस्थापित केले होते. हिंदू धर्माच्या पुनर जीवनाबरोबरच परमधर्म सहिष्णुतेचा विशाल दृष्टिकोन ठेवून समाजाची प्रगती घडवून आणली होती.                       

               

shriगुप्त  हा घराण्याचा संस्थापक होता, याच्या नावावरून या घराण्याला गुप्त घराणे असे नाव मिळाले असावे.इसवी सनाच्या तिसऱ्या शतकाच्या शेवटी कोषांबी येथे या राज्याचा उदय झाला असे पुराणांनी म्हटले आहे. 

 पृयाग सांकेत या प्रदेशावर श्री गुप्ताची सत्ता होती.त्यामुळे  श्री गुप्ताला महाराज ही पदवी लावलेली दिसते , गुप्त सत्तेचा भारतात मोठ्या प्रमाणात प्रसार होण्यास पहिला चंद्रगुप्त च्या काळापासून खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे. असे इतिहासाच्या साधनांमध्ये आढळते. प्राचीन भारताच्या इतिहासात गुप्तांच्या सत्तेला स्वतंत्र स्थान मिळवून पहिल्या चंद्रगुप्ताचे योगदान मोठ्या प्रमाणात आहे. महाराजाधिराज ही पदवी त्याने देखील लावलेली होती.त्यानेवेगवेगळ्या प्रकारची नाणी काढून राजा राणी एका  बाजूला सिह व दुसऱ्या  बाजूला  दुर्गा अशी नाणी त्यांनी निर्माण केली होती. गुप्त सत्तेला स्थिरता मिळवून देण्यामध्ये त्याचे योगदान महत्त्वपूर्ण मानले जाते. 

चंद्रगुप्ता पहिल्यानंतर समुद्रगुप्त हा गुप्त सत्तेचा प्रमुख बनला. उत्तर व दक्षिण भारतात त्याने सत्तेचा विस्तार केला. आणि भारतातील सर्वश्रेष्ठ विस्तारित सत्ता म्हणून त्याला स्थान मिळवून दिले. युवराज असताना विव्दतेच्या वेगवेगळ्या  शास्त्रांमध्ये पारंगत झालेला होता.त्यामुळे समृट झाल्यानंतर त्याला 

पराक्रमाचा आणि साम्राज्याचा विस्तार केला. त्याने  पाटीली पुत्र वर ताबा मिळवलेला होता. आर्यावर्ता तील महिमा त्याने काढलेल्या होत्या. त्याने छोटी-मोठी राज्य आपल्या  ताब्यात घेतलेली होती. त्या मध्ये तो यशस्वी झाला होता. सीमेवरील राज्य व गणराजा विरुद्ध मोहीम उघडून त्याच्यावर त्याने आपली जरब बसवली होती. अनेक परकीय सत्तेशी त्याने संबंध प्रस्थापित केले होते. एवढ्या मोठ्या साम्राज्यविस्ताराची योग्य व्यवस्थापन त्याने उत्तम रित्या लावले होते. त्याने मिळवलेल्या प्रदेशाचे योग्य नियोजन  केले होते. 

समुद्रगुप्ताच्या कार्याचे मूल्यमापन करताना असे लक्षात येते की त्याचे आदर्श प्रशासन व्यवस्था त्यांनी निर्माण केली होती. अनेक विद्वानांना त्याने आश्रय दिला होता. समुद्रगुप्त हा  हीदुं धमृचा अनुयायी होता. असे असले तरी त्यांना इतर धमियाना सन्मानाने वागणूक दिली होती.समुद्रगुप्ता ने अथृ व्यवस्था मजबुतीसाठी अतिशय प्रगत अशी नाणी काढली होती. आणि ती देखील कलात्मक आणि शुद्ध सोन्याची होती राजा   छाप नानी धनुर्धर छाप नानी आणि आपण आणि व्याघ्र ची पृतिमा असनारी नानी तसेच वीणा वादक राजा  अशा  वेगळ्या पद्धतीची नाणी समुद्रगुप्ता ने काढलेली होती. एकंदरीत राज्यकर्ता म्हणून गुप्त राजवटीमध्ये सर्वश्रेष्ठ सम्राट म्हणून त्याची गणना केली जाते.

भारताच्या इतिहासातील चलेजाव आंदोलनाचे महत्त्व

(Sawant S. R.)

 BA--- 2 -- इतिहास पेपर -- नं -- 6---  मुंबई भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास-- चले जाव चळवळ --चले जाव चळवळ ची वाटचाल. 

भारताच्या इतिहासातील चलेजाव आंदोलनाचे महत्त्व --   

8 ऑगस्ट 1942 रोजी राष्ट्र सभेने चले जाव चळवळ पुकारली आणि त्याच रात्रीला राष्ट्सभेच्या सर्व प्रमुख नेत्यांसह अटक करण्यास सुरुवात केली. यामध्ये महात्मा गांधी जवाहरलाल नेहरू मौलाना आझाद सरदार पटेल अरुणा असफअली या सर्वांना अटक करण्यात आली.अटक करून कोठे ठेवलेले आहे. याची माहिती देखील जनतेला देण्यात आले नाही. याच दरम्यान मुस्लिम लीगने british सरकार बरोबर हात मिळवणी केली, असे  असले तरी इतर राजकीय पक्षाच्या  मंडळीनी ही चळवळ पुढे चालवली. गांधीच्या करा किंवा मरा या मञांने जनता   नेतृत्व नाही म्हणून  स्वस्त बसली नाही.  ही चळवळ दडपून टाकण्यासाठी सरकारने क्रूर मार्गाचा अवलंब केला. त्यामध्ये गोळीबार मशीन गन्सचा वापर स्त्रियांवर अन्याय कैद्यांना  उपाशी ठेवणे.अशा अनेक कारणाने हिंदी जनतेचा ब्रिटिश सरकारने छळ केला. अनेक लोकांना कारावासात घातले. त्याला उत्तर म्हणून जनतेने रेल्वे टेशन जाळली टेलिफोन तारा तोडल्या पोस्ट ऑफिस नष्‍ट केली. सरकारचा खजिना लुटला यावेळी देशांमध्ये राज्यात अशी सघंमय परिस्थिती सरकार आणि जनतेमध्ये निर्माण झाली होती.  

सरकारने गांधी यांच्यावर गुप्तता जपान धार्जी ने धोरण  आणि अनीतिमत्ता हे आरोप ठेवले त्याच्याविरोधात गांधीजींनी 10 फेब्रुवारी 1943 पासून 21 दिवसाचे आमरन उपोषण केले.  आधुनिक भारताच्या इतिहासात चलेजाव चळवळीला फार मोठे महत्त्व आहे 1789 ची फ्रान्सची  राज्यक्रांती 1917 ची रशियन राज्यक्रांती . 1942चे चलेजाव आंदोलन या आंदोलनाला देखिल भारतिय राज्य krantiअसेच म्हणावे लागते, ही चळवळ पूर्णतः यशस्वी झाली नाही तरी ब्रिटिश सत्तेला जबरदस्त आवाहन हिंदी लोकांनी दिले, चले जाव आंदोलनामुळेच  काही कालावधीतच भारताला.स्वातंत्र्य मिळाले .या वेळी सरकारच्या लक्षात आले की आता आपण भारतावर जास्त वेळ राज्य करु शकणार नाही. परिणामी त्यांना भारतातून काढता पाय घ्यावा लागला. या चळवळीचा एक आणखी परिणाम म्हणजे इंग्रज व मुस्लीम लीग यांची युती घनिष्ट झाली. आणि त्याचा परिणाम म्हणजे 1947 ला हिंदुस्थानला फाळणीला सामोरे जावे लागले. एकंदरीत असहकार सविनय कायदेभंग  चलेजाव या तीन चळवळीतील महात्मा गांधींचे योगदान महत्त्वपूर्ण होते.  2 

या तिन्ही चळवळी  मुळे देश स्वातंत्र्य मंदिराच्या  पायऱ्या चढत चढत  स्वातंत्र्य मूर्तीजवळ पोहोचला.

गांधी युगाच्या कालखंडामध्ये याच्या अगोदर असहकार चळवळ सविनय कायदेभंग

(Sawant S. R.) 

BA  -  2 --- पेपर  -- नं -- 6 -- 

भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास -- महात्मा गांधीजींचे चलेजाव आंदोलन -- 

गांधी युगाच्या कालखंडामध्ये याच्या अगोदर असहकार चळवळ सविनय कायदेभंग 

चळवळीचा अभ्यास केला. या दोन्ही चळवळी पेक्षा चलेजाव आंदोलन चळवळ ही भारताच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण चळवळ मानले जाते. कारण या चळवळीमुळे british सत्तेला आपला भारतातील घाशा गुंडाळावा लागला. आणि भारताला स्वातंत्र्य द्यावे लागले. यानंतर आपल्याला छोडो भारत आंदोलनाची पार्श्वभूमी पाहावे लागेल. 1935 च्या भारतसरकारच्या कायद्या नुसार राज्याना स्वायतत्ता मिळणार होती.या स्वायत्ते मुळे1935 ला प्रांताच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीमध्ये अनेक राज्यांमध्ये राष्ट्रसभेचे सरकार सत्तेवर आलीत. त्यानंतर  त्याच दरम्यान आंतरराष्ट्रीय क्षेत्रात हुकूमशाही राष्ट्रांनी लोकशाही राष्ट्रांच्या वर दादागिरी करण्यास सुरुवात केली होती. एक प्रकारे युरोपच्या राजकारणात अशांततेचे वातावरण तयार झाले होते. परिणामी भारतातील प्रांतीय सत्त्तेची सुञे केंद्राच्या हाती गेलीत व्हाइस राॕयला   सर्वाधिकार दिले गेले. परिणामी काँग्रेसने या निर्णयाच्या धोरणात सरकारच्या विरोधात आंदोलन केले. आंदोलनामध्ये मुळे देशात अशांतता निर्माण झाली. त्याच दरम्यान युरोप मध्ये 1939 ला दुसऱ्या महायुध्धास सुरुवात झाली होती.भारतात अशांतता होती या अशा परिस्थितीत  मार्ग काढण्यासाठी 8 ऑगस्ट 1940 रोजी व्हाइसरॉयने ऑगस्ट घोषणा केली. त्यामध्ये काही आश्वासने भारतीयांना दिली गेली. मात्र यामुळे भारती यांचे समाधान झाले नाही. साहजिकच महात्मा गांधीजींनी 1940 मध्ये मुंबईमध्ये राष्टीय अधिवेशन झाले. या अधिवेशनात मध्ये वैयक्तिक सत्याग्रहाचा ठराव पास करून घेतला आणि  त्यानंतर देशात  गांधीजींच्या आदेशावरून वैयक्तिक सत्याग्रहाला सुरुवात झाली .यातून मार्ग काढण्यासाठी ब्रिटिशांनी स्टे फर्ड क्लिप्स या मंत्र्याला मार्च 1942 मध्ये भारतात पाठवले. त्याने सुधारित  योजना जाहीर केली. मात्र त्यामुळे भारतीयांचे अजिबात समाधान झाले नाही.त्या मुळे भारता मध्ये असतोषाची  परिस्थिती तयार झाली होती. 

