Pt. Nehru, Mahatma Gandhi and Sardar Patel
राधनागरी कॉलेज राधनागरी
असायनमेंट-इतिहास विभाग
बी ए भाग -2
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास (1858 ते 1947)
पेपर क्र 6, दिनांक 8/ 4 /2020,
एकूण गुण -30
प्रश्न क्र 1) भारतीय राष्ट्रीय सभेच्या उदयाची कारणे लिहा. 10
प्रश्न क्र 2) 1885 ते 1905 या काळातील मावळ काँग्रेसच्या कार्याची माहिती द्या 10
प्रश्न क्र 3 खालील पैकी 2 टिपा लिहा. (प्रत्येकी 5 गुण) 10
अ) अॅलन ह्यूम
ब) राष्ट्रीय सभेची धोरणे
क) न्यायमूर्ती रानडे
प्रश्न 1 ला यावर काय उत्तर अपेक्षित आहे यावर एक नजर टाका
1.पहिल्यादा प्रास्ताविक करा, त्यात त्या प्रश्नास अनुसरून पूर्वपीठिका लिहा किंवा आपण जे उत्तर लिहिणार आहे त्याचा एक सारांश लिहा
2. या उत्तरात येणारे मुद्दे जे आहेत त्या मुद्द्यावर सविस्तर लिहा
3. मूल्यमापन कसे कराल?
प्रश्नाचे स्वरूप आणि उत्तर याच्या अनुषंगाने दोन तीन मुद्दे तयार करून लिहा
प्रश्न 3 टिपा लिहा
यामध्ये काय अपेक्षित असते तर
कोण, कुठे, कधी, का?
असे प्रश्न मनाशी निर्माण करा मग मुद्द्यांच्या आधारे लिहा
उदाहरण म्हणून आपण अॅलन ह्यूम यावरील टीप पहायची म्हंटल्यास कसे मुद्दे अपेक्षित आहेत
1 प्रास्ताविक,
2पूर्वायुष्य,
3 राष्ट्रीय सभा स्थापनेमागील भूमिका, 4 कार्य,
5 परिणाम
6 समारोप
म्हणजे असे चार ते पाच मुद्दे तयार केले तर लिखाण करण्यास वाव मिळतो
आणखी एक आपली शंका असते ती किती पाने लिहावीत तर
1 मोठा प्रश्न हा किमान 4 पानांचा सविस्तर लिहिलेला असावा
2 टिपा लिहिताना प्रत्येक टिपेस दीड पाने खर्ची घाला
याबाबत आपली कांही शंका असेल तर आपण मला संपर्क करा: सावंत एस. आर.
(econtent developed by Sawant S. R.)