Print Friendly and PDF e-contents Radhanagari College: Serpent Lover

Thursday 12 September 2024

Serpent Lover

 (e-content developed by Prof. (Dr) N A Jarandikar)

The Serpent Lover

     A. K. Ramanujan

ए. के. रामानुजन हे इंग्रजीतून लेखन करणारे एक महत्त्वाचे भारतीय लेखक आहेत. त्यांची ओळख ही मुख्यत्वे एक कवी म्हणून आहे. भारतीय लोककथांमध्ये त्यांना विशेष रुची होती. आयुष्यातील कित्येक वर्षे त्यांनी भारतीय, विशेषतः कन्नड लोककथा गोळा करण्यामध्ये व्यतीत केली आहेत. प्रस्तुतची कथा ‘The Serpent Lover’ ही अशीच एक कन्नड लोककथा आहे. ही कथा त्यांच्या ‘A Flowering Tree’ या पुस्तकातून घेण्यात आलेली आहे.

कामाक्षी नावाची एक तरुण स्त्री या कथेची नायिका आहे. कामाक्षीचे एका तरूणाबरोबर लग्न झाले आहे. पण हा तरुण बाहेरख्याली असून त्याचे अन्य एका स्त्रीसोबत (concubine—विवाहबाह्य संबंध असणारी स्त्री)) संबंध आहेत. कामाक्षीला याची कल्पना आहे. एक दिवस आपला नवरा आपल्याकडे परत येईल, या आशेवर ती जगत आहे. अशीच २-३ वर्षे गेल्यानंतर, एके दिवशी तिच्या शेजारील एक म्हातारी तिला या समस्येचा उपाय म्हणून एक जादुई औषध (love medicine) देते. ते औषध नवऱ्याच्या अन्नात मिसळण्यास सांगते. त्याप्रमाणे कामाक्षी ते औषध खिरीमध्ये (porridge) मिसळते. पण खीर एकदम रक्तासारखी लालभडक होते. घाबरून कामाक्षी ती खीर एका सापाच्या बिळामध्ये ओतून देते. तिथे एक सर्पराज रहात असतो. तो ती खीर पिऊन टाकतो आणि ती जादुई असल्याने तो कामाक्षीच्या प्रेमामध्ये पडतो. तो सर्पराज मग कामाक्षीच्या नवऱ्याचे रूप धारण करतो आणि तिला रोज भेटायला येऊ लागतो. नवऱ्यामध्ये झालेल्या बदलाचे कामाक्षीला आश्चर्य वाटते.

पुढे कामाक्षी गर्भवती राहते. ही गोष्ट जेव्हा सर्पराजाला कळते तेव्हा तो तिला सगळी हकीकत सांगतो आणि आपल्या खऱ्या रुपात प्रकट होतो. पाच फण्यांचा (five-hooded) तो सर्पराज पाहून कामाक्षी गर्भगळीत होते. सर्पराज तिला जादुई औषध आणि खीर याबद्दल सांगतो. तसेच तिला आश्वासन देतो की तिचा नवरा पुन्हा तिच्याकडे येईल आणि सगळे सुरळीत होईल.

तथापि, कामाक्षीचा नवरा तिला स्वीकारण्यास नकार देतो. तो तिच्या चारित्र्यावर शंका घेतो. कामाक्षी पुन्हा सर्पराजाकडे जाते. यावर तो तोडगा काढतो. त्यानुसार ती राजाकडे जाते आणि म्हणते मी पतिव्रता असल्याचे सिद्ध करू शकते आणि त्यासाठी मी शिवमंदिरातील नाग हातात घेण्यास तयार आहे. अर्थातच हा नाग म्हणजेच सर्पराज असल्याने, कामाक्षी या परीक्षेत उत्तीर्ण होते. परिणामी तिचा नवरा तिचा स्वीकार करतो आणि तिच्याकडे कायमचा राहायला येतो. पुढे कामाक्षी प्रसृत होते आणि एका मुलाला जन्म देते. नवरा त्या बाळाच्या प्रेमामध्ये मश्गुल होऊन जातो.

पुढे एके दिवशी तो नवरा ज्या स्त्रीसोबत रहात होता, ती त्या बाळाला पाहण्याची इच्छा व्यक्त करते. त्यावेळी कामाक्षी बाळाला दागिन्यांनी मढवते व राजासमोर त्याचे वजन करते. व वजन/दागिने कमी झाल्यास तिने कामाक्षीची दासी म्हणून काम करण्याची अट घालते. त्यानुसार कामाक्षीची सेविका बाळाला घेऊन त्या स्त्रीकडे येते. दरम्यान सर्पराज आपली कामगिरी चोख बजावतो. बाळाचे वजन कमी भरते, काही दागिने नाहीसे होतात व त्या दिवसापासून ती स्त्री कामाक्षीची दासी म्हणून काम करू लागते. अशा तऱ्हेने कामाक्षी सुखाने संसार करू लागते.