परिणामी सुधारित क्रिप्स योजना राष्ट्र सभेने फेटाळून लावली. दरम्यान  ब्रिटिशांचे साम्राज्यवादी धोरण त्याचबरोबर सरकारची भारतीयांच्या  वर चालवलेली दडपशाही दुसऱ्या बाजूला   जपानने आक्रमक धोरणाचा स्वीकार करून जपान हिंदुस्थानच्या सीमेवर येऊन धडकला होता. जो इंग्लंड स्वतःचे संरक्षण करू शकत नाही तो हिंदुस्तानचे काय संरक्षण करणार हे गांधीजींनी ओळखले त्यामुळे  

महात्मा गांधीनी निर्माण झालेल्या परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी सात ऑगस्ट 1942 रोजी अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन मुंबई मध्ये भरले. होते. या अधिवेशनामध्ये 8 ऑगस्ट 1942 रोजी छोडो भारत हा ऐतिहासिक ठराव प्रचंड मतानुसार  मान्य केला गेला. आणि त्यावेळी गांधीजीनी आम्ही आता अधिक काळ शांत राहू शकत नाही गुलामगिरीत राहू शकत नाही त्यासाठी सर्वशक्तीनिशी सरकारच्या  विरोधात लढा द्या मी तुम्हाला छोटा मंत्र देतो तो मंत्र म्हणजे करा अथवा मरा ही घोषणा करून संपूर्ण देशाला गांधीजींनी  चले जाव आंदोलनाची घोषणा केली. आणि संपूर्ण देश या चळवळीने पेटून उठला भारतामध्ये चलो जो आंदोलनाला मोठ्या प्रमाणात प्रत्यक्षपणे सुरुवात झाली

Wednesday, 30 June 2021

राष्ट्रवाद

 Sawant R.

 बी.ए.3 सेमी 6 इतिहास पे.क्र. 14 आधुनिक जगाची निर्मिती (16वे शतक ते 19वे शतक) 

 घटक 2  राष्ट्रवाद. 

          अ. राष्ट्रवादाच्या उदय व प्रसाराची कारणे.  

           ब. इटली व जर्मनीचे एकीकरण.  

            क. परिणाम.

घटक २. राष्ट्रवाद 

 

अ) राष्ट्रवादाच्या उदयाची कारणे-  

प्रस्तावना- राष्ट्र Nation राष्ट्रीयत्व Nationality हे शब्द लॅटिन 'नेटस्' Natus या शब्दापासून बनला आहे. 'नेटस्' या लॅटिन शब्दाचा अर्थ एखादा वंश race असा आहे. ' राष्ट्र म्हणजे ज्या राज्यात एखादा जनसमुदाय मूलभूत अशा प्रेरणांनी एकत्रित येतो आणि ज्या प्रेरणा इतक्या मजबूत असतात आणि ज्या इतक्या जिवंत वाटतात की त्याकरीता त्यांची एकत्र राहण्याची तयारी असते.अशा समुहाला राष्ट्र ही संज्ञा प्राप्त होते.  

फ्रेंच राज्यक्रांतीने स्वातंत्र्य,समता ,बंधुता व मानवता या तत्वांची देणगी जगाला दिली. आधुनिक राष्ट्रवादाचा त्यातुनच उदय झाला. ज्या लोकांची भाषा,वंश,परंपर,संस्कृती, भौगोलिक वसतिस्थान समान आहे अशा लोकांमधे, समाजामध्ये राष्ट्रवाद निर्माण होऊ शकतो.  

   राष्ट्रवादाच्या उदयाची कारणे  

अ) सरंजामशाहीचा-हास- मध्ययुगात युरोपात सरंजामशाहीचा प्रभाव होता.सर्वसामान्य लोकांची ते पिळवणूक करीत. सरंजामशाहीची त्यांच्याच देशात छोटी छोटी राज्ये होती. सरंजामशाहीचा अंत सर्वसामान्य लोकांनी केला. युरोपात राष्ट्रीय भावना निर्माण होण्यास मदत झाली.  

ब) भौगोलिक एकता- समान भुप्रदेशातील लोकांमध्ये मातृभुमीच्या रक्षणासाठी सर्वस्वाचा त्याग करण्याची भावना निर्माण झाली.  

क) समान ऐतिहासिक वारसा- प्रत्येक मानवी समूहाला ऐतिहासिक वारसा मिळाला आहे. राष्ट्रवादाच्या उदयासाठी हे कारण उपयुक्त ठरले.  

ड) समान हितसंबंध- भुप्रदेशातील लोकांचे राजकीय,सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक हितसंबंध समान असतील तर यातुनही राष्ट्रवाद निर्माण होऊ शकतो.

[6/30, 17:59] Kavitq: ह ) परकीय राज्ये : युरोपातील काही राज्यांनी आपली सत्ता परराज्यावर स्थापन केली होती . अशा राज्यात राष्ट्रीय भावनेचे संवर्धन किंवा विकास होण्यास मदत झाली . परकीय सत्ताधिशांनी तेथील लोकांना गुलाम बनवून स्वतःच्या कल्पना , जीवनपध्दती , संस्कृती लादली व आर्थिक पिळवणूक केली . दडपशाहीचा उपयोग करून राजकीय सत्तेचा वापर केला . तेव्हा दडपशाही राजकीय सत्तेविरुद्ध लोक एकत्र आले . त्यांनी राष्ट्रवादी भावनेने आपला लढा उभारला . स्वातंत्र्य मिळविण्यासाठी संघर्ष उभा केला . 

 ज ) व्हिएत्रा परिषदेतील निर्णय : नेपोलियनच्या युरोपातील साम्राज्याचे व्हिएन्ना  परिषदेतील करारामुळे विघटन झाले . अनैसर्गिक एकीकरण व्हिएना कराराने केले गेले  .  

ल ) राजकीय महत्वाकांक्षा : कोणत्याही देशातील लोकांना आपल्या देशाची भविष्यकाळाविषयी महत्वाकांक्षा असते . पारतंत्र्यातील लोकांना स्वातंत्र्य होण्याची , स्वतंत्र राष्ट्राला वैभवशाली बनविण्याची महत्वाकांक्षा ही लोकांच्या ठायी असते . ते भविष्य साकार करण्यासाठी लोक आपआपसातील मतभेद मिटवून देशकार्य , देशहित याकरिता लक्ष देतात . यातून राष्ट्रवादाचा उदय होतो . 

 म ) थोर लेखकांचे योगदान : एक राष्ट्रीयत्वाची भावना सतत तेवत ठेवण्याचे कार्य हे त्या - त्या राष्ट्रातील थोर साहित्यकारांनी नेहमीच केलेले आहे . त्यामध्ये मोठमोठे तत्त्वज्ञ , राजनीतीज्ञ, कुटनितज्ञ आणि राजकारणी यांनी केलेले लिखाण राष्ट्रीय भावना निर्माण करण्यास कारणीभूत ठरले आहे . मॅकिया व्हॅली , हॉब्स , रूसो , व्हॉल्टेअर , थॉमस पेन , माँटेस्क्यू , रविंद्रनाथ टागोर , स्वातंत्र्यवीर सावरकर , लोकमान्य बाळ गंगाधर टिळक इ . विचारवंत लेखकांनी राष्ट्रवादी भावना निर्माण करण्यासाठी आपल्या परीने योगदान दिले आहे .

[6/30, 18:00] Kavitq: राष्ट्रवादाच्या उदयाची कारणे.  

 

इ ) वंश , धर्म , भाषा यांचे ऐक्य : एकच वंश , समान धर्म व भाषा ही भावना परस्परांची मने जुळविण्यास अत्यंत प्रभावी ठरलेली आहेत . समान वंशीय लोक एकत्र येण्याची प्रक्रिया सतत चालूच असते . २० व्या शतकाच्या प्रारंभी याचाच हिटलरने उपयोग करून वांशिक एकतेचे आवाहन केले . जर्मन राष्ट्रवादाचो पुननिर्मिती केली होती . तसेच धार्मिक एकताही महत्वाची मानली जाते . कारण लोकांच्या धर्मावर गदा आल्यास धर्मरक्षणार्थ हजारो लोक प्राणत्याग करतात , त्यामुळे एक राष्ट्र निर्माण होण्यास मदत होते . यातून राष्ट्रवाद निर्माण होतो . 

 फ ) युरोपातील धार्मिक सुधारणा चळवळ : मध्ययुगात युरोपात चर्च आणि धर्मगुरू यांना अत्यंत मानाचे स्थान होते . त्यांच्याजवळ अत्युच्च सत्ता होती . पवित्र रोमन साम्राज्यात पोप आणि रोमन राजा हे अनुक्रमे धार्मिक व राजकीय प्रमुख मानले जात असत . त्याकाळात युरोपात कोठेही स्वतंत्र राष्ट्र - राज्य नव्हते . परंतु धर्मसुधारणेच्या चळवळीमुळे लोकांत जी जागृती निर्माण झाली . परिणामी पोप व रोमच्या राजाचे पद दुर्बल बनले आणि


Sawant R., [30.06.21 21:16]

युरोपात राष्ट्रीय भावना ठिकठिकाणी निर्माण झाली . यातून युरोपात राष्ट्र राज्यांचा उदय झाला . १५३४ मध्ये इंग्लंडचा आठवा हेन्री राजाने पोपची धार्मिक व राजकीय अधिसत्ता झुगारून दिली . इंग्लंडचे नवे धोरण आखले .  

ग ) निरनिराळ्या काळात झालेली युध्दे : मध्ययुगात जी विविध युध्दे झाली . त्याकारणाने लोकांच्यात नवचैतन्य निर्माण झाले . त्यामुळे राष्ट्रवादी भावनेला उत्तेजन मिळाले . इंग्लंड - फ्रान्स यांच्यात शंभर दिवसांच्या संघर्षमय 

संघर्षमय युध्दामुळे दोन्ही राष्ट्रांत राष्ट्रवाद निर्माण झाला . अशा निरनिराळया युद्धांनी वेगवेगळ्या राष्ट्रातील राष्ट्र भावना जागृत करण्याचे कार्य केले .  

ह ) परकीय राज्ये : युरोपातील काही राज��

[6/30, 18:01] Kavitq: क ) नेपल्समधील आंदोलन ( १८२० ) :  

इ . स . १८२० मधील स्पेनच्या क्रांतीचे पडसाद नेपल्स येथे उमटले . नेपल्स - सिसिलीचा राजा फर्डिनंड हा बुर्बान घराण्यातील होता . तो नेपोलियनचा तिरस्कार करणारा होता . त्याने नेपोलियनच्या सर्व गोष्टी नष्ट करण्याचा प्रयत्न केला . स्पेनमधील क्रांतीनंतर नेपल्समधील जनतेने प्रस्थापित राजा फर्डिनंड विरुद्ध आवाज उठविला . राजाकडे स्पेनच्या धर्तीवर घटना तयार करण्याची मागणी केली . जुलमी फर्डिनंड राजाने विरोध केला . परंतु क्रांतिकारकांचा जोर पाहून शेवटी त्याने नमते घेतले व उदारमतवादी घटना देण्याचे मान्य केले . १८२० मध्ये नेपल्समधील क्रांतिकारकांनी आपला पहिला लढा यशस्वी केला .परंतु लेबॅक परिषदेनंतर मेटरनिकने ऑस्ट्रियात सैन्य पाठवून नेपल्समधील उठाव दडपून टाकला . 

