बी ए भाग (१विद्याशाखीय विशेष गाभा DSC-A1)
मराठी(ऐच्छिक) पेपर क्रं१
चिञपट: दृकश्राव्य माध्यम,छायाचिञण,पटकथा, संवाद
विषय प्राध्यापक: बी.के. पाटील
चिञपट हे एक दृक श्राव्य माध्यम :
चिञपटाशी समानार्थी असणारे अनेक शब्द आहेत विशेषत: फिल्म, मोशन मूवी, सिनेमा हे शब्द महत्वाचे आहेत फिल्म हा शब्द प्लास्टिक कोटींगच्या पारदर्शक व गुंडाळी करता येणार्या रीळाशी संबंधित आहे. या मध्ये कॅमेर्याने चिञित केलेली दृश्य व संगीताचे तसेच ध्वनीचे संकलन करता येते आणि फिल्म यंञाच्या साह्याने पडद्यावरती दाखविते येते.
आठ एम एम, सोळा एम एम ,पस्तीस एम एम ,सत्तर एम एम यावरुन चिञपटास फिल्म असे म्हटले जात असावे. मोशन मूवी म्हणजे चलत चिञपट
थोडक्यात मोशनमूवी म्हणजे हलणार्या वस्तूचे कॅमेर्याच्या साह्याने केलेले चिञिकरण. सिनेमा शब्द हा इंग्रजीत आहे तो चिञपटामधील दृश्याची संबंधित आहे म्हणून चिञपट म्हणजे कॅमेर्याने दृश्यीत केलेल्या दृश्यांची मालिका असे म्हणता येईल .
चिञपटात खालील बाबी असतात
१.आयडिया म्हणजे कल्पना
२.संकल्पना
३.कला दिग्दर्शक व त्याची संहिता
४कॅमेरा व त्याची उपकरणे
५.वेशभूषा व त्याची संहिता
६.विचार व तत्वज्ञान
७कथा, पटकथा, संवाद आणि गीते
८.प्रकाश योजना
९. दिग्दर्शक व त्याच्या संहिता
१०.रंगभूषाकार
११.संकलक व त्याचे संकलन
१२.व्हिडिओ इफेक्ट
१३.ग्राफिक्स व पोस्टर डिझाइन
१४.निर्मिती व्यवस्थापन व त्याची संहिता
१५.प्रसिध्दी व्यवस्थापन
अशा बर्याच घटकांचा समावेश होतो.
पटकथा:
पटकथेला इंग्रजीमध्ये स्कीन प्ले म्हणतात. पटकथेत कथेची विभागणी वेगवेगळ्या दृश्यात होते. एका चिञपटामधून दिग्दर्शकाला जसं काही सांगायचं असतं तसेच प्रत्येक दृश्यामधून काही सांगायचं असतं.
पटकथेत लेखक काय सांगतो हा कळीचा मुद्दा आहे स्थुलमानाने वेळ, स्थळ, पाञपरिचय, कलाकाराची कृती, त्यांचा अभिनय, प्रकाश योजना, दृश्यामधील वातावरण, स्थळ वर्णन पाश्व संगीत ,इ.बाबी येतात.तसेच चिञीकरणानंतर संकलन!डी. आय, डबिंग' व्हिडिओ ,स्पेशल इफेक्ट,इ संस्कार होतात. पटकथा ही दिग्ददर्शक, कलादर्शक, कॅमेरामन, संगीतकार, वेशभुषाकार प्रकाशयोजनाकार,पाश्वसंगीत यांना सामग्री पुरविते.
पटकथा म्हणजे शूटिंग करावयाच्या दृश्यांची संरचना आहे. अलीकडे पटकथेला तांञिक स्वरुप येऊ लागलं आहे.
संवाद:
चिञपटाची पहिली भाषा कॅमेर्याची असली तरी संहितामधील भाषिक सामग्रीही खूप महत्वाची आहे. उदा शोले मधील गब्बर सिंग चा डायलाॅग 'कितने आदमी थे ? डाॅन मधील अमिताभचा डायलाॅग 'डाॅन को पकडना मुश्कील ही नही नामुमंकीन है!' किंवा आताच्या सैराट मधील आर्चीचा संवाद'मराठीत सांगितलेलं समजत नाही का? इंग्रजीत सांगू'
मुळात चिञपट माध्यम चिञपटांमधून सामाजिक वास्तव मांडण्याचा प्रयत्न करते निधान वस्तुनिष्ठतेचा आभास निर्माण करते. त्यासाठी चिञपटाची भाषा वस्तुनिष्ठतेने व्यक्त होणे गरजेचे आहे. काव्यात्मक , अलंकारीक भाषेला चिञपटामध्ये वावडे नसले तरी सर्रासपणे अशी भाषा वापरली जात नाही. तसेच उच्यारावरही लक्ष दिले जाते, अनावश्यक भाषेचा वापर टाळला जातो.
उदा. अलीकडच्या बबन ,ख्वाडा चिञपटामध्ये शिव्याचा वापर आहे चिञपटाची भाषा वस्तुनिष्ठ करण्याकडे तोकल आहे. अलीकडे हिंदी,मराठी चिञपटामधून व गाण्यामधून प्रेक्षकावर्ती होणारा परिणाम लक्षात घेऊन भाषेचा वापर होताना दिसतो.
उदा. मुन्नी बदनाम हुई. झेंडू बाम हुई या गाण्यामध्ये वापरलेला झेंडू बाम शब्द किंवा सिंघम चिञपटामध्ये वापरलेली भाषेची टॅगलाईन 'आता माझी सटकली' यावरुन एक गोष्ट लक्षात येते समाजामध्ये संमिश्र भाषेचा वापर होतोय. म्हणून चिञपटाची किंवा गाण्याची भाषा बदलते.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.