Skip to main content

भारतातील पर्यटन उद्योग (Tourism Industry in India)

 (J D Ingawale)

बीए भाग .     सेमी         भारतीय अर्थव्यवस्था

भारतातील पर्यटन उद्योग (Tourism Industry in India)

पर्यटन म्हणजे काय ?

    भारतातील पर्यटन उद्योग हा मानवी संस्कृतीइतका पुरातन आहे. “नवनवीन ऐतिहासिक, नैसर्गिक, धार्मिक, सांस्कृतिक स्थळांना भेट देऊन त्यातून आत्मिक समाधान नावीन्याचा आनंद मिळविणे, माहितीचा शोध घेणे या हेतूने प्रवास करणे, राहत्या ठिकाणापासून काही काळ दूर राहणे म्हणजे पर्यटन होय." भारतातील मोठ्या उद्योगात पर्यटन उद्योगाचा समावेश होतो. पर्यटन हा अत्याधुनिक आर्थिक व्यवसाय आहे. औद्योगिक क्रांतीनंतर जगात पर्यटन बाजारपेठ अस्तित्वात येऊ लागली. ऐतिहासिक, नैसर्गिक, सांस्कृतिक पर्यटन स्थळे हा बाजारव्यवस्थेचा आधार असतो. अलीकडे कृषी पर्यटन ही नवीन संकल्पना अस्तित्वात आली आहे. पर्यटनाचा साधा अर्थ म्हणजे 'माणसाचे त्याच्या नेहमीच्या राहत्या ठिकाणाहून इतरत्र झालेले अल्पकालीन स्थलांतर होय.' विविधतेचा आस्वाद घेण्यासाठी भटकणे, पायी प्रवास करणे, मोटार, ट्राम, रेल्वे, हवाई मार्गे, सागरी मार्गे काही कालावधीसाठी स्थलांतर करणे पर्यटनात अपेक्षित असते.

भारतातील पर्यटन स्थळे

भारत हा हजारो वर्षांची जुनी संस्कृती परंपरा असलेला देश आहे. भारत हा विविधतेने नटलेला, परकीय पर्यटकांना आकर्षित करणारा देश आहे. देशात प्राकृतिकदृष्ट्या भिन्नता आहे. उत्तरेला बर्फाच्छादित असलेला हिमालय आहे. केरळचा सागरी किनारा,राजस्थानमधील वाळवंटे, ऐतिहासिक किल्ले राजवाडे, गोव्यातील सुमद्रकिनारा, गुजरातमधील मंदिरे, उद्याने, ताजमहाल, मुंबई, आग्रा, दिल्ली, चेन्नई, अजंठा-वेरुळ, खजुराहो येथील लेण्या जैन बौद्ध कलेचे दर्शन घडवितात. अमृतसरचे सुवर्ण मंदिर महाबळेश्वर, पाचगणी, चेरापुंजी येथील निसर्ग, हैद्राबाद येथील माहिती तंत्रज्ञानाचे केंद्र, रामोजी फिल्म सिटी, तिरुपती बालाजी, राष्ट्रीय उद्याने, मोठमोठे धरण प्रकल्प, स्तूप, गुजरातमधील सांस्कृतिक पर्यटन स्थळे इत्यादी असंख्य लहान-मोठी प्रेक्षणीय स्थळे भारतात आहेत. जम्मू-काश्मीर, कुलू-मनाली ही थंड आल्हादायक हवेची ठिकाणे, हिंदू, मुस्लीम, बौद्ध, शीख यांची मंदिरे असणारा मध्य प्रदेश ज्याला वाघांचे राज्य असे संबोधले जाते. तेथील धबधबे पर्यटकांना आकर्षित करतात. ओरिसामधील कोणार्कचे सूर्यमंदिर, जगन्नाथ (पुरी), उत्तर प्रदेशातील फत्तेपूर शिक्री, वाराणसी, अलाहाबाद-प्रयाग देशातील अशी असंख्य ठिकाणे देशी विदेशी पर्यटकांना भुरळ घालतात.