ड) पिडमाँटमधील क्रांती ( १८२१ ) : नेपल्समधील आंदोलनाचे लोन इटलीभर पसरू लागले . पिडमाँमाटच्या जनतेचा पहिला व्हिक्टर इमॅन्यूअलवर विश्वास होता . त्याने ऑस्ट्रियाविरुष्ट युद्ध पुकारावे असा क्रांतिकारकांचा आग्रह होता . नेपल्समधील क्रांतिकारकांनी देशभक्तांना पिडमाँटने मदत करावी असा आग्रह जनतेने धरला परंतु व्हिक्टर इमॅन्युअल पहिला याने त्यास नकार दिला . क्रांती झाली व व्हिक्टर इमॅन्यूअल पहिला याने राजत्याग केला . त्याचा भाऊ चार्लस फिलिप्स हा गादीवर आला त्याने उदारमतवादी घटना देण्याचे मान्य केले . मेटरनिकच्या प्रतिगामी राजवटीविरुध्द क्रांती चळवळ ही गतिशील बनू लागली . मेटरनिकने येथेही सैन्य पाठवून क्रांती दडपली व तेथे पुन्हा प्रतिगामी राजवट निर्माण केली . हाही इटालियन देशभक्तांचा राष्ट्रवादी प्रयत्न होता .  

इ ) १८३० व १८४८ च्या क्रांत्यांचे पडसाद : १८३० च्या फ्रेंच क्रांतीचे पडसाद इटलीतील पोपचे राज्य , पिडमाँट , चार्मा , मोदेना या राज्यात राष्ट्रवादी विचाराने प्रस्थापित सत्तेविरुद्ध जनतेने उठाव केला . मेटरनिकने ते उठाव दडपून टाकले . परंतु १८४८ च्या फ्रेंच क्रांतीची लाट मोठी होती . त्यात खुद्द आस्ट्रिया व मेटरनिकचे वर्चस्व संपुष्टात आले . १८४८ च्या क्रांतीचे पडासाद इटलीमध्ये उमटून इटालियन जनतेत खूप मोठी जागृती झाली आणि इटलीतील प्रत्येक राज्याने लढण्यापेक्षा सर्व राज्यांनी एकत्रपणे लढावे . त्यात यश येईल अशी खात्री झाली . त्यातून इटलीच्या एकीकरणाच्या चळवळीला गती मिळाली आणि राष्ट्रवादाचा विकास मोठ्या प्रमाणात झाला. 

फ ) इटलीचे एकीकरण आणि रोम इटलीची राजधानी :  

युरोपियन ख्रिस्ती जगतात रोमच्या पोपला अत्यंत महत्व होते . ख्रिस्ती जगतात रोमचा पोप धर्मगुरू होता . रोमच्या पोपचे राज्य अजूनही इटलीच्या एकीकरणात समाविष्ट झाले नव्हते . कारण पोपविरुध्द लष्करी मोहिम काढणे कठीण होते . फ्रेंच सैन्य नेपोलियन तिसऱ्याने पोपच्या संरक्षणासाठी रोममध्ये ठेवले होते . परंतु १८७० मध्ये फ्रान्स - रशिया युद्धावेळी रोममधील सैन्य रशियात हालविले . तेव्हा व्हिक्टर इम्यन्यूअल दुसरा याने रोमवर स्वारी केली . रोम ताब्यात घेतले व इटलीचे एकीकरण पूर्ण केले . रोम ही इटली या राष्ट्राची राजधानी बनविली . अशा रितीने १८१५ पासून इटलीमध्ये एक राष्ट्रीयत्वाची आणि राष्ट्रवादी भावनांनी इटालियन देशभक्तांनी इटालियन जनतेला संघटीत केले . त्यांच्या अथक प्रयत्नामुळेच जगात राष्ट्र म्हणून मान्यता मिळाली . युरोपमध्ये एक प्रभावशाली देश राष्ट्रवादाच्या चैतन्यामुळे अस्तित्वात आला .

[6/30, 18:01] Kavitq: इटलीचे एकीकरण- १८७० 

 

 प्रस्तावना-  

रोमन साम्राज्याच्या -हासाबरोबरच इटलीचे विघटन होऊन इटली अनेक लहान मोठ्या राज्यात विभागला होता.अनेक राज्यात राजेशाही अस्तित्वात होती. त्यांच्यात कित्येक वर्षे संघर्ष होता.१५व्या शतकापासुन युरोपातील अनेक राष्ट्रांनी इटलीवर राज्य करण्याचा प्रयत्न केला. म्हणून इटली एक राष्ट्रही संकल्पना मुळ धरू शकत नव्हती . इटलीच्या उत्तरेला अल्फा पर्वत , तिन्ही बाजूंनी समुद्र अशी भौगोलिक सीमा लाभलेल्या इटलीला राष्ट्र बनता आले नव्हते . हे इटलीचे दुर्दैव होते . इटलीत प्रांता - प्रांतात , शहरा - शहरात , कुटुंबा- कुंटुबात आणि माणसा - माणसात वैर होत , अशा ठिकाणी एकीची भावना निर्


Sawant R., [30.06.21 21:16]

माण होणे तसे कठीणच बनले होते . त्यामध्येच इटलीतील वेगळवेगळया ठिकाणातील समाजातील रूढी , परंपरा वेगवेगळ्या लोक होत्या . 

 अ ) नेपोलियन बोनापार्टची इटली मोहीम- एक वरदान : रोमन साम्राज्याच्या -हासानंतर इटलीचे जरी विघटन झाले असले तरी प्राचीन रोमन साम्राज्याचा वैभवाचा इतिहास विसरले नव्हते . इटालियन देशभक्त होते . आपला इतिहास स्मरणारे इटालियन विद्या , विज्ञान , कला , संगीत , धर्म आदींचा अभिमान बाळगून पुन्हा एकदा आपल्या देशाला जागतिक महत्व प्राप्त व्हावे यासाठी प्रयत्नशील होते . ऑस्ट्रिया जर्मनी , फ्रान्स , स्पेन या राष्ट्रांचे इटलीवर वर्चस्व निर्माण झाले होते , त्यांनी स्वत : च्या स्वार्थासाठी इटलीला एक संघ होऊ दिले नाही . पुन्हा इटली एकत्र यावा किंवा राष्ट्रीय ऐक्य व्हावे या इटालियन लोकांच्या , देशभक्तांच्या स्वप्नांना नेपोलियन बोनापार्टच्या इटली मोहिमेने फार मोठा हातभार लावला . नेपोलियनच्या स्वारीने इटालियन लोकांच्यात नवे पर्व सुरू झाले . त्याने इटलीचे प्रदेश जिंकून ऑस्ट्रियाची हकालपट्टी केली . बुर्बाॅन राजांना हाकलून दिले . इटालियनांचे परकीय पारतंत्र्य घालविले व एक राष्ट्रीयत्वाची मुहूर्तमेढ रोवली . तिथे आपले एकछत्री राज्य , अंमल सुरू केला . इटलीचा राज्यकर्ता या नात्याने त्याने इटलीचा विखुरलेला प्रदेश एकत्र केला . तेथे विधानसंहिता रूजविली , दळणवळणाच्या सोयी केल्या . दळणवळणाच्या सोयीमुळे इटलीला एकत्र आणले . स्वातंत्र्य , समता , बंधुत्व या फ्रेंच तत्त्वत्रयींचा प्रसार झाला . इटलीमध्ये राष्ट्रवादी भावना वाढली . नेपोलियनची इटली मोहीम ही इटलीतील राष्ट्रवादास वरदानच ठरली .  

व्हिएन्ना परिषद व इटली [१८१४-१८१५] : नेपोलियनच्या पाडावानंतर युरोपची पुनर्रचना करण्यासाठी ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना येथे युरोपियन राष्ट्रांनी १८१४-१५ मध्ये परिषद भरविली . युरोपमधील राज्यांमध्ये नेपोलियनपूर्वीची जैसे थे परिस्थिती निर्माण करण्यासाठी चर्चा सुरू झाली . मेटरनिकने इटालियन लोकांच्या भावनांचा विचार न करता इटलीची चिरफाड केली व पुन्हा इटलीत अनेक छोटी - छोटी राज्ये निर्माण केली . पुन्हा इटालियनांच्यावर पारतंत्र्य लादले . १८१५ च्या व्हिएना परिषदेने इटलीचे स्वतःचे अस्तित्व संपुष्टात आणले . परिणामी , इटालियन लोकांच्यात मेटरनिकच्या प्रतिगामी धोरणाविरुध्द असंतोष भडकू लागला आणि इटलीत राष्ट्रवादाचा उदय झाला  

 ब ) कार्बोनारी संघटना : इटलीमध्ये मेटरनिकने दडपशाहीचे घोरण राबविले . तेव्हा ऑस्ट्रियाचे वर्चस्व झुगारून देवून ऑस्ट्रियाला इटलीतून हाकलणे , इटलीचे एकीकरण करणे , इटलीला स्वातंत्र्य मिळवून दिले पाहिजे , हो इटालियन जनतेची भावना बळावत गेली . राष्ट्रवादी भावनेने इटालिवन देशभक्तांनी भूमिगत राहूनच स्वातंत्र्या चळवळ उभी केली . कारण मेटरनिक क्रांती चळवळी दडपण्यासाठी नेहमी सतर्क असे . म्हणून इटालियन देशभक्त नेपल्समध्ये गुप्तपणे संघटित होऊन क्रांतीकार्य किंवा एकीकरणाची चळवळ गुप्तपणे करणारी ' कार्बोनरी संघटना ' संदेश देत असे.या संघटनेने इटलीत लोकशाही स्थापणे , एकीकरण घडवून आणणे व इटली स्वतंत्र करणे हे उद्देश ठेवले होते.या संघटनेने इटलीतील एकीकरणाची चळवळ गतीमान केली.

[6/30, 18:02] Kavitq: जर्मनीचे एकीकरण-१८७०


प्रस्तावना  : युरोपियन राष्ट्रवादाच्या वाटचालीत जर्मनीच्या राष्ट्रवादी चळवळीने उल्लेखनीय कार्य केले . जर्मनी छोट्या - छोट्या राज्यात विभागला होता , अशा राज्या राज्यातून जर्मनीचा राष्ट्रवाद निर्माण झाला होता . एकीकरणाची चळवळ सुरू होऊन काही वर्षातच एक सुसंघटित व बलाढ्य जर्मनी निर्माण झाले . १८७० ते १९१४ पर्यंत जर्मनीने संपूर्ण युरोपमध्ये अत्यंत महत्वपूर्ण स्थान निर्माण केले .  

अ ) जर्मनीची ऐतिहासिक पार्श्वभूमी: 

प्राचीन रोमन साम्राज्याच्या अस्तानंतर पूर्व युरोपातील ३६० लहान मोठ्या राज्यांनी पुन्हा पवित्र रोमन साम्राज्याची स्थापना केली होती . ऑस्ट्रियन सम्राट हा या पवित्र रोमन साम्राज्याचा पदसिद्ध राजा होता . यामध्ये प्रशियाचे राज्य मोठे होते . जर्मनी हा एकीकरणापूर्वी ५ राज्यांचा एक विस्कळीत संघ होता. हे छोटे मोठे सत्ताधिश स्वत : च्या प्रदेशात जवळजवळ स्वतंत्र होते .  

