Sunday, 9 November 2025

Andha Yug (I)_Synopsis in Marathi

अंधा युग – नाटकाविषयी थोडक्यात

  •  स्वातंत्र्योत्तर कालखंडातील भारतीय रंगभूमीवरील हे एक अत्यंत महत्त्वपूर्ण नाटक आहे. महाभारतातील कुरुक्षेत्रावर झालेल्या कौरव-पांडवांच्या युद्धानंतर झालेला घटनाक्रम या नाटकात मांडलेला आहे. धर्म-अधर्म, न्याय-अन्याय याची चिकित्सा करतानाच युद्धाने, संहाराने प्रश्न सुटतात का असा एक मुलभूत प्रश्न हे नाटक उपस्थित करते.
  • कुरुक्षेत्रावरील युद्ध संपल्यानंतर १८ व्या दिवशी संध्याकाळी नाटक सुरु होते.
  •  श्रीकृष्णाची अवतारसमाप्ती होते (एका शिकाऱ्याकडून कृष्णाची हत्या होते) तिथे नाटक संपते.
  •   यानंतर द्वापरयुग संपले आणि ‘अंधा युग’ म्हणजेच कलियुग सुरु झाल्याचे कोरस प्रेक्षकांना  सांगतो.
  • नाटकात एकूण ५ अंक आहेत. नाटकाची सुरुवात Prologue ने होते आणि शेवट Epilogue ने होतो. 
  • धर्मूमवीर भारती यांचे हे नाटक मूळ  हिंदी भाषेमध्ये लिहिले आहे. अलोक भल्ला यांनी या नाटकाचा इंग्रजी अनुवाद केला आहे.

प्रमुख पात्रे

१     अश्वत्थामा : गुरु द्रोणाचार्यांचा मुलगा; महाभारताच्या युद्धामध्ये अश्वत्थामा मारला गेल्याची बातमी ऐकून गुरु द्रोणाचार्य हतबल होतात. बातमी खरी आहे का हे तपासण्यासाठी ते याबाबत युधिष्ठिराला विचारतात. युधिष्ठिराला नेमके माहित असूनही तो नर होता की हत्ती याबाबत संदिग्धता असल्याचे म्हणतो (“नरो वा कुंजरो वा”). हे ऐकून द्रोणाचार्यांच्या हातून शस्त्र गळून पडते आणि मग नि:शस्त्र द्रोणाचार्यांची दृष्टद्युम्न हत्या करतो.

वडलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी अश्वत्थामा सुडाने पेटतो. दुर्योधनानंतर कौरव सेनेचा तो सेनापती बनतो. कौरवांच्या छावणीवर रात्रीच्या वेळी तो त्वेषाने हल्ला चढवतो. दिसेल त्याला मारत सुटतो. झोपी गेलेल्यानांही तो सोडत नाही. दृष्टद्युम्नचा वध करतो. शेवटी तो ब्रम्हास्त्र सोडतो. याला प्रत्यत्तर म्हणून अर्जुनही ब्रह्मास्त्र सोडतो. कृष्ण होणारा विनाश ओळखून दोघांनाही ब्रह्मास्त्र मागे घेण्यास सांगतात. परंतु ते मागे कसे घ्यायचे याची विद्या अश्वत्थामाला ठाऊक नसल्याने ते ब्रह्मास्त्र तो अभिमन्यूची पत्नी उत्तरा हिच्या उदराच्या दिशेने सोडतो, जेणेकरून पांडवांचा निर्वंश व्हावा. क्रोधीत कृष्ण ब्रह्मास्त्र स्वतःवर घेतात आणि अश्वत्थामाला शरीरभर जखमा घेऊन विकल अवस्थेत सृष्टीच्या अंतापर्यंत भटकत राहशील असा शाप देतात.

‘अंधा युग’ नाटकातील हे एक प्रमुख पात्र आहे. तो स्वतःची तुलना कृष्णाशी करतो. त्याच्यामते कृष्णाने देखील कपटाचा आधार घेतला आहे. मग त्याचा तो धर्म आणि माझा तो अधर्म कसा, असा त्याचा सवाल आहे.

२ युयुत्सु : हा दुर्योधन आणि गांधारीचा पुत्र आहे. कुरुपुत्र असून देखील महायुद्धामध्ये तो पांडवांच्याकडून लढतो. सत्य आणि धर्माच्या बाजूने आपण लढत असल्याचे तो सांगतो. नाटकामध्ये युद्ध संपल्यानंतर तो हस्तिनापूरला परत आल्याचे दाखवले आहे. परंतु त्याला तिथे कोणीही स्वीकारत नाही. उलट एक भयावह श्वापद म्हणून त्याच्याकडे सर्वजण पाहतात. केवळ विदुर त्याला समजून घेतो. विदुराच्या मते तो जिवंत असलेला शेवटचा कौरव आहे.

