बी. ए भाग २
सञ : ३
मराठी अभ्यासक्रमपञिका क्रं ४
पाठ्यपुस्तक : काव्यगंध
विषय प्राध्यापक : प्रा. बी. के. पाटील
वास्तववाद : भयभीत वर्तमानाला आणि अस्वस्थ भोवतालला दिलेली प्रतिक्रिया.
वास्तववाद ही कविता भयभीत आणि अस्वस्थ भोवतालला दिलेली प्रतिक्रिया आहे.
"जी बीजे पेराल, तशी पिकं निघतात.
तिरस्कार, घृणा, हिंसा यांची बीजे पेराल तर
रक्तानं रंगलेल्या पिकांची कापणी करावी लागेल
आणि खळ्यात तुडवल्या जातील उदध्वस्त वस्ता"
असे कवी म्हणतात.
आज जगभरात द्बेष, हिंसा यांचेच राजकारण दिसते.काही व्यक्ती मुद्दामच वंश, धर्म यांचा आधार घेतात आणि माणसामाणसात भेद निर्माण करतात. प्रेम दिल्याने प्रेम वाढते ही शिकवण जणू विसरुनच गेली आहे. सुंकुचित अस्मितांचे मुद्दे पुढे करुन माणसामाणसातील दरी वाढविण्याचे काम सुरु आहे.हेच वास्तव आज कवीला अस्वस्थ करत आहे. कवी डहाके याकडे मोठ्या गंभीर नजरेने बघतात.
शेतात आपण जे पेरतो तेच उगवते त्याच प्रकारे हिंसा आणि द्बेष यांची पेरणी करुन त्याचेच पीक काढणारे काही जण आहेत. त्यांचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे असे कवीला वाटते.
समाजात एकोपा असावा. एकमेकात प्रेम - जिव्हाळा असावा असे कवीचे स्वप्न आहे समताधिष्ठित समाज निर्माण करावा असे कवीला वाटते पण असे वाटणार्यांची संख्या फारच कमी आहे.
समाजात समता असावी असे वाटणार्या लोंकांच्या विचाराचे कोंब खुडले जात आहेत. माणूसपण धोक्यात आणले जात आहे
असे एक दाहक वास्तव ही कविता वाचकांच्या समोर आणते वाईट गोष्टी टाळून वास्तवाचा हा विस्तव हातात घेऊन काटेरी रानातून जायचे आहे आणि तो पुढच्या पिढीकडे सोपवायचा आहे.
पण हा विस्तव सकारात्मक कामासाठी वापरायला हवा अशी कवी सुचना करतात.
अशी ही कविता वास्तववाद एक भीषन वास्तव वाचकासमोर उभे करणारी, धोक्याची सुचन करणारी कविता आहे.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.