Showing posts with label Management. Show all posts
Showing posts with label Management. Show all posts

Wednesday, 30 June 2021

नेतृत्व व त्याचे प्रकार

 िषय-व्यवस्थापनाची तत्त्वे आणि उपयोगिता

B.Com I  Sem  II

उपघटक- नेतृत्व व त्याचे प्रकार 


व्याख्या- अपेक्षित उद्दिष्टे गाठण्यासाठी लोकांना संघटित करून त्या पूर्ती साठी प्रयत्न करणे होय.


नेतृत्वाचे प्रकार-

1 -लोकशाही नेतृत्वशैली-

                                      लोकशाही नेतृत्वशैली ही सर्वार्थाने योग्य ठरते.यामध्ये व्यवस्थापन व कर्मचारी हे एकमेकांचे विचार करून निर्णय घेतात. त्यामुळे निर्णय योग्य ठरतात. तसेच व्यवस्थापक व कर्मचारी यांचे संबंध चांगले राहतात. या नेतृत्वशैली प्रकारात अन्याय होण्याची शक्यता कमी असते. पण काही वेळेला व्यवसाय संधीचा फायदा घेता येत नाही. 


2-हुकूमशाही नेतृत्वशैली-

                                      यामध्ये एकटा व्यवस्थापन वर्ग निर्णय घेतो. तसेच काही वेळा स्वतः चे हीत लक्षात घेवून निर्णय घेतला जावू शकतो. या नेतृत्वशैली प्रकारात कर्मचारी अस्वस्थ असतात.तसेच ते प्रामाणिक काम करण्याची शक्यता कमी असते. कारण कोणत्याही निर्णय प्रक्रियेत त्यांना विचारात घेतले जात नाही. 


3- मुक्त नेतृत्वशैली-

                             ही नेतृत्वशैली व्यवस्थापन प्रक्रियेत अव्यवहार्य ठरते. या नेतृत्वशैली प्रकारात व्यवस्थापक व कर्मचारी या दोघांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असते.त्यामुळे मनमानी व अनागोंदी निर्माण होण्याची दाट शक्यता असते. व्यवस्थापक व कर्मचारी यांचे समन्वय अजिबात राहत नाही.

नियोजन व त्याचे प्रकार

 िषय-व्यवस्थापनाची तत्त्वे आणि उपयोगिता

बी-काॅम 1 सेम II

उपघटक-नियोजन व त्याचे प्रकार

नियोजन व्याख्या-

                           भावी प्रक्रिया व भविष्यात तिची अंमलबजावणी करण्याची योजना म्हणजे नियोजन होय.


नियोजन प्रकार-

1-उत्पादन नियोजन-  उत्पादन नियोजनात उत्पादनाची संख्या, दर्जा, खर्च, मालाची उपलब्धता यासंधी नियोजन केले जाते. नियोजन ही व्यवसाची मुलभूत प्रक्रीया आहे.


2- वित्त नियोजन-  व्यवसायाच्या सर्व क्रिया साठी पैशाची गरज असते. भांडवल उभारणी व इतर गुंतवणूक साठी वित्त नियोजन गरजेचे आहे. वित्त नियोजनानुसार वित्ताची उपलब्धता होणे गरजेचे आहे.


3- विपणन नियोजन- विपणन हा व्यवसायाला उत्त्पन मिळवून देणारा प्रमुख मार्ग आहे.विक्री वाढ व ग्राहकाच्या गरजांचे समाधान करणे यासाठी विपणन नियोजन गरजेचे आहे. 


4- अल्पकालीन नियोजन-  अल्प काळासाठी केलेल्या नियोजनाला अल्पकालीन नियोजन म्हणतात.हे नियोजन एकवर्षा पर्यंत असते.तसेच हे नियोजन यशस्वी होण्याची शक्यता अधिक असते. 


5- दीर्घ कालीन नियोजन-  ही नियोजन प्रक्रिया एकवर्षा पेक्षा अधिक चालते.या नियोजनात उद्दिष्टे व धोरणांचा समावेश असतो.तसेच या नियोजनात तज्ञ व्यक्तींची गरज असते. मोठी दूरदृष्टी ठेवून हे नियोजन करावे लागते. 


6 - प्रशासकीय नियोजन- हे नियोजन दीर्घ कालीन नियोजन असते. उच्च व्यवस्थापन हे नियोजन करावे लागते व त्यामध्ये प्रशासनाला व्यवसायाच्या सर्व विभागांना समाविष्ट करून घ्यावे लागते.

कार्यप्रेरणा व त्याचे महत्त्व

(K.S.Powar)

 िषय-व्यवस्थापनाची तत्त्वे आणि उपयोगिता

        बी- काॅम  1 सेम  2

विषय- व्यवस्थापनाची तत्त्वे आणि उपयोगीता


 घटक- कार्यप्रेरणा                                                                              उपघटक - कार्यप्रेरणा व त्याचे महत्त्व 

 


कार्यप्रेरणा व्याख्या- अपेक्षित ध्येय प्राप्तीसाठी प्रयत्न करण्यास लोकांना उत्तेजित करण्याची प्रक्रीया म्हणजे कार्यप्रेरणा होय.


महत्त्व-

1-कार्यक्षमतेत वाढ

     कार्यक्षमतेत वाढ होण्यासाठी कर्मचार्यांना योग्य प्रशिक्षण व प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.  

2-उत्पादनात वाढ 

        उत्पादनात वाढ होणे हे कोणत्याही व्यवसायासाठी महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी कार्यप्रेरणा हा मूळ स्ञोत आहे

3-कर्मचार्यांचे सहकार्य 

            कर्मचार्यांचे सहकार्य मिळवण्यासाठी त्यांच्या बरोबर आपुलकीचे संबंध असणे गरजेचे असते.त्यामुळे काम करण्यासाठी निश्चित प्रेरणा मिळते. 


4- निष्ठा व आत्मीयता 

         निष्ठा व आत्मीयता ही सुद्धा कर्मचार्यांचे सहकार्य मिळवण्यासाठी गरजेचेची आहे. पण ती दोन्ही कडून असली पाहिजे. त्यामुळे कर्मचार्यांना काम करण्याची प्रेरणा मिळते. 


5- कौशल्याचा विकास

            कर्मचार्यांचे कौशल्याचा विकास होण्यासाठी व्यवसायाने प्रशिक्षणाच्या विशेष सोयी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. 

6-संबंधात सुधारणा 

            कर्मचार्यांरी व व्यवस्थापन यांच्यामध्ये योग्य सुसंवाद असला पाहिजे.  त्याचा सकारात्मक परिणाम व्यवसायावर होतो.तसेच कंपणीची बाजारपेठातील प्रतिमा सुधारते.

7- उत्पादन खर्चात घट-

             उत्पादन खर्चात घट होण्यासाठी कर्मचार्यांचे विशेष सहकार्य अपेक्षित असते. जर कर्मचार्यांनी पूर्ण क्षमतेने काम केले तर त्यामुळे उत्पादनखर्चात बचत होते. 

             





















             

BCOM_AEC

https://drive.google.com/file/d/1F1IRMakowHOCmho9iSvSdqoPKh2SWmVe/view?usp=sharing