Print Friendly and PDF e-contents Radhanagari College: बी.ए.भाग-१ (मराठी आवश्यक) / अनंत फंदी

Monday, 19 April 2021

बी.ए.भाग-१ (मराठी आवश्यक) / अनंत फंदी

                                                      अनंत फंदी   (इ. स. १७४४-१८१९)

      'फंदी आनंदाची कविता सवाई सोटा सोटा रे'असा आत्मविश्वास घेऊन मराठी शाहिरी काव्यात आपले नाव अजरामर करणारा कवी म्हणजे आनंत  फंदी होय. त्यांच्या जन्म मृत्यु संदर्भात नेमकी माहिती उपलब्ध नाही. पेशवे काळातील हा एक महत्त्वाचा कवी. आनंत फंदी यांचे गाव संगमनेर.पूर्वजांचा व्यवसाय गोंधळी पणाचा व सराफीचा होता. आपल्या कवित्वाच्या बळावर तो प्रसिद्ध शाहीर झाला. व पुढे अहिल्याबाई होळकर यांच्या सल्ल्याने तो कीर्तन करण्यास प्रवृत्त झाला. व पुढे तो प्रसिद्ध कीर्तनकार झाला. आनंद फंदी चे पोवाडे, लावण्या, कटाव व फटके उपलब्ध आहेत. आनंत फंदी यांचा 'खर्ड्याच्या लढाईवर' पोवाडा प्रसिद्ध आहे. 'माधव ग्रंथ' हा त्यांच्या नावावर आहे.

 ' जमाना आला आला उफराटा ' या लावणीत अनंत फंदी यांनी पेशवे काळातील अनागोंदीचे चित्र रेखाटले आहे. सुन, लेक, शिष्य अनुक्रमे सासू, वडील आणि आणि गुरूला किंमत देत नाहीत. त्यांची निंदा करतात जावई सासूला किंमत देतो व आईला लावंडून देतो. बहिणीला अपशब्द वापरून मेहुणीचे लाड पुरविणारा भाऊ, आईवडिलांची निर्भत्सना करुन बायकोचे लाड पुरवणारा लबाड मुलगा, मालकावर उलटनारे चाकर, बेईमान सावकार, दरबाराची बिघडलेली शिस्त, व्यापारी लोकांनी केलेली लूट, फालतू लोकांना आलेली किंमत, चमचेगिरीचा सुळसुळाट या सारख्या अनेक घटकांचे  स्पष्ट शब्दात फंदी यांनी वर्णन केले आहे.

       'हे मूर्खा खून तर्का' जीवनातील काही कटू अनुभवातून आणि भोवतालच्या परिस्थितीच्या निरीक्षणातून आनंत फंदीच्या लेखणीला धार चढत गेली. त्यातूनच काही उपरोधिक लावण्याची रचना झाली त्यातील एक लावणी म्हणजे 'हे मूर्खा खून तर्का' होय. यामधून दिसते तसे नसते हे सत्य त्यांनी उपरोधक पद्धतीने मांडले आहे. बाहेरून जे चांगले वाटते तसे आतूनच असेलच असे नाही. याची अनेक उदाहरणे कवीने या लावणीतून दिली आहेत. आणि सावधपणे जगाकडे पाहण्याचा सल्ला दिला आहे. उपदेशपर रचना, मौलिक व्यावहारिक संदेश, रांगडी भाषा, व्यवहार ज्ञान सडेतोडपणा ही फदीच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत.

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.

Woamn on a Roof

 (e-content developed by Prof. (Dr) N A Jaranadikar ‘अ वूमन ऑन अ रुफ ’ ही कथा डोरिस लेसिंग या लेखिकेने लिहिली आहे. स्त्रीकडे पाहण्याचा पुरु...