Print Friendly and PDF e-contents Radhanagari College: बी ए भाग ३ /मराठी पेपर क्रं ७ / सञ - पाचवे /साहित्यविचार - अलंकार उपमा अलंकार-स्वरुप व उदाहरण

Thursday, 3 December 2020

बी ए भाग ३ /मराठी पेपर क्रं ७ / सञ - पाचवे /साहित्यविचार - अलंकार उपमा अलंकार-स्वरुप व उदाहरण


बी ए भाग ३

मराठी पेपर क्रं ७

सञ - पाचवे

साहित्यविचार - अलंकार

उपमा अलंकार-स्वरुप व उदाहरण

विषय प्राध्यापक-बी.के. पाटील

    मराठी भाषेतील महत्वाच्या अलंकारापैकी एक म्हणजे उपमा अलंकार आहे.

व्याख्या- जेव्हा दोन गोष्टीतील साम्य पाहिले जाते, एक वस्तू दुसर्‍या वस्तूसारखी आहे असे वर्णन असते तेव्हा उपमा हा अलंकार होतो.

   या अलंकारात दोन गोष्टीमधील साम्य चमत्कृतीपूर्ण रीतीने वर्णन केलेले असते.

     उपमा अलंकारात ज्याला उपमा दिलेली असते त्या वस्तूला उपमेय म्हणतात. तर ज्याची उपमा दिलेली असते त्याला उपमान म्हणतात.

     उपमा अलंकारात दोन वस्तूमधील सारखेपणा किंवा साधर्म दाखविण्यासाठी सम, समान, परी, गत , सारखा , प्रमाणे असे शब्द वापरले जातात.

      उदा.:

१.सावळाच रंग तुझा, पावसाळी नभापरी.

      वरील ओळीत सावळा रंग हे उपमेय आहे. याउपमेयाला पावसाळ्यातल्या नभाची म्हणजे ढगाची उपमा दिली आहे. म्हणून पावसाळी नभ हे उपमान आहे

२.आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे.

३.असेल तेथे वाहत सुंदर दुधासारखी नदी,

४मुंबईची घरे माञ लहान, कबुतराच्या खुराड्यासारखी.

...........................................

  अनुप्रास अलंकार स्वरुप व उदाहरणे.

व्याख्या:   शब्दांच्या किंवा व्यंजनांच्या पुनरावृत्तीमुळे जो अलंकार होतो त्याला अनुप्रास असे म्हणतात. एकच अक्षर पुन:पुन्हा आल्याने नादमधुरता निर्माण होते व काव्याला सौंदर्य प्राप्त होते.

      उदा.

१.गडद निळे गडद निळे जलद भरुनी आले

     शीतलतनु चपलचरण अनिलगण निघाले

      रजनीतल ताम्रनील स्थिर पल जल पल सलील

       हिरव्या तटि कृष्ण मेळ खेळे

     बा भ बोरकरांची या काव्यमय ओळी अत्यंत नादमय आहेत 'ल' या अक्षराच्या पुनरावृत्तीमुळे त्या ओळींना एक वेगळेच सौंदर्य प्राप्त झाले आहे.

२.अडगुलं मडगुलं सोन्याचं कडगुल

     रुप्याचा वाळा तान्हा बाळा तीट लावू.

३,आज गोकुळात रंग  खेळतो हरी।

     राधिके जरा जपून जा तुझ्याघरी।

    असा हा अनुप्रास अलंकार. एकाच अक्षराची पुनरावृत्ती करणारा. वाचकांना मनमुराद आनंद देणारा.

...........................................

रुपक अलंकार स्वरुप व  उदाहरणे   व्याख्या: जेव्हा उपमेय आणि उपमान यात भेद नसून दोन्ही एकरुप आहेत असे दर्शविले जाते तेव्हा रुपक अलंकार होतो.

       उदा:

   १.     लहान मूल म्हणजे मातीचा गोळा.

   २.     देह देवाचे मंदिर। आत आत्मा परमेश्वर

    ३.     समिधाच सख्या या। यात कसा ओलावा।।

             कोठुनि फुलापरि। वा मकरंद मिळावा

   ४.आई भरलं आभाळ। आई नितळ सागर।

       आई चांदणं दुधाळ। आई मायेचे आगर।।

        आई सरिता निर्मळ ।आई हिरवं शिवार।

          आई फुलांचा दर्वळ ।आई मांगल्य अपार।।

    ही कविता नामदेव शिंदे यांची असून ही आईवरची कविता म्हणजे रुपक अलंकाराचे उत्तम उदाहरण आहे.

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.

Human and animal communication

  Human and Animal communication            Language is a specific characteristic of human beings. Animals do not use language. Humans use l...