Skip to main content

Posts

भारतातील पर्यटन उद्योग (Tourism Industry in India)

 (J D Ingawale) बीए भाग १ .      सेमी २         भारतीय अर्थव्यवस्था भारतातील पर्यटन उद्योग (Tourism Industry in India) पर्यटन म्हणजे काय ?     भारतातील पर्यटन उद्योग हा मानवी संस्कृतीइतका पुरातन आहे . “ नवनवीन ऐतिहासिक , नैसर्गिक , धार्मिक , सांस्कृतिक स्थळांना भेट देऊन त्यातून आत्मिक समाधान व नावीन्याचा आनंद मिळविणे , माहितीचा शोध घेणे या हेतूने प्रवास करणे , राहत्या ठिकाणापासून काही काळ दूर राहणे म्हणजे पर्यटन होय ." भारतातील मोठ्या उद्योगात पर्यटन उद्योगाचा समावेश होतो . पर्यटन हा अत्याधुनिक आर्थिक व्यवसाय आहे . औद्योगिक क्रांतीनंतर जगात पर्यटन बाजारपेठ अस्तित्वात येऊ लागली . ऐतिहासिक , नैसर्गिक , सांस्कृतिक पर्यटन स्थळे हा बाजारव्यवस्थेचा आधार असतो . अलीकडे कृषी पर्यटन ही नवीन संकल्पना अस्तित्वात आली आहे . पर्यटनाचा साधा अर्थ म्हणजे ' माणसाचे त्याच्या नेहमीच्या राहत्या ठिकाणाहून इतरत्र झालेले अल्पकालीन स्थलांतर होय ....