बी. ए. भाग ३
सञ-पाचवे
अभ्यासक्रमपञिका क्रं ७(मराठी)
(साहित्यविचार)
विषय शिक्षक: प्रा. बी. के. पाटील
अतिशयोक्ती अलंकार:
स्वरुप व उदाहरण:
व्याख्या: "एखादी कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगवून वा खुलवून सांगितली जाते तेव्हा अतिशयोक्ती अलंकार होतो."
किंवा
अतिशय उक्ती म्हणजे अतिशयोक्ती होय.
अतिशयोक्ती या शब्दाचा अर्थ आहे तिखटमीठ लावून एखादी गोष्ट सांगणे,पराचा कावळा करणे.
आपणही बोलतांना अतिशयोक्ती अलंकार वापरतो, मिञ वा मैञिण बर्याच दिवसांनी आपल्याकडे आली तर आपण म्हणतो!" काय यायला रिक्षा मिळत नव्हती का काय? ही अतिशयोक्तीच आहे.
अतिशयोक्ती उदाहरणे:
१ ती रडली समुद्रच्या समुद्र.
२ तुझे पाय असे भासतात जणू हवेवर नाचतात,
३ दमडीचं तेल आणलं, सासुबाईंचं न्हाणं झालं,
मामंजींची दाढी झाली, भावोजींची शेंडी झाली.
उरलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला.
वेशीपर्यत ओघळ गेला, त्यात उंट पोहून गेला,
Comments
Post a Comment