Skip to main content

Woaman on a Roof

 (e-content developed by Prof. (Dr) N A Jaranadikar

‘अ वूमन ऑन अ रुफ ही कथा डोरिस लेसिंग या लेखिकेने लिहिली आहे. स्त्रीकडे पाहण्याचा पुरुषी समाजाचा दृष्टीकोन यावर ही कथा भाष्य करते. ही कथा लंडन शहरामध्ये घडते. साधारणपणे सहा दिवसांचा काळ या कथेत मांडला आहे. स्टॅनले, टॉम आणि हॅरी ही कथेतील मुख्य पात्रे आहेत. हे तिघेही कामगार आहेत.  हॅरी हा ४५ वर्षांचा असून तिघांमध्ये सर्वात वयाने मोठा आहे. टॉम हा १७ वर्षांचा आहे. स्टॅनलेचे नुकतेच ३ महिन्यांपूर्वी लग्न झाले आहे. या कथेमध्ये जून महिन्यातील शेवटच्या आठवड्याचे वर्णन केले आहे. यावेळी लंडनमध्ये उष्णतेची लाट आली आहे, आणि हे तिघेही एका रुफवर (रुफ – छत) प्लंबिंग दुरुस्तीचे काम करत आहेत. प्रचंड उन्हामुळे हे काम करणे त्यांना कठीण जात आहे. याचवेळी त्यांना दुसऱ्या एका रुफवर एक मध्यमवयीन स्त्री तोकड्या कपड्यात उन्हात पुस्तक वाचत पडलेली दिसते. इथून सगळ्या नाट्याला सुरुवात होते. त्यांचे आपल्या कामावरून लक्ष हटते. तिच्याकडे पहात ते ओरडू लागतात. ती स्त्री यांच्याकडे फारसे लक्ष देत नाही. दुसऱ्या दिवशी हाच प्रकार घडतो. हळूहळू या तिघांची भीड चेपत जाते. ते स्त्रीच्या अगदी जवळ जाऊन शेरेबाजी करू लागतात. तरीही ती तिकडे दुर्लक्ष करते. पुढच्या दिवशी ती त्यांना रुफवर दिसत नाही. ते तिघेही अस्वस्थ होऊन आपले काम करत राहतात. संध्याकाळी त्यांच्या लक्षात येते की त्या स्त्रीने आपली जागा बदलली आहे आणि रुफच्या दुसऱ्या टोकाला जाऊन ती सूर्यप्रकाशात पहुडली आहे. पुन्हा एकदा शिट्ट्या मारणे, किंचाळणे असा प्रकार हे तिघे सुरु करतात. पण आताही ती स्त्री त्यांच्याकडे फारसे लक्ष देत नाही. इकडे प्रचंड उन्हामुळे या तिघांचे काम अपूर्णच राहते. ऊन असह्य झाल्यामुळे एके दिवशी स्टॅनले आणि  हॅरी लवकर घरी जातात आणि  टॉम धाडस करून समोरच्या रुफवर जातो. तो त्या स्त्रीला तुम्ही मला आवडत असल्याचे सांगतो. पण स्त्रीकडे चोरून पाहणे, तिच्याकडे पाहून शेरेबाजी करणे, तिच्या कपड्याबद्दल भाष्य करणे या तिघांच्या कृत्याचा त्या स्त्रीला प्रचंड राग आलेला असल्याने, ती टॉमला खडे बोल सुनावते आणि तिथून निघून जाण्यास सांगते.

दुसरे दिवशी हे तिघेही पुन्हा कामाला येतात. पण आता उष्णतेची लाट निघून गेलेली असल्याने आणि थोडाफार पाऊस पडायला सुरुवात झालेली असल्याने रुफवर त्यांना कोणीच दिसत नाही, अगदी ती स्त्रीदेखील नाही.

अशा प्रकारे समाजामध्ये स्त्रीने कसे वागावे, काय कपडे घालावेत, कसे बोलावे याचे स्वातंत्र्य तिला मिळाले पाहिजे या भूमिकेचा या कथेद्वारे लेखिकेने जोरदारपणे पुरस्कार केला आहे.