देशांतर्गत पर्यटन

     भारत सरकारने सन १९५८ मध्ये स्वतंत्र पर्यटन मंत्रालयाची स्थापना केली. त्यानंतर झा समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करून १९६६ मध्ये भारतीय पर्यटन विकास महामंडळाची (ITDC) स्थापना झाल्यानंतर या उद्योगांची वेगाने वाढ झाली. भारतात देशांतर्गत पर्यटन करणाऱ्यांची संख्या प्रतिवर्षी १५ टक्क्यांनी वाढत आहे. वाढणारे दरडोई उत्पन्न, वाहतूक दळणवळणाच्या तसेच निवासाच्या वाढत्या सोई, शिक्षण प्रसार, जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोणातील बदल, पर्यटन व्यावसायिक संघटनांकडून उपलब्ध होणाऱ्या विभिन्न आकर्षक सोई-सवलती यामुळे देशांतर्गत पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे. उदा. सन २००६ मध्ये आंध्र प्रदेशातील देशांतर्गत पर्यटकांची संख्या ११,१७,१५,३७६ होती. ती सन २०१२ मध्ये १६,१८,१३, ४३० एवढी वाढली. तर महाराष्ट्रात ती अनुक्रमे ,६८,८०,३८८ वरून ,३५, ३८, ३४० एवढी वाढली. उत्तर प्रदेश, कर्नाटक, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तराखंड, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, राजस्थान या राज्यांतील स्थानिक देशांतर्गत पर्यटकांचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे.

विदेशी पर्यटन

    सन १९५१ मध्ये भारतात येणाऱ्या विदेशी पर्यटकांची संख्या १६,८२९ एवढी होती. नंतरच्या काळात मात्र भारतात येणाऱ्या पर्यटकांची संख्या सन २०११ मध्ये ६२,९०,३१६ एवढी होती ती २०१७ मध्ये .०२ कोटीपर्यंत वाढली. या विभागाचे स्वतंत्र मंत्रालय, पर्यटन विभागाने आखलेल्या विविध विकास योजना, हॉटेल्स इतर सुविधांमध्ये झालेली वाढ, सुनियोजित प्रसिद्धी, डॉलरच्या तुलनेत स्वस्त असणारारुपया इत्यादी कारणांमुळे परकीय पर्यटक भारताकडे आकर्षित होतात. वर्ल्ड ट्रॅव्हल अॅण्ड टुरिझम कौन्सिलच्या मते, पर्यटन उद्योगाचा विकास होणाऱ्या राष्ट्रांत भारताचा जगात पाचवा क्रमांक लागतो. सन २०११-१२ मध्ये भारताला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या सुमारे ६५,९०,३२० एवढी होती. ती २०१७ मध्ये .०२ कोटी झाली. भारतात सन २०११ मध्ये येणाऱ्या विदेशी पर्यटकांत संयुक्त संस्थाने (१६ टक्के), इंग्लंड (१२.) टक्के), कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, चीन इत्यादी देशांतील पर्यटकांची संख्या अधिक आहे. चीनमधून भारतात येणाऱ्या पर्यटकांची संख्या २००१ ते २००६ या काळात पटीने वाढली आहे. महाराष्ट्र, तमिळनाडू, दिल्ली ही राज्ये परकीय टुरिस्टना अधिक आकर्षित करतात. चेन्नई, दिल्ली, मुंबई, आग्रा या चार शहरांना परकीय पर्यटकांनी अधिक पसंती दिली आहे. नोव्हेंबर ते फेब्रुवारी या हिवाळी कालावधीत ५० टक्क्यांपेक्षा जास्त विदेशी पर्यटक भारतात येतात.

पर्यटन उद्योगाचे महत्त्व

पर्यटनामुळे आर्थिक विकासाला चालना मिळते. आंतरराष्ट्रीय सामंजस्य वाढते. राष्ट्रीय एकात्मता वाढीला लागते. जर्मन अभ्यासक मॅक्स म्युलर यांनी भारताबद्दल उद्गार काढले की, “जर आपणाला निसर्गाने काही भागात उधळलेले सौंदर्य, पृथ्वीवरचा स्वर्ग, जगातील संपत्ती पाहावयाची असेल तर मला भारताकडे बोट दाखवावे लागेल." पर्यटन उद्योगाचे महत्त्व पुढील मुद्द्यांद्वारे स्पष्ट करता येईल.

