बी.ए. भाग-१ मराठी
• आवश्यक अनुषंगिक निवड( CGE- 1)
¤ निवड- यशवंतराव चव्हाण ¤
यशवंतराव बळवंतराव चव्हाण (1913-1984)
महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय नेते.सविनय कायदेभंग चळवळीत सहभाग, 1942 च्या छोडो भारत आंदोलनात सहभाग,स्वतंत्र भारताचे संरक्षणमंत्री,गृहमंत्री,अर्थमंत्री,परराष्ट्रमंत्री. कार्यक्षम मंत्री,उत्तम संसदपटू,उदारमतवादी नेते,वक्ते आणि लेखक म्हणून परिचित. 'कृष्णाकाठ' हे आत्मचरित्र. 'सह्याद्रीचे वारे',युंगातर या दोन संग्रहातून विचारप्रवर्तक भाषणे प्रकाशित.
▪️निवड▪️
या पाठातून यशवंतराव चव्हाण यांच्या महाविद्यालयीन जडणघडणीचा प्रत्यय येतो.कोल्हापूरशी जिव्हाळ्याचे नाते, कायद्याच्या शिक्षणासाठी पुण्यातील महाविद्यालयात प्रवेश, वाचनाशी जडलेले नाते,शिक्षणाबरोबर समाजकारण, राजकारणातील सक्रियता,अभ्यासमंडळे,सभा-संमेलनातील सहभाग या सर्वांमुळे कायद्याच्या प्रथम वर्षांत आलेले अपयश,त्यावर केलेली मात,दुसरे महायुद्ध,या महायुद्धाचा भारतावर झालेला परिणाम,वेगवेगळ्या विचारसरणीशीं करावा लागलेला संघर्ष यांचे इ.बाबींचे चित्रण या लेखात केले आहे.शिक्षण घेत असताना आपल्या वर्तमान जगण्याशी असलेले नाते,त्यात सक्रिय सहभाग असूनही आपले व्यक्तीमत्व कसे संपन्न,विविधांगी आणि सुसंस्कृत करता येते याचा प्रत्यय या पाठातून येतो.
Comments
Post a Comment