बी. ए. भाग २
मराठी अभ्यासक्रमपञिका ४
काव्यगंध
सञ -३
विषय प्राध्यापक- प्रा. बी. के. पाटील
गिरणीची लावणी- कामगारांच्या घामाची कहाणी.
प्रस्तावना- सुर्वेचा ऐसा गा मी ब्रह्म १९६२ साली प्रकाशित झाला आणि मराठी कवितेला एक नवा आयाम मिळाला. चिञमयता हा त्यांच्या काव्याचा विशेष ठरला.
"चाक फिरे गरगरा। सूत निघे भरभरा।
नटवया वसुंधरा। आमच्या घामातून।
नाना रुतुंच्या हो कळा।खुलवी माझा वस्ञमळा।
मरवा मोतिया पिवळा। तुरा खोवून।।"
अशी ही नारायण सुर्वे यांच्या" गिरणीची लावणी" आहे. लोककलांशी सुर्वे यांचा जवळचा संबंध आहे.या संस्कारातून या गीताची निर्मिती झाली असावी. सुर्वे यांच्या गीतातील अनुभवाचा घाट गझल सदृश रचनेप्रमाणे साधाच राहिला आहे.
सुर्वे यांची गिरणीची लावणी ही अनेक गुणांनी युक्त आहे. हे गीत फार गाजले या गीतात कापड गिरणीच्या दुनियेचे शब्दचिञ आले आहे. सकाळी सात वाजता भोंगा भूपाळी गातो आणि मोठ्या डौलात गिरणीची पहिली पाळी सुरु होते. चाके गरगरा फिरतात. सुत भरभरा निघते.
कामगार स्वत:च्या घामातून वस्ञे निर्माण करतो. ही वस्ञे वसुंदरेलाही नटवितात. नऊवारी सूत परिधान केलेल्या बाबिणीचा नखरा भारी असतो. साच्यातून गोल कांडी फेरे मारते. झडपीने वारा घातला जातो.तुटलेल्या ताराही जुळवून घेतल्या जातात.ही घामाची कहाणी आहे.
ही नाना रंगांची दुनिया आहे. इथे आभाळाचा रंग घेऊन,हिरव्या सोनाळ शेताचा गंध घेऊन, सात रंगी इंद्रधनूत वस्र भिजवले जाते.
कवितेत नाना रुतुंचे खुबीदार वर्णन आले आहे रुतुचक्रांचे स्पंदन आणि वरदान या वस्रमळ्यात आहे.भोळा कबीर शेले विणतो आहे व जगाला नटवतो. वेगवेगळ्या रंगांची ,वेगवेगळ्या कपड्यांची ही दुनिया आहे.कवी आपल्या लावणीचे नाते थेट कबीरांशी व दौपदीशी जोडतो. पण आज ही वस्रे बनवणार्या कामगाराची लज्या कोण राखणार आहे? आज राबणारा चोर ठरला आहे. ऐतखाऊ शिरजोर झाला आहे.
लावणी या काव्यप्रकाराचा पूर्वीच्या शाहिरांनी वापर केला पण सुर्वे कितीतरी वेगळ्या दृष्टिकोणातून लावणी वापरतात.यामुळे गिरणगावातील ही घामाची कहाणी जणू जिवंत होते.
Comments
Post a Comment