बी ए भाग ३
मराठी पेपर क्रं१२
सञ ६
विषय साहित्यविचार
विषय प्राध्यापक प्रा बी के पाटील
प्रास्ताविक
काव्याचे शरीर म्हणजे शब्द+ अर्थ म्हणजे शब्दार्थ याचा विचार काव्यलक्षणामध्ये पाहिला. शब्द आणि त्यांचे विविध अर्थ यांच्या साह्याने ध्वनी किंवा रस याची रस निष्पत्ती होते.
शब्द शक्ती म्हणजे काय?
शब्द शक्ती म्हणजे शब्दांचे अर्थ व्यक्त करणारी क्षमता शब्द एकच असतो ,पण तो ज्या ठिकाणी योजला आहे, ज्या हेतुने योजला आहे आणि ज्या परिणामाच्या अपेक्षेणे योजिला आहे,त्यावरुन त्या एकाच शब्दाला अनेक अर्थ प्राप्त होतात.
अभिधा
शब्दाची पहिली व मुख्य शक्ती अभिधा होय मनात निर्माण होणारा तो मुख्य अर्थ होय
उदा वृक्ष शब्द उच्यारताच आपल्या मनासमोर जी आकृती येते ती एक सरळ अर्थ दर्शविते
अभिधेचे प्रकार---
अ)योग योग म्हणजे व्युत्पती
उदा भारतीय या ठिकाणी 'य' प्रत्यय लावून'भारतीय' असा शब्द झाला
ब)रुढी शब्दाची ही शक्ती रुढीने प्रस्थापित झालेली असते उदा वेगवेगळ्या सोयीनीयुक्त अशी रचना करुन बांधलेले ते गृह म्हणजेच घर
क)योगरुढ काही शब्दाना अवयव असतात पण त्याचा व्युत्पत्तीने न होता रुढीने निश्चित होतो
उदा पंकज 'पंक' म्हणजे चिखल चिखलात जन्मलेले ते सर्व पंकज ठरायला हवे पण या शब्दाचा अर्थ आपण असा घेत नाही
Comments
Post a Comment