बी. ए. भाग :२
मराठी अभ्यासक्रमपञिका क्रं: ४
पाठ्यपुस्तक :काव्यगंध.सञ:३
विषय प्राध्यापक :प्रा. बी. के. पाटील घटक:३ अजीम नवाज राही(वंचितांची कविता)
कवी अजीम राही यांचा परिचय.
कवी अजीम राही यांचा जन्म१मे१९६५ रोजी झाला.बुलडाणा जिल्हा सिंदखेड राजा तालुक्यातील सावरखेर्डा हे त्यांचे मूळ गाव आहे. ते आठवी पासून मराठी माध्यामात शिकले.याचा परिणाम दहावीत ते मराठी भाषेच्या पेपरमध्ये नापास झाले व त्यांचे शिक्षण तेथेच थांबले.
पण मराठीत नापास झालेल्या या कवीच्या कविता कालांतराने दहावी मराठी भाषेच्या पाठ्यपुस्तकासाठी निवडल्या गेल्या दुष्काळ व पडझड या त्या कविता होत.
गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली डाॅ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद, संत विद्यापीठ अमरावती,त्याच्या कविता अभ्यासाला आहेत.
अजीम नवाज राही यांच्या कवितांचे इंग्रजी व हिंदी अनुवाद झाले आहेत.
राही यांना मिळालेले पुरस्कार :
*महाराट्र फाऊंडेशन
*महाराट्र शासनाचा कवी केशवसुत पुरस्कार
* इंदिरा संत काव्य पुरस्कार
*नारायण सुर्वे काव्य पुरस्कार
*लोकमत साहित्य पुरस्कार
*शरच्चंद्र मूक्तिबोध पुरस्कार
*कवी कुसुमाग्रज पुरस्कार
*प्रकाशित कवितासंग्रह*
*व्यवहाराचा काळा घोडा
*कल्लोळातला एकांत:२०१२
*वर्तमानाचा वतनदार:२०१७
कवी सावरखेडा येथे पैनगंगा सह. सूत गिरणीॅत काही काळ जनसंपर्क अधिकारी होते.
सध्या ते सावरखेडा येथेच वास्तव्याला आहेत.
दुष्काळ: काही दाहक संदर्भ:कवी अजीम राही यांच्या जीवनावर-भोवतालावर झालेला परीणाम
" दुष्काळ:काही दाहक संदर्भ" या कवितेत दुष्काळाचे ह्रदय पिळवटून टाकणारे वर्णन येते. कवी जेथे राहतात त्या बुलडाणा जिल्यातील परीसरात सततच दुष्काळच दिसतो, या दुष्काळाचा कवीच्या जीवनावर परिणाम झाला आहे. तिथला निसर्ग शेतीभाती, पशुपक्षी यावरही दुष्काळाच्या झळा दिसतात.
करपलेले गवत, आटलेल्या विहिरी,तळ शोधणारी धरणे या मुळे कवीचे मन अस्वस्थ होते,रानातून उपाशीपोटीच गायीगुरे आली आहेत. व्याकूळ वासरे हंबरत आहेत. घरे दुष्काळाच्या झळांनी उदासवाणी दिसत आहेत. वसती समस्यानी घेरलेल्या आणि काळोखात बुडाल्या आहेत. सगळ्या भवतालला वेढून असलेली उदासी कवीच्या मनालाही वेढून घेते.
कवी म्हणतात:
" पारावरच्या म्हातार्या कुतार्यांच्या चर्चा गप्पा
क्षीण डोळ्यात भाकरीची आकृती"
कवी तपशिलात जाऊन दुष्काळाचे वर्णन करतो, कूवळ पशुपक्षी नव्हेत तर म्हातारे व मुलेही दुष्काळाने कसनुसे झाले आहेत. म्हातार्या माणसांच्या क्षीण डोळ्यात भाकरीचे स्वप्न करपले आहे तर लहान मुलांच्या चेहर्यावर भीती आहे ती बालपनच विसरुम गेली आहेत.
बारीकसारीक तपशिलामुळे दुष्काळाची दाहकता वाचकांच्या अंगावर येते जे भोगले ते तसे थेटपणे मांडणे ही या कवीची भूमिका आहे.
थोडक्यात कवी स्व:च्या जीवनावर आणि भवतालावर दुष्काळाचा कोणता परिणाम झाला ते व्यक्त करतात.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.