B.A.III Paper XV
मराठ्यांच्या इतिहासाची परकीय साधने.
इ. स.१८१० मध्ये स्कॉट बेरिंग या इंग्रजांनी मराठ्यांचा पहिला इतिहास लिहिला. यानंतर ग्रँड डफ यांनी History of The Marathas हा ग्रंथ लिहिला. यामध्ये आपण इंग्रजी भाषेतील साधने पाहणार आहोत.
१)..इंग्रजी साधने.
ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी भारतात आले या कंपनीने मुंबई मद्रास कलकत्ता सुरत राजापूर कारवार इत्यादी भागात व्यापारी वसाहती सुरू केल्या. कंपनीची मुंबई मद्रास कलकत्ता लंडन येथील दप्तर खाण्यात अनेक कागदपत्रे आहेत. शिवाजी महाराजांचे बरोबर इंग्रजांची असणारे संबंध व्यापारी व इतर युद्धविषयक राजनेतिक माहिती या कागदपत्रांतून आपणास मिळते लंडनमधील India Office येथील अनेक कागदपत्रांचे उतारे श्री बेंद्रे यांनी वापरलेल्या आहेत.
फॉरेन बायोग्रफिज ऑफ शिवाजी.
डॉ. सुरेंद्रनाथ सेन यांनी या ग्रंथाचे संपादन केले आहे. इंग्रज फ्रेंच पोर्तुगीज लेखकांनी शिवाजी महाराजांच्याबद्दल केलेल्या लिखाणाचा इंग्रजी अनुवाद डॉक्टर सेन यांनी प्रसिद्ध केला. इंग्रज डच फ्रेंच व्यापारी करार वकिलांची वृत्तान्त या बाबी यामध्ये आहेत.
२). पोर्तुगीज साधने.
वास्को द गामा या पोर्तुगीजांनी भारतात समुद्रमार्गे येऊन पहिल्यांदा व्यापारी प्रयत्न केले भारतात पोर्तुगीज आणि गोवा प्रथम जिंकला त्यापासून भारतीय राज्यकर्त्यांनी बरोबर जे करारमदार व्यवहार केले यासाठीची पोर्तुगीज साधने डॉ. पांडुरंग पिसूर्लेकर यांनी पोर्तुगीज मराठा संबंध या ग्रंथात एकत्रित केली आहेत. त्याचबरोबर पोर्तुगीज सरकारच्या पुराणवस्तू संशोधन विभागाचे अध्यक्ष श्री. ए. बी. श्री. ब्रांगास परेरा यांनी पोर्तुगीज कागदपत्रांचे अनेक खंड प्रकाशित केले आहेत त्यांचा मराठी अनुवाद महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि मराठ्यांच्या इतिहासाची साधने पोर्तुगीज दप्तर या नावाने दोन खंडात प्रकाशित केला आहे हा अनुवाद स. शं देसाई यांनी ताराबाई कालीन कागदपत्रे यातही अनुवादित केलेला आहे.
३). फ्रेंच व डच साधने
पॅरिस व लंडन येथील दप्तर खाण्यात मराठ्यांच्या इतिहासाची साधने आहेत फ्रेंच व्यापाऱ्यांनी मायदेशी पाठविलेली पत्रे राजे सेनापती यांनी त्यांना लिहिलेली पत्रे इत्यादींचा उल्लेख आपणास यात दिसतो मार्टिन या फ्रेंच गव्हर्नर यांनी दिलेली रोजनिशी हीसुद्धा यात आहे या रोजी निशीचे भाषांतर सर जदुनाथ सरकार यांनी केले आहे.डॉ. हतळकर यांनी Relations between the French and the Marathas ( 1668 -1815) ग्रंथाली इंग्रज पोर्तुगीज यांच्या तुलनेने देशांचा मराठ्यांची फार कमी संबंध झाला तरीही काही कागदपत्रे आपणास मिळतात.डॉ. बाळकृष्ण यांनी Shivaji the Great या ग्रंथात चौथ्या खंडात दज रेकॉर्डचा बराच उपयोग केलेला आहे.
परकीय प्रवाशांच्या वृत्तांत.
१) जॉन फ्रायर. सन १६७२ ते १६८१ या काळात हा ईस्ट इंडिया कंपनीचा सर्जन होता महाराष्ट्रातील अनेक ठिकाणांना त्यांनी भेटी दिल्या शिवछत्रपतींचा राज्याभिषेक प्रसंगी हजर होता. त्याने लिहिलेल्या Travels in India in the Seventeenth century यात छत्रपती शिवाजी महाराज व संभाजीराजे यांचे अनेक उल्लेख आढळतात.
२). निकोलस मनूची. मनोज हा इटालियन प्रवासी वयाच्या सतराव्या वर्षी इसवी सन १६५६ मध्ये भारतात आला आणि तो १७१७ मध्ये भारतात मरण पावला. त्याने औरंगजेब पोर्तुगीज इंग्रज यांच्या नोकरी केलेल्या त्यांनी जे अनुभवले ऐकले त्याचा वृत्तांत त्याने Stotia Do Megor अर्थात मोगलांचा इतिहास हा ग्रंथ लिहिला विल्यम आयर्विन यांनी या ग्रंथाचे इंग्रजी भाषांतर केले तर महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने असे होते मुघल हे मराठीत भाषांतरित केले.
३). विल्यम नॉरीस. हा इंग्लंडच्या राजाप्रमाणे होता ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला भारतात सवलती मिळाल्या म्हणून इंग्लंडच्या राजाने नोरीस याला मुगल बादशहा कडे पाठवले. तो औरंगाबाद शहागड ब्रह्मपुरी मीरज पन्हाळा इत्यादी ठिकाणी थांबला त्याने तत्कालीन संरक्षण व्यवस्था भ्रष्टाचार इत्यादी बाबतीत सविस्तर लिहिले आहे.
४). अबे कॅरे. हा फ्रेंच प्रवासी होता सन १६६८ मध्ये भारतातला सुरत,चौल, राजापूर इत्यादी ठिकाणी त्यांनी भेटी दिल्या छत्रपती शिवाजीराजे व संभाजीराजे यांच्या अनेक हकीकती त्यांनी लिहून ठेवलेले आहेत.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने विखुरलेली आहेत . संभाजी राजांच्या मृत्यूनंतर जेव्हा औरंगजेबाने रायगड जिंकला तेव्हा तेथील सर्व कागदपत्रे नष्ट करण्यात आली. त्यामुळे शिवकाळातील मराठ्यांच्या इतिहासाची साधने संख्येने कमी आहेत . पण पेशवेकाळातील भरपूर कागदपत्रे आपणास सापडतात.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.