युद्ध समाप्तीनंतर युधिष्टिर हस्तिनापूरचा राजा होतो. युयुत्सुला तिथेच आश्रय दिला जातो. पण तिथली जनता त्याला स्वीकारत नाही. त्याचा प्रचंड छळ होतो. शेवटी त्याची वाचा जाते. एके दिवशी तो कृपाचार्यांच्या हातातला भाला हिसकावून घेतो आणि स्वतःच्या पोटात खुपसून घेत आत्महत्या करतो.

सत्य आणि धर्माच्या बाजूने उभे राहूनदेखील माझे आयुष्य असे का, या प्रश्नाने युयुत्सु पुरता कोलमडून गेलेला नाटकात पाहायला मिळतो.

३ गांधारी : अंध दुर्योधनाची धर्मपत्नी. आपला पती अंध आहे हे विवाहानंतर समजून आल्याने तिने आपल्या डोळ्यावर आयुष्यभर पट्टी बांधली आहे. महायुद्धाच्या अठराव्या दिवशी ‘अंधा युग’ नाटकाला सुरुवात होते. यावेळी दुर्योधन (आणि युयुत्सु) सोडून तिचे सर्व पुत्र मारले गेले आहेत. भीमाने ज्या पद्धतीने दु:शासनाला मारल्याचे तिला कळते, तेव्हा ती अत्यंत क्रोधीत होते. नाटकाच्या सुरुवातीला गांधारी आणि धृतराष्ट्र हे दुर्योधनाची आणि त्याच्या विजयाची वाट पाहत असलेले दिसतात.

पुढे संजयकडून तिला दुर्योधन देखील अत्यंत क्रूरपणे मारला गेल्याचे कळते. त्याचवेळी अश्वत्थामा हा सेनापती झाल्याचे आणि त्याने अंधाऱ्या रात्री झोपलेल्या पांडवांच्या छावणीवर हल्ला चढवत सैनिकांची निर्घृण हत्या केल्याचे कळते, तेव्हा तिला काही क्षणांसाठी समाधान मिळते. अश्वत्थाम्याला संरक्षक कवच मिळावे म्हणून गांधारी पहिल्यांदा आपल्या डोळ्यावरची पट्टी उघडते.

अटीतटीच्या लढाईत अश्वत्थामा आणि अर्जुन ब्रह्मास्त्र सोडतात, कृष्ण ते स्वतःवर ओढवून घेतो आणि विनाश टाळतो. तसेच तो अश्वत्थाम्याला शाप देतो. यावेळी झालेला अपमान, पदरी पडलेले अपयश आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सर्व पुत्रांचा झालेला मृत्यू सहन न होऊन गांधारी कृष्णाला शाप देते. तिच्या म्हणण्यानुसार या महायुद्धाला सर्वस्वी कृष्ण जबाबदार आहे. हा नरसंहार तो थांबवू शकला असता. ‘तुझे आप्त, सगेसोयरे सर्वजण एकमेकावर हल्ला करतील आणि पिसाळलेल्या कुत्र्याप्रमाणे एकमेकाला खाऊन टाकतील. आणि हा सर्व विनाश पाहिल्यानंतर एके दिवशी तू जंगलामध्ये एका पारध्याच्या हातून मरण पावशील’ असा गांधारी कृष्णाला शाप देते.

युधिष्टीर गादीवर बसल्यानंतर धृतराष्ट्र, गांधारी, कुंती आणि संजय वानप्रस्थाला जातात. इथे जंगलाला लागलेल्या वणव्यामध्ये धृतराष्ट्र, गांधारी, कुंती यांचा होरपळून मृत्यू होतो. नाटकामध्ये अश्वत्थामा, युयुत्सु यांच्याप्रमाणेच गांधारी धर्म-अधर्म, सत्य-असत्य या संघर्षात सापडलेली दिसून येते.

अन्य पात्रे :

संजय : महर्षी व्यासांनी याला दिव्य दृष्टी बहाल केलेली आहे. कुरुक्षेत्रावर चाललेले युद्ध प्रत्यक्ष तो पाहत असून त्याचा इतिवृत्तांत तो धृतराष्ट्र आणि गांधारीला सांगत आहे. एक तटस्थ आणि त्रयस्थ व्यक्ती म्हणून त्याच्याकडे सर्वजण पाहतात.

विदुर : धृतराष्ट्र आणि पंडूचा सावत्रभाऊ, अत्यंत बुद्धिमान, कौरव-पांडवांचा काका. नाटकामध्ये तो अश्वत्थामा, गांधारी आणि युयुत्सु यांना कृष्णाची भूमिका समजावून सागण्याचा प्रयत्न करताना दिसतो.    


No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.

Resume writing_Short answer type questions

Short answer type questions: 1.    What is the primary purpose of a resume, and how can a well-designed resume benefit a job applicant? ...