(e-Content developed by Prof. (Dr) Nitin Jarandikar)
रुक्मिणी
स्वयंवर ही कथा भागवत पुराण, विष्णु पुराण आणि हरिवंश पुराणामध्ये
आढळते. ही कथा भगवान श्रीकृष्ण आणि विदर्भराज भीष्मकाची कन्या रुक्मिणी यांच्या
विवाहाची आहे. या कथेत प्रेम, भक्ती, साहस आणि दैवी
सौंदर्य यांचा सुंदर संगम दिसतो.
विदर्भराज
भीष्मकाची कन्या रुक्मिणी अतिशय रूपवती, सद्गुणी आणि कृष्णभक्त होती. तिने
श्रीकृष्णाचे पराक्रम आणि गुण ऐकले होते, आणि त्या ऐकण्यातूनच तिला
श्रीकृष्णाप्रति गाढ प्रेम व भक्ती
निर्माण झाली. तिला वाटले — “श्रीकृष्णच माझा योग्य वर आहे.” पण तिचा मोठा भाऊ
रुक्मी अहंकारी होता. त्याने राजकीय स्वार्थापोटी
रुक्मिणीचा विवाह शिशुपालाशी ठरविला. आई-वडीलही रुक्मिणीच्या बाजूने होते,
पण
रुक्मीच्या हट्टापुढे ते काही करू शकत नव्हते.
लग्नाच्या आदल्या
दिवशी रुक्मिणीने एक गुप्त संदेश एका ब्राह्मण दूतामार्फत श्रीकृष्णाला पाठविला.
त्या पत्रात तिने आपल्या प्रेमाची व भक्तीची कबुली दिली. तिने कृष्णाला विनंती
केली की, “तुम्ही येऊन मला या
विवाहापासून वाचवा.” तिने सांगितले की ती देवी अंबिकेच्या मंदिरात पूजा
करायला जाणार आहे, तेथेच श्रीकृष्णांनी येऊन तिला घेऊन जावे. या पत्रातून रुक्मिणीची
प्रेमभावना, नम्रता आणि श्रद्धा स्पष्ट दिसते.
श्रीकृष्णाने
पत्र वाचताच बलरामासह द्वारकेहून विदर्भाकडे प्रस्थान केले. ते विवाहाच्या आदल्या
दिवशीच विदर्भनगरीत पोहोचले. त्या वेळी शिशुपाल, जरासंध आणि इतर
राजे मोठ्या सैन्यासह तेथे आलेले होते. रुक्मिणी मंदिरात पूजा करण्यासाठी गेली
होती आणि मनात फक्त एकच विचार — “माझे श्रीकृष्ण येतील का?”
पूजा संपल्यावर
रुक्मिणी मंदिरातून बाहेर आली, आणि त्याच वेळी श्रीकृष्णाचा रथ तेथे
थांबलेला होता. श्रीकृष्णाने तिला आदराने रथात बसवले आणि तेथून वेगाने प्रस्थान
केले. ही घटना इतक्या वेगाने घडली की, कोणाला काही समजायच्या आतच रथ दूर गेला. शिशुपाल आणि
रुक्मी संतापले, आणि त्यांनी सैन्य पाठवले. घनघोर
युद्ध झाले, पण बलरामाने सर्वांना पराभूत केले. श्रीकृष्णाने रुक्मीला ठार केले
नाही — फक्त त्याचा अपमान करून त्याचे केस कापले.
यानंतर
श्रीकृष्ण रुक्मिणीला घेऊन द्वारकेत परतले. तेथे मोठ्या थाटामाटात विवाह झाला.
सर्व देव, ऋषी आणि यदुवंशातील लोक उपस्थित होते. अशा प्रकारे रुक्मिणी स्वयंवर
संपन्न झाले.
शृंगार रसाचे एक उत्तम उदाहरण म्हणून या प्रसंगाकडे पहिले जाते.
कृष्णाची प्रत्यक्ष भेट होण्यापूर्वीच रुक्मिणीने त्याला वरणे, त्याला संदेश पाठवणे, कृष्णाने तिचे हरण करणे, आणि
शेवटी रुक्मिणी स्वयंवर संपन्न होणे या सर्व प्रसंगातून शृंगार रसाच्या
निरनिराळ्या छटा उमटलेल्या दिसून येतात.
* * * * *
The Rukmini Swayamvar episode is
one of the best literary examples of the Sṅgara
rasa. It depicts the emotion of love, beauty, and attraction.
The story of Rukmini Swayamvar
comes from the Bhāgavata Purāṇa.
It narrates how Lord Krishna marries Princess Rukmini. It is one of the most
beautiful love stories in Indian mythology.
The Background:
Rukmini, the princess of
Vidarbha, had heard many tales of Krishna’s valour, kindness, and divine charm.
Without ever meeting him, she developed deep love and devotion for him. She
considered him her rightful husband.
However, her brother Rukmi was politically
motivated.
He wanted to marry her off to Shishupala who was a friend of the Kauravas. Though
her parents were sympathetic toward her, they were helpless before Rukmi’s
insistence.
Rukmini’s Letter to Krishna:
On the eve of her proposed
marriage, Rukmini secretly sent a message to Krishna. In her letter, she
confessed her love for him. She requested Krishna to come to Vidarbha and take
her with him.
Krishna’s Arrival in Vidarbha:
After reading her message,
Krishna comes to Vidarbha with his brother Balarama. Shishupala, Jarasandha,
and other kings had gathered there with their armies for the ceremony. Rukmini,
filled with anxiety and faith, went to the temple to pray to the goddess.
The Abduction:
As Rukmini came out of the temple,
Krishna suddenly appeared in his chariot. He lifted her gently and placed her
beside him. Before anyone could react, Krishna drove away swiftly.
Soon, the other kings and Rukmi’s
soldiers gave chase. A fierce battle followed in which Balarama defeated the
enemy forces. Krishna spared Rukmi’s life but humiliated him by cutting his
hair.
Rukmini Swayamwar:
Krishna took Rukmini to Dwaraka,
where they were married in a grand ceremony. The gods and sages blessed the
couple, and Rukmini became Krishna’s chief queen.
The Rukmini Swayamvar and the Sṅgara rasa:
Rukmini’s love for Krishna: Rukmini falls in love with
Krishna after hearing about his virtues and seeing his image in her mind. Though
they have not met, her heart is completely devoted to him. Her longing, restlessness,
and faithful love create the mood of divine romantic yearning, a hallmark of Sṅgara rasa.
Rukmini’s secret letter to
Krishna: Rukmini’s
secret letter to Krishna reveals her intense emotional desire and delicate
modesty. She expresses her wish to be united with him while maintaining the
purity and dignity of love — thus blending bhakti (devotion) and romantic
passion.
Rukmini’s abduction: When Krishna arrives and carries
Rukmini away in his chariot, the scene becomes charged with Sṅgara. The triumph of love over
social barriers and the visual beauty of the moment evoke joy, admiration, and fulfilment.
Rukmini’s beauty: The descriptions of Rukmini’s
beauty, her bridal attire, her emotions of fear, hope, and excitement — all
create visual and emotional appeal that arouses the rasa of love in readers or
listeners.
* * * * *
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.