 

MCQ type questions:

1.      The story ‘Woman on a Roof’ is written by _____. (Doriss Lessing)

2.      The story takes place in the city of _____. (London)

3.      Stanley, Harry and Tom are on the roof _____. (to replace gutters)

4.      _____ is recently married. (Stanley)

5.      Stanley, Harry and Tom find it difficult to work on the rooftop because _____. (there is a heat wave in London)

6.      _____ is 17 years old. (Tom)

7.      To protect from sunlight, Harry brings _____ from a friendly woman living downstairs. (a blanket)

8.      Due to the heatwave, the temperature in London has risen up to _____ degrees Fahrenheit. (70-80)

9.        _____ suffers from sunstroke. (Stanley)

10.  _____ goes to meet the woman lying on a roof.  (Tom)

Comments

Popular posts from this blog

Internal Evaluation_Winter Semester_2024-25

  Winter Semester Internal Evaluation 2024-25 Dept. of English सूचना : १.         सर्व विद्यार्थ्यांनी आपले अंतर्गत मूल्यमापनाचे काम दि. ०४ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर २०२४ यादरम्यान पूर्ण करायचे आहे. यानंतर कोणाचेही होम असाइनमेंट/सेमिनार/ग्रुप अॅक्टिव्हिटी स्वीकारली/घेतली जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. २.         होम असाइनमेंट/सेमिनार यासाठी महाविद्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या वह्यांचाच वापर करावा. सदर वह्या महाविद्यालयाच्या कार्यालयामध्ये उपलब्ध आहेत. ३.           बीए/बीकॉम भाग दोनच्या विद्यार्थ्यांनी ग्रुप अॅक्टिव्हिटीसाठी खालील नंबरवर संपर्क साधावा. बीए भाग दोन :  English (Compulsory): 9975669140 बीए भाग दोन :  English (Optional): 9890355376 बी कॉम भाग दोन :  English: 9766188306 Class: BA I                            1.   Subject: English (AEC)    ...

Serpent Lover

  (e-content developed by Prof. (Dr) N A Jarandikar) The Serpent Lover                                               -     A. K. Ramanujan ए. के. रामानुजन हे इंग्रजीतून लेखन करणारे एक महत्त्वाचे भारतीय लेखक आहेत. त्यांची ओळख ही मुख्यत्वे एक कवी म्हणून आहे. भारतीय लोककथांमध्ये त्यांना विशेष रुची होती. आयुष्यातील कित्येक वर्षे त्यांनी भारतीय , विशेषतः कन्नड लोककथा गोळा करण्यामध्ये व्यतीत केली आहेत. प्रस्तुतची कथा ‘ The Serpent Lover ’ ही अशीच एक कन्नड लोककथा आहे. ही कथा त्यांच्या ‘ A Flowering Tree’ या पुस्तकातून घेण्यात आलेली आहे. कामाक्षी नावाची एक तरुण स्त्री या कथेची नायिका आहे. कामाक्षीचे एका तरूणाबरोबर लग्न झाले आहे. पण हा तरुण बाहेरख्याली असून त्याचे अन्य एका स्त्रीसोबत (concubine— विवाहबाह्य संबंध असणारी स्त्री) ) संबंध आहेत. कामाक्षीला याची कल्पना आहे. एक दिवस आपला नवरा आपल्याकडे परत येईल , या आशेवर ती जगत आहे. अशीच २-३ वर्षे गेल्यानंतर , ...

Model Millionaire

  (e-content developed by Prof (Dr) N A Jarandikar) ‘ The Model Millionaire’ ‘द मॉडेल मिलियनेअर’ (‘ The Model Millionaire’ /आदर्श लखपती) ही कथा ऑस्कर वाइल्ड (Oscar Wilde) या लेखकाने लिहिलेली आहे. कोणताही हेतू न बाळगता चांगल्या मनाने केलेली मदत ही अनमोल कशी असते, याविषयीची ही गोष्ट आहे. या गोष्टीमध्ये पुढील पात्रे आहेत : १.        ह्युई अर्सकाईन ( Hughie Erskine): हा या कथेचा नायक आहे. २.        अॅलन ट्रेव्हर ( Alan Trevor ) : हा एक चित्रकार आणि ह्युईचा मित्र आहे. ३.        बॅरन हाऊजबर्ग ( Baron Hausberg ) : हा अॅलन ट्रेव्हरसाठी मॉडेल म्हणून काम करतो आहे. ४.        लॉरा मेर्टन ( Laura Merton ): ही ह्युईची प्रेयसी आहे. ही कथा लंडन शहरामध्ये घडते. ह्युई अर्सकाईन हा एक तरुण आणि रुबाबदार युवक आहे. त्याचे वर्णन पुढीलप्रमाणे केलेले आहे : 1. wonderfully good looking; 2. crisp brown hair; 3. clear-cut profile; 4. grey eyes. त्याच्या वडलांनी त्यांच्या पश्चात आ...