. स्थूल देशांतर्गत उत्पादन (GDP) : वर्ल्ड ट्रॅव्हल अॅण्ड टुरिझम कौन्सिलच्या मते, सन २०११ मध्ये पर्यटन उद्योगाने भारताच्या स्थूल देशांतर्गत उत्पादनात १२१ डॉलर म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या . टक्के भर घातली आहे. सन १९९० ते २०११ या काळात पर्यटन उद्योग २२९ टक्क्यांनी वाढला आहे. या पुढील दहा वर्षांत या उद्योगाचा वृद्धिदर वार्षिक सरसरी . टक्के राहील. वर्ल्ड ट्रॅव्हल अॅण्ड टुरिझम कौन्सिलच्या मते, सन २०११ ते २०२१ या काळात या उद्योगाचा वार्षिक सरासरी वृद्धिदर . टक्के राहील. पर्यटन उद्योगामुळे नागरिकांच्या दरडोई उत्पादनात वाढ होत आहे.

    पूर्वी धार्मिक पर्यटन, व्यापारी पर्यटन अधिक महत्त्वाचे होते. भारतात सध्या वैद्यकीय पर्यटन हा विभाग वेगाने विकसित होतो आहे. सन २०१९ पर्यंत या मार्गाने भारताला प्रतिवर्षी १०,00 कोटी रुपयांची प्राप्ती अपेक्षित आहे. देशाच्या आर्थिक विकासात या उद्योगाचे योगदान वाढत आहे.

. भारतात आलेले पर्यटक त्यातून मिळालेले परकीय चलन : भारतासारख्या विकसनशील देशात पर्यटन विकासाचे ध्येय आहे. त्याचा प्रमुख हेतू परकीय चलनमिळविणे हा आहे. सन १९६० पूर्वी भारतात पर्यटन उद्योगाचा विकास झालेला नव्हता. भारतीय पर्यटन विकास महामंडळाच्या मते, सन १९६० मध्ये भारतात आलेल्या परकीय पर्यटकांची संख्या ,२३,०९५ होती. त्यानंतरच्या दशकात ती दुप्पट झाली. सन १९९० मध्ये विदेशी पर्यटकांची संख्या १०,१२,३६७ होती. त्यानंतरच्या काळात भारतातील विदेशी पर्यटकांची संख्या त्यातून मिळालेले परकीय चलन तक्ता क्रमांक १३. मध्ये दाखविले आहे.

सन २०११ मध्ये भारतात आलेल्या विदेशी पर्यटकांची संख्या ६२,९०,३१६ होती त्यापासून देशाला ७७,५९१ कोटी रुपये उत्पन्न मिळाले.

पर्यटन हे विदेशी चलन मिळविण्याचे प्रमुख साधन असून विदेशी पर्यटकांकडून विदेशी चलन मिळते. भारतात येणाऱ्या परकीय पर्यटकांमुळे मौल्यवान अशा विदेशी चलनाच्या प्राप्तीत वाढ होत असल्याचे वरील पत्रकावरून लक्षात येते. पर्यटन विभागाचेस्वतंत्र मंत्रालय, पर्यटन विभागाने आखलेल्या विविध योजना, देशात परदेशात स्थापन करण्यात आलेली कार्यालये, भारताची विदेशातील पर्यटन कार्यालये निर्यात वाढीसाठी प्रयत्न करतात. हॉटेल्स, मोटेल्सच्या सुविधात झालेली वाढ, प्रवासासाठी माहितीसाठीचे प्रयत्न, प्रसिद्धी जाहिरात विभागाचा समन्वय, बँकिंगच्या अत्याधुनिक सोई, रेल्वे, हवाई वाहतूक, सुरक्षिततेसाठीची काळजी इत्यादींमुळे विदेशी पर्यटकांची संख्या वाढली आहे. तक्ता क्र. १३. वरून सन २००८-०९ मध्ये विदेशी पर्यटकांची संख्या घटलेली दिसते. हा दहशतवादी कारवायांचा परिणाम आहे. सन २०११ मध्ये देशाला या उद्योगापासून ७७,५९१ कोटी रुपयांचे परकीय चलन उपलब्ध झाले. त्यामुळे देशाच्या व्यवहारतोलाच्या अदृश्य सेवांचे मूल्य वाढले. जगात परकीय पर्यटकांनी भेट देणाऱ्या १३९ देशांत भारताचा नंबर २८ वा आहे. अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, जपान, चीन, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया इत्यादी देशांचे चलन भारताला उलपब्ध होते.

