Print Friendly and PDF e-contents Radhanagari College: मराठ्यांच्या इतिहासाची साधने

Monday, 10 May 2021

मराठ्यांच्या इतिहासाची साधने

 B.A.3 paper 15 

बी.ए.३ पेपर १५ Topic 1

मराठ्यांच्या इतिहासाची साधने

कोणताही इतिहास अभ्यासण्यासाठी अथवा लिहिण्यासाठी आवश्यकता असते ती साधनांची. साधनांचे मुख्यतः दोन प्रकार पडतात १. अस्सल साधने( प्राथमिक साधने) २. दुय्यम साधने

मराठ्यांचा इतिहास अभ्यासण्या साठी प्राथमिक साधने आपण पाहत असताना छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज राजाराम महाराज ताराबाई शाहू महाराज पेशवे इत्यादी ने दिलेली आज्ञापत्रे, वतन पत्रे, इनाम पत्रे, निवाडे इत्यादी कागदपत्रांचा आपणास अभ्यास करावा लागतो यामध्ये शासकीय अधिकाऱ्यांची पत्रे होत गोतसभा, ज्ञाती, ग्रामसभा यांची निवड इत्यादी कागदपत्रांचा आपणास विचार करावा लागतो इतिहासाचार्य राजवाड्यांनी मराठ्यांच्या इतिहासाच्या अभ्यासाची साधने प्रकाशित केली. एकूण २२ खंडांमध्ये त्यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधने प्रकाशित केली.  शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ताराबाई कालीन कागदपत्रे प्रकाशित करण्यात आले.

जेधे शकावली: ऐतिहासिक घटना लिहून ठेवण्याच्या प्रथा काही मराठी घराण्यांमध्ये होती त्यातील नोंदी अस्सल नोंदी आहेत जेधे करीना जेधे शकावली यामध्ये अनेक घटना नोंदी तारखा या अचूक आहेत. शिवाजी महाराजांची जन्म तिथी शके 1951 फाल्गुन वद्य तीन म्हणजेच १९ फेब्रुवारी १६३० ही नोंद याच शकावली वरून इतिहासकारांनी मांडणी केली आहे

आज्ञापत्र:.  रामचंद्रपंत अमात्य यांनी हा ग्रंथ १७१५ मध्ये लिहिला. शिवाजी महाराजांची राजनीती पुढील वारसांना उपयुक्त ठरावी म्हणून हा ग्रंथ रामचंद्र पंत अमात्य लिहिलेला यामध्ये नऊ प्रकरणे आहेत. राजा प्रधानमंडळ व्यापार सावकार वतने इनामदार वृत्ती किल्ले जंजिरे व आरमार यावर त्यांनी आपले विचार मांडले आहेत. 

बखरी :  सेक्स खबर या शब्दावरून बखर हा शब्द आला असावा दरबारातील वृत्त वार्तांकन व इतर सर्व प्रकारच्या खबरी म्हणजे माहिती यामध्ये लिहिलेले असत.

१). सभासद बखर.  कृष्णाजी अनंत सभासद यांनी राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत जिंजी या ठिकाणी इसवी सन १६९७ मध्ये याचे चे लिखाण केले. शिवाजी महाराजांच्या बद्दल सर्वात लवकर लिहिलेली ही बखर आहे.

२). ९१ कलमी बखर या बखरी मध्ये एकूण 91 कलमे आहेत मालोजीराजे यांच्या पासून शिवाजी महाराज यांच्या पर्यंतचा इतिहास यामध्ये कथन केलेला आहे दत्ताजी त्रिंबक वाकेनवीस यांनी ही बखर लिहिली असे इतिहासकारांचे मत आहे.

३).  चिटणीस बखर (सप्त प्रकरनात्मक  चरित्र).  मल्हार रामराव चिटणीस यांनी लिहिलेली सातारचे छत्रपती शाहू दुसरे यांच्या पदरी तो काम करत होता प्रथमतः विविध ज्ञानविस्तार या मासिकात प्रसिद्ध झाली माहितीच्या आधारावर लिहिलेली ही बखर आहे.

४) चित्रगुप्ताची बखर.   रघुनाथ यादव चित्रगुप्त यांनी ही बखर सभासद बखरी वर आधारित यांचे लिखाण झालेले आहे.

५). दलपत रायाची बखर . शिवाजी महाराजांच्या विरोधी पक्षांनी ही बखर लिहिलेली आहे विरोधकांचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल काय मत होते हे यातून आपणास अजमावता येते.

६).  शिवदिग्विजय बखर.   या बकरीचा कर्ता अज्ञात आहे इसवीसन १८१८ मध्ये ती लिहिली गेली नंदुरबारकर आणि दांडेकर यांनी या भाकरीचे संपादन केले आहे.

७).  मराठी साम्राज्याची छोटी बखर.  याही बकरीचा लेखक अज्ञात आहे इसवीसन अठराशे 17 मध्ये ही लिहिली असावी काव्येतीहास संग्रह या मासिकातून प्रसिद्ध झाली.

८). चिटणीस कृत संभाजी महाराज व राजाराम महाराज यांची बखर.    मल्हार रामराव चिटणीस यांनी या दोन बकरी लिहिल्या.

      वरील सर्व बखरी शिवचरित्रावर प्रकाश टाकतात व कलाकारांच्या लिखाणात स्थळ प्रसंग यात अनेक ठिकाणी गलती झालेले आहेत सर जदुनाथ सरकार यांनी बखरीला इतिहास निर्मितीसाठी दुय्यम मांडलेले आहे.

शिलालेख नाणी शिक्के इत्यादी

     नाणी, हत्यारे, शीलालेख इत्यादी ऐतिहासिक वस्तू मराठ्यांच्या इतिहासातील महत्त्वाची साधने आहेत. महाराष्ट्राच्या विविध भागात व विविध पुराणवस्तू संग्रहालयात या सर्व बाबी आपणास आढळून येतात.

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.

Human and animal communication

  Human and Animal communication            Language is a specific characteristic of human beings. Animals do not use language. Humans use l...