Print Friendly and PDF e-contents Radhanagari College: Model Millionaire

Sunday, 22 September 2024

Model Millionaire

 (e-content developed by Prof (Dr) N A Jarandikar)

The Model Millionaire’

‘द मॉडेल मिलियनेअर’ (‘The Model Millionaire’ /आदर्श लखपती) ही कथा ऑस्कर वाइल्ड (Oscar Wilde) या लेखकाने लिहिलेली आहे. कोणताही हेतू न बाळगता चांगल्या मनाने केलेली मदत ही अनमोल कशी असते, याविषयीची ही गोष्ट आहे. या गोष्टीमध्ये पुढील पात्रे आहेत :

१.       ह्युई अर्सकाईन (Hughie Erskine): हा या कथेचा नायक आहे.

२.       अॅलन ट्रेव्हर (Alan Trevor): हा एक चित्रकार आणि ह्युईचा मित्र आहे.

३.       बॅरन हाऊजबर्ग (Baron Hausberg): हा अॅलन ट्रेव्हरसाठी मॉडेल म्हणून काम करतो आहे.

४.       लॉरा मेर्टन (Laura Merton): ही ह्युईची प्रेयसी आहे.

ही कथा लंडन शहरामध्ये घडते. ह्युई अर्सकाईन हा एक तरुण आणि रुबाबदार युवक आहे. त्याचे वर्णन पुढीलप्रमाणे केलेले आहे : 1. wonderfully good looking; 2. crisp brown hair; 3. clear-cut profile; 4. grey eyes. त्याच्या वडलांनी त्यांच्या पश्चात आपल्या मुलासाठी पुढील गोष्टी सोडलेल्या आहेत : १. तलवार (a sword); 2. इतिहासावरील पुस्तके (History of Peninsular War’ या पुस्तकाचे १५ खंड). या दोन्ही गोष्टी ह्युईच्या उपयोगाच्या नाहीत. त्याची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही. त्याची एक मावशी (aunt) त्याला वर्षाकाठी २०० पाऊंड देते. त्यावर त्याची गुजराण होते. पोटापाण्यासाठी त्याने अनेक उद्योग केलेले आहेत. ते पुढीलप्रमाणे : १. स्टॉक मार्केट (stock market); २. चहाचा व्यवसाय (tea merchant); ३. मद्यविक्री (selling dry sherry). परंतु सगळीकडे त्याला अपयश आलेले आहे.

तो एका मुलीच्या प्रेमात पडलेला आहे. तिचे नाव लॉरा मेर्टन आहे. लॉराचे वडील हे कर्नल (Colonel) आहेत. त्यांनी ह्युईला एक अट घातलेली आहे. ज्यावेळी ह्युईकडे दहा हजार पाऊंड जमा होतील, त्यावेळी ते या लग्नाबाबत विचार करतील. त्यामुळे ह्युई हताश झालेला आहे. कुठून जमा करणार तो एवढी मोठी रक्कम?

एके दिवशी तो फिरत-फिरत अॅलन ट्रेव्हर या मित्राकडे येतो. तो तेथे पाहतो की अॅलन एका मॉडेलचे चित्र काढण्यात गुंग झालेला आहे. अॅलन त्याचे स्वागत करतो. त्या मॉडेलला पाहून ह्युईला धक्का बसतो. कारण ते मॉडेल म्हणजे एक अतिशय गरीब भिकारी (beggar) असतो. तो एक म्हातारा गृहस्थ असतो. त्याचे कपडे फाटलेले (tears and tatters) असतात. बूट खराब झालेले असतात. चेहरा दीनवाणा असतो. आणि आपली टोपी त्याने भिक मागण्यासाठी पुढे केलेली असते. त्या भिकाऱ्याकडे पाहून ह्युईला कणव येते. ह्युई अॅलनला विचारतो की या भिकाऱ्याला मॉडेल म्हणून किती पैसे मिळतील? अॅलन म्हणतो की तासाला एक शिलिंग (shilling). तर त्याच्या चित्राचे अॅलनला दोन हजार गिनीज (guineas) मिळणार असतात. त्या भिकाऱ्याबद्दल अतिशय वाईट वाटल्याने ह्युई त्याला अॅलनच्या माघारी आपल्याकडील सॉव्हेरीन कॉईन (sovereign coin—एक नाणे) काढून देतो आणि निघून जातो.

त्या रात्री ह्युई ११.०० वाजता अॅलनला एका क्लबमध्ये भेटतो. ह्युई त्याला चित्राबद्दल विचारतो. अॅलन चित्र पूर्ण झाल्याचे त्याला सांगतो आणि त्या मॉडेलला ह्युईबद्दल विशेष आस्था वाटल्याचेही सांगतो. त्यामुळे अॅलन ह्युईबद्दलचा सर्व तपशील त्याला सांगून टाकतो. लॉरा आणि दहा हजार पाऊंडबद्दलदेखील तो त्या मॉडेलला सर्व काही सांगून टाकतो. यावरती आपली सर्व माहिती त्या भिकाऱ्याला सांगून टाकल्याबद्दल ह्युई अॅलनवर उखडतो.    

