Print Friendly and PDF e-contents Radhanagari College: बी ए भाग १ /सञ २ / अभ्यासक्रमपञिका क्रं २ / पाठ्यपुस्तक अक्षरबंध (बाकी सर्व ठीक आहे) /लोकनाथ यशवंत

Monday, 19 April 2021

बी ए भाग १ /सञ २ / अभ्यासक्रमपञिका क्रं २ / पाठ्यपुस्तक अक्षरबंध (बाकी सर्व ठीक आहे) /लोकनाथ यशवंत

                                                         पाठ्यपुस्तक: अक्षरबंध (बाकी सर्व ठीक आहे)

लोकनाथ यशवंत

कवी परिचय

कवी लोकनाथ यशवंत यांचा जन्म १३मार्च१९७६ रोजी झाला. ते आंबेडकरवादी कवी आहेत. त्यांची कविता वास्तवाला भिडणारी आहे तसेच ती जीवघेणे अनुभव व्यक्त करते भगवान गौतम बुध्द यांच्या'**प्रतितसमुत्पाद** या तत्वाचा विचार मांडून कवी मानवाचे दु:खी जीवन दु:खमुक्त करु पाहतात. यातुन माणूस निसर्ग आणि समाज यांच्या धारणतत्वात जी मूल्यनिष्ठा आहे ती कवी टिकवू बघतात

    लोकनाथ यशवंत यांची कविता आक्रस्ताळी नाही .ती वेदना, विद्रोह आणि नकार यांना विवेकाचा आयाम देते.

     कवीने गौतम बुध्दांच्या प्रज्ञा, शील ,करुणा, अहिंसा आणि सदाचार या तत्वांचा स्वीकार केला आहे. माणूस हा केंद्र मानला आहे. लोककल्यानाचा विचार करता करता वाड:मयीन मूल्ये आणि जीवनमूल्ये यांची जोपासना केली आहे.

लोकनाथ यशवंत यांचे प्रकाशित कवितासंग्रह

*आता होऊन जाऊ द्या १९८९

*आणि शेवटी काय झाले? १९९५

*पुन्हा चाल करु या!२००९

*बाकी सर्व ठीक आहे२०१४

योग्य पर्याय निवडा

१ पुढीलपैकी कोणता कवितासंग्रह कवी लोकनाथ यशवंत यांचा नाही ?

अ)किडे जगतात घाणीत

ब)आता होऊन जाऊ द्या

क)आणि शेवटी काय झाले?

ड)बाकी सर्व ठीक आहे

२ कवी लोकनाथ यशवंत यांचा जन्म किती साली झाला?

अ)१९७४

ब)१९७६

क)१९७८

ड)१९८०

३ लोकनाथ यशवंत यांचा पहिला कवितासंग्रह किती साली प्रसिध्द झाला?

अ)१९८७

ब)१९८९

क)१९९१

ड)१९९३

४ 'जिवाचा आटापिटा' या कवितेतील तो कशासाठी जिवाचा आटिपिटा करीत आहे?

अ)कवीशी मैञी व्हावी म्हणून

ब)आपणही कवी व्हावे म्हणून

क)कवीची जात कळावी म्हणून

ड)कवीने दारू पिऊ नये म्हणून

५ जिवाचा आटिपिटा या कवितेतील कवीच्या मुलांची नावे काय होती?

अ)मुक्तछंद आणि समुद्र

ब)अभंग आणि ओवी

क)समीक्षा आणि कला

ड)कादंबरी आणि पोवाडा

६'मुख्य प्रवाह' या कवितेत शहरात राहून माणसाशी कसे वागायचे असते असे कवी म्हणतात?

अ)एकदम तोडून टाकायचे

ब)हळूहळू दूर सारायचे

क)त्याचा खून करायचा

ड)गोड गोड वागायचे

७ मुख्य प्रवाह या कवितेत  कोणती गोष्ट हाडे पोखरत आहे, असे कवी म्हणतात?

अ)पालेभाज्यांची रसायने

ब)पेट्रोलचा काळा धूर

क)मतलबी वागणे

ड)संवेदनहीनता

९ कवी लोकनाथ यशवंत यांना पुढीलपैकी कोणता पुरस्कार मिळाला नाही?

अ)महाराष्र्ट राज्य वाड:मय पुरस्कार

ब)भैरु रतन दमाणी पुरस्कार

क)अस्मितादर्श वाड:मय पुरस्कार

ड)महाराट्र साहित्य परिषद पुरस्कार

१० मुख्य प्रवाह या कवितेत शहरात गेल्यानंतर कसे प्रेम दाखवावे, असे कवी म्हणतात?

अ)मनाच्या तळापासून

ब)भडभड बोलून

क)सामनेवाल्याला तोलत

ड)मनात काहीही असलं तरी

*टिप - योग्य उत्तरे 'ठळक' केली आहेत


No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.

Woamn on a Roof

 (e-content developed by Prof. (Dr) N A Jaranadikar ‘अ वूमन ऑन अ रुफ ’ ही कथा डोरिस लेसिंग या लेखिकेने लिहिली आहे. स्त्रीकडे पाहण्याचा पुरु...