. रोजगारनिर्मिती : भारतासह विकसनशील देशांत बेरोजगारी वाढत आहे. परंतु पर्यटन उद्योगांमुळे रोजगारी वाढत आहे. प्रत्यक्ष रोजगारात हॉटेल्स, मोटेल्स, अल्पोपाहारगृहे, मार्गदर्शक, वाहतूक दळणवळण इत्यादींत जवळजवळ १२ दलशक्ष लोकांना रोजगार मिळतो. तर अप्रत्यक्ष रोजगार कृषी पर्यटन, बँकिंग, हस्तकला, बांधकाम, पशुपालन, मासेमारी तसेच फळबागा, दुग्धउत्पादन, कलाकुसरीच्या हस्तोद्योगातील वस्तूंची निर्मिती, पर्यटन विकासासाठी रस्ते, रेल्वे, विमानतळ, इमारती इत्यादींचे बांधकाम यामध्ये जवळजवळ २६ दशलक्ष लोकांना रोजगार निर्माण होतो. भारताच्या एकूण रोजगारीत पर्यटन उद्योगातील या रोजगाराचा हिस्सा टक्के आहे. रोजगारनिर्मितीच्या संभाव्यता विचारात घेऊन भारत सरकारने या उद्योगाच्या नियोजनबद्ध विकासाचे कार्य हाती घेतले आहे.

. स्थानिक रोजगार : पर्यटनामुळे स्थानिक रोजगार उपलब्ध होतो. प्रमुख पर्यटन स्थळांना भेटी देण्यामुळे हॉटेल, उपाहारगृह, गिर्यारोहण, मोटार वाहतूक, दुभाषक, गाईड यांसारख्या क्षेत्रांत स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध होतो. पर्यटन उद्योगात ४० दशलक्ष रोजगारनिर्मिती होते.

. वाहतुकीचा विकास : पर्यटनामुळे वाहतुकीच्या विकासाला चालना मिळते. त्यातून नागरीकरण, औद्योगिकीकरण, व्यापार इत्यादींत वाढ होते. परकीय पर्यटनासाठी रस्ते, रेल्वे, सागरी हवाई वाहतूक इत्यादींच्या विकासाला चालना मिळते.

. प्रादेशिक विकास : देशात साधनसंपत्तीचे असमान वितरण आढळते. जम्मू काश्मीर, गोवा, हिमाचल प्रदेश, अंदमान-निकोबार बेटे, लक्षद्वीप इत्यादी भागांचा विकास हा पर्यटन उद्योगावर अवलंबून आहे. उंच पर्वतशिखरे, खोल दऱ्या, घनदाटजंगले, प्रदूषणमुक्त वातावरण, नितळ समुद्रकिनारे इत्यादींमुळे शाश्वत विकासाला चालना मिळते. संतुलित प्रादेशिक विकासाचे उद्दिष्ट साधण्यास पर्यटन व्यवसाय साहाय्यकारी ठरतो.

. महसुली उत्पन्न : केंद्र सरकार राज्य सरकारला कररूपाने महसुली उत्पन्न मिळवून देण्याच्या दृष्टीने पर्यटन उद्योगाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

. दारिद्र्य निर्मूलन : भारतात गरिबी मोठ्या प्रमाणात आहे. पर्वतीय / पहाडी विभागात मागास, हरिजन, गिरीजन, आदिवासी लोक मोठ्या प्रमाणात राहतात. तेथे दारिद्र्याचे प्रमाण अधिक असून ते हमाली, स्थानिक उत्पादनांची विक्री करतात. त्यांना पर्यटन उद्योगामुळे उपजीविकेचे साधन उपलब्ध होते.

. सामाजिक सांस्कृतिक लाभ : देशाचा धार्मिक सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे कार्य पर्यटनामुळे होते. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर सामाजिक ऐक्य प्रस्थापित करण्यात या उद्योगाची भूमिका महत्त्वाची ठरते. कला-संस्कृतीचा ठेवा जतन करण्याचे कार्य या उद्योगाने केले आहे.

१०. सेवा क्षेत्राचा विकास : याशिवाय बँकिंग, माहिती तंत्रज्ञान इत्यादींचा विकास घडवून आणण्यात पर्यटन व्यवसायाचे योगदान महत्त्वाचे आहे.

