बी. ए. भाग -१ / सञ - २ / अभ्यासक्रमपञिका २ /पाठ्यपुस्तक : अक्षरबंध/ बाकी सर्व ठीक आहे(निवडक कविता) -कवी लोकनाथ यशवंत
बी. ए. भाग -१
सञ - २
अभ्यासक्रमपञिका २
पाठ्यपुस्तक : अक्षरबंध बाकी सर्व ठीक आहे(निवडक कविता)
-कवी लोकनाथ यशवंत
विषय प्राध्यापक - प्रा. बी. के. पाटील.
कविता -राग - योग्य पर्याय निवडा.
१) सरकारला कोणत्या बाबींकडे लक्ष द्यायला वेळ नाही असे कवी'राग' या कवितेत म्हणतात
अ) दुष्काळाकडे
ब) कुपोषणाने मरणार्या मुलांकडे
क) सुशिक्षित बेकारांकडे
ड) वाढत्या लोकसंख्येकडे
२) ' राग ' या कवितेत कुपोषणाने बालकांचे मृत्यू होत असूनही कोण आनंदात आहेत असे कवी म्हणतात ?
अ) बालकांचे पालक
ब) सरकार
क) एनजीओवाले
ड) सरकारी अधिकारी
३) कुपोषित बालकांच्या प्रश्नाबाबत डाॅक्टरसाहेबांशी बोलत असतांना ते काय म्हणाले ?
अ) त्यांनी शहरात मुख्य धारेत यावे
ब) त्यांनी कुटुंबनियोजन करावे.
क) कुपोषित ही सरकारची जबाबदारी नाही.
ड) कुपोषितांनी आपले उत्पन्न वाढवावे.
४) ' कुपोषितांनी शहरात मुख्य धारेत यावे ' या डाॅक्टरसाहेबांच्या बोलण्यावर कवी काय म्हणाले ?
अ) त्यांना नोकर्या द्या.
ब) त्यांना शिक्षण द्या.
क) त्यांना तुमच्या वातानुकूलित
घरात आणून ठेवतो
ड) त्यांना नजरपालिकेसमोर उपोषणाला बसवितो.
५) ' कुपोषितांना तुमच्या वातानुकूलित घरात आणून ठेवतो ' या कवीच्या उत्तरावर डाॅक्टरसाहेबांची काय प्रतिक्रिया होती ?
अ) ते चकितच झाले.
ब) ते कवीशी भांडले.
क) ते कवीला शिव्या देऊ लागले.
ड) ते आत कवीकडे बघतच नाही.
उत्तरे :-
योग्य पर्याय.............,,
१) ब) कुपोषणाने मरणार्या मुलांकडे
२) क) एनजीओवाले
३) अ) त्यांनी शहरात मुख्य धारेत यावे.
४) क) त्यांना तुमच्या वातानुकूलीत घरात आणून ठेवतो.
५) ड) ते आता कवीकडे बघतच नाहीत.
Comments
Post a Comment