एके दिवशी तिला भेटण्यासाठी म्हणून पुन्हा एकदा सर्पराज येतो. आपल्या नवऱ्याबरोबर ती सुखाने नांदत असल्याचे पाहून सर्पराजाचा मत्सर जागा होतो आणि त्यापोटी तो कामाक्षीच्या केसांमध्ये स्वतःला गुंडाळून घेतो व आत्महत्या करतो. दुसरे दिवशी मृत सर्पराज पाहून कामाक्षी आक्रोश करू लागते. तिच्या नवऱ्याला हे कोडे काही उलगडत नाही. तेव्हा ती त्याला सांगते की सर्पराज तिच्या बाळाच्या वडिलांसमान आहे. त्यानेच तिच्या नवऱ्याला तिच्यापर्यंत पुन्हा पोहोचवलेले आहे. त्यामुळे त्याचे सन्मानाने अंत्यसंस्कार केले पाहिजेत. याला तिचा नवरा दुजोरा देतो. तिचा मुलगा सर्पराजाचे अंत्यसंस्कार करतो. कामाक्षीला आपण सर्पराजाच्या ऋणातून उतराई झाल्याचे वाटते. पुढे ती आपला नवरा आणि मुलगा यांच्यासोबत सुखाने राहू लागते.

 

Q. Discuss the plot of the story The Serpent Lover.

A. K. Ramanujan is an important Indian English poet. He was also interested in collecting the folktales (लोककथा). All his collected folktales are published in the book ‘A Flowering Tree’. The Serpent Lover’ is a Kannada folktale. It is taken from the book ‘A Flowering Tree’.

Kamakshi is the main character in this story. She is a young woman married to one youth. However, her husband is not loyal to her. He lives with one concubine. Kamakshi decides to wait for her husband. She waits for him for 2-3 years. But her husband doesn’t return to her.

One day, an old woman gives Kamakshi love medicine. She tells Kamakshi that if this medicine is given to her husband, he will fall in her love and will return to her. Kamakshi adds that medicine into the porridge. But the porridge turns red like blood. Kamakshi is terrified looking at it. So, she throws it into one serpent’s hole.

A five-hooded king of serpents is living in that hole. The serpent drinks that porridge and falls in love with Kamakshi. He changes his form. He begins visiting Kamakshi in the form of her husband every night. Kamakshi is surprised by her husband’s changed behaviour (वर्तणूक). 

Kamakshi remains pregnant. Listening to this news, the serpent tells her the truth. The serpent promises her that her husband will accept her, and everything will be alright. But Kamakshi’s husband doubts her character (चारित्र्य). He rejects him to be a father of the baby inside her. So, Kamakshi takes an advice from the serpent. As per the serpent’s advice, Kamakshi tells the king that she is ready to hold a cobra (नाग) from the Shiva temple so that she could prove her innocence (निर्दोष). As per the plan, she picks up the serpent in her hand. She is proved innocent. Her husband accepts her. Then Kamakshi gives birth to a baby boy.

One day, the concubine desires to see the baby. Kamakshi tells her one condition. Her son will be wearing jewelry. She will weigh him before the king. After the return, if the baby’s weight is less, it will mean that the jewelry is stolen. In that case, she will work as maid (दासी) to Kamakshi for her rest of the life. The concubine accepts this condition. Once again, the serpent comes to Kamakshi’s help. After the return, the son’s weight is less and some jewelry is missing. So, as per the condition, the concubine becomes the maid of Kamakshi.

One night, the serpent comes to meet Kamakshi. But he finds that she is sleeping very happily with her husband. The serpent feels jealous (मत्सर) about the husband. He twists himself in the loose hair of Kamakshi, and commits suicide (आत्महत्या). The next morning, looking at the dead serpent, Kamakshi starts weeping. The husband asks about it. Kamakshi tells him that the serpent is like her son’s father. The serpent has helped her in getting her husband back. So, she tells her husband that the serpent should get proper funeral rites (अंतिम संस्कार). The husband agrees with this. The son performs the final rites. Kamakshi feels relieved from the debt of the serpent. Then onwards, Kamakshi lives happily with her husband and the son. 

 

*        *        *        *        *

·         वरील प्रश्नाचे उत्तर आपल्या वहीमध्ये लिहून काढा.

·         सोबत दिलेली क्विझ ही सर्व उत्तरे बरोबर येईपर्यंत पुनःपुन्हा सोडवा. सर्व उत्तरे बरोबर आल्यानंतर सर्व प्रश्न व त्यांची उत्तरे वहीमध्ये लिहून काढा. https://forms.gle/pxLphEwe5ke3jMKQ9

*     *     *     *     *

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.

Comedy of Errors_Short Notes

  (e-content developed by Prof. (Dr) N A Jarandikar) Egeon Egeon is an important character from the play ‘The Comedy of Errors’. He is a m...