ब ) नेपोलियन बोनापार्ट व जर्मनी: १८०६ मध्ये नेपोलियनने पवित्र रोमन साम्राज्यावर आक्रमण करून ३०० राज्ये 

   

राज्यात संघटित केली . त्याला -हाईनचा राज्य संघ असे नाव दिले . नेपोलियनच्या काळातच जर्मनीमधे राष्ट्रवादाच्या भावनेचा विकास होऊ लागला . जेव्हा नेपोलियन बोनापार्टने रशियावर जाचक अटी टिलसिटच्या तहामध्ये घातल्या तेव्हा प्रशियाचा स्वाभिमान जागृत झाला . याच काळात हर्डर , किश्ते , गटे , कांट व हेगेल यासारख्या जर्मन लेखकांनी राष्ट्रवादी लेखन केले . राष्ट्रवादाच्या उदयाला त्यामुळे चालना मिळाली . नेपोलियन हा या संघाचा संरक्षक बनला त्याने -हाईन राज्य संघाचा राजा म्हणून राज्य निर्माण करीत असताना समान काय


Sawant R., [30.06.21 21:16]

दा , समान न्याय , समान कर , समान प्रशासन निर्माण केले हीच समता एकराष्ट्रीयत्वास व राष्ट्रवादास कारणीभूत ठरली .  

क ) व्हिएन्ना काँग्रेस व जर्मनी : 

व्हिएन्ना परिषदेत १८१५ मध्ये पुनर्रचना करण्यासाठी जेत्या राष्ट्रांनी जर्मनीचे विघटन करण्याचा प्रयत्न केला . जर्मन एक राष्ट्र होणे या जेत्या राष्ट्रांना परवडणारे नव्हते .कारण मेटरनिकने ऑस्ट्रियाचे वर्चस्व राखण्यासाठी -हाईनचा राज्यसंघ नष्ट करून पुन्हा १८ राज्यांचा दुसरा जर्मन संघ तयार केला  या संघाचे अध्यक्षपद ऑस्ट्रियाकडे घेतले . उपाध्यक्ष प्रशियाच्या राज्याकडे नाममात्र दिले . व्हिएन्ना परिषदेने जर्मन एकराष्ट्रीयत्वाच्या कल्पनेला पूर्णपणे बगल दिली . वेगळे जर्मन राष्ट्र निर्माण झाल्यास ऑस्ट्रियाकडील नेतृत्व जाईल अशी भिती मेटरनिकला होती . जर्मन राज्य संघाच्या प्रतिनिधींची फ्रैंकफूट येथे परिषद भरावी व त्याचे अध्यक्षपद ऑस्ट्रियाकडे असावे असा निर्णय घेण्यात आला . परिणामी मेटरनिकला विरोध होऊ लागला . जर्मनीच्या इच्छा , जनतेची सार्वभौम सत्ता इत्यादी गोष्टी मेटरनिकने हेतुपुरस्सर डावलल्या . व्हिएन्ना परिषदेच्या तहनाम्याने जर्मन लोकांचा अपमान झाला होता ते जर्मन रक्ताला मानवणारे नसल्याने जर्मन देशभक्तांनी त्यास विरोध केला आणि राष्ट्रबाद उदयास आला .  

ड ) जेना विद्यापीठ राष्ट्रवाद जागृतीचे केंद्र : मेटरनिकच्या प्रतिगामी धोरणास जर्मन विद्यापीठातील विद्यार्थी प्राध्यापकांनी प्रथमपासून विरोध केला . त्यामध्ये जेना विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला व जर्मन एकीकरणाची कल्पना उचलून धरली . एकीकरणाची चळवळ सुरू केली ती दरवर्षी फोफावत गेली . १८१७ मध्ये बर्टनबर्ग विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी मार्टीन ल्युथर यांची १८९ वी जयंती साजरी केली . जेना विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी लिपझिक लढाईचा स्मृतीदिन साजरा केला . जर्मन एकीकरण झाले पाहिजे असे यावेळी विचार मांडले . बर्टनबर्ग विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी नेपोलियन संहिता पुस्तक , लष्करी राजवटीची , प्रतिगामी राजवटीची सर्व चिन्हे असलेली साहित्यांची भर रस्त्यावर होळी केली . विद्यार्थी चळवळीने केलेल्या जागृतीमुळे जेना विद्यापीठ हे राष्ट्रवादी व लोकशाही विचारांचे एक प्रमुख केंद्र बनले.

[6/30, 18:03] Kavitq: इ ) कार्लस्बाडचे वटहुकूम :  

जर्मनीतील विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या चळवळींचा प्रसार होऊ नये व एकीकरणाची चळवळ दडपून टाकण्यासाठी प्रशियाच्या राजाच्या सहमतीने जर्मनीतील सर्व प्रमुख राज्यांची मेटरनिकने कार्लस्बाड येथे एक परिषद बोलावली . या परिषदेत जे ठराव मेटरनिकने पास करून घेतले त्यास कार्लस्बाड वटहुकूम ( डिक्रीज ) असे म्हणतात त्यानुसार जेना विद्यापीठातील प्राध्यापकांच्यावर नजर ठेवण्यासाठी एक सरकारी अधिकारी नेमला . प्राध्यापकांना प्रक्षोभक मते मांडण्यास मज्जाव करण्यात आला . नियमांचे पालन न करणाऱ्या प्राध्यापकांना कडक शिक्षा ठोठावण्यात आल्या . विद्यार्थी संघटना पोलीस दलामार्फत मोडून टाकल्या व त्यावर बंदी आणली . विद्यापीठाची स्वायत्तता संपुष्ठात आणून विद्यापीठाचा कारभार सरकारनियुक्त अधिकाऱ्यांच्या हातात दिला . भाषण , लेखन , मुद्रण यावर बंदी घातली . जर्मनीतील राष्ट्रवादी एकराष्ट्रीयत्वाची चळवळ दडपून टाकली . यावेळी मेटरनिकने पोलीस राज्यच स्थापन करून दरारा निर्माण केला . परिणामी जर्मन लोकांच्या मनात असंतोष निर्माण झाला .  

जर्मनीची जकात संघटना - जर्मन एकराष्ट्रीयत्वाचा पाया :  

जर्मनीची जकातसंघटना ही जर्मनीच्या एकीकरणात राष्ट्रवादाप्रमाणेच पायाभूत ठरली . जर्मन हा अनेक सार्वभौम राज्यांचा बनलेला संघ होता . परंतु प्रत्येक राज्यांचे कायदे , चलन व्यवस्था जकातीचे धोरण हे वेगवेगळे होते . परिणामी जर्मनीचा आर्थिक विकास झाला नव्हता . प्रत्येक प्रांतांचे जकातविषयक धोरण वेगळे असल्याने एका प्रांतातून दुसऱ्या प्रांतात देवघेवीचा माल ( वस्तू ) पाठविण्यास अडचण निर्माण झाली होती . त्यामुळे जर्मनीचा व्यापार व उद्योगास अडथळा होत असे . यामुळे व्यापारी व भांडवलदार हे असंतुष्ट होते . १८१८ मध्ये प्रशियाच्या पुढाकाराने प्रशियाचा मंत्री मॅसेनने एक कायदा करून कच्च्या मालाच्या आयातीवरील सर्व निबंध उठविले व प्रशियाच्या मालाला संरक्षण देऊन जकात संप उभा केला . १८२९ मध्ये बव्हेरिया , सॅक्सनी ही राज्ये या संघटनेत सामील झाली . १८४२ पर्यंत ऑस्ट्रिया वगळता सर्व राज्यांनी जकात संघटनेत सहभाग घेतला . परिणामी इतरत्र विखुरलेला जर्मन प्रदेश या संघाच्या कक्षेत आला . १८४२ नंतर प्रशियाच्या नेतृत्वाखाली सर्व राज्यांचा एकत्र जकात संघ स्थापन केल्यामुळे प्रांताप्रांतात दळणवळण निर्माण झाले व आर्थिक संबंध घनिष्ट बनले . आर्थिक हितसंबंधाच्या निमित्ताने जर्मनीतील राज्ये अधिकाधिक जवळ आली  आणि जर्मनीच्या आर्थिक क्षेत्रात प्रशियाचे महत्व वाढले . यामुळे ही जकात संघटना जर्मनी एकीकरणाचा पाया ठरली .  

ई ) १८३० च्या


Sawant R., [30.06.21 21:16]

क्रांतीचे पडसाद : राष्ट्रवादी भावना दडपून टाकण्यात मेटरनिकला प्रारंभी यश आले असले तरी जर्मनीतील लोकांच्या मनातील राष्ट्रवादी भावना तो मारू शकत नव्हता त्या जर्मनीतील फिस्ते , गटे , हेगेल , कांट यासारख्या साहित्यिकांनी , तत्त्ववेत्त्यांनी जीवंत ठेवल्या होत्या . जसे १८३० च्या क्रांतीने युरोपवर परिणाम घडवून आणले तसेच जर्मनीवर ही ते घडून आले . जर्मनीतील प्रस्थापित प्रतिगामी सत्तेविरुद्ध जनतेने 

उठाव करून उदारमतवादी घटनेची मागणी केली . बुन्सविक , नास्ताऊ , हॅनोव्हर , सैक्सनी , हेसीकेंसल या राज्यातील राज्यकर्त्यांना उदारमतवादी घटना अंमलात आणावी लागली . मेटरनिकने पुन्हा आपल्या पाशवी बळाचा वापर करून सर्व चळवळी दडपून टाकल्या आणि जर्मनीत पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण केली .

सविनय कायदेभंग चळवळी चे महत्व

(S R  Sawant)

 BA-- 2 ---  इतिहास -- पेपर नं-- 6- 

भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास ---2 

सविनय कायदेभंग चळवळी चे महत्व-- 

भारताच्या  इतिहासात सविनय कायदेभंग चळवळी ला फार मोठे महत्त्व आहे. देशाच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासात अहिंसात्मक लढ्यामुळे मोठ्या राज्यसंस्थेला जेरीस आणू शकतो. हेया चळवळीने दाखवून  दिले .आणि हे उदाहरन म्हणजे भारतातील सविनय  कायदे भंग चळवळ  होय. या चळवळीचे वैशिष्ट्य म्हणजे मुंबई गिरणी मालक कारखानदारांनी या चळवळीला सढळ हाताने मदत केली. त्याचबरोबर या चळवळीमध्ये मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग होता. सर्वसामान्य माणसे यामध्ये सामील झाली होती.सरोजिनी नायडू यांनी  गांधीच्या अटकेनंतर चळवळी चे नेतृत्व केले होते कमलादेवी चट्टोपाध्याय कमला नेहरू चेतना कृपलानी आणि नागा लोकांची राणी गौदिन लीवू या महिलांचा वाटा फार मोठा होता. 

