Tuesday, 22 September 2026

Resume Writing

 (e-Content developed by Dr N. A. Jarandikar)

RESUME WRITING

·       Resume यालाच पारंपारिक भाषेत Biodata असे म्हटले जाई.

·       एक चांगला Resume तुमच्यासाठी personal marketing tool म्हणून काम करतो.

·       चांगला Resume आणि उत्तम Interview हे हमखास job मिळवण्याचे उत्तम सूत्र आहे.

·       चांगला Resume हा आटोपशीर (concise) असतो.

·       Resume हा एक पानापेक्षा अधिक असून नये.

·       Resume मध्ये आपले शिक्षण, अनुभव लिहित असताना reverse chronological order पाळावी. म्हणजेच आपली अलीकडील degree किंवा अगदी अलीकडील कामाचा अनुभव हा सर्वप्रथम लिहावा.

·       Resume चा font हा शक्यतो Arial किंवा Helvetica असावा.

·       Resume मधील font चा आकार हा 10-12 points असावा. तर आपले नाव आणि section ची नावे ही Bold आणि 14 points असावी.

·       Resume चा margin हा 1 ते 1.5 इंचाचा असावा.

·       Resume हा तीन प्रकारचा असू शकतो : 1. Chronological resume; 2. Functional Resume; 3. Combination Resume

 

Chronological resume

Functional Resume

Combination Resume

ज्यांना कामाचा/नोकरीचा चांगला अनुभव आहे; नोकरीमध्ये कोणता gap पडलेला नाही अशांसाठी Chronological resume उपयोगी ठरतो.

ज्यांना कामाचा/नोकरीचा कमी अनुभव आहे किंवा ज्याचा नोकरीमध्ये वारंवार gap/खंड पडलेला आहे, अशांसाठी Functional Resume उपयोगी ठरतो.

ज्यांना आपले career बदलायचे आहे किंवा नोकरीमध्ये promotion हवे आहे, अशांसाठी Combination Resume उपयोगी ठरतो.

तुम्ही प्राप्त केलेल्या skills पेक्षा Work history/अनुभव महत्वाचा ठरतो.

तुमची work history/अनुभव यापेक्षा तुम्ही प्राप्त केलेली skills महत्वाची ठरतात.

तुमची work history आणि प्राप्त केलेली skills दोन्ही गोष्टी महत्वाच्या ठरतात.

Format: खालीलप्रमाणे ५ sections मध्ये

1. Contact Details:

2. Work Experience:

3. Education:

4. Skills Summary:

5. Additional Information:

Format: खालीलप्रमाणे ५ sections मध्ये

1. Contact Details:

2. Skills Summary:

3. Education:

4. Work Experience:

5. Additional Information:

Format: खालीलप्रमाणे ५ sections मध्ये

1. Contact Details:

2. Work Experience:

3. Skills Summary:

4. Education:

5. Additional Information

 

·       Contact Details Section: यामध्ये पुढीलप्रमाणे माहिती द्यावी :

ü  Full Name: ………………………………… (आपले पूर्ण नाव; सुरुवात आडनावाने करावी; सर्व अक्षरे CAPITAL असावीत).

ü  Current job title: ……………………………. (पहिल्यांदाच application करत असल्यास Fresher असे म्हणावे. अनुभव असल्यास आपले पदनाम आणि कंपनीचे नाव लिहावे.

ü  Email: ........................................... (आपला नेमका इमेल द्यावा; इमेलची सर्व अक्षरे SMALL आहेत, याची खात्री करा. इमेलमध्ये @gmail.com/ @yahoo.com इ. असे डोमेन नेम आहे, याची खात्री करा.

ü  Phone number: …………………………………

ü  Adress for communication: …………………………………………..

ü   City and Country: .................................

·       Work Experience Section मध्ये पुढीलप्रमाणे माहिती द्यावी :

ü  Company Name: ……………………………………….. (आपण ज्या कंपनीमध्ये काम केले आहे त्या कंपनीचे नाव, शहराचे नाव, उदा. Mai TVS Auto, Kolhapur)

ü  Responsibility: .................................... (कंपनीमध्ये ज्या हुद्द्यावर काम केले त्याचे नाव, उदा. Sales Manager)

ü  Duration: From …………….. to …………… (ज्या कालावधीत कंपनीमध्ये काम केले तो कालावधी, उदा. June 2025 तो April 2026)

·       Education Section मध्ये पुढीलप्रमाणे माहिती द्यावी :

ü  Degree: ……………… (पदवीचे नाव, उदा. Bachelor of Arts in English)

ü  University: ………………. (विद्यापीठाचे नाव, उदा. Shivaji University, Kolhapur)

ü  Month and Year: …………… (कोणत्या वर्षी पदवी प्राप्त झाली, उदा. June, 2024)

ü  Class secured: ………….. (उदा. I class)

(याठिकाणी केवळ सर्वोच्च पदवीचा तपशील द्यावा).

·       Skills Summary Section मध्ये पुढीलप्रमाणे माहिती द्यावी :

ü  Technical skills: ............................ (आपल्याकडे असणारे तांत्रिक कोशल्य, उदा. MSCIT, Tally)

·       Additional Information Section मध्ये पुढीलप्रमाणे माहिती द्यावी :

(याठिकाणी आपण केलेल्या समाजोपयोगी कामाचा तपशील आपण देऊ शकतो; आपले छंद सांगू शकतो. पण याबाबत एक पथ्य पाळावे. आपली माहिती ही ज्या पोस्टसाठी आपण अर्ज केलेला आहे, त्याच्याशी सुसंगत असावी)  

 

*      *      *      *      *

खाली दिलेली quiz सर्व उत्तरे बरोबर येईपर्यंत पुनःपुन्हा सोडवा. सर्व उत्तरे बरोबर आल्यानंतर quiz आपल्या वहीत लिहून काढा.

https://forms.gle/cdyCeCbSVt25wq1U9

 

 


No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.

Resume Writing_Q&As

  Q. Answer the following questions in one word, a phrase or a sentence. 1. What is the main purpose of a resume? Ø   To present your qu...