यावर अॅलन जे काही सांगतो ते ऐकून ह्युई चकित होतो. अॅलन त्याला सांगतो की ज्याला तू भिकारी समजतोस त्याचे नाव बॅरन हाऊजबर्ग असे असून तो खरे तर पूर्ण युरोपमधील एक सर्वात श्रीमंत गृहस्थ आहे. त्याने मनात आणले तर तो सगळे लंडन शहर विकत घेऊ शकतो. प्रत्येक महत्त्वाच्या शहरामध्ये त्याची प्रॉपर्टी आहे. तो सोन्याच्या ताटामध्ये जेवतो.

हे ऐकल्यावर ह्युईला धक्का बसतो आणि तो अॅलनला म्हणतो की आणि अशा एका श्रीमंत माणसाला मी एक सॉव्हेरीन कॉईन देऊ केले. अॅलनला ही घटना माहित नसल्याने तोही चकित होतो. ह्युई स्वतःला बोल देऊ लागतो. यावर अॅलन त्याची समजूत काढतो की बॅरन हाऊजबर्ग त्याचे पैसे योग्य ठिकाणी गुंतवेल आणि दर सहा महिन्यांनी त्याचे व्याज ह्युईला देऊन टाकेल.

दुसरे दिवशी बॅरन हाऊजबर्ग यांचेकडून एक वृद्ध गृहस्थ ह्युईकडे येतात आणि एक लखोटा देतात. त्यामध्ये दहा हजार पाऊंडचा एक चेक आणि एक पत्र असते. “एका म्हाताऱ्या भिकाऱ्याकडून ह्युई आणि लॉरा यांच्या लग्नाची भेट” असे पत्रामध्ये लिहिलेले असते.

अशा प्रकारे ह्युईला दहा हजार पाऊंड रक्कम मिळते आणि त्याचे लॉरासोबत लग्न होते. लग्नामध्ये अॅलन आणि बॅरन हाऊजबर्ग स्वतः हजर राहतात. यावेळी अॅलन पुढील उद्गार काढतो :“Millionaire models are rare enough, but model millionaires are rare still.”

म्हणजेच लखपती असणारी व्यक्ती मॉडेल म्हणून क्वचित दिसते. तर एक आदर्श, सर्वगुणसंपन्न असून लखपती असणारी व्यक्ती त्याहून क्वचित दिसते.

 

(एक पाऊंड = २० शिलिंग; एक पाऊंड = एक सॉव्हेरीन कॉईन; गिनी = २१ शिलिंग म्हणजेच एक पाऊंड+एक शिलिंग)     

·         हे वाचून झाल्यानंतर खालील लिंकवर जाऊन प्रश्नावली सोडवा. जोपर्यंत सर्व उत्तरे बरोबर येत नाहीत, तोपर्यंत ही प्रश्नावली पुनःपुन्हा सोडवत रहा. सर्व उत्तरे बरोबर आल्यानंतर ही प्रश्नावली आपल्या वहीमध्ये लिहून काढा.

https://forms.gle/qGqL8hcQqvpjHHkd9

·         खाली दिलेली प्रश्नोत्तरे आपल्या वहीमध्ये लिहून काढा. परीक्षेसाठी त्याचा नीटपणे सराव करा.

 

 

Q. 1 Write a short note on Hughie Erskine.

Hughie Erskine is a main character (प्रमुख पात्र) in the story ‘The Model Millionaire’. The story is written by Oscar Wilde. Hughie is a handsome youth. He has brown hair and grey eyes. But he is a poor fellow. His father had left him only two things – a sword and a 15-volume book on history. He had tried his luck in many businesses.  He had tried in stock market, tried as a tea merchant, tried to sell dry sherry. But in every business, he failed. His aunt gives him 200 pounds every year. That is his only source of income. He is fallen in love with Laura Merton. But Laura’s father is against this marriage. He has asked Hughie to collect ten thousand pounds to marry Laura. But Hughie is a sensible person. When he looks at one beggar in his friend’s studio, feels pity for him and gives him a sovereign coin. Hughie’s this help changes his life altogether.

Q. 2 Write a short note on a beggar.

The name of the beggar is Baron Hausberg. He is a character from the story ‘The Model Millionaire’. The story is written by Oscar Wilde. The beggar works as a model for the painter Alan. The beggar is an old man. His face is wrinkled. His clothes are dirty and torn. His boots were patched. He has held hat for alms. For the modelling, he gets one shilling per hour. But in reality, the beggar is a very rich man. He could buy the city of London. He eats in golden plate. He has property in every main city.

Q. 3 Discuss the end of story ‘Model Millionaire’.

Hughie Erskine is a main character in the story ‘The Model Millionaire’. He is very handsome, but poor. He loves a girl named Laura. But Laura’s father has asked Hughie to collect ten thousand pounds to marry Laura.  Hughie knows that it is an impossible task. At his friend’s studio, he sees one beggar. His friend is using the beggar as his model. Looking at the condition of the beggar, Hughie feels pity for him. He gives him one coin and leaves. But Hughie doesn’t know that the beggar is actually a very rich man. His name is Baron Hausberg. Baron Hausberg likes the sensible personality of Hughie. From the painter, he comes to know about Hughie and Laura. The next morning, he sends a cheque of ten thousand pounds to Hughie.  And finally, Hughie marries with Laura.

*    *    *    *    *

 

 

 

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.

Woamn on a Roof

 (e-content developed by Prof. (Dr) N A Jaranadikar ‘अ वूमन ऑन अ रुफ ’ ही कथा डोरिस लेसिंग या लेखिकेने लिहिली आहे. स्त्रीकडे पाहण्याचा पुरु...