Showing posts with label Sangram Patil. Show all posts
Showing posts with label Sangram Patil. Show all posts

Friday, 16 July 2021

नागरी सहकारी बँका ( Urban Co - Operative Banks )

 (S D Patil)

B.A II Sem IV

Co-Operatives in India Paper II

Unit – I

घटक -  नागरी सहकारी बँका  ( Urban Co - Operative Banks )

नागरी सहकारी बँका

 

 जर्मनी इटली देशांतील नागरी सहकारी चळवळीपासून प्रभावित होऊन भारतातही नागरी सहकारी पत संस्था स्थापन होण्यास सुरुवात झाली. फब्रुवारी १८८९ ला प्रा. विठ्ठल लक्ष्मण कवठेकर यानी बडोदा शहरात "परस्पर सहाय्यकारी मंडळी" ची स्थापना, काही महाराष्ट्रीयन मध्यमवर्गीयांच्या मदतीने केली. या सस्थेपासून प्रेरणा घेऊन बॉम्बे प्रांतातही नागरी सह. पत सस्था स्थापन झाल्या. १९०४ च्या कायद्याने त्यांना कायदेशीर दर्जा मिळाला. १९४९ चा बकिंग नियमन कायदा ( Banking Regulation Act ) मार्च १९६६ रोजी नागरी सहकारी बँकाना लागू करण्यात आला.

 

व्याख्या :

बँकिंग नियमन कायदा -१९४९ नुसार नागरी सहकारी बँकांना प्राथमिक सहकारी संस्था समजण्यात येते याचा अर्थ या बँका सहकारी त्रि-स्तरीय रचनेतील सर्वात खालच्या पातळीवर मात्र शहरी भागात कार्य करणाऱ्या प्राथमिक संस्था आहेत. या कायद्यानुसार ना. . बँकेची व्याख्या पुढीलप्रमाणे केली जाते- "नागरी सहकारी बँक म्हणजे प्राथमिक कृषी सहकारी पत संस्थेव्यतिरिक्त अशी प्राथमिक सहकारी संस्था की,

१)     जिचा प्राथमिक उद्देश बँकिंग व्यवसाय करणे हा आहे,

२)     जिचे भागभांडवल राखीव निधी एकूण किमान एक लाख रुपयांपेक्षा कमी नाही, आणि

३)     जिच्या पोट नियमात ( bye lanss ) इतर सहकारी संस्थांना सभासदत्व देण्याची तरतूद नाही."

 

कार्य :

व्यापारी बँकांप्रमाणे ना. . बँका नागरी भागात बँकिंग विषयक कार्ये करतात - () ठेवी स्विकारणे () कर्जे देणे () सुरक्षा कक्ष, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड () पैशाची पाठवणी () हुंड्या वटविणे इत्यादी.

 

नियंत्रण :

ना. . बँकावर  RBI तसेच राज्य सरकारचे सहकार खाते यांचे नियंत्रण असते. याला "दुहेरी नियंत्रण" ( Dual Control ) असे म्हणतात.

 

प्रगती :

भारतात मार्च २०१७ अखेर ,५६२ ना. . बँका होत्या, ज्यांपैकी ५४ अनुसूचित होत्या, तर ,५०८ गैर- अनुसूचित होत्या. या नागरी सहकारी बँकांपैकी सर्वाधिक ना. . बँका महाराष्ट्रात आहेत.

राज्य सहकारी बँका ( State Co - operative Banks )

 (S D Patil)

B.A II Sem IV

Co-Operatives in India Paper II

Unit – I

घटक -  राज्य सहकारी बँका ( State Co - operative Banks )

राज्य सहकारी बँका

 

स्वरूप :

राज्य सहकारी बँक सहकारी त्रिस्तरीय रचनेच्या शिरोभागी असते. म्हणून तिला शिखर बँक असेही म्हणतात. ती एका बाजुला जिल्हा मध्य. बँका तर दुसऱ्या बाजुला RBI NABARD यांच्यात दुव्याचे कार्य करते.

 

सदस्यत्वः

राज्यापरत्वे रा. . बँकेची रचना वेगवेगळी आहे. मात्र साधारणपणे तिच्या सदस्यांमध्ये जि. . . बँकांचे प्रतिनिधी तसेच वैयक्तिक भागधारक यांचा समावेश होतो.

 

नियंत्रणः

रा. . बँकांवर NABARD चे नियंत्रण असते. NABARD त्यांना () पुनर्वित्त पुरवठा करते, () पुनर्वटवणुकीच्या सोयी प्राप्त करून देत, () चळवळीबद्दल महत्त्वाची माहिती पुरवते.

 

कार्ये :

१)      जि. . . बँकांना त्यांच्या माध्यमातून प्राथमिक सहकारी संस्थांना वित्तपुरवठा करणे, तसेच त्यांच्या कार्याचे नियंत्रण पर्यवेक्षण करणे.

२)     शिखर बँक शहरी भागातून ठेवी गोळा करून जि. . . बँकांच्या माध्यमातून ग्रामीण भागात पसरविण्याचे कार्य करतात.

३)     शिखर बँकेला सामान्यत: व्यापारी बँक विषयक कार्ये करण्यास मनाई असते. मात्र सध्या (फेब्रुवारी २०१३) ३१ राज्य सह. बँकांपैकी १५ बँकांना रिझर्व्ह बँकेने व्यापारी बँक व्यवसायाचा परवाना दिला आहे.

४)     शिखर बँक जि. . . बँकांमधील समतोल राखणारे केंद्र ( Balance Centre ) म्हणून कार्य करते. काही जि. . .  बँकांकडील अतिरिक्त निधी इतर गरजू जि. . . बँकांकडे वळविण्याचे कार्य ती करते. जि. . . बँकांना आपापसात कर्जे घेण्या-देण्यास संमती नाही.

 

भांडवल  उभारणी :

रा. . बँका पुढील मार्गांनी आपले भांडवल उभारतात.

१)      स्वस्वामित्व निधी :

यात भाग-भांडवल राखीव निधीचा समावेश होतो. भाग-भांडवल पुरवठा सदस्य जि. . . संस्था, इतर सदस्य सह. संस्था, वैय्यक्तिक सदस्य राज्य  सरकारमार्फत केला जातो.

२)      ठेवी :

जि. . . बँका, सहकारी संस्था, व्यक्ती, स्थानिक संस्था इत्यादींच्या.

३)     कर्जे :

NABARD , SBI , व्यापारी बँका , राज्य सरकार . कडून मिळालेली कर्जे.

 

विस्तार :

भारतात मार्च २०१७ अखेर ३३ रा. . बैंका होत्या त्यांच्या ९८६ शाखा होत्या.

महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्य सहकारी बँक शिखर बैंक म्हणून कार्य करते. तिचा स्थापना स्वातंत्र्यापूर्वीच ११ ऑक्टोबर, १९११ रोजी करण्यात आली होती. तिची चार प्रादेशिक कार्यालये आहेत: औरंगाबाद, नाशिक, पुणे नागपूर

BCOM_AEC

https://drive.google.com/file/d/1F1IRMakowHOCmho9iSvSdqoPKh2SWmVe/view?usp=sharing