(E-content created by Dr V. S. Patil)
मराठी अभ्यासपत्रिका -3 , सेमिस्टर -III बी.ए. भाग- 2
नाटक- काय डेंजर वारा सुटलाय!लेखक-जयंत पवार
नाटक:
नाटक हा एक वाड़मय प्रकार आहे.नाटक दृकश्राव्य वाड़मय प्रकार आहे. या घटकाचा अभ्यास केल्यावर आपल्याला-
* नाटक या वाड़मय प्रकाराची वैशिष्ट्ये स्पष्ट करता येतील.
* नाटकाच्या दृकश्राव्य स्वरूपाचे वेगळेपण नोंदवता येतील.
* नाटक या वाड़मय प्रकाराच्या जन्माचा इतिहास सांगता येईल.
* नाटक या वाड़मय प्रकाराची व्याखा करता येईल.
● नाटक व्याख्या●
1) शब्दांनी तयार झालेले संवाद साभिनय सादर करावयाची कला म्हणजे नाटक.
2) एका मानवी समूहाने दुसर्या मानवी समूहासमोर सादर करावयाची कला म्हणजे नाटक.
3) नाटक म्हणजे शब्दांपासून तयार होणारी संहिता आणि या संहितेचे सादरीकरण म्हणजे नाटक. नेपथ्य, संगीत, प्रकाशयोजना, अभिनय,इ.घटकांच्या मदतीने करता येते.पण या सर्व घटकांची सुप्त शक्ती शब्दानी तयार झालेल्या संहितेत असावी लागते.
● नाटकाचे घटक ●
( अ) विषयसूत्र
( ब) संविधानक
( क) पात्रचित्रण
(ड) संवाद
● नाटकाचे प्रकार ●
1) शोकात्मिका(Tragedy)
2) सुखात्मिका (Comedy)
3)क्षोभप्रदान नाट्य (Melodrama)
4) प्रहसन ( Farce)
■ नाटकांचे उपप्रकार ■
1) एकांकिका
2) दिर्घांक
3) पथनाट्य
4) एकपात्री प्रयोग
5) नाट्यछटा
6) संगीतिका
7) नभोनाट्य
▪️ नाटकांचे आशयानुरूप वर्गीकरण ▪️
1) पौराणिक
2) ऐतिहासिक
3) समस्याप्रधान
अ) सामाजिक
ब) राजकीय
क) दलित
ड) स्त्रीवादी
इ) चर्चाप्रधान
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.