Print Friendly and PDF e-contents Radhanagari College: प्रश्नावली

Sunday, 30 May 2021

प्रश्नावली

 (Dhere V. D.)

B.A.III

Paper XVI

प्रश्नावली

  संशोधन प्रक्रियेमध्ये प्रश्नावली तंत्राला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. एखाद्या समस्येचा अभ्यास करण्यासाठी त्या समस्येबाबत माहिती मिळवण्यासाठी संशोधकांने तयार केलेल्या प्रश्नांच्या मालिकेस प्रश्नावली असे म्हणतात. एखादे समस्या विधान डोळ्यासमोर ठेवून संशोधक त्याची उत्तरे शोधण्यासाठी मोठी प्रश्नावली तयार करतो. या प्रश्नावली मध्ये जे प्रश्न असतात ते संशोधनाच्या कामासाठी उपयुक्त ठरतात. या प्रश्नावली मधून लोकांची मते समजावून घेतली जातात. राज्य शासन चालवताना कोणत्या अडचणी येतात याची माहिती शासनाला येऊ शकते. प्रश्नावली मधून संशोधक तत्कालीन परिस्थितीचे आकलन करून घेतो. प्रश्नावली चा वापर प्रामुख्याने आधुनिक काळातील विशेषतः समकालीन माहिती संकलित करण्यासाठी होतो. सामाजिक, आर्थिक व राजकीय विषयाच्या संशोधनामध्ये प्रश्नावली फार उपयुक्त असते. ज्या अभ्यास विषयातील व्यक्ती शिक्षित आहेत, प्रश्न ओळीतील प्रश्न समजतात, विचार करणाऱ्या व्यक्ती आहेत, प्रश्नावली तील प्रश्नांची लिखित उत्तरे देण्यात त्यांना कोणाची भीती वाटत नाही. अशा प्रकारच्या उत्तरदाते कडून माहिती घेण्यासाठी प्रश्नावली हे चांगले साधन आहे. उत्तरदात्याला लिखित प्रश्न विचारून त्याच्याकडून शाब्दिक व लिखित प्रतिक्रिया मिळवणे ही प्रश्नावली ची उद्दिष्टे आहेत.

      प्रश्नावली चे प्रकार

  सामाजिक संशोधन कोणत्या प्रकारचे आहे व उत्तर दात्याकडून नेमकी कोणत्या प्रकारची माहिती अपेक्षित आहे या आधारावर प्रश्नावलीचे अनेक प्रकार पडतात.



अ). संरचीत प्रश्नावली:-.

         या प्रकारची प्रश्नावली छापून पोस्टाने किंवा मुलाखत काळाबरोबर पाठवतो. संशोधक आपला विषय, हेतू, संशोधनाची व्याप्ती आणि खोली याचा विचार करून विचारावयाचे प्रश्न प्रश्नांचा क्रम निश्चित करतो. व त्यातच महत्त्वाची पर्यायी उत्तरे देतो. उत्तरदाते असे प्रश्न आपल्या पसंतीचे उत्तर  निवडण्यास सांगतो. काही प्रश्नांची उत्तरे संशोधकास स्पष्ट माहित नसतात किंवा त्याबाबत उत्तर दात्याकडून मते हवी असतात. ज्या प्रश्नांची पर्यायी उत्तरे दिलेली नसल्यास उत्तरदात्याकडून त्याच्या शब्दांमध्ये उत्तर देण्याचे स्वातंत्र्य दिलेले असते. अशा प्रश्नांना मुक्त किंवा अनावृत्त प्रश्न म्हणतात. प्रश्नाच्या व्यक्ती वरून प्रश्नाचे स्वरूप कसे असावे हे संशोधक ठरवतो खुल्या प्रश्नामुळे प्रत्येकाने वेगवेगळी उत्तरे दिल्याने प्रश्नाच्या उत्तराची वर्गीकरण करण्यामध्ये संशोधकांची कसोटी लागते. त्यासाठी जास्त वेळ खर्च होतो. तर बंदिस्त प्रश्नामुळे संशोधकांची वर्गीकरणाची काम कमी होऊन त्वरित निष्कर्ष काढता येतात.