याचबरोबर या चळवळीमध्ये सरहद्द  प्रांतातील पठाण लोकांनी या चळवळीचा मनःपूर्वक स्वीकार केला होता. खान अब्दुल गफार खान आणि त्यांची खुदाई खिदमतगार ही संघटना या चळवळीत सक्रिय झाली होती.या चळवळीचे वैशिष्ट्य  असे की शेतकरी वर्गाचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.चळवळीने विशाल रूप प्राप्त केले होते. याच दरम्यान भारतीयांना कोणत्या सुधारणा द्यावे याच्यासाठी नोव्हेबंर 1930  पहिली गोलमेज परिषद भरली. या गोलमेज परिषदेमध्ये काही सामज्यस्य करार झाले5 मार्च 1931 ला झाला याला गांधी-आयर्विन करार म्हणतात.मात्र पूढे हा करार ब्रिटिशांनी पाळला नाही.पुन्हा  दुसरी गोलमेज परिषद घेण्यात आली या दुसरी गोलमेज परिषदेमध्ये हिंदुस्तानी मंडळींच्या मागण्या मान्य केल्या नाहीत.परिणामी सरकारविरुद्ध रोष वाढला. त्या मुळे चळवळीच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात झाली. आणि कायदेभंग चळवळीच्या दुसरे पर्व म्हणजेच नव्या सरकारने गांधी-आयर्विन करार माघार घेऊन  

त्यामुळे मोठ्या प्रमाणात दडपशाही सुरू केले  जनतेवर गोळीबार लाटीमार सुरु केला. अशातच हिंदू-अस्पृस्य यांच्यामध्ये फूट पडू नये म्हणून गांधीजी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच्या 25 सप्टेंबर 1932 ला पूणे करार झाला . नंतर 1932 ला लंडनमध्ये तिसरी गोलमेज परीषदेत देखील हिंदी लोकांच्या हिताकडे गंभीरपणे बघितले नाही .आणि ही परिषद औपचारिक ठरली. साहजिकच या यावेळी पुणे करार केला यामध्ये इंग्रजांची कुटील नीती त्यांनी ओळखली होती. त्यामुळे सविनय कायदेभंग चळवळीकडे दुलृक्ष करून सामाजिक कार्यावर लक्ष केंद्रित केले. आणि त्यांनी हरिजन संघ स्थापन करून अस्पृश्यता निवारणाच्या कामाला प्राधान्य दिले .

सविनय कायदेभंग चळवळ मिठाचा सत्याग्रह

(Sawant S. R.) 

BA--- 2---   इतिहास --  पेपर नं-- 6 भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास 

सविनय कायदेभंग चळवळ मिठाचा सत्याग्रह 

 सविनय कायदेभंग चळवळीत अन्याय कारक कायद्याचा भंग सवीनय पद्धतीने करून चळवळीला सुरुवात करण्याचे 12 मार्च 1930 ची तारीख ठरवली. मिठाच्या सत्याग्रहाचा साठी गुजरात मधिल दांडी या गांवाची निवड केली. गांधीनी  साबरमती आश्रमातून आपल्या 78अनुयायांसह गांधी12 मार्च 1930 रोजी पायी चालत निघाले.व दांडी येथे 5 एप्रिल 1930 रोजी पोहोचले  त्यादिवशी दांडी येथे मिठाचा कायद्याचा भंग करून त्यांनी विनापरवाना मीठ उचलले. गांधींच्या मिठाच्या आंदोलनामुळे मीठ या शब्दाला फार मोठी ताकद निर्माण झाली. गांधींचे नेतृत्व किती उंची गाठू शकते.या वरून लक्षात आले. असे नेताजी सुभाष चंद्र म्हणतात.या चळवळीकडे जगाचे लक्ष लागले होते.नेहरू नेताजी सुभाष चंद्र बोस सरदार पटेल यांनी त्यामध्ये भाग घेतला. ही चळवळ खेड्यापाड्यांमध्ये मोठ्या पृमानात चालु होती त्यावेळेला गांधीं गांधींना सोडून बाकी सर्व नेत्यांना अटक करण्यात आली. गांधीनी त्यानंतर 1 मे 1930 रोजी धारासना येते सत्याग्रह केला. या सत्याग्रह मध्ये सरोजिनी नायडू यांनी नेतृत्व केले. देशामध्ये अनेक ठिकाणी हजारोंच्या संख्येने लोक मिठाचा सत्याग्रहा मध्ये सामील झाले होते कायदेभंगाच्या चळवळीमध्ये शेतकऱ्यांनी सरकारलाच सारा देण्याचे नाकारले. परदेशी मालावर बहिष्कार टाकला .काही ठिकाणी समुद्रकिनार्‍यावर जाण्यास बंदी होती.त्या समुद्र किनाऱ्यावर लोकांनी पृवेश केला परदेशी कापडाची वाहतूक रोखण्याचे काम केले गेले .जंगलात जान्यास बंदी करन्यात आली होती ही बंदी  जनतेने झुगारुन लावली.  सोलापूर मध्ये लष्करी कायदा पु करण्यात आला मात्र आंदोलकांनी याच्याकडे दुर्लक्ष केले.  या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात सर्वसामान्यांचा पाठिंबा मिळाल्याने .सविनय कायदेभंग चळवळ स्वातंत्र्य चळवळीतील महत्त्वाचा टप्पा होती. सविनय कायदेभंग चळवळी चे महत्व--  या चळवळीने अनेक गोष्टी साध्य केल्या. कारण सविनय कायदेभंग चळवळी मुळे चळवळ ग्रामीण भागात पोहोचली. सामान्य माणसं त्यामध्ये सहभागी झाले. सर्व थरातील लोक  या चळवळीचे कार्यकर्ते बनले. स्वातंत्र्य चळवळीचे हे सर्व स्वरूप आणि तिची लोकप्रियता बघून सरकारला राजकीय सुधारणा देणे भाग पडले.त्यातून पुढे गोलमेज  परिषदेचे आयोजन केले.सरकारने राबवलेल्या दडपशाही मुळे शेवटच्या घटकापर्यंतचे लोक त्यामध्ये सामील झाले. परिणामी सरकार पोलीस  

यांच्या  विषयि लोकांच्या  मनातील भिंती  नाहीशी झाली.लोक स्वातंत्र्यासाठी पोलिसांचा लाठीमार तुरुंगवास आनंदाने स्वीकारू लागले या चळवळी  मुळे राष्ट्रभक्तीला मोठ्या  पृमानात उधान आलेआले.

Sunday, 27 June 2021

पुरातत्वीय साधने

 (Sawant S. R.)

BA-- 3 -- इतिहास     मध्य युगिन भारताचा इतिहास  पेपर--13

पुरातत्वीय साधने 

मध्यकालातील इतिहासाची माहिती होण्यास फार उपयुक्त आहेत मुगल काळातील स्थापत्य भारताच्या इतिहासाचा मानबिंदू ठरला आहे. या साधनांमध्ये किल्ले नकाशे क्षेत्रे काष्ठशिल्प कालवे शिलालेख ताम्रपट नाणी याचा उल्लेख करावा लागतो.कील्याचा विचार करता मध्ये मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये पाचशे किल्ले असून उत्तर भारतात 104 दक्षिण भारतात 380 किल्ले आहेत किल्ल्याचे पुढील  प्रकार होते डोंगरी गिरिदुर्ग जलदुर्ग भुईकोट किल्ला असा त्यामध्ये समावेश होता अकबराने आग्याचा किल्ला तसेच लाहोर चा किल्ला बांधला पुराना किल्ला शेरशहाने  बांधला .त्याच बरोबर शहाजहानने लाल किल्ल्याचे बांधकाम केले. अकबराने अजमेर मेरट कटक इत्यादींमध्ये देखील किल्ले बांधले. शिवाजीमहाराजांनी किल्ल्याचे महत्व ओळखून रायगड प्रतापगड सिंहगड राजगड सिंधुदुर्ग विजयदुर्ग इत्यादी किल्ले उभारले या किल्ल्याला वेग-वेळ-अंतर बुरुज त्यावरील तोफा दारुगोळ्याची कोठारे इमारती बाजारपेठा इत्यादी विभाग निर्माण केले.  आज देखील मध्ये इतिहासातील याची साक्ष देत आहेत. त्याच्यानंतर शस्त्रास्त्रे व अवजारे याच्या जोरावर मध्ययुगीन व्यवस्था बर्‍यापैकी अवलंबून होती शस्त्रास्त्रे सैन्यबळावर राज्य मोठी होत होती वाढत होती. मध्ये कालखंडाचा तो न्याय होता ज्याच्याकडे शशाञे भरपूर तो लढाई चांगल्या पृकारे  तोच सरस ठरत होता. ढाल तलवार भाला धनुष्यबाण कट्यार खंजीर दानपट्टा वाघ नखे बंदुका तोफा यांचा यामध्ये समावेश होता. राजवाडे  गढ्या मधून भारताच्या इतिहासातील अनेक गढ्या राजेवाडे त्या काळातील वैभवाची साक्ष देतात मुघल राजपूत राजानीअतिशय भव्य राजवाडे बांधले त्यांच्या संरक्षणासाठी खंदक खोदून भक्कम तटबंदी या राजवाडा मध्ये अनेक दालने असून राज्याचे राजकुमार राजकुमारीची दास दासींच्या निवासाची सोय त्याचबरोबर संरक्षणासाठी असलेल्या सैनिक सैनिकांची राहण्याची व्यवस्था केली होती.दिल्ली दक्षिण  भारत फत्तेपूर सिक्री दतिया अंबड येथील राजवाडे महत्त्वपूर्ण आहेत. राजा जयसिंग यांनी जयपूर येथे हवा महल बांधला. तर पहिल्या बाजीरावाने पुणे ते शनिवार वाडा बांधला. कोल्हापूर येथील राजवाडा देखील इतिहासाची साक्ष देण्यास प्रसिद्ध आहेत. यानंतर नकाशे ज्या भूप्रदेशावर राज्य करायचे त्यांचा भूगोल माहित असणे गजे गरजेचे असते मुगल खंडात साम्राज्य दर्शवन्यानासाठी अनेक नकाशे बनविण्यात आले होते .अनेक व्यापारी मार्गाचे आराखडे बनवण्यात आले होते .यामध्ये युरोपियन लोकांनी महत्त्वपूर्ण मदत केली होती फृचं विद्वान् सॅमसंग डी एम बी वेल इ.स.16 54 मधील मुघलसाम्राज्याचा दिशा दर्शवणारा नकाशा उपलब्ध आहे .नकाशा बाबत मुगल कालखंडात फारशी प्रगती झाली नव्हती. वस्त्रे व अलंकार याचा विचार करता कापड उद्योग भरभराटीला आला होता गुजरात बंगाल कापडनिर्मितीची मोठी केंद्रे होती. रेशीम कापडासाठी पैठण आग्रा खंबायत ठिकाणे  प्रसिद्ध होती. पुरुषांची वेशभूषा चूडीदार पायजमा अंगरखा दुपट्टा असा होता गळ्यांचे प्रकार अस्तित्वात होते आणि मुगल बादशहाच्या पगडी वेगळेपणा दिसून येतो. त्याच्यावर महाराष्ट्रामध्ये पेशवाई पगडी शिंदेशाही पगडी प्रसिद्ध आहे स्त्रियांच्या बाबतीत घागरा ओढणी प्रसिद्ध होती. बुरखा पद्धत पडदा पद्धतीचा अवलंब केला जात होता. या काळातील इतिहास हा छोट्या मोठ्या साधनांमधून व्यक्त होतो .चित्र कलेचा  विचार करता चित्रकलेची भरभराट झाली होती. बाबराने भारतात येताना अनेक चिञे चित्रकार आपल्या सोबत आणले होते त्याच्याकडे 240 चित्रे होती हुमायून हादेखील चिञ कलेचा चाहता होता.त्याने इतर अनेक चित्रकारांना राजाश्रय दिला होता.मुघल काळातील चित्रांमध्ये राजा त्याचा दरबार त्याच्या जीवनातील प्रसंग त्याच्यावर निसर्गचित्रे प्राणी-पक्षी इत्यादीचा समावेश होतो .मात्र  या काळातील धातूच्या मूर्ती काष्ठशिल्प मध्ये फार मोठी काय प्रगती झाली नाही. कारण मध्ययुगातील जे मोगल राज्यकर्ते होते त्यांच्या दृष्टिकोनातून मूर्तीपूजेला अजिबात स्थान न्हवते परिणामी धातूच्या मूर्ती आणि काष्ठशिल्प यामध्ये फार काही प्रगती झाली नाही .मात्र कालवे आणि बगीचे याविषयी त्यावेळच्या समृट राजे याच्या मध्येआवड होती. त्यातील राजे राजवटीत त्याचबरोबर मोगल राजे बगिचे कालवे निर्माण केले. त्यामुळे अनेक नदीच्या किनारी राजवाड्याबाहेर किलवे बागितयार केल्या गेल्या .काश्मीर दिल्ली आग्रा येथे बगीचे सध्या देखील अस्तित्वात आहेत. त्यानंतर शिलालेख व ताम्रपट ही महत्त्वपूर्ण पुरातत्वीय साधने होत. किल्ला मंदिर तलाव इत्यादी ठिकाणी शिलालेख आढळून येतात. रायगडच्या किल्ल्यावर शिलालेख पहायला मिळतो विजय नगर च्या  इतिहासाची साक्ष देणारे अनेक शिलालेख आढळून येतात. मध्ययुगीन काळात कर्नाटकात  शिलालेखांची निर्मिती झालेली दिसते. त्याचबरोबर तामृपट हे इतिहास जाणून घेण्याचे महत्त्वाचे साधन आहे राजाकडून मिळणारे वतन व इनामी जमीन काही का काहीवेळा ताम्रपटावर आज्ञा दिल्या जात होत्या तांब्याच्या धातूवर कोरलेल्याला ताम्रपट असे म्हटले जाते. त्याचा नंतर त्या व्यवस्थेचा महत्त्वाचा घटक म्हणजे नानी 15 26 मध्ये बाबराने दिल्ली ताब्यात घेऊन इस्लाम सत्तेची स्थापना केली .आणि बाबर व हुमायुन दोघांनीही आपली  रुप्याची व तांब्याची नाणी बनवली. मात्र मोठ्या प्रमाणात आणि सोन्याची नाणी सुद्धा निर्माण केली .सम्राट अकबराने नाण्यावर वर्ष कलमे व वचने दिलेले आहेत. त्याचा कारकीर्दीत  बऱ्यापैकी व्यवस्थेमध्ये सुधारणा आणली आणि अनेक प्रकारची नाणी निर्मिती केली गेली .मुघल भारताचा किंवा मध्ययुगीन भारताचा इतिहास माहीत होन्यास.पुरातत्विय साधने महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडतात असे म्हणावे लागते .

