बी. ए. भाग :२ / मराठी अभ्यासक्रमपञिका क्रं ४ सञ :३/ पाठ्यपुस्तक : काव्यगंध/ *सुरक्षेची हमी देणारा कळपवाद* कवी - अजीम राही.
बी. ए. भाग :२
मराठी अभ्यासक्रमपञिका क्रं ४
सञ :३
पाठ्यपुस्तक : काव्यगंध.
विषय प्राध्यापक प्रा बी. के. पाटील
*सुरक्षेची हमी देणारा कळपवाद*
कवी - अजीम राही.
'सुरक्षेची हमी देणारा कळपवाद':कळपाबाहेरील व्यक्तींचा छळ.
या कवितेत समूहाने राहाणार्या माणसाची आज जी परवड होते आहे ती व्यक्त केली आहे. तसे पाहिले तर कळपाने राहाणे हे सर्वच पशुपक्षांना सोयीचे व फायद्याचे वाटते तसेच माणूसही समाजप्रीय प्राणी आहे.पण कालांतराने या समाजाचे रुपांतर कळपात होते आणि जे दुर्बल आहेत त्यांचा छळ होतो. याछळाविरोधी प्रतीक्रिया कवी अजीम देतात.
कवी मस्लिम बांधव आहेत. हा समाज अल्पसंख्य वर्गात मोडतो. अल्पसंख्य लोकांना ज्या ज्या समस्या येतात त्या त्या समस्या अजीम राही यांनाही जाणवतात. जे लोक मळलेल्या वाटेने जायचे नाकारतात त्यांच्यासाठी सजातीय तलवारी उपसतात. प्रसिध्दी माध्येमेही वेगवेगळे अर्थ लावतात. जातीचे आणि जाती बाहेरचे असे दोघेही अभागी जीवांचा छळ करतात.
हे सगळं पाहताना आपली कविता रक्तबंबाळ होते असे कवीला वाटते, आपण संयम तरी कुठवर दाखवायचा हेही कळेनासे होते.सर्व घटना धक्कादायकच घडत जातात. काहीजण बिरादारी बाहेरच्या लोकांना छळण्यातच सुख मानतात. काही लोक जत्यांध असतात. काही वेगळ्या धर्माच्या लोकांना ञास देतात.
अशी ही कवीता, कळप करणे ही एक नैसर्गिक वृत्ती आहे. पण काही माणसांनी माञ याचा गैरफायदा घेत दुसर्यांना छळायचा मार्ग कसा स्वीकारला आहे याचे भयानक वास्तव दाखवणारी अजीम राही यांची ही कविता आहे.
Comments
Post a Comment