बी. ए. भाग २
मराठी अभ्यासक्रमपञिका क्रं ४
सञ ३ पाठ्यपुस्तक - काव्यगंध.
कविता -आख्यान-वसंत आबाजी डहाके.
विषय प्राध्यापक -प्रा. बी. के. पाटील.
आख्यान-जागतिकीकरणामुळे माणसाच्या आयुष्याची झालेली परवड.
आख्यान ही दीर्घ कविता आहे.जागतिकीकरणामुळे, काॅर्पोरेट जीवनामुळे सर्वसामान्य माणसाचे जगणे हरवले आहे. त्याच्या अस्तित्वाची परवड सुरु आहे. ही परवड कवीने या कवितेत मांडली आहे. हे आख्यान पूर्वीही चालू होतं आणि आत्ताही चालूच आहे.
हरिश्चंद्राचा मुलगा रोहित याला बळी देण्याऐवजी शनु:शेपाचा बाप फायद्यासाठी शनु:शेपाला बदली बळी देण्याचे कबूल करतो, हा उल्लेख कवी करतो व आपलाही बदली बळी दिला जातो असं म्हणतो. केवळ मूठभर धान्याच्या बदल्यात आपला बळी दिला आहे.या राजकारणी व श्रीमंतांनी एक गुढी उभारली आहे. ते बुध्दीजीवी लोकांची बुध्दी विकत घेतात.आज लोकांची गुणवत्ता ही एक विकत घेण्याची वस्तू बनली आहे. पण कवीची मूल्यांवर निष्ठा आहे. त्यामुळे त्याला भ्रमिष्ट झाल्यासारखे वाटत आहे.
पूर्वी भूकंप , दुष्काळ,पूर यामुळे लोक गाव सोडून जात माञ आज विकास आला की माणसं देशोधडीला लागतात. ज्या व्यक्तींचं जगणं हरवलं आहे त्यांनु आपल्या मुळांचा शोध घेणं हे सुध्दा या कवितेच सुञ आहे या महानगरात मनासारखे जगता येत नाही आणि मागे जायची दारे बंद झाली आहेत. गावी एक समूहभाव होता. आता शहरात काॅर्पोरेट कल्चरमुळे हा समूह भाव गाडला गेला आणि एकाकीपण उरले आहे.
आता बदकं आणि राजहंस यांच्यात सत्तास्पर्धा सुरु आहे. यात बदक असणं हे कमीपणाचं आहे आणि राजहंस श्रेष्ठ आहेत असं ठरवलं आहे. पण हे राजहंसानी स्व:च ठरवलं आहे. यात बदकांचा सहभागच नाही. आज शोषकच इतिहास लिहीत आहेत. खरं तर शोषितांनी इतिहास लिहायला हवा, असं कविला वाटतं
सामान्य माणूस टिकला पाहिजे,जगला पाहिजे असं स्वप्न कवी डहाके यांची ही कविता बघते आहे. काळोखात दिवट्या घेतलेल्या माणसांचा एक जथा पुढे सरकतो आहे.
हा जथा पृथ्वीला सावरुन धरेल असा आशावाद ही कविता व्यक्त करते.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.