निकोलास मनुची

(S. R. Sawant) 

BA---- 3 इतिहास --पेपर--- नं--- 13-- मुघल  भारताचा  इतिहास 

निकोलास मनुची 

निकोलस मनुची हा शहाजान च्या कालखंडामध्ये सतराव्या वर्षी भारतात इटालियन प्रवासी म्हणून आला.  1656  मध्ये तो सुरतला आला. त्यानंतर तो दिल्लीला  आला. दिल्ली तक्ता मध्ये दारा शिकोह ची त्याने मर्जी संपादन केली. त्यामुळे दिल्ली दरबारामध्ये मनूची ला भारतामध्ये फिरण्यासाठी अनेक सवलती मिळाल्या. दारा शिकोह व  पोर्तुगीज इंग्रज इत्यादींच्या पदरी नोकरी केली नोकरी करत असताना प्रत्येकाचा दरबारातील त्याने वेगवेगळा अनुभव घेतलेला होता संघर्ष मोगल सत्तेचे होणारे परकीयांशी संबंध या काळात त्याने अनुभवले होते आणि त्याचा अनुभव त्याने मोगला चा इतिहास या नावाने प्रसिद्ध केला. त्याने आपल्या प्रवासवर्णनात महत्त्वाचे प्रसंग रंगवले आहेत .औरंगजेबाने सत्ता हाती घेऊन शहाजहान ला कशा पृकारे तुरुंगात टाकले व त्याचे हाल केलेयाचे वणृन मनुचीनेआपल्या गृथांत केले आहे. अनेक वेळा तुरुंगात जाऊन शहाजहानची  भेट घेतली असे तो वर्णन करतो. तुरुंगात इतक्या भयंकर हाल-अपेष्टा प्रत्यक्ष बादशहाला सहन करावा लागत असतील. तर सर्वसामान्य माणसाचे काय. अशी भयंकर शिक्षा शहाजहानला दिली होती. शहाजहानला भयंकर  यातना   औरंगजेबाने तुरूंगामध्ये दिल्या होत्या.या यातना देताना निकोलस ने पाहिल्या होत्या. शहाजान चा गुलाम एक बारखिन याला शहाजान ची व्यवस्था ठेवण्याचे कार्य दिले होते. परंतु बादशहाच्या आज्ञेने त्याला शहाजानला तुरुंगवास अत्यंत त्रासदायक आणि कष्टकारक सहन करावा लागला.त्या पद्धतीचे माहीती निकोलस मनुचीने आपल्या गृथांत दीली आहे.  मोगलाचां अतगृत संघर्ष औरंगजेब मराठा संघर्ष शिवाजी महाराजमुघल संघर्ष  मुघलाचीं प्रशासन व्यवस्था यासंबंधीची माहिती निकलास मनुचीने आपल्या मोगला चा इतिहास या ग्रंथात करून ठेवलेली म्हणून इतिहास माहित होण्यासाठी आणि त्या काळातील शासन व्यवस्था  याची माहिती होण्यासाठी निकोलस मनुचीचे गृथं लिखाण अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते.

Friday, 25 June 2021

महात्मा गांधी यांची सविनय कायदेभंग चळवळ

(Sawant S. R.) 

BA---2--- इतिहास -- पेपर नं  -- ६ -- भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास -  

महात्मा गांधी यांची सविनय कायदेभंग चळवळ 

भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासामध्ये महात्मा गांधींच्या मंग चळवळीला अतिशय महत्त्वपूर्ण स्थान आहे गांधीजी ने 1920 ची असहकार चळवळ तहकुब केल्यानंतर गांधीजींना इंग्रजांनी अटक केली. केल्यानंतर स्वातंत्र्य जवळ कोणाच्या नेतृत्वाखाली लढायची असा प्रश्न निर्माण झाला. होता मोतीलाल नेहरू आणि सी आर दास या मंडळींनी स्वराज्य पक्ष ची स्थापना केली .पक्षाच्या माध्यमातून भारतीय स्वातंत्र्य चळवळ गतिमान केली ज्यावेळेला भारतामध्ये 1919 च्या करण्यासाठी आणि भारताला नवीन सुधारणा देण्यासाठी सायमन कमिशन भारतामध्ये आले 8 नोव्हेंबर 1927 रोजी त्यावेळी कमिशन मध्ये कोणत्याही भारतामध्ये जन्मलेल्या व्यक्तीचा सहभाग न्हवता साहजिकच या सायमन कमिशन ला भारतामध्ये मोठ्या प्रमाणात विरोध झाला. परिणामी हा विरोध शांत करण्यासाठी सरकारने मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली 19 मे 19 ते 28 रोजी या समितीने कष्ट करून आपला अहवाल सरकारला दिला मात्र सरकारने या अहवालाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले दरम्यानच्या कालावधीमध्ये गांधींची तुरुंगातून सुटका झाली होती england मध्ये 1929 मध्ये ससंदेच्या निवडनूका झाल्या होत्या. त्यां निवडणुकीमध्ये मजूपक्षाचा विजय झाला होता. मजूरमुळे हिंदी लोकांना आपल्याला लवकरात लवकर स्वातंत्र्य मिळेल अशी आशा वाटू लागली .मात्र  

नवीन सरकारनेदेखील भारतीयांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले . भारतीयांच्या आशे ची निराशा झाली .साहजिकच 31 डिसेंबर 1929 चा राष्ट्रसभेच्या अधिवेशनात   महात्मा गांधीजींनी सविनय कायदेभंग चळवळीचा कार्यक्रम दिला या.कार्यक्रमानुसार  

चळवळीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे होता मिठ तत्सम अन्य कायद्याचा भंग करणे शेतसारा व अन्य सरकारी कर्ज न देणे निवडणुकांवर बहिष्कार करणे कौन्सिल सरकारी समारंभ शाळा कॉलेज इत्यादी वर बहिष्कार करणे मालावर बहिष्कार करणे नशीले पदार्थ दुकानासमोर निदर्शने करणे सरकारी नोकऱ्या वर बहिष्कार करणे , असे सविनय कायदेभंग चळवळी चे कार्यक्रमाचे स्वरूप होते आणि हा कार्यक्रम संपूर्ण देशातील जनतेला देण्यात आला आणि सविनय कायदेभंग सर्व देशांमध्ये सुरू झाली.

अबुल फजलचे इतिहास लेखन: अकबर नामा

 BA---- 3 

मध्ययुगीन भारताचा इतिहास पेपर नंबर--- 14 

अबुल फजलचे इतिहास लेखन: अकबर नामा 

अकबरनामाचे मूल्यमापन---- करताना अबुल फजल ने या ग्रंथात अनेक महत्त्वपूर्ण विधान केली आहेत. अकबराच्या चरणी आपले वर्चस्व अर्पण केल्याने जो अकबराचा विरुद्ध जाईल त्यास त्याच्या कर्माचे फळ मिळेल. अशी तो भविष्यवाणी करत होता. अकबर व कट्टर इस्लाम धर्मिय यांच्यातील संघर्षात मोठ्या निर्धाराने अबुल फजल ने अकबराची पाठराखण केली. 

मुघल कालखंडामध्ये इतिहास लेखन म्हणजे हिंदू-मुस्लीम यांच्यातील संघर्ष नसून मुघल राज्य हे महत्वपूर्ण भारतीय राज्य होते व त्यास पाठिंबा होता असे अब फजल आपल्या लिखाणामध्ये म्हणतो. त्याचा लिखाणामध्ये कोठेही धार्मिक कट्टरता दिसून येत नाही.यावरून त्याच्यावर सम्राट अकबराच्या धर्म संस्थेच्या धोरणाचा प्रभाव दिसून येतो. अबुल फजल ने वस्त् स्थितीला धरुन  काम केले आहे असे म्हणता येणार नाही . 

कारण धार्मिकता नष्ट करण्यास सम्राटा ने  सर्वतोपरी प्रयत्न केला एवढेच नव्हे तर मुघलांची सत्ता खंडित करून अफगांनी सत्ता दिल्लीत  स्थापन करणाऱ्या शेरशहाच्या सर्व कामगिरीची तो निरभृच्छना करतो. अकबराच्या विजयास त्याचे सौभाग्य कारणीभूत होते असे फजल म्हणतो. युद्धा मधील विजय केवळ सहभाग यावर अवलंबून नसून त्यासाठी कष्ट परिश्रम डावपेच लष्करी तयारी या गोष्टीची आवश्यकता असते, याची अफजलला भूल पडली असावी म्हणून  फजल म्हणतो अकबराचे गुणगान करतो अबुल फजल च्या ग्रंथामध्ये अनेक दोष असले तरी तत्कालीन परिस्थितीत मुघल कालखंडाचा इतिहास शब्दबद्ध करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. आहे अकबरनामा ग्रंथ त्यामुळे इतिहास काराना मार्गदर्शक ठरत आहे. अनेक इतिहासकारांनी अबुल फजल च्या कामगिरी ची प्रशंसा केली .म्हणून फजल यास मोगल कालखंडातील अव्वल दर्जाचा इतिहासकार मानला जातो.

