बी.ए. भाग-१ मराठी • आवश्यक अनुषंगिक निवड( CGE- 1) ¤ वाटेवरच्या सावल्या ¤ कुसुमाग्रज तथा विष्णु वामन शिरवाडकर
बी.ए. भाग-१ मराठी
• आवश्यक अनुषंगिक निवड( CGE- 1)
¤ वाटेवरच्या सावल्या ¤
कुसुमाग्रज तथा विष्णु वामन शिरवाडकर (1912-1999)
▪️वाटेवरच्या सावल्या▪️
आधुनिक कवी,नाटककार व कादंबरीकार. 'जीवनलहरी','विशाखा','किनारा,'मराठी माती,'स्वगत',' हिमवर्षाव,'वादळवेल', महावृक्ष इ.काव्यसंग्रह प्रकाशित. 'दुसरा पेशवा',कौंतेय','आमचं नाव बाबूराव ','ययाती आणि देवयाणी','वीज म्हणाली धरतीला','नटसम्राट 'ही नाटके प्रकाशित. कालिदासाच्या 'मेघदूता'चे तसेच अन्य पाश्चात्य नाटकांचे मराठीत रूपांतर 'वैष्णव ','जान्हवी,'कल्पनेच्या तीरावर 'या कादंबऱ्याही लिहिल्या आहेत. शिवाय कथा,निबंध आणि काव्यसमीक्षात्मक लिखाणही त्यानी केलेले आहे.साहित्य अकादमी आणि ज्ञानपीठ या पुरस्कारानी ते सन्मानित आहेत.
'वाटेवरच्या सावल्या' या पाठात कुसुमाग्रज यांनी त्याच्या बालपणातील सुंदर आठवणी ओघवत्या भाषेत कथन केल्या आहेत.कौटुंबिक वातावरण,माध्यमिक शाळेत असताना साहित्य,कला,क्रिडा,नाटक यांची लागलेली गोडी,वाचनाचे संस्कार, एका फकिराची अरेरावी वृत्ती व त्याच्याशी झालेली झटापट,शिक्षकांच्या अध्यापनातून झालेले काव्याचे संस्कार, क्रिकेट या खेळाची मनस्वी आवड आणि त्यासाठी केलेल्या खटपटी यांचे मनोरम वर्णन कुसुमाग्रजांनी केले आहे.शिवाय 'वणी' नावाचे लहानसे गाव, या गावातील ग्रंथालय,चिपळूणकरांची ग्रथमाला,गडकर्याची नाटके,कवितासंग्रह,कादंबर्या इ.वाचन,नाटके आणि काव्याच्या छंदापायी गणित विषयात आलेले अपयश;हे सारे काही या पाठात कुसुमाग्रजांनी आत्मियतेने कथन केलेले आहे.
नाशिकच्या एच.पी.टी.महाविद्यालयात शिकत असताना कुसुमाग्रज गणित विषयात नापास झाले.एक वर्ष वाया गेले.वडिलांना झालेल्या दु:खाने त्याना खुप वाईट वाटले.पुढे त्यांनी झटून अभ्यास केला.मराठी आणि इंग्रजी विषयात बी.ए. झाले या पाश्र्वभूमीवर त्यानी पुढे केलेली प्रगती थक्क करून सोडते.
Comments
Post a Comment