बी.ए.भाग २
मराठी अभ्यासक्रमपञिका ४
सञ: ३पाठ्यपुस्तक -काव्यगंध.
विषय प्राध्यापक बी के पाटील
खेळ : मुक्तपणे जगू इच्छिणार्या मुलीच्या आयुष्याचा खेळ
खेळ ही आकाराने लहाण पण मोठा आशय सामावणारी त्यांच्या कवितापैकी एक महत्वाची कविता आहे.
या कवितेत लहान मुली खेळ खेळत आहेत.
"कुणी घ्या जाई
कुणी घ्या चमेली
कुणी घ्या गुलाब"
असे म्हणत आहेत.हे एक साधच गाणं आहे. इथे प्रत्येक मुलीला हव्या त्या रंगाचे, हव्या त्या वासाचे फूल निवडायचे स्वातंञ्य आहे. या खेळात एक मुक्तपणा आहे. स्वच्छंदीपणा आहे.
हा खेळ संपतो आणि एक भयानक वास्तव समोर येतं, मग निवडीचं स्वातंञ्य संपत आणि रागावणं, भुवया चढवून दटावणं, गुरकावून, आरडून ओरडून गप्प बसवणं सुरु होतं .हे प्रत्येकीच्याच वाट्याला येतं. खेळातला मुक्तपणा संपतो.
खेळात स्वातंञ्य आहे . पण ते प्रत्यक्षात देणे यात मोठा धोका आहे असे पुरुषांना वाटते. मुली खरेतर सक्षम आहेत! सामर्थवान आहेत. याची पुरूषाना कल्पना आहे माञ मुलींना स्व:ताचे सामर्थ माहीतच नाही.
आणि खेळ खेळता खेळता मुलींच्या आयुष्याचाच खेळ होतो हे वास्तव या लहानशा कवितेत कवी प्रभावीपणे दाखवितात.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.