मध्ययुगीन भारताच्या इतिहासाची साधने -----अबुल फजल चे इतिहास लेखन अकबरनामा

(Sawant S. R.) 

BA--- 3 

मध्ययुगीन भारताचा इतिहास पेपर नंबर - 14-- प्रकरण एक:

मध्ययुगीन भारताच्या इतिहासाची साधने -----अबुल फजल चे इतिहास लेखन अकबरनामा 

                मुघलाच्या भारताच्या इतिहासामध्ये समृठ अकबराच्या समकालीन अबुल फजल हा अकबराच्या दरबारातील विव्दान व्यक्ती  होता. हा मोगल कालखंडातील श्रेष्ठ साहित्यिक म्हणून पृसिध्द आहे . तो कुशल राजकारणी सेनानी पुरोगामी विचारवंत होता. त्याचा जन्म 14 जानेवारी 1551 मध्ये झाला वडीलआणि भाऊ हे अकबराच्या पदरी होते त्यामुळे त्याला देखील अकबराच्या दरबारात मध्ये काम करण्याची संधी मिळाली.,   

बुद्धिमत्ता आणि कुशलता याच्याजोरावर तो अकबराच्या दरबारातील एक विश्वासू व्यक्ती बंनला.आपल्या पांडित्याच्या छाप अकबरावर पाडली होती. अबुल फजल चे गुण हेरून अकबराने त्यास  मोगल साम्राज्याचा इतिहास लीहण्याचीकामगिरी सोपवली .आणि मोठ्या कष्टाने ती त्याने पार पाडली .अबुल फजल ने अकबरनामा हा प्रमुख ग्रंथ लिहिला. त्याने तीन भागांमध्ये त्याचे लिखान केले. पहिल्या  

पहिल्या भागामध्ये तैमुर पासून हुमायुन पर्यंतचा मोगलांचा इतिहास कथन केला आहे बाबर भारतात येण्याची कारणे पहिले पानिपतचे युद्ध दिल्लीवर मुघल सत्तेची स्थापना हुमायुनङाच्या जीवनातील अडचणी अबुल फजल ने लिहलेल्याआहेत. अकबर पूर्व इतिहास जाणून घेण्यासाठी हा पहिला विभाग महत्त्वाचा आहे. दुसर्‍या विभागात सम्राट अकबराची कारकीर्द रेखाटली आहे. अकबर पत्ती अबुल फजल चा निष्ठा एकवटल्या होत्या.  

अकबराचे महान व्यक्तिमत्त्व बनवण्याचा त्याने प्रयत्न केला. दुसऱ्या भागांमध्ये इतिहास धर्म तत्त्वज्ञान यासंबंधीचे विवेचन त्याने केले. आहे अकबर अबुल फजल च्या मृत्यूपर्यंत चा इतिहास या खंडांमध्ये रेखाटण्यात आला आहे. त्यानंतर तिसरा भाग आईन ए अकबरी म्हणून ओळखला जातो या ग्रंथाचे पाच भाग पाडण्यात आले आहेत अबुल फजल ने आपल्या इतिहासलेखनात प्राथमिक साधनांना महत्त्वपूर्ण मानले आहे याची त्याच्यावर जबाबदारी असल्याने दरबारी कागदपत्रे फर्मान विमान वतने अधिकार पत्रे याचा त्याला अभ्यास करता आला. अनेक अधिकारी सरदार अनुभवी व्यक्तींच्या कडून त्याने माहिती मिळवली. घटना पडताळून पाहून त्याने त्याचा स्वीकार केला. नि काम करण्यापूर्वी ती माहिती अकबरा कडे तपासणीसाठी पाठवत होता.  सुवर्णमय ग्रंथामध्ये इतिहासाच्या अभ्यासासाठी साधने अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. सांगतो इतिहासाच्या अभ्यासातून मानवाच्या दुःख व वेदना कमी होऊन त्यास भविष्याची वाटचाल सुकर पणे करता येते असे अबुल फजल म्हणतो .राजकीय दृष्ट्या तों पक्षपाती होता तर धार्मिक दृष्ट्या तो धर्मनिरपेक्ष होता. तर्कावर आदित्य  सत्य-असत्य शोधून काढण्याचा प्रयत्न करत होता.  अकबरनामा मध्ये तू झुक मे बाबरी व मनुस्मृती या ग्रंथामधून काही उतारे घेतले आहेत .त्याच्या लिखाणामध्ये अनेक महत्त्वपूर्ण साधनांचा आधार घेतल्याने त्याचे लिखाण महत्त्वपूर्ण आहे असे म्हणावे लागेल .

Tuesday, 22 June 2021

असंहकार चळवळीचे मूल्यमापन

(Sawant S. R.) 

बी ए भाग 2 इतिहास विभाग पेपर नंबर--6  भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास आहे--  

असंहकार  चळवळीचे मूल्यमापन -- 

असहकार सर्वांचे मूल्यमापन करत असताना या चळवळीला पूर्णपणे यश मिळाले नाही. हे खरे असले तरी त्यातून काही गोष्टी मध्ये यश देखील प्राप्त झाले या चळवळीचे मुल्यमापन पुढील प्रमाणे करता येइल --- 

महात्मा गांधींनी असहकार चळवळ चोरा चौरी येथील घटनेमुळे थांबवली. परिणामी देशातील सर्व सर्वसामान्य जनता नेतेमंडळी त्यामध्ये सहभाग असणारा वर्ग निराश झाला. गांधीना हिंसाचार अजिबात मान्य नव्हता. परिणामी ही चळवळ थांबवली गेली. त्यानंतर गांधीजींनी भारतीय जनता आंदोलनाला प्रशिक्षित झाल्याशिवाय आणि त्याचबरोबर सत्य अहिंसा सत्याग्रह याचं योग्य आकलन झाल्याशिवाय चळवळ राबवणे चूक ठरेल असे गांधींना वाटले. त्यामुळे त्यांनी ही चळवळ तहकूब केली. दुसरे म्हणजे 

खिलाफत चळवळ  ही धार्मिक चळवळ होती .या चळवळीला पाटिबां  देणे चूक होती .परिणामी हिंदू-मुस्लीम त्यातून फारसे सख्य स्थापन झाले नाही .त्याच बरोबर ही चळवळ तुर्कस्तानच्या खलिफा विषयी होती. सहाजिकच खिलाफत चळवळीला पाठिंबा देणे ही महात्मा गांधीजीची चूक होती. असे जनतेला वाटू लागले.त्याचबरोबर गांधींचे एक वर्षात स्वराज्य मिळवून देणे गांधीजी म्हणाले होते तसे झाले नाही .यावर देखील मोठ्या प्रमाणात टीका झाली. पदव्या 

मान सन्मान याचा त्याग बऱ्याच लोकांनी केला नाही हा त्याग मोठ्या प्रमाणात लोकांनी केला असता तर त्याचा परिणाम निश्चितच झाला असता.परिणामी ही चळवळ अपयशाला हे एक  

कारण ठरले असले तरी देखिल असहकार चळवळ मध्ये काही उणिवा राहिल्या तरीदेखील काही उल्लेखनीय कामगिरी निश्चित झाली. ते पुढीलप्रमाणे यामध्ये राष्ट्रीय चळवळ सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचली आतापर्यंत फक्त शहरी मध्यमवर्ग पुरती असलेली राष्ट्रीय चळवळ खेड्यापाड्यातील पोचली.हे फार मोठे यश होते. असे डॉक्टर राजेंद्र प्रसाद म्हणतात. काँग्रेस कृतिशील संघटना बनली काँग्रेस फक्त मोर्चा निवेदन हरताळ या माध्यमाचा वापर करत होती. परिणामी त्याला अपेक्षित असे यश प्राप्त होत नव्हते. संघटनात्मक मरगळ आली होती. या चळवळी मूळे राष्ट्रसभा एक कृतिशील व्यासपीठ बनले. त्यानंतर सरकार विषयी भीती नष्ट झाली सामान्य माणसांची तुरुंगवास आणि सरकार बद्दलची भीती दूर झाली हजारो लोक पोलिसांचा लाट्या काठ्या खाण्यास व तुरुंगात जाण्यास आनंदाने तयार होऊ लागले. तुरुंगातून लोक बाहेर जाईना म्हणून ब्रिटिश पोलीस भारतीयांना  बाहेर आणून सोडू लागले.आंदौलकाशी कसे वागावे हेच पोलीस व सरकारला कळेनासे झाले.हे चळवळीचे यश होते.स्वराज्य हे अंतिम ध्येय ठरले आता पयृंत सुधारणा मागणाऱ्या कॉंग्रेसचे नजिकचे ध्येय स्वराज्य ठरले. हा  या आंदोलनातील मोठे यश मानावे लागे या असहकार आंदोलनामुळे हिंदी जनतेत नवीन चैतन्य निर्माण होण्यास मदत झाली .

Monday, 21 June 2021

महात्मा गांधीजींची असहकार चळवळीची कारणे

 Sawant R., [21.06.21 14:43]

BA--2  भारतीय स्वातंत्र्या चळवळीचा इतिहास पेपर नंबर 6 --महात्मा गांधीजींची असहकार चळवळीची  कारणे--- 

