Skip to main content

Posts

Showing posts from December, 2024

Woaman on a Roof

 (e-content developed by Prof. (Dr) N A Jaranadikar ‘अ वूमन ऑन अ रुफ ’ ही कथा डोरिस लेसिंग या लेखिकेने लिहिली आहे. स्त्रीकडे पाहण्याचा पुरुषी समाजाचा दृष्टीकोन यावर ही कथा भाष्य करते. ही कथा लंडन शहरामध्ये घडते. साधारणपणे सहा दिवसांचा काळ या कथेत मांडला आहे. स्टॅनले , टॉम आणि हॅरी ही कथेतील मुख्य पात्रे आहेत. हे तिघेही कामगार आहेत.   हॅरी हा ४५ वर्षांचा असून तिघांमध्ये सर्वात वयाने मोठा आहे. टॉम हा १७ वर्षांचा आहे. स्टॅनलेचे नुकतेच ३ महिन्यांपूर्वी लग्न झाले आहे. या कथेमध्ये जून महिन्यातील शेवटच्या आठवड्याचे वर्णन केले आहे. यावेळी लंडनमध्ये उष्णतेची लाट आली आहे, आणि हे तिघेही एका रुफवर (रुफ – छत) प्लंबिंग दुरुस्तीचे काम करत आहेत. प्रचंड उन्हामुळे हे काम करणे त्यांना कठीण जात आहे. याचवेळी त्यांना दुसऱ्या एका रुफवर एक मध्यमवयीन स्त्री तोकड्या कपड्यात उन्हात पुस्तक वाचत पडलेली दिसते. इथून सगळ्या नाट्याला सुरुवात होते. त्यांचे आपल्या कामावरून लक्ष हटते. तिच्याकडे पहात ते ओरडू लागतात. ती स्त्री यांच्याकडे फारसे लक्ष देत नाही. दुसऱ्या दिवशी हाच प्रकार घडतो. हळूहळू या तिघांची भीड च...