Comments

Popular posts from this blog

Internal Evaluation_Winter Semester_2024-25

  Winter Semester Internal Evaluation 2024-25 Dept. of English सूचना : १.         सर्व विद्यार्थ्यांनी आपले अंतर्गत मूल्यमापनाचे काम दि. ०४ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर २०२४ यादरम्यान पूर्ण करायचे आहे. यानंतर कोणाचेही होम असाइनमेंट/सेमिनार/ग्रुप अॅक्टिव्हिटी स्वीकारली/घेतली जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. २.         होम असाइनमेंट/सेमिनार यासाठी महाविद्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या वह्यांचाच वापर करावा. सदर वह्या महाविद्यालयाच्या कार्यालयामध्ये उपलब्ध आहेत. ३.           बीए/बीकॉम भाग दोनच्या विद्यार्थ्यांनी ग्रुप अॅक्टिव्हिटीसाठी खालील नंबरवर संपर्क साधावा. बीए भाग दोन :  English (Compulsory): 9975669140 बीए भाग दोन :  English (Optional): 9890355376 बी कॉम भाग दोन :  English: 9766188306 Class: BA I                            1.   Subject: English (AEC)    ...

Serpent Lover

  (e-content developed by Prof. (Dr) N A Jarandikar) The Serpent Lover                                               -     A. K. Ramanujan ए. के. रामानुजन हे इंग्रजीतून लेखन करणारे एक महत्त्वाचे भारतीय लेखक आहेत. त्यांची ओळख ही मुख्यत्वे एक कवी म्हणून आहे. भारतीय लोककथांमध्ये त्यांना विशेष रुची होती. आयुष्यातील कित्येक वर्षे त्यांनी भारतीय , विशेषतः कन्नड लोककथा गोळा करण्यामध्ये व्यतीत केली आहेत. प्रस्तुतची कथा ‘ The Serpent Lover ’ ही अशीच एक कन्नड लोककथा आहे. ही कथा त्यांच्या ‘ A Flowering Tree’ या पुस्तकातून घेण्यात आलेली आहे. कामाक्षी नावाची एक तरुण स्त्री या कथेची नायिका आहे. कामाक्षीचे एका तरूणाबरोबर लग्न झाले आहे. पण हा तरुण बाहेरख्याली असून त्याचे अन्य एका स्त्रीसोबत (concubine— विवाहबाह्य संबंध असणारी स्त्री) ) संबंध आहेत. कामाक्षीला याची कल्पना आहे. एक दिवस आपला नवरा आपल्याकडे परत येईल , या आशेवर ती जगत आहे. अशीच २-३ वर्षे गेल्यानंतर , ...

Model Millionaire

  (e-content developed by Prof (Dr) N A Jarandikar) ‘ The Model Millionaire’ ‘द मॉडेल मिलियनेअर’ (‘ The Model Millionaire’ /आदर्श लखपती) ही कथा ऑस्कर वाइल्ड (Oscar Wilde) या लेखकाने लिहिलेली आहे. कोणताही हेतू न बाळगता चांगल्या मनाने केलेली मदत ही अनमोल कशी असते, याविषयीची ही गोष्ट आहे. या गोष्टीमध्ये पुढील पात्रे आहेत : १.        ह्युई अर्सकाईन ( Hughie Erskine): हा या कथेचा नायक आहे. २.        अॅलन ट्रेव्हर ( Alan Trevor ) : हा एक चित्रकार आणि ह्युईचा मित्र आहे. ३.        बॅरन हाऊजबर्ग ( Baron Hausberg ) : हा अॅलन ट्रेव्हरसाठी मॉडेल म्हणून काम करतो आहे. ४.        लॉरा मेर्टन ( Laura Merton ): ही ह्युईची प्रेयसी आहे. ही कथा लंडन शहरामध्ये घडते. ह्युई अर्सकाईन हा एक तरुण आणि रुबाबदार युवक आहे. त्याचे वर्णन पुढीलप्रमाणे केलेले आहे : 1. wonderfully good looking; 2. crisp brown hair; 3. clear-cut profile; 4. grey eyes. त्याच्या वडलांनी त्यांच्या पश्चात आ...