महात्मा गांधींनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीसाठी असहकार आंदोलनाची घोषणा करण्याचा अगोदर हे आंदोलान  का करावं लागलं आपण बघणार आहोत.या मध्ये पहिले कारण रौलट अॕक्ट हे कायदे क्रांतिकारकांचा मोठ्या प्रमाणात उदय होत होता. त्या प्रमाणात ब्रिटिशांना त्याची धास्ती वाटत होती, भारतीय लोकांच्यादेश द्रोही हालचाली रोखण्यासाठी मिस्टर रौलट  यांच्या अध्यक्षतेखाली ब्रिटिश सरकारने एक समिती नेमली. आणि तिच्या शिफारशीनुसार 1919 आली सरकारने  कायदे केले त्याला रोलेट कायदा म्हणतात. या कायद्यानुसार भारतीय याःच्यावरविनाचौकशी खटला दाखल केला जानार होता. शिक्षा झाल्यास त्याला उच्च न्यायालयात अपील करता येणार नव्हते.  पोलीस कचेरीतुन रोज हजेरी लावणे ही सक्ती केली गेली होती. सरकारला दडपशाहीचे एक प्रकारे स्वातंत्र्य या कायद्यामुळे मिळाले होते. अशा कायद्यामुळे भारतीय लोकांच्या वर प्रचंड दडपशाही केली गेली .हे जुलमी कायदे मी चालु देणार नाही हे गांधीजींनीत्या वेळी ठणकावून सांगितले आणि त्यांनी 30 मार्च 1919 देश व्यापी आंदोलनाची तारीख घोषित केली त्यानंतर  जालियनवाला बाग हत्याकांड घडले भारत देशाच्या इतिहासातील अतिशय व अमानवी घटना म्हणजे 1919चे  जालियनवाला  बाग हत्याकांड होय रौलट कायद्याला विरोध म्हणून पंजाब मोठ्या प्रमाणात संघर्ष सुरू होता 13 एप्रिल 1919 रोजी अमृतसरच्या जालियनवाला बागेत निषेध सभा आयोजित केली होती या सभेला हजारो लोक जमले होते ही संधी साधून पटांगण बंदिस्त होते त्याला एकच आत-बाहेर करण्यास वाट होती त्या संधीचा फायदा घेऊन ही वाट जनरल डायरने बंद केली .आणि ब्रिटिश सैनिकांन करवी बंदुकी द्वारे हजारो गोळ्या हिंदी जनतेवर मारल्या यामध्ये चारशे लोक मारले गेले हिंदुस्तानच्या इतिहासात अशा प्रकारच्या हत्याकांडाने देश पेटून उठला ही घटना घडल्यानंतर व्हाइस राॕय ओडवायरने जनरल डायर ला शाबासकी दिली या मुळे भारतीयांच्या  मनातअसंतोष निर्माण झाला. अधिकच  हे आंदोलन गतिमान करण्याचा निर्णय घेतला त्यासाठी गांधीजीने मुस्लिम समाजाची  खिलापत चळवळ सुरू होती त्या चळवळीला पाठिंबा दिला या पाठिंबा च्या निमित्ताने हिंदू मुस्लिम लोक मोठ्या प्रमाणात भारतीय स्वातंत्र्यासाठी एका ठिकाणी आले एक प्रकारे ब्रिटिशाना  मोठा इशारा होता. या सगळ्याला भारतातील जालियनबाग हत्याकांडाची चौकशी करन्या साठी व भारतीय  असंतोष शांत करण्यासाठी सरकारने हंटर कमिशनची नियुक्ती केली होतीत्याचा अहवाल 23 मे 1919 रोजी  प्रसिद्ध केला जनरल ला दोषी ठरवून त्याला निवृत्त केले. इंग्लंडमध्ये डायरच्या सन्मानासाठी इंग्रज साम्राज्याचा त्राता म्हणून निधी उभारला गेला. यावेळेला भारतामध्ये त्याच्या मुळे तीव्र असंतोष पसरला. या सर्वांचाच परिपाक म्हणजे कोणत्याही परिस्थितीत अहिंसा मार्गाने आक्रमक असे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आणि हे आंदोलन म्हनजे असहकार आंदोलन चळवळ होय या आंदोलनाला वरील कारणे कारणीभूत ठरली आणि याच कारणामुळे ब्रिटिशांच्या वरचा गांधींचा विश्वास उडाला .म्हणून  त्यांनी  असहकार आंदोलनाची घोषना केली.लावून त्याची चौकशी केली जानार होती. या कायद्याच्या माध्यमातून भारतीयानां ञास दिला जात होता. त्याच्यावर अपील करता येणार नव्हते.शिवाय विनाचौकशी कोणत्याही भारतीय व्यक्तीला अटक करता येणार होते. या कायद्याला विरोध करन्यासाठी13-4-1919 ला अमृतसर मध्ये जालियनवाला बागेमध्ये मोठ्या प्रमाणात विरोध करण्यासाठी लोक एका ठिकाणी जमले असताना .ब्रिटिशांनी त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला .त्याच्या मध्ये 400 लोक मारले गेले 13 एप्रिल 1919  रोजी ची घटना आहे या घटनेमुळे देशात असतोंष निर्माण  झाला.परीनामी गांधींना ब्रिटिशांच्या वर विश्वास दाखवली ती चूक लक्षात आली. त्यानंतर त्यांनी सर्व भारतीयांच्यात ऐक्य निर्माण व्हावे  या साठी स्वातंत्र्यलढ्यात मुस्लिमांनी देखील सहकार्य मिळावे यासाठी महात्मा गांधींनी खिलापत चळवळीला पाठिंबा दिला  त्याचबरोबरजालीयन बाग हत्याकांड करन्यातत आले.परीणामी वरील सर्व  कारना मुळे देशात असतोष निर्माण  झाला"देशाने त्या वेळी गांधीनी  ब्रिटिशांच्या विरोधात   आंदोलन सुरू केले .करन्याचा निर्णय  घेतला गांधीजी नी1920 चे असहकार चळवळ चे आंदोलन हाती घेतले 4 -9-1920रोजी कलकत्ता येथे भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात असहकार  आंदोलनाचा ठराव पास केला. गेला आणि पुढे असहकार चळवळीचा कार्यक्रम निश्चित करून हे आंदोलन सुरू केले गेले .या आंदोलनाचे कार्यक्रमां मध्ये  पुढील गोष्टीचा अंतर्भाव होता. यामध्ये  लोकांनी ब्रिटिश सरकारने दिलेल्या पदव्या मानसन्मान अधिकार पदे याचा त्याग करायचा. स्वदेशी मालाचा वापर.परदेशी मालावर बहिष्कार टाकायचा.सरकारी  सभा कार्यक्रमांना हजर राहायचे नाही. सरकारी शाळा महाविद्यालय विद्यापीठे यातून शिक्षण घ्यायचे नाही .ब्रिटिश न्यायालयावर


Sawant R., [21.06.21 14:43]

बहिष्कार टाकायचा. भारतीय लोकांनी न्याय पंचायत सुरू करायच्या .स्थानिक स्वराज्य संस्था कायदेमंडळ यांचे वर बहीष्कार टाकायचा .  कायदेमंडळाच्या निवडणुका बहिष्कार टाकायचा अशा पद्धतीचा असहकार आदोंलनाचा चा कार्यक्रम होता. आणि या निमित्ताने गांधींच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू केले गेले या चळवळीमुळे 

देशामध्ये स्वदेशीचा जोरदार पुरस्कार केला गेला स्वदेशी मालाच्या उत्पादनासाठी प्रोत्साहन दिले गेले हातमागाच्या व्यवसायाचे पुनर्जीवन झाले. दारुबंदीचा प्रचार अस्पृश्यता निवारण हिंदू-मुस्लीम एक्य या साठी यासाठी प्रयत्न होऊ लागली लोकांनी पदव्या व मानसन्मान यांचा त्याग केला नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी आयसीएस पदवीचा त्याग केला गांधीजीनी कैसर-ए-हिंद या पदवीचा त्याग केला रविद् नाथ टागोर यांनी सर या पदविचा त्याग केला.परीनामी असहकार  चळवळ सर्वसामान्य माणसापर्यंत ते उच्चशिक्षित तरुण या चळवळीमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झाले. हे आदोंलन ब्रिटिशांनी दडपून   टाकण्याचा प्रयत्न  केला त्यात  ब्रिटिशांना यश आले नाही . या आंदोलनात अनेक लोकांना अटक केली गेली 1921 25 हजार कार्यकर्त्यांना केले गेले होते.तरी देखील  हे आंदोलन सुरु होते.हे आंदोलनसुरुअसताना  उत्तर  पृदेश चौरी चौरा येथे5--2-1922 रोजी बंदीचा सत्याग्रह सुरु असताना पोलीस आणि जनता यांच्यामध्ये संघर्ष झाला. यामध्ये भारतीय जनतेने पोलिसांना मारहाण करून .त्याना ठिर मारले. पोलीस चौकी जाळली. परिणामी महात्मा गांधींनी ही चळवळ तहकूब  केली.जोपर्यंत अहिंसेचे महत्व लोकांना कळत नाही तो पयृतं कोणतीही चळवळ यशस्वी होणार नाही . अशी गांधीनी  खूणगाठ बांधली .आणि यामुळेच असहकार चळवळ त्यांनी मागे घेतली. अनेकांना हा निर्णय आवडला नाही. ही संधी साधून  10 मार्च 1922 रोजी गांधीजींना अटक केली त्यामध्ये त्यांना सहा वर्षाची शिक्षा दिली. असहकार चळवळी चे  मूल्यमापन करताना असे लक्षात येते कीया चळवळी ला जरी अपेक्षित यश मिळाले नाही तरी .भारतीय  स्वातंत्र्याची चळवळ सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचली. काँग्रेसचे कृतिशील संघटना बनली सरकार बद्दलची लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली होती ती भीती नष्ट झाली. आतापर्यंत सुधारणा मागणाऱ्या काँग्रेसचे नजिकचे ध्येय स्वराज्य ठरले .हे  आंदोलनाचे यश होते. या आंदोलनामुळेच त्यामध्ये नवचैतन्याची निर्मिती झाली नवीन विचार करायचे सुरुवात झाली. कार्यकर्त्यांची फळी तयार झाली.  जरी ही चळवळ यशस्वी झाली नसली तरी अ यशस्वी झाली अशी देखील म्हणता येणार नाही. मात्र या चळवळीमुळे हिंदुस्तान स्वातंत्र्य चळवळ विषयी जागृत झाला असे मात्र नक्कीच म्हणावे लागेल.

गांधीयुग

(Sawant S. R.) 

भारतीय  स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास. पेपर न.६---  

प्रकरण-2 --गांधीयुग 

भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासातील 1920 ते 1947 या कालखंडाला गांधी युग असे म्हटले जाते.या काळात गांधीजींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्याचा लढा यशस्वी झाला .गांधींचे पूर्वचरित्र. 2 ऑक्टोंबर सोळा 1869 रोजी पोरबंदर येथे त्यांचा जन्म झाला. 1888 ते 1891 या काळात त्यांनी इग्लंड मध्ये वकिलीचे शिक्षण पूर्ण केले.  

 वकिलीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर.1893 गांधीजी वकीलीच्या व्यवसायासाठी दक्षिण आफ्रिकेला गेले. 

तेथे त्यांना गोऱ्या लोकांच्या कडून  अपमानास्पद वागणूक मिळाली त्या  अनुभवामुळे गांधींच्या आयुष्याला वेगळी कलाटणी  मिळाली .आणि यातूनच गांधीवादाची सुरुवात झाली .महात्मा गांधींचे तत्वज्ञान हे सत्य. अहिंसा.सत्याग्रह.याच्या आधारावर आधारलेले होते. गांधीजीनी स्वातंत्र्य चळवळ  यशाश्वी करण्या साठी पुढील , मागृचा अवलंब केला त्यामध्ये असहकार .सविनय कायदेभंग.आणि चले जाव. या चळवळी भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील त्यांच्या महत्त्वाच्या होत्या. आणि याच चळवळीच्या जोरावर त्यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळ यशस्वी केली.  

दक्षिण आफ्रिकेमध्ये देखील गोऱ्या लोकांच्या विरुद्धआंदोलन यशस्वी केले होते. 1915 मध्ये महात्मा गांधीजी भारतात आले. नामदार गोखले यांचे त्याना मार्गदर्शन लाभले. 1916  त्यांनी साबरमती आश्रम स्थापन केला .आणि त्यानंतर त्यांनी  देशसेवेला वाहून घेतले.भारतामध्ये प्रथम त्यानी चंपारण्य सत्याग्रह केला.त्यानंतर 1918 ला खेडा सत्याग्रह केला. 1919 ला गिरणी कामगारांसाठी पहिले उपोषण केले. या आंदोलनामध्ये गांधीजींना मोठ्या प्रमाणात यश मिळाले .वेगवेगळ्या आंदोलनामध्ये गांधींना मिळालेल्या  यशामुळे लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर देशाने त्यांचे नेतृत्व स्वीकारले . यानंतर त्यांनी ब्रिटिशांच्या विरोधात  असहकार आंदोलन सुरू केले .

Resume writing_Short answer type questions

Short answer type questions: 1.    What is the primary purpose of a resume, and how can a well-designed resume benefit a job applicant? ...