        ब). असंरचित प्रश्नावली:-. 

    या प्रकारात या समस्येविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही, निश्चित प्रश्न किंवा पर्याय देता येत नाहीत, अशा वेळी असंरचित प्रश्नावली चा उपयोग होतो. उत्तर दात्याला अनुभव शब्दांकित करून त्यावरून निष्कर्ष काढून प्रश्न तयार करावे लागतात. अशा प्रश्नावली मध्ये उत्तरदात्यावरच जास्त जबाबदारी असते तर असंरचीत प्रश्नावलीत उत्तरे वेगवेगळी असू शकतात. त्यामुळे अनेक उत्तरदात्यानी दिलेल्या उत्तराची तुलना करणे अवघड जाते. समस्येबाबत प्राथमिक माहिती मिळवण्यासाठी ही प्रश्नावली उपयोगी ठरते.


आदर्श प्रश्नावलीचे स्वरूप:- 

१). प्रश्नावली तील प्रश्नांची लांबी क्रम व पर्यायी उत्तरे याबाबत काळजी घ्यावी.

२). प्रश्नावली चांगली तयार होण्यासाठी कौशल्य व अनुभव हवा.

३). ज प्रश्नावलीचे उत्तरे पोस्टामार्फत मिळवायचे असतील तर संशोधकाने विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

४). प्रश्न अचूक व काटेकोर शब्दात विचारावेत.

५). प्रश्न छोटे सोपे व सुटसुटीत असावेत.

६). पंधरा ते वीस मिनिटांमध्ये उत्तरे देऊ शकतील एवढेच प्रश्न असावेत.

७). प्रश्नांच्या उत्तराचे पर्याय असावेत असं तिच्या उतरल्याबरोबर अशी खूण करण्यास सांगावे.

८). प्रश्न वस्तुनिष्ठ असावेत.

९). प्रश्न सुसंगत असावेत.

१०). प्रश्नावली मध्ये खाजगी प्रश्न विचारताना शब्दांची निवड काळजीपूर्वक करावी.


प्रश्नावली तंत्र प्रभावी होण्यासाठी घ्यावयाची काळजी.

     अ. आवाहन:-. प्रश्नावली तयार केल्यानंतर उत्तरदात्याला आपल्या संशोधनाबद्दल थोडक्यात पण पूर्ण माहिती द्यावी. प्रश्नावली उत्तरदात्याकडे पाठवताना ती भरून परत पाठवणे बाबत विनंती करणारे आवाहन पत्र सोबत जोडावे. त्यात पुढील गोष्टी असाव्यात.

१). प्रश्नावली तयार केल्यानंतर ती भरून पाठवणे बाबत योग्य शब्दात विनंती करावी.

२). प्रश्नावली भरून मिळणारी माहिती गोपनीय ठेवावयाची असेल तर तसा स्पष्ट उल्लेख असावा.

३). प्रत्येक प्रश्नवली वर अनुक्रमांक असावा.


Dhere Sir, [19.05.21 14:42]

४). आवाहन व प्रश्नावली चांगल्या प्रतीच्या व योग्य आकाराच्या कागदावर आकर्षक पद्धतीने छा.

५). संशोधन करणारी व्यक्ती किंवा संस्था संशोधनाचा हेतू व विषय संशोधनात मिळणारी सरकारी मदत यांचा उल्लेख करावा.

६). प्रश्नावली सोबत तिकीट लावलेले पाकीट पाठवावे.

७). प्रश्नावली कशी भरावी किती वेळेत व कोणाकडे पाठवावी याचा स्पष्ट उल्लेख करावा.

      ब.. प्रश्नावली ची चाचणी:- 

      प्रश्नावली तयार केल्यानंतर ती प्रातिनिधिक स्वरुपात काही उत्तरदात्यानकडे पाठवून ती योग्य झाली आहे की नाही याची चाचणी घ्यावी. अशा चाचणीमुळे प्रश्नावली किती अचूक आहे? किती अचूक उत्तरे मिळतात? प्रश्नावलीत कोणत्या उणिवा आहेत? हे समजते.

      क.. प्रश्नावली ला मिळालेला प्रतिसाद:-. 


               जर २०% ते ३०% लोकांनी प्रश्नावली भरून पाठवल्यानंतर चांगला प्रतिसाद मिळाला असेल तर याहीपेक्षा चांगला प्रतिसाद मिळण्यासाठी खालील बाबीकडे अधिक लक्ष द्यावे.

 १).  केलेले आवाहन प्रभावी असावे.

२). ज्यांच्याकडून प्रश्नावली भरून आल्या नसतील त्यांना स्मरण पत्र पाठवून योग्य कालावधीत पाठवण्याची विनंती करावी.

३). प्रश्नावली साठी वापरलेला कागद त्याची छपाई ही उत्तर जात्याला प्रभावी करणारी असावी ज्यामुळे संशोधन कार्य करण्यास हातभार लावण्याची त्याची इच्छा होईल.


      प्रश्नावली चे गुण

  

  १).  प्रश्नावली ही संशोधकाच्या तटस्थ प्रतीचे निदर्शक असते त्यामुळे ती वस्तुनिष्ठ  असू शकते.

२). प्रश्नावली कोणी भरून पाठवली याचे नाव जाहीर न केल्याने वस्तुनिष्ठ माहिती मिळते व गुप्तता राखली जाते.

३). प्रश्नावली चे उत्तर पाठवलण्यावर संशोधकाचे प्रत्यक्ष दडपण नसते त्यामुळे व्यक्ती पूर्ण विचारांती प्रश्नावली भरते.

४). अतिशय कमी वेळेत बऱ्याच जणांना प्रश्नावली देऊन माहिती गोळा करता येते.

५). प्रश्न सुटसुटीत व उत्तरेही सुटसुटीत असल्याने वर्गीकरण करून मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करणे सोपे जाते.

६). व्यक्ती कितीही दूर असली तरी पोस्टाने प्रश्नावली पाठवून त्याच्याकडून माहिती मिळवता येते.

७). प्रश्नावली पोस्टाने पाठवावयाचे असल्याने मुलाखत करांना प्रवासासाठी निवेदक यांना भेटण्यासाठी लागणारा वेळ श्रम व पैसा यांची बचत होते.

८). उत्तरदाता स्वतःच्या घरी स्वतःच्या सवडीने विचार करून प्रश्नाचे उत्तर लिहित असल्याने वेळेचे व मुलाखत कराचे उपस्थितीचे दडपण त्याच्यावरून नसते.



       प्रश्नावली चे दोष:-. 

१). प्रश्नावली मध्ये उत्तरदात्याच्या उत्तरावर विश्वास ठेवावा लागतो त्याच्या उत्तरांची पडताळणी करण्याची संधी नसते.

२). उत्तरदातामध्ये पूर्वग्रहदूषित पण असेल तर वस्तुनिष्ठ माहिती मिळणे अशक्य असते.

३). प्रश्नावली मधील प्रश्नाचा अर्थ समजून घेण्याची कुवत उत्तरदात्यामध्ये असावी लागते.

४). प्रश्नावली पाठवल्यावर त्याची उत्तरे वेळेत मिळतील याची खात्री नसते कमी प्रतिसादामुळे अधिक व्यक्तींकडे प्रश्नावली पाठवावे लागतात.

५). पिक्चर प्रश्नावली छोटे व सुटसुटीत प्रश्न असतील तर त्याची योग्य उत्तरे मिळत नाहीत

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.

On His Blindness

  Introduction "On His Blindness" is a well-known sonnet written by John Milton.  John Milton is  a famous English poet. The poem...