बी.ए. भाग -तीन
मराठी अभ्यासक्रमपञिका १६
सञ सहा.
पाठ्यपुस्तक :वाड:मय प्रकाराचे अध्ययन ललितगद्य(व्यक्तिचिञे)
विषय प्राध्यापक प्रा. बी. के. पाटील.
मृत्यूचे चुंबन घेणारा महाकवी:
हा एक वेगळ्या प्रकारचा लेख आहे. त्याला रुढार्थाने मृत्युलेख म्हणावे लागेल.साने गुरुजींचे जीवन हे राट्रजीवनासाठी वाहिलेले समर्पित जीवन होते. सुरुवातीलाच आचार्य अञे यांच्यासारखा समर्थ साहित्यिक साध्या सोप्या भाषेत साने गुरुजींचे व्यक्तिचिञ समग्रतेने उभे करीत आहेत.
"हे सात दिवस मी विचार करतो आहे.त्यांच्या भाषणाचा विचार करतो आहे.त्यांच्या मरणाचा विचार करतो आहे. त्यांच्या उपोषणाचा विचार करतो आहे. त्यांच्या बसण्याचा विचार करतो आहे त्यांच्या उभे राहण्याचा विचार करतो आहे. संकोचाच्या भावनेने सदैव अवघडलेली त्यांची आकृती माझ्या डोळ्यासमोर उभी आहे. ओठांच्या दोन्ही कोपर्यातुन त्यांचे ते ओशाळू हसू अजून माझ्या दृष्टिपुढे उभे आहे.स्नेहभावाने डबडबलेल्या त्यांच्या डोळ्याच्या ओल्या कडा अजुन मला दिसता आहेत.
याठिकानी त्यांच्या आयुष्याचे प्रयोजन न सांगता अधोरेखित झाले आहे .ही सारी किमया आहे आचार्य अञे यांच्या शब्दप्रभु साहित्याची.
साने गुरुजी आणि आचार्य अञे यांची डोळाभेट झालेली आहे. त्यांचे वाड:मय अञे यांनी आवडीने वाचलेले आहे. त्यांच्या जीवनाचा अन्वयार्थ अनेकांनी अनेक तर्हांनी लावला अञे यांनी आपल्या आकलनानुसार लावण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या कवित्वशक्तिवर प्रकाश टाकतांना ते मातृह्यदयाचे कवी होते असे आञेना वाटते. मातृप्रेमात ममता असते,तशीच समता असते. साने गुरुजी यांचे व्यक्तिमत्वही असेच आहे.
गुरुजींचे सारे सामर्थ त्यांच्या अश्रुत होते. आपला दुबळेपणा रडकेपणा या वाशेषणांनी उपहास केला. याचे त्यांना वैषम्य वाटते. पण अश्रुंच्या सामर्थामुळे कश्मल कसे घालविता येते याचा आदर्श साने गुरुजींनी निर्माण कूला आहे . हे उदाहरणासह आचार्य अञे यांनी दाखवून दिले आहे.
गरीब आणि श्रमजीवी जनतेची सर्व दु:खे आणि दुखणी दूर व्हावीत ही साने गुरुजींच्या जीवनातील तळमळ होती."माझ्या वाड:मयाला हात लावाल तर माझ्या ह्रदयाला हात लावाल" असे ते म्हणत होते. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे आणि वाड:मयाचे अभिन्न असे नाते होते.
शुद्ध, निर्हेतुक आणि आत्यंतिक प्रेम ही साने गुरुजींच्या जीवनाची प्रेरणा होती.
साने गुरुजींनी आत्मसमर्पण का केले याची मीमांसा आचार्य अञे यांनी आपल्या परीने केली आहे. समाजातील जातीयता, प्रातीयता आणि ध्येयशुन्यता नष्ट करण्यासाठी साने गुरुजींनी जन्मभर प्रयत्न केले. पण ते फलद्रूप झाले नाहीत म्हणून त्यांना कमालीचे नैराश्य प्राप्त झाले असे त्यांना वाटते . या लेखाचा शेवट त्यांनी हळूवारपणे केला आहे. साने गुरुजी जरी देहरुपाने गेले असले तरी त्यांचे वाड:मय मातेच्या वात्सल्याने अनंत काळापर्यत महाराष्टातील तरुण पिढीचे संगोपन करीत राहील अशी श्रद्धा बाळगून आहेत
"मत्युचे चुंबन घेणारा महाकवी" हे आचार्य अञे यांनी या व्यक्तिचिञाला दिलेले शीर्षकही अर्थपूर्ण आहे. साने गुरुजींच्या समर्पित जीवनाला ते कवेत घेणारे आहे
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.