राधानगरी महाविद्यालय, राधानगरी.
बी.ए.भाग३
सञ पाचवे
अभ्यासक्रमपञिका क्रं ७
(मराठी)
साहित्यविचार
अलंकार-दृष्टांत
विषय प्राध्यापक -प्रा.बी.के. पाटील.
मराठीत 'शब्दालंकार आणि अर्थालंकार असे अलंकारांचे दोन प्रकार आहेत.
१.शब्दालंकार -हे शब्दाच्या विशिष्ट रचनेवर आधारित असतात.
२.अर्थालंकार-हे अर्थावर अवलंबून असतात. अर्थालंकार हे जणू साहित्याच्या आत्माचे सौंदर्य आहेत.
दृष्टांत अलंकार : व्याख्या-एखादे तत्व ,एखादी गोष्ट किंवा कल्पना पटवून देण्यासाठी तसाच एखादा दाखला किंवा उदाहरण दिल्यास दृष्टांत अलंकार होतो.
उदा.
लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा।
ऐरावत रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मार ।।
संत तुकाराम महाराज यांनी वरील ओळीमध्ये दृष्टांत अलंकाराचा वापर केला आहे. ते परमेश्वराकडे लहानपण मागत आहेत . त्यासाठी मूंगीचे व ऐरावताचा दृष्टांत म्हणजे उदाहरण दिले आहे. मुंगी लहान होऊन साखर खाते तर ऐरावत मोठा हत्ती आहे म्हणून त्याला अंकुशाचा मार खावा लागतो.
२. निवडी क्षीर आणि पाणी,राजहंस दोन्ही वेगळाली।
तुका म्हणे तेथे पाहिजे जातीचे,
येरागबाळाचे काम नव्हे।।
हे दुसरे उदाहरण संत तकाराम महाराजांचे आहे. ज्याचे काम त्यानेच करावे हे सांगतांना ते राजहंसाचा दाखला देतात राजहंस पाणी आणि दूध वेगवेगळे करतो. हे काम फक्त त्यालाच जमते इतरांनी करु नये असे ते म्हणतात.
सारांश - दृष्टांत अलंकाराचा सर्वच कवी आणि लेखकांनी भरपूर वापर केला आहे. नानाविध उदाहरणे देत, दाखले देत आपला मुद्दा वाचकांना पटवून दिला आहे.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.