बी. ए. भाग :३
अभ्यासक्रमपञिका १५
सञ :६
विभाग ३
मुद्रितशोधन. प्रमाणलेखन नियम-र्हस्व,दीर्घ
विषय प्राध्यापक प्रा बी के पाटील.
नियम ५: मराठीतील तत्सम इकारान्त आणि उकारान्त शब्द दीर्घान्त लिहावे
उदा. कवी,मती,गुरु
इतर शब्दांच्या अंती येणारा इकार व उकार दीर्घ लिहावा
उदा. पाटी,जादू, पैलू, विनंती
नियम ६:(दीर्घ) ईकारान्त व उकारान्त शब्दांतील उपान्त्य इकार व उकार र्हस्व लिहावे
उदा. गरिबी, माहिती, हुतुतू ,सुरू
अपवाद :नीती, भीती ,रीती कीर्ती इत्यादी दीर्घान्त झालेले तत्सम शब्द.
हाच नियम अकारान्त, एकारान्त व ओकारान्त शब्दांनाही लागू आहे.
उदा. खिळा, सुळा, पाहिले, मिरवतो इत्यादी.
नियम ७: अकारान्त शब्दांचे उपान्त्य इकार व उकार दीर्घ लिहावे
उदा. गरीब,वकील,वीट, सून, वसूल
अपवाद:र्हस्वोपान्त्य अकारान्थ तत्सम शब्द,
उदा, गुण, विष, मधुर, प्रचुर
या नियमानुसार अकारान्त शब्दांचे उपान्त्य इकार किंवा उकार दीर्घ लिहावयाचे आहेत
उदा. ठरीव ,भरीव,फकीर,हूरूप,फूल ,मूल,धूळ,कूळ ,सूर,पूर इत्यादी.
नियम८:उपान्त दीर्घ ई-ऊ असलेल्या शब्दांचा उपान्त्य ईकार-ऊकार उभयवचनी सामान्यरुपाच्या वेळी र्हस्व लिहावा
उदा. गरीबास, वकिलांना,सुनेला,वसुलीचा, नागपुरास
अपवाद:दीर्घोपान्त्य तत्सम शब्द
उदा. शरीरात,गीतेत, सूञास, जीवास
पुल्लिंग शब्दांच्या शेवटी असलेला'जा' सामान्यरुपात तसाच राहतो,(त्याचा'ज्या' होत नाही)
उदा.मांजा-मांजाने, गांजा-गांजाने, सांजा-सांजाची.
मधल्या अक्षरातील'क' किंवा'प' द्वित्व सामान्यरूपाच्या वेळी निघून जाते.
उदा. रक्कम-रकमेचा,तिप्पट-तिपटीने.
३)किरकोळ
नियम९: पूर हा ग्रामवाचक शब्द कोणत्याही ग्रामनामास लावताना दीर्घोपान्त्य लिहावा
उदा. -नागपूर, संबळपूर, तारापूर
संस्कृतात'शहर' या अर्थी'पूर' हा शब्द प्रचलित आहे. तोच मराठीत 'पूर' असा दीर्घोपान्त्य लिहिला जातो
मराठीतील उच्यारपद्धतीला हे धरून आहे. त्यामुळे गावांची नावे वरीलप्रमाणे लिहिण्यात यावीत.
नियम १०:
कोणता, एखादा ही रूपे लिहावी; कोणचा, एकादा ही रूपे लिहू नयेत
नियम११:
हळूहळू,मूळूमुळू,खुटूखुटू या शब्दांतील दुसरा स्वर व चौथा स्वर दीर्घ लिहावा. वरील शब्दांप्रमाणेच तसूतसू, झुंजूमुंजू. चिरीमिरी या सारख्या पुनरुक्त शब्दांतील ऊकार व ईकार मूळ घटक शब्दांमध्ये ते दीर्घ असल्याने दीर्घ लिहावे, परंतु पुनरुक्त शब्द नादानुकारी असतील तर ते उच्याराप्रमाणे र्हस्व लिहावे
उदा, लुटुलुटु,दुडुदुडु,रुणुझुणु
नियम १२:
एकारान्त नामाचे सामान्यरुप याकारान्त करावे.
उदा. करण्यासाठी,फडक्यांना, पाहण्याला
अशा रुपांऐवजी करणेसाठी,फडकेंना, पाहणेला यांसारखी एकारान्त सामान्यरूपे करू नयेत.
नियम१३:
लेखनात पाञाच्या किंवा वक्त्याच्या तोंडी बोलण्याची भाषा घालावी लागते, त्यावेळी तिचे स्वरूप बोलण्यातील उच्याराप्रमाणे असावे. अन्य प्रसंगी तसे लिहू नये.
नाटकात किंवा कथा-कादंबरीतील पाञांच्या तोंडी "असं केलं" "असं झालं" "मी म्हटलं" असे लिहिण्यास हरकत नाही.
नियम १४
क्कचित,कदाचित,अर्थात,अकस्मात, विद्वान असे रुढ झालेले तत्सम शब्द अकारान्त लिहावे.
इंग्रजी शब्द,पदव्या किंवा त्यांचे संक्षेप यांच्या शेवटचे अकारान्त अक्षर आता व्यंजनान्त (म्हणजे पायमोडके) लिहू नये
उदा वाटसन, बायरन,कीटस, एम एल सी! पीएच.डी इत्यादी.
नियम१५
केशवसुतपूर्वकालीन पद्य व विष्णुशास्ञी चिपळूणकर पूर्वकालीन गद्य यांतील उतारे छापताना ते मुळानुसार छापावे .तदनंतरचे लेखन मराठी साहित्य महामंडळाच्या प्रस्तुत लेखनविषयक नियमास अनुसरून छापावे
नियम१६
राहणे, पाहणे, वाहणे अशी रूपे वापरावी. रहाणे-राहाणे,पहाणे-पाहाणे, वहाणे-वाहाणे अशी रूपे वापरू नयेत
आज्ञार्थी प्रयोग करताना' राहा, पाहा,वाहा' यांजबरोबरच' रहा, पहा, वहा' ही रूपे वापरण्यास हरकत नाही,
नियम१७
इत्यादी व ही(अव्यय)हे शब्द दीर्घान्त लिहावे 'अन' हा शब्द व्यंजनान्त लिहावा'इत्यादी' हे अव्यय नसून विशेषण आहे. त्यामुळे ते दीर्घान्त लिहावे.
नियम१८
पद्यात वृत्ताचे बंधन पाळताना र्हस्व- दीर्घाच्या बाबतीत हे नियम काटेकोरपणे पाळता येणे शक्य नसल्यास कवीला तेवढ्यापुरते स्वातंञ्य असावे.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.