बी. ए भाग ३ / मराठी अभ्यासक्रमपञिका क्रं ७ / सञ पाचवे/ साहित्यविचार / घटक १/ आधुनिक मराठी साहित्यिकांनी केलेल्या साहित्याच्या व्याख्या
बी. ए भाग ३
मराठी अभ्यासक्रमपञिका क्रं ७
सञ पाचवे
साहित्यविचार घटक १
विषय प्राध्यपक प्रा. बी. के. पाटील
आधुनिक मराठी साहित्यिकांनी केलेल्या साहित्याच्या व्याख्या :
प्रस्तावना :
आपण पाहिले शेकडो वर्षापूर्वी पौर्वात्य म्हणजे संस्कृत साहित्यकारांनी काव्य म्हणजेच साहित्याची व्याख्या करुन ठेवली आहे
आधुनिक मराठी साहित्यातही ना. सी. फडके यांच्याही आधीपासून मराठी साहित्याची व्याख्या लेखक करत आहेतच. या बाबत पुढील साहित्यिकांचा विचार पाहू
१. विनोबा भावे : विनोबा भावे म्हणजे विनायक नरहरी भावे. हे भारतीय स्वातंञ्य सैनिक होते.भूदान चळवळीचे महत्वाचे काम त्यांनी केले अहींसा व करुणा ही त्यांच्या जीवनातील मोठी दोन तत्वे होती. त्यानी आयुष्यभर 'भगवदगीतेला मतृस्थानी मानले. ते स्थितप्रज्ञ वृतीचे होते.निष्काम कर्मयोग ही त्यांची साधना होती.त्यानी समाधी मरण स्वीकाले.
स्वत:च्या आईला गीता समजावी म्हणून त्यांनी गीताई हे गीताचे मराठीत भाषांतर केले.या पुस्तकाच्या २४४ आवृत्या आणि अडतीस लाख प्रती खपल्या आहेत
भारत सरकारने त्यांना भारत रत्न पुरस्कार देऊन गौरविले आहे.
विनोबा भावे यांचीसाहित्याची व्याख्या :
"साहित्य म्हणजे सत्यनिष्ठ आणी सत्यानुभवाचे, जे समाजजीवनाला संस्कारित आणि संपन्न करुन सोडते असे अलिप्त चिंतन होय".
२. अरविंद वामन कुलकर्णी :
मराठीचे व्यासंगी प्राध्यापक म्हणून अ वा कुलकर्णी जाणकारांना माहित आहेत.नाट्यतंञाविषयी त्यांचा संशोधन प्रबंध मौलिक आहे. सामाजिक जाणिवा व्यक्त करणारी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली तसेच १९६० चे महत्वाचे कवी म्हणूनही ओळखले जातात.
अ. वा. कुलकर्णी यांची व्याख्या :
" साहित्य म्हणजे एका व्यक्तिमनाला भावलेल्या कलात्मक सत्याचा आविष्कार होय". या व्याखेत कलात्मक सत्याला महत्व दिले आहे.
गंगाधर गाडगीळ:
यांना ८५वर्षांचे दीर्घ आयुष्य लाभले.५० वर्षापेक्षा अधिक काळ दर्जेदार लेखन ,अर्थशास्ञाचे प्राध्यापक, कुशल प्रशाशक सहा कादंबर्या. सहा नाटके,सात समीक्षा ग्रंथ मुंगीचे महाभारत सारखे आत्मचरिञ त्यांच्या नावावर आहे
गंगाधर गाडगीळांची व्याख्या
जीवनात जे भीषण असतं, जे अटळ पराजय असतात, ज्या जीवघेण्या वेदना असतात, एकाकीपणा असतो, माणसामाणसांच्या संबंधातून निर्माण झालेले शोकनाट्य असतं त्याचा लाव्हारस साहित्यातून व्यक्त होत असतो".
अशा प्रकारच्या मराठी साहित्यातील लेखक समीक्षकांनी केलेल्या साहित्यविषयक व्याख्या आहेत